विकिस्रोत:प्रचालक

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

प्रचालक, अथवा प्रचालक म्हणजे विकिस्रोतवरील असे सदस्य ज्यांना विकिस्रोतच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात. विकिस्रोतवर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिस्रोत वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिस्रोतच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी सांभाळत असतात व ते विकिमीडिया फाऊंडेशनचे कर्मचारी नसतात.

विकिस्रोतच्या सुरवातीच्या दिवसांत, सर्व सदस्यांना प्रचालकाचे अधिकार दिले जात होते आणि आत्तासुद्धा ते तसेच असायला हवे होते. सुरवातीपासूनच असा विचार मांडण्यात आला होता की प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच असावेत. विकिस्रोतचा सर्वसाधारण निर्वाह हा कुणीही (अगदी नोंदणी न केलेला सदस्य सुद्धा) करू शकतो. फक्त अशा काही क्रिया ज्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास खूप त्रासदायक ठरू शकतात अशा क्रियांचे अधिकार हे प्रचालकांना दिले जातात. प्रचालकांना दिली जाणारी कार्ये ही तांत्रिक प्रकारची असल्याने कुठल्याही प्रकारे अधिकार देत नाहीत.

प्रचालक हे विकिस्रोतचे जुने संपादक असल्याने, नवीन सदस्यांना मदत करण्याचे काम त्यांच्यावर येऊन पडते. साधारणपणे प्रचालकांनी कुठल्याही चर्चेमध्ये (अथवा वादामध्ये) स्वत: तटस्थ राहून इतरांना मदत करणे अपेक्षित असते.

प्रचालकांची कामे - प्रचालकांना निवेदन - प्रचालकांची यादी - प्रचालकपदासाठी विनंती

प्रचालकांचे अधिकार[संपादन]

विकी प्रणाली मध्ये काही विशिष्ट क्रिया अशा आहेत ज्या सर्वांना करता येत नाहीत. या मध्ये पाने वगळणे, पानांची सुरक्षा पातळी बदलणे, सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे अथवा देणे (ब्लॉक व अनब्लॉक) या क्रियांचा समावेश होतो. तसेच मिडियाविकिचे प्रणाली संदेश बदलणे व विशेष पृष्ठे संपादित करणे ह्या क्रियासुद्धा प्रचालकांनाच करता येतात.

प्रचालकांच्या सर्व कार्यांची यादी विकिस्रोत:प्रचालक/कामे इथे दिलेली आहे.

प्रचालकपद[संपादन]

मोठी गोष्ट नाही[संपादन]

मराठी विकिस्रोतवर प्रचालक बनणे ही मोठी गोष्ट नाही आहे. प्रचालकांनी इतर सदस्यांची मदत करणे तसेच विकिस्रोतवर स्वच्छतेची (clean-up) कामे करणे अपेक्षित असते. विकिस्रोतची स्थापना करणारे जिमी वेल्स यांचे या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे आहेत.

साचा:Cquote

प्रचालक बनण्यासाठी[संपादन]

साचा:मुख्य लेख साचा:मुख्य लेख प्रचालक बनण्यासाठी तुम्ही काही काळ विकिस्रोतवर योगदान केलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रचालक बनू इच्छित असाल तर प्रचालकपदाची मागणी प्रचालकपदासाठी अर्ज इथे नोंदवू शकता. आपल्या मागणीवर इतर प्रचालक तसेच सदस्य आपआछपले विचार तसेच कौल मांडतील. जर सर्वानुमते आपणांस प्रचालक पद द्यायचे निश्वित झाले तर एखादा प्रशासक आपणांस प्रचालक अधिकार देईल.

अत्यवस्थता
हे जरूर वाचा!
जर आपणांस प्रचालक पद मिळाले, तर मिळालेल्या अधिकारांचा सुयोग्य वापर करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर राहील. तुम्ही कुठलीही कृती करत असताना कायम लक्षात ठेवले पाहिजे की मी करत असलेली कृती ही विकिस्रोतच्या नीतीनुसार आहे की नाही, तसेच ह्या कृतीचे परीणाम जाणून घेतलेले आहेत की नाहीत. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केल्यास तुमचे प्रचालकपद रद्द होऊ शकते याची नोंद घ्या.

प्रचालकांचा वावर[संपादन]

प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच आहेत. तरीसुद्धा काही विशिष्ट ठिकाणी प्रचालकांचे अनुकरण इतरांनी करावे अशी अपेक्षा असते. प्रचालकांनी उत्तम संपर्क साधणे आवश्यक असते.

प्रचालकांनी खालील गोष्टी टाळाव्यात:

 • अधिकारांचा गैरवापर (उदा. सूचना न देता - लेख वगळणे, सदस्यांना ब्लॉक / अनब्लॉक करणे, इ.)
 • विकिस्रोत नीतीचे उल्लंघन (उदा. एखाद्या सदस्याला लक्ष्य बनविणे, गोपनियता नीतीचे उल्लंघन, इ.)
 • परत परत चुकीचे निर्णय देणे
 • अधिकारांशी खेळणे (उदा. एखाद्या सदस्याने अथवा प्रचालकाने एखादी कृती उलटविली तर चर्चा न करता पुन्हा ती कृती करणे, इ.)
 • संपर्कात कसूर करणे
 • चुकीच्या उद्देशाने प्रचालन करणे
 • इत्यादी

प्रचालकांची मदत कुठे होऊ शकते[संपादन]

खालील बाबींमध्ये विशेषत: प्रचालकांची मदत होऊ शकते.

प्रचालकपदाचा गैरवापर[संपादन]

जर एखाद्या सदस्याच्या असे निदर्शनास आले की एखाद्या प्रचालकाने त्याच्या पदाचा गैरवापर केलेला आहे, तर त्या सदस्याने ही गोष्ट त्या प्रचालकांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करावा. तरीही जर सहमती मिळाली नाही तर ही बाब प्रशासकांच्या नजरेत आणून द्यावी.

अधिकारांचा गैरवापर[संपादन]

अधिकारांचा गैरवापर करणे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. प्रचालनाचे अधिकार हे फक्त काही आदरणीय सदस्यांनाच दिले जातात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर हा योग्य प्रकारे करणे अपेक्षित आहे.

काही बाबी ज्यामध्ये अधिकारांचा वापर टाळावा:

 • विचारांमध्ये मतभेद - जर एखाद्या लेखात दिलेल्या माहितीमध्ये मतभेद असतील, व प्रचालकांनी जर त्या लेखात योगदान दिलेले असेल तर मतभेद टाळण्यासाठी प्रचालकांचे अधिकार वापरण्याचे टाळावे.
 • नीती - जर एखाद्या नीतीनुसार प्रचालकांचे अधिकार वापरण्यास बंदी असेल, तर अधिकार वापरू नयेत
 • रद्द केलेली कृती पुन्हा करणे - अधिक माहितीसाठी खालील परिच्छेद पहा

जर एखाद्या विशिष्ट बाबींमध्ये प्रचालकांचे अधिकार वापरावेत का नाही याची शंका आली तर दुसर्या् प्रचालकाशी संपर्क करून त्याला ती कृती करण्यास सांगावे.

रद्द केलेली कृती पुन्हा करणे[संपादन]

जर तुम्ही केलेली कृती दुसऱ्या प्रचालकांने रद्द केली तर चर्चा न करता ती कृती पुन्हा करणे कुठल्याही परिस्थितीत टाळावे. तसेच एखाद्या प्रचालकाने केलेली कृती रद्द करतानासुद्धा त्या प्रचालकाशी संपर्क करणे अपेक्षित आहे.

अपवाद[संपादन]

दुसऱ्या प्रचालकांनी केलेल्या क्रिया उलटविण्यासाठी खालील अपवाद आहेत.

 • एखादा लेख अथवा चित्र वगळल्यास, व तो लेख अथवा चित्र योग्य असल्यास
 • वगळलेली वैयक्तिक माहिती दुसऱ्या प्रचालकाने पुन्हा पूर्वस्थितीत आणल्यास
 • एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ज्यामध्ये एखादी क्रिया केल्याने काही अडचणी उद्भवल्यास
 • एखाद्या लेखाची सुरक्षितता पातळी बदलल्यास व तो लेख उत्पात करणाऱ्यांचे लक्ष्य असल्यास

प्रचालकपद रद्द करणे[संपादन]

जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार फक्त प्रतिपालकांनाच असतात.

प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.

सुरक्षितता[संपादन]

प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द अतिशय गुप्त ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यांना एका संपादनात संपूर्ण संकेतस्थळावर परीणाम करता येऊ शकतो. याच कारणास्तव प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द इतरांना सांगणे धोकादायक ठरू शकते.

हेही पाहा[संपादन]

विकिस्रोत प्रचालकांच्यापुढे विकिस्रोत प्रशासक पुढे विकिस्रोत प्रतिपालक अशी पदावली असते.