वनस्पतिविचार/पेशी, सजीवतत्व व केंद्र

विकिस्रोत कडून

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ४७
-----
प्रकरण ७ वें.
---------------
पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).
---------------

 पेशी–ताज्या ताडीचा एक थेंब सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहिला असतां त्यामध्ये पुष्कळ लहान लहान वर्तुलाकृति पदार्थ आहेत असे आढळेल. प्रत्येक लहान वर्तुळ म्हणजे एक स्वतंत्र पेशी होय. पूर्वी वर्णन केलेली किण्व (Yeast) नांवाची वनस्पती हीच होय. प्रत्येक वर्तुळांत वर्तुळाचा बाह्य पडदा, केंद्र व केंद्रासभोवती जीवनकण हीं स्पष्ट दिसतात. वर्तुळांत दोन प्रकारचे पदार्थ आढळतात. सचेतन व जड ( Living and dead ). सजीव तत्त्व (Protoplasm) किंवा त्याचे सुटे कण तसेच तेथील केंद्र (nucleus) हे सचेतन पदार्थ आहेत.

 वर्तुळाचा बाह्य पडदा व आंतील द्रवादि पदार्थ हे मात्र जड ( dead ) आहेत. जमिनीतील निरिंद्रिय द्रव्ये जशीच्यातशी पेशीमध्ये येऊ शकत नाहींत. ती द्रव्ये प्रथम पाण्यात विरघळतात; नंतर ते पाणी जेव्हा पेशीमध्ये शोषिले जाते, त्याबरोबर ती विरघळलेली द्रव्ये आत शिरतात. जसे जसे जास्त पाणी पेशीमध्ये शिरते, तशी तशी ती पेशी जास्त फुगू लागते. प्रथम कांहीं वेळ ते पाणी जीवनरसामध्ये मिसळून जीवन रस पातळ होऊ लागतो; पण ही स्थिति फार वेळ टिकणे शक्य नसते. पाणी जास्त झाल्यामुळे तसेच जीवन रस अधिकाधिक पातळ झाल्यामुळे, ते पाणी पेशींत विशिष्ट जागी सांठविले जाते. त्या विशिष्ट जागेस जडस्थानें । Vacuoles ) म्हणतात. जडस्थानामध्ये निरिंद्रियद्रव्य मिश्रित शोषिलेले पाणी जमून सजीव तत्त्व बाह्यांगाकडे जाते. ह्या पाण्यास पेशीरस ( Cell Sap) म्हणतात.

 पेशीस बाह्य पडदा असणे अवश्य नसते. कांहीं पेशीमध्ये नुसतें जरूर तेवढे सजीव तत्त्व असून बाह्य पडदा नसतो. पण पुढे ते तत्त्व आपलें घटकदुव्यांतून बाह्य पडदा अगर पेशी-भीत्तिका (Cell wall ) उत्पन्न करते. पेशी कशी असते याविषयी चांगली कल्पना येण्याकरिता आपण मधमाशीच्या पोळ्याचे व नारिंगाचे उदाहरण घेऊ, मधमाशीची प्रत्येक कोठडी दुसऱ्या

४८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
कोठडीस जशा चिकटलेली असते व अशा अनेक कोठड्या मिळून एक पोळे झालेले असते, तद्वतच अनेक पेशींची मिळून एक वनस्पति बनलेली असते. अथवा नारिंगें सोलून आंतील मधूर बलक उघडा केला असतां लहान लहान रसमय गठड्या एकमेकांस चिकटलेल्या आढळतात. पैकी एका गठडीची जी आपली कल्पना असते, तीच पेशीसंबंधाने लागू पडते.

 सजीव तत्व (Protoplasm):-पेशीचा मुख्य मालक आंतील सजीव तत्त्व (Protoplasm ) असून या तत्त्वामुळे पेशींत चलनवलनादि खेळ दृष्टीस पडतात. नवीन अन्न शोषण करणे, बाहेरील निरिंद्रिय द्रव्ये पोटांत घेणे व त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनविणे, श्वासोच्छवास करणे, वगैरे क्रिया सजीव तत्त्वामुळे घडतात, सजीवतत्त्वाची घटक द्रव्ये, कारबन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फास्फरस ही आहेत. ती द्रव्ये कोणत्या बरोबर प्रमाणांत परस्पराशी संयोग पावली आहेत, हे निश्चित ठरविता येणार नाही. कारण पृथक्करणाचे वेळीं सजीव तत्त्व मृत होते, व मृत स्थितीमधील पृथक्करण खरे नाहीं. चैतन्यस्थिति गेल्यावर कदाचित त्यामध्ये पुष्कळ रासायनिक फरक होत असतील अथवा चैतन्याचे अभावी त्यांतील एखादें तत्त्व नाहीसे होऊन तें पृथक्करण खरे समजता येणार नाहीं. वरील घटकावयवें सजीव तत्त्वाची न समजतां मृत जड तत्त्वाची आहेत असे समजावे.

 पेशीभित्तिका:--(Celliwall) मधासारखे जाड, पातळ ना घट्ट असे मध्यम प्रकारचे द्रवात्मक चैतन्यशक्ति सजीवत्व पेशीभित्तिकेंत असते. पेशीभित्तिकेचे घटक सत्त्वासारखे असतात. सहा भाग कारबन्, दहा भाग हैड्रोजन व पांच भाग ऑक्सिजन, अशा प्रमाणांत घटक पेशीभित्तिकेंत आढळतात.कापसाचे केसांत जी घटक द्रव्ये आढळतात, तीच द्रव्यें पेशी भित्तिकेमध्ये असतात. पेशी भित्तिका सजीव तत्त्वापासून पातळ पडद्यासारखी बाहेरील बाजूस बनत जाते. सजीव तत्त्वाच्या चैतन्य शक्तीमुळे नवीन नवीन कण बाह्य पडद्याच्या सूक्ष्म रंधांत जाऊन बसतात. जसे जसे जास्त कण पडद्यामध्ये जमतील तसतशी पडदा अगर भित्तिका जाड होते.

 पेशीभित्तिकेंत पाणी कमी अधिक असते. त्यासंबंधी निरनिराळी मते आहेत. प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रवेत्ता नगिली ह्याचे असे म्हणणे आहे की, पेशीघटक द्रव्ये साखरेच्या कणाप्रमाणे चौकोनी, वाटोळी, त्रिकोणी, वगैरे आकाराची

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ४९
-----
असून प्रत्येक सूक्ष्म कणासभोंवती पाण्याचा थेंब असतो. स्ट्रासबरगर साहेब म्हणतो की, पेशीभित्तिकेची घटकद्रव्ये जाळ्यासारखी जणू एकमेकांत गुंतली असून मधल्या सुट्या जागेत पाण्याचे थेंब अगर कण राहतात. अलिकडील शोधांत असे ठरत आहे की, भित्तिकेचे घटकावयव सजीव कणांनी वेष्टित असून त्यांत पाण्याचा अंतर्भाव होतो. नवीन शोधाप्रमाणे भित्तिका सुरवातीस सजीव असून पुढे त्यांतील सजीव तत्व हळूहळू नाहींसें होते, व त्याबरोबर भित्तिकाही मृत होते. अशा वेळेस भित्तिकेस कायमचे स्वरूप प्राप्त होते,

 भित्तिकेच्या घटक द्रव्यांत व सत्वा ( Starch ) च्या घटक द्रव्यांत फारसा फरक नसतो. सत्त्वाच्या घटक द्रव्यापेक्षां पहिल्या द्रव्यावर अधिक कार्य घडून त्यांच्या शक्तीत थोडा फरक होतो. आयडीनचा थेंब सत्त्वाचे कणावर टाकिला असतां कणास निळा रंग येतो, पण तोच थेंब पेशीघटकावयवावर पाडला असता त्यास निळा रंग येत नाही. निळा रंग त्यास आणावयाचा असेल तर प्रथम गंधकाम्ल त्यावर सोडून नंतर काही वेळाने आयडीनचा थेंब सोडावा, म्हणजे तात्काल पेशीभित्तिकेस निळा रंग येईल. बाकी घटक प्रमाण दोन्हीचे सारखेच असते.

 सजीव तत्त्वाच्या चैतन्यशक्तीमुळे भित्तिका वाढू लागते ही गोष्ट खरी, तथापि ती सर्व बाजूस सारखी वाढते असे नाहीं. पेशीची वाढ अंतरघडामोडीमुळे कमी अधिक होते. तसेच बाह्य परिस्थितीचा परिणाम पेशीच्या आकारावर होतो. चौकोनी, वाटोळे, किरणाकृति, त्रिकोनी, चौकोनी वगैरे आकार पेशीमध्ये आढळतात. पेशींची वाढ सुरू झाल्यावर सजीव तत्व आंतून बाह्यांगाकडे निरनिराळ्या प्रमाणांत कणांचे थरावरथर पाठवत राहिल्याने आंतील जाडी कमी अधिक मोठी होते. तसेच ज्या आकारांत ते कण जमत जातात, त्या प्रकारचा आकार पेशीच्या आतील बाजूस तयार होईल. या रीतीने फिरकीदार ( Spiral) वळ्यासारखे (Annular) वगैरे आकार उत्पन्न होतात. कधी कधी जागजागीं मोठे थर जमून मध्यभागी खांचा राहतात. असल्या पेशीस खांचेदार (Pitted) म्हणतात. असल्या कमी अधिक जाडीच्या निरनिराळ्या आकाराच्या पेशीपासून ज्या वाहिन्या (Vessels ) तयार होतात त्यास तोच आकार येतो, हे निराळे सांगावयास नको. सुरूच्या लाकडांत खांचेदार पेशी व वाहिन्या पुष्कळ असतात.

५०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
शोषित अनेंद्रिय ( Inorganic ) द्रव्यांपैकी पुष्कळवेळां कांहीं द्रव्यें पेशीस निरुपयोगी असतात, त्यापासून सेंद्रिय पदार्थ वनस्पति बनवीत नाहीत, अथवा अन्नद्रव्याप्रमाणे त्यांचा उपयोग करीत नाहीत, असली द्रव्ये खरोखर पेशीबाहेर टाकिली पाहिजेत. पण वनस्पतींत अशी निराळी योजना नसते की, ज्यायोगाने असल्या त्याज्य वस्तु सहज बाहेर टाकितां येतील. ह्मणून असल्या निरुपयोगी वस्तू पेशी भित्तिकेमध्ये सांठविल्या जाऊन वेळ आली ह्यणजे भित्तिका झडून जाते व त्याबरोबर त्या बाहेर टाकल्या जातात. तृणजातीच्या वनस्पतीमध्ये पानांत नेहमी चमकणाऱ्या वाळूचे कणसूक्ष्म आढळतात. रबर, पिंपळ, वड वगैरे वनस्पतीत पानाच्या उपरी (बाह्य) त्वचेत (Epidermis) असली निरिंद्रिय द्रव्ये आढळतात. बिगोनियाची पाने, कांद्याच्या पाती वगैरेमध्ये हीं निरिंद्रिय द्रव्ये निरनिराळ्या आकृतींत आढळतात. एकंदरीत पेशभित्तिका केवळ साध्या सात्विक घटक द्रव्याची नसून त्यांत वरील प्रकारची निरिंद्रिय द्रव्ये सांपडतात.

 केद्र:—(Nucleus) केंद्राचा आकार सजावत्वापेक्षां स्पष्ट असून केंद्रद्रव्यें जीवनकणासारखी असतात, केंद्रामध्ये केंद्रबिंदू (Nucleolus ) असतो, केंद्रद्रव्यांत फॉस्फरसयुक्त कांही कण आढळतात. त्या कणास पेशीचे मेंदुस्थान समजण्यांत येते. जेव्हां पेशीमध्ये पाणी अधिक झाल्यावर जडस्थाने तयार होऊ लागतात, त्यावेळेस केंद्र आपले मूळचे स्थान सोडून बाजूस जाते. जीवनकण परिघाकडील बाजूस चिकटून राहतात. केंद्राचा व जीवनकणांचा संबंध बारिक तंतूमधून असतो. हे तंतू जीवनकणांचे बनले असून जडस्थानास (Vacuole) टेंका देण्यास उपयोगी पडतात.

 सजीवतत्त्वांचे कण भित्तिका तयार करण्यांत अथवा ती मोठी वाढविण्यांत खर्चिले जाऊन त्याबरोबर शोषित द्रव्यापासून नवीन सजीव कण उत्पन्न होत असतात. पेशी पूर्ण वाढल्यावर आंतील सजीव तत्व कमी होते व शेवटी ती मृतप्राय होते, मृत होण्यापूर्वी नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यामध्ये पूर्ववत चैतन्यशक्ति येते. जुन्या पेशीचे काम फार दिवस सजीव प्रकारचे नसते, कायम स्वरूप प्राप्त झाल्यावर पेशीच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या पेशीस आधार व संयोगशक्ति ह्याशिवाय दुसरे कार्य त्याकडून होत नाहीं. अथवा रसाची नेआण करणे वगैरे कामाकरितां कांही दिवस उपयोगी पडतात. पण पुढे ह्या कामा-

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५१
-----
सही त्या पेशी निरुपयोगी होतात, व हळुहळू गळू लागतात. जुन्या पेशींतून प्रथम प्रथम रस जात येत असतो खरा, पण अगदी जुन्या पेशी मृत असल्यामुळे त्या गळून जरी पडल्या तरी वनस्पतीच्या संसारयात्रेत कोणताही फरक पडत नाहीं. मोठमोठ्या वृक्षाच्या ढोलीत सर्व पेशीसंघ मृत असतो, तरी बाहेरील बाजू सजीव असूनही रोजचे व्यवहार चालू असतात.  रंजित शरीरे:-( Chloroplasts ) सजीवतत्त्वामध्ये विशिष्ट कार्य घडून त्यापासून रंजित शरीरे तयार होतात. ह्या शरीरांकडून विशिष्ट काय घडत असल्यामुळे वनस्पतीच्या जीवनयात्रेत ह्यांची उपयुक्तता फारच महत्त्वाची असते. पेशीतील केंद्र ज्या सजीव तत्त्वांचे बनले असते, तशाच प्रकारचे तत्त्व असल्या शरीरांत आढळते. सजीवतत्त्वापासून हरिद्वर्ण पदार्थ ( Chlorophyll ) उत्पन्न होऊन त्यासभोंवतीं सजीव कण जमतात, व पुढे त्यापासून हरिद्वर्ण शरीर ( Chloroplast ) उत्पन्न होते. अशा प्रकारची पांढरी अथवा इतर रंजित शरीरें वनस्पति पेशींत आढळतात. सूर्यप्रकाशांत पांढऱ्या अगर इतर रंगाच्या शरीरांपासून अंधारांत फिकट रंगाची शरीरें उत्पन्न होतात. ह्मणजे शरीराचे रंग बदलण्यास प्रकाश पुष्कळ अशी कारणीभूत होतो यांत संशय नाहीं. उन्हाळ्यांत कोवळ्या पानांत तांबूस रंगाची शरीरे असून पुढे ती हरितवर्णी शरीरें बनतात. ह्याचे कारण केवळ प्रकाश आहे. जितका हरिद्वर्ण पदार्थ पानामध्ये अथवा वनस्पति शरीरांत अधिक असतो, तितक्या प्रमाणांत तो वनस्पतीस जास्त उपयोगी पडतो. ह्मणूनच ज्या वनस्पतीमध्ये पुष्कळ सतेज हिरवी पाने असतील ती वनस्पति आरोग्यदृष्ट्या उत्तम आहे, असे समजण्यांत येते. तसेच उलटपक्षी ज्या वनस्पतीमध्ये अस्सल हरित वर्णाचे ऐवजी फिकट रंग आढळतो, त्या वनस्पतीचे आरोग्य क्षयरोग्याप्रमाणे रोग लागून बिघडले आहे, असे समजावे. लवकर उपाय जर न होतील तर ती वनस्पति मृत होईल. फुलांच्या पाकळ्यांत तांबडा, पिवळा, गुलाबी वगैरे रंग आढळतात, हे रंग त्या रंजित् शरीरांपासून अलग करितां येतात, आलकोहलमध्ये हिरवी पानें ठेविली असतां पानांतील हरित वर्ण पदार्थ ( chlorophyll ) अलग होऊन आलकोहलचे बुडाशी जमतो. तसँच बाष्पीभवन करून शुद्ध केलेल्या पाण्यांत पाकळ्या ठेविल्यावर त्यांचा रंग सुटून अलग होतो.

५२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 चलनादि धर्म:—सजीवतत्त्व नेहमी चलनस्थितीत असते असे ह्मणण्यास हरकत नाही. पुष्कळ वेळा सूक्ष्मदर्शक यंत्रांतून अथवा साध्या डोळ्यांना सजीवतत्त्वाची चलनशक्ति दिसत नाही, म्हणून ते चलनस्थितीत नसते, असें अनुमान काढणे बरोबर होणार नाहीं. जडस्थानांतून ( Vacuoles) निरिंद्रिय पदार्थ काढून त्यापासून जीवनकण तयार करणे, तसेच घटकावयवांतून पेशीभित्तिका उत्पन्न करणे, अथवा पेशी विभाग करून पेशीजाल (Tissue } बनविणे, वगैरे गोष्टी ज्या पाहण्यात येतात, त्यावरून सजीवतत्त्वाच्या चंचल स्वभावाची साक्ष चांगली पटते. कित्येक वेळां जीवनकण इकडून तिकडे धांवतांना चांगले स्पष्ट दिसतात. लालघांस अथवा ट्रेडेसकॅनशिया नांवाच्या वनस्पतींत ही चलनशक्ति चांगली स्पष्ट दिसते. ट्रेडेसकॅनशिया फुलांचे पुंकेसरावरील केंस चिमटीने उपटून काचेच्या तुकड्यावर सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्याकरितां ठेवावेत, पाण्याचा थेंब त्यावर सोडून पातळ काचेची झांकणी ( Cover slip ) आंत हवा न राहील अशा बेताने ठेवावी. प्रत्येक केंस दोनपासून पांच पेशींचा बनलेला आढळतो. गुलाबी रंगाचा पेशीरस केंसामध्ये थोडा दिसतो. सजीव तत्त्वाचे कण सारखे इकडून तिकडे पेशीच्या परिघाकडील भागांत धांवतांना दृष्टीस पडतात. एवढेच नव्हे, तर ते कण एका पेशींतून दुसऱ्या पेशींत ही जात येत असतात पेशीची भित्तिका छिद्रमय असल्यामुळे त्यांतून जीवनकण खाली वर येत असतात. जर दोन पेशींमधील पडदा छिद्रमय नसता, तर जीवनकण एका पेशींतून दुसऱ्या पेशींत जाणे शक्य झाले नसते. पेशी जुनी होत चालला असतां मध्यपडदाही त्या मानाने जाड होतो, व जेव्हां तो पडदा चांगला जाड होईल, त्यावेळेस पेशींतील परस्पर अंतरचलनादि क्रिया बंद पडतात. पाण्यात आढळणाऱ्या वनस्पतिमध्ये विशेषेकरून ही चलनक्रिया पाहण्यास अधिक सांपडते. जसे, व्हॅलिंसिनेरिया वगैरे. जमिनीवर हवेत वाढणा-या वनस्पतीमध्ये सजीव तत्वाची चलनशक्ति स्पष्ट दिसत नसते, तथापि जोपर्यंत सचेतन वस्तू वनस्पतीमध्ये आहेत, तोपर्यंत अंतरसुक्ष्मचलनादि क्रिया नेहमी सुरू असल्याच पाहिजेत.

 क्षुद्र वनस्पतीमध्ये चलनशक्ति दोन प्रकारची असते. काहीं पेशीस सजीव तत्त्वाच्या चलनशक्तीमुळे गती मिळून त्या पेशी आपली मूळ जागा सोडून

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५३
-----
पुढे सरकतात. अशा वेळेस त्यापासून बारीक केंसासारखे भाग ( Cilia ) उत्पन्न होऊन ते वल्ह्याप्रमाणे पेशींस पाण्यांतून जातांना उपयोगी पडतात, कांहीं ठिकाणी पेशीस स्थलांतर करण्यासारखी गति न मिळतां पेशीपासून जरूरीच्या प्रसंगी केंस बाहेर उत्पन्न होतात, व पुनः ते केस पेशींत परत घेतां येतात. केंस आवरून धरणे अथवा बाहेर सोडणे, हे त्याच्या मर्जीप्रमाणे तसेच जरूरीप्रमाणे घडत असते. अशा प्रकारची सूक्ष्मगती क्षुद्रवर्गीय प्राण्यामध्येसुद्धा आढळते. जसे, अमिबा प्राणि आणि एकपेशीमय वनस्पति ह्यांचा परस्पर भेद ओळखणे मोठे कठीण असते.

 सजीवतत्त्व आपल्या चैतन्य शक्तीमुळे केवळ सचेतन शरीरें उत्पन्न करिते. एवढेच नव्हे तर शोषित निरिंद्रिय द्रव्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करणे हे काम सारखे सुरू असते. निरिंद्रिय पदार्थ प्रत्येक सजीव पेशींत थोडे बहुत प्रमाणांत आढळतातच. हे सेंद्रिय पदार्थ निरनिराळ्या घनतेचे असून निरनिराळ्या रीतीनें आपआपलेपरी वनस्पतीस उपयोगी पडतात. कांहीं अडचणीचे प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणून वनस्पति त्यांचा साठा आपले शरीरांत निर्भय जागी करितात. मुळे, खोड, पाने अथवा बीजे, ही साधारणपणे वनस्पतीची सोईप्रमाणे अन्न सांठवण करून ठेवण्याची कोठारे आहेत.

 पेशी द्रव्यें:–ह्या सेंद्रिय द्रव्यांत कांहीं द्रव्ये नेहमीं पेशी रसामध्ये विरघळून त्याशी एकजीव झाली असतात, व कांहीं द्रव्य न विरघळतां पेशीमध्ये अलग राहतात. ह्या न विरघळणाऱ्या पदार्थाचाच बहुतकरून सांठा केला असतो. कारण तात्काल उपयोगी पडणाऱ्या व विरघळणाऱ्या पदाथांपासून सजीव तत्व जीवन कण तयार करते, व त्यापासून पेशीभित्तिका अगर पेशींरचना घटत जाते. साखर, सेंद्रिय आम्ले, त्यांचे क्षार, नायट्रोजनयुक्त शरीरे वगैरे पदार्थ तात्काल उपयोगी पडणारे असून पेशी रसांत सहज विरघळतात. बहुतकरून ते विरघळलेल्या स्थितीत असतात. सत्व, तेल, टॅॅनिन, कांहीं विशिष्ट रंग वगैरे पदार्थ दुसऱ्या वर्गापैकी आहेत. पैकी सत्व, चरबी व तेल हें विशेष महत्त्वाचे आहेत. साधारणपणे ते सर्व पेशींमध्ये आढळतात. मात्र त्याचे प्रमाण निरनिराळ्या वनस्पतींमध्ये निराळे असते. सत्त्वाची घटकद्रव्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन आहेत, हे पूर्वी सांगितलेच आहे. पेशी घटकद्रव्ये

५४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
( Cellulose) व सत्त्वाची घटकद्रव्ये ह्यांमधील फरक आयोडीनने ओळखिता येतो.

 बटाटे, रताळी, गहू, तांदूळ, डाळ वगैरेमध्ये सत्त्व पुष्कळ असते. सत्त्वाचे सूक्ष्म कण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असता एका मध्यबिंदूसभोंवतीं थरावर थर वाढलेले दृष्टीस पडतात. मग मध्यबिंदु मध्यभागी असो वा कोपऱ्याकडे असो, हा विशेष मुद्दा नाहीं. सत्व सूर्यप्रकाशांत सजीव हरिद्रंंजित ( Chloroplasts ) शरीराकडून तयार होते. कार्बनवायु हवेतून सूर्यप्रकाशांत हरिद्रंंजित शरीराकडून शोषिला जातो. कार्बनवायु पाण्याशी मिसळून कार्बन आम्ल बनते व पुढे त्याचे विघटीकरण होऊन शोषित पदार्थांशी मिसळल्यामुळे सात्त्विक पदार्थ तयार होतात.

 वनस्पतींच्या पानांमध्ये सेंद्रिय सत्त्व उत्पन्न होते खरे, पण तेथे फार वेळ टिकत नाही. जर पुष्कळ सत्त्व पानांमध्ये राहते तर त्यायोगे पाने खेचून भरली असती व असे होता होतां नवीन सत्व उत्पन्न होण्यास जागा न राहती. म्हणूनच त्यावर पाचक आम्लाची क्रिया होऊन ते सत्त्व विरघळून पेशीरसाशी एकजीव होते. यामुळे पेशीरसाबरोबर ते इकडून तिकडे वनस्पतिशरीरांत खेळले जाते. वनस्पतीच्या शरीरांत आंतील खोल भागीं सचेतन शुभ्रवर्णी शरीरें (Leucoplasts) असतात, त्यांचा परिणाम त्या विरघळेलेल्या सात्त्विक पदार्थांवर होऊन पुनः त्यांचे अद्राव्य सत्त्व बनते, व ते वाटेल त्या जागी येणेप्रमाणे सांठविता येते. जेथे जेथे वनस्पतीस ते सत्व सांठविण्याचे असते, तेथे प्रथम पेशीरसाबरोबर साखरेच्या द्राव्य स्थितीत ते पोहोंचते, नंतर शुभ्रवर्णी शरीर द्राव्य स्थितीतून त्यास न विरघळणारे पूर्वीप्रमाणे स्वरूप देतात. न विरघळगाच्या स्थितीत त्यास स्थलांतर करण्यास अडचण पडते, म्हणून पाचक आम्लाची विरघळविण्यास जरूरी असते.

 कांहीं ठिकाणीं सत्त्वाच्या उत्पत्तीस सचेतन हरिद्वर्ण शरीरांची जरूरी नसून सजीव तत्त्व आपल्या चैतन्यशक्तीने सत्त्वांची उत्पत्ति करिते. कमळाच्या परागवाहिनींत ( Style ) सत्त्वाचे कण उत्पन्न होतात. ह्यांची उत्पत्ति सजीवतत्त्व करीत असते. नायट्रोजनयुक्त न विरघळणारी द्रव्ये बीजांमध्ये कमी-अधिक प्रमाणांत नेहमी सांपडतात. त्यांचे कण लहान-मोठे

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५५
-----
असून, कणास निरनिराळे आकार येतात. एरंडीच्या बीजाचें टरफल काढून आंतील पांढऱ्या पदार्थांचा वस्त्र्याने पातळ भाग कापून सुक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरिता तयार करावा. पाण्याचे थेंबा ऐवजी ग्लिसरीनचा थेंब त्या पातळ भागांवर सोडावा व सुक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहण्यास सुरुवात करावी.पेशीमध्ये त्रिकोनी अथवा चतुष्कोनी कण आढळतात व त्यांजवळच वाटोळे कण असतात. ह्या त्रिकोनी किंवा चतुष्कोनी शरीरांत नायट्रोजन युक्त द्रव्ये असतात, पण वाटोळे कण नायट्रोजनयुक्त नसून फॉस्फेट अथवा मॅग्नेशियमचे निंरिद्रिय पदार्थ मिश्र असतात.

 बीजांमध्ये सात्विक पदार्थाबरोबरच नायट्रोजनयुक्त शरीरे (Proteids ) थोडीबहुत असतात. त्यांस कधी विशिष्ट आकार येतो, अथवा साधारणपणे वाटोळ्या स्थितीत नेहमी आढळतात.

 सात्विक व नायट्रोजनयुक्त शरीराबरोबरच पुष्कळ बीजांमध्ये तेल आढळते. गळिताची बीजे म्हणून जी प्रसिद्ध असतात, त्यांत नेहमी तेलाचा साठा असतो. जसे, करडई, शिरस, भुयमूग, तीळ, वगैरे.

 तेलाचा सांठा केवळ बीजांमध्येच असतो असें नाहीं. पानांमध्ये अथवा फुलांतील पाकळ्यांमध्येसुद्धा तेलाचा अंश असतो. लिंबू अथवा युकॅलिप्टसूची पाने बोटांनी चुरडली असतां एक प्रकारचा विशिष्ट वास त्यांपासून येतो. हा वास पानांतील उडणाऱ्या तेलाचा होय. गुलहौसी लोक सुवासिक अत्तरे व तेलें जी वापरतात, त्यांचा उगम पानांतील अगर फुलांतील तैलोत्पादक पिंडजालापासून होतो. तज्ञ लोक भट्टया चढवून सुवासिक पानांचा व फुलांचा व्यावहारिक फायदा करून घेतात.

 पेशीरसामध्ये इन्युलिन ( Innulin ) नांवाचा सेंद्रिय पदार्थ विरघळून त्याशी एकजीव झाला असतो. डॅॅहलिया वनस्पतीचे मूळ काही दिवस अलकोहलमध्ये ठेवून पुढे सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये त्याचा पातळ भाग पाहिला असतां इन्युलिनचा साखा पेशीरसापासून अलग होऊन त्याच्या स्फटिकाकृती दिसतात.

 निरिंद्रिय द्रव्येसुद्धां पुष्कळ वेळां पानांमध्ये एकत्र होऊन त्यांस निरनिराळ्या आकृति येतात. ह्या द्रव्यांचा वनस्पतीशरीरपोषणास फारसा उपयोग नसतो. पाने व साली गळून पडल्या असतां त्यांबरोबर हे पदार्थ आपोआप गळून

५६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
जातात. प्राणिवर्गास गुदद्वारांवाटे विष्ठेत, मूत्राबरोबर, घामांत अथवा श्वासोश्वास क्रियेंत निरुपयोगी त्याज्य पदार्थ बाहेर टाकितां येतात; पण अशी सोय वनस्पतिशरीरांत नसल्यामुळे ह्या रीतीने ते पदार्थ टाकणे भाग पडते.

 केंद्र:-पेशीच्या प्राथमिक स्थितीत सुद्धा तिच्या आकारमानानें केंद्र मोठे असते. पेशी वाढू लागली असतां तीबरोबर ते वाढत नाहीं. बहुतेक केंद्र पूर्वीसारखेंच असते. पेशींत केंद्र असणे हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. केंद्रामध्ये सुट्ठां चलनशक्ति असते. कारण केंद्र आपले मूळस्थान बदलीत असते. केंद्राची घटकद्रव्यें सजीव तत्त्वासारखीच असून ती त्यापेक्षा अधिक घन असतात; ह्यामुळे केंद्र स्पष्ट ओळखता येते. केंद्रासभोंवतीं सजीव कण असतात,

 पेशी विभाग:-एक पेशी किती मोठी वाढली,तथापि त्यापासून वृक्ष थोडाच बनू शकेल ? व्यक्ति मात्र पेशी वाढणे ज्याप्रमाणे जरूर आहे, तद्वतच पेशींची संख्या अधिक वाढणे अत्यंत जरूरीचे आहे. पेशींची संख्या वाढून जेव्हा पुष्कळ पेशी-जालें (Tissues) बनतील त्यावेळेस कदाचित मोठे वृक्ष बनण्याचा संभव असतो. वृक्षांची वाढ पेशींच्या नवीन वाढीवर अवलंबून असते. ह्या वाढीस अन्न, पाणी, हवा, तसेच सूर्यप्रकाश इतक्या गोष्टींची आवश्यकता असते. बीज पेरून त्यांतील गुप्त सजीव तत्त्व जागृत झाल्यावर पुढे त्याच्या चैतन्य शक्तीनें नवीन पेशी उत्पन्न होतात. नवीन उत्पन्न झालेल्या पेशींपासून पेशीविभाग होऊन त्याच्या लाखों पेशी तयार होतात. येणेप्रमाणे बीजापासून तयार होणा-या रोपड्यास कालगतीने वृक्षासारखे मोठे स्वरूप प्राप्त होते.

 पेशींची वर्धकशक्ति प्राथमिक स्थितीत अधिक असते, नवी पेशी उत्पन्न होण्याचे प्रकार पुष्कळ तऱ्हेचे असतात. शिवाय नवीन पेशीं उत्पन्न होऊन सगळ्या एकाच जीवाकरितां अन्नग्रहणादि क्रिया करीत राहतील, तर एक वनस्पति वाढत जाते असे म्हणता येईल. पण जेथे नवीन पेशी उत्पन्न होऊन प्रत्येक स्वतंत्र रीतीने आपला जीवनक्रम चालवू लागते, त्या ठिकाणी निराळ्या व्यक्तींची उत्पत्ती होत असते. बीजापासून मोठी वनस्पति तयार होणे म्हणजे लाखों नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यांचा संघ एकाच वनस्पतींत एकवटून राहणे होय. तसेंच एक जीव कायम राखणे व त्या जिवाच्या जीवनाकरितां सारखी खटपट करणे, हा उद्देश त्या सर्व पेशीसंघाचा असतो; पण किण्व (Yeast)

७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५७
-----
वनस्पतीपासून नवीन पेशी जेव्हा तयार होते, त्यावेळेस पेशींच्या वाढीमुळे दोन वेगळ्या व्यक्ति उत्पन्न होतात. अशा ठिकाणी पेशींची संख्या वाढणे अगर पेशी द्विधा होणे म्हणजे नवीन व्यक्ती तयार होणे होय. जेव्हां पेशी द्विधा होण्याचा समय येतो, तेव्हां केंद्रामध्ये विशेष फरक दिसू लागतात. केंद्रांतील भाग व केंद्रबिंदु ( Nucleolus ) ह्यांत गड़बड होऊन केंद्र केवळ सरसरीत जीवन कणांनी भरून जाते. पुढे कोष्ट्याच्या घरातील सूत गुंडाळण्याकरितां जें डबल त्रिकोणाकृति अवजार असते, त्या प्रकारचा आकार केंद्रास येतो; अथवा इंग्रजी मूळाक्षरापैकी दोन 'व्ही ' मूळाक्षरे एकमेकांस उलटी चिकटून जो आकार दिसतो, त्याच प्रकारची आकृति केंद्रास विभाग सुरू झाला असतां येते. ह्या आकृतींत सूक्ष्म जीवनतंतू बुडाकडून अग्राकडे गेलेले दृष्टीस पड़तात. तंतूंच्या मध्य भागीं अधिक कण जमत गेल्यामुळे तो भाग हळुहळु जाड होत जातो. हा जाड भाग केंद्र द्विधा करणारा मध्यपडदा होय. हा पडदा दोन्ही बाजूस वाढत वाढत पेशीभित्तिकेस पोहचतो व त्या योगाने ती पेशी पूर्णपणे द्विधा होते, पूर्ण विभाग होण्यापूर्वी केंद्राची दोन शकलें झालेली असतात. पैकी एक एक केंद्र प्रत्येक पेशींत दिसू लागते.

 एक पेशीच्या दोन पेशी होण्यास मूळ पेशीची जरूरी असते. तसेच मूळ केंद्राशिवाय नवीन केंद्र उत्पन्न होत नाही. वनस्पतीच्या वाढत्या कोंबावरील पेशी झपाट्याने द्विधा होऊन शेकडों नवीन पेशी अस्तित्वात येतात व त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. पेशीच्या कोवळ्या स्थितीत द्विधा होण्याची शक्ति अधिक असून त्यांचे सजीवतत्त्व ताजे व तरतरीत असल्यामुळे अधिक चंचल असते. ही चंचल स्थिति पेशी विभागास अधिक सोईची असते.

 साधारण नियम असा आहे की, प्रथम केंद्राचा विभाग होऊन नंतर पडदा मध्यभागी वाढून पेशीविभाग पूर्ण होतो. ह्या नियमास कधी कधी अपवादही सांपडतात; असो, क्षुद्र वनस्पतीमध्ये पडदा प्रथम तयार होऊन नंतर केंद्रोत्पत्ति होते.

 कधीं कधीं पेशींतील केंद्राचे वारंवार पुष्कळ विभाग होऊन ती सर्व त्या पेशीत कांहीं काल राहतात. नंतर ती बाहेर पडून त्यापासून अनेक स्वतंत्र पेशी

५८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
तयार होतात. बाहेर पडल्यावर केंद्रासभोंवतीं पेशीभित्तिका तयार होते. क्षुद्र वनस्पतीमध्ये ह्या रीतीने पुष्कळ वेळां उत्पत्ति होते.

 उच्चवर्गामध्ये फुलांतील गर्भकोशांत ( Embryo sac ) गर्भस्थापना झाल्यावर गर्भाकरितां अन्नाची सोय होऊ लागते. अन्न उत्पन्न करणाच्या पेशीमध्येसुद्धा ह्याचप्रकारे पुष्कळ वेळां केंद्र द्विधा होते. फुलामध्ये परागवाहिनींत ( Style ) परागकण गेल्यावर त्याच्या पोषणाकरितां पेशीविभाग ह्या रीतीनेच होतात.

 वरील प्रकाराहून आणखी एका रीतीने नवीन पेशी उत्पन्न होते. ही पेशी उत्पन्न होण्यास दोन पेशीची जरूरी असते. या प्रकारांत पेशींची संख्या न वाढतां उलटपक्षी कमी होते. फुलांतील दोन जननपेशींचा मिलाफ होऊन त्यांपासून एकच पेशी बनते. परागनळीतून पुंतत्वपेशी अंडाशयांत (Embryo) शिरून बीजकोशामध्ये ( Embryo Sac ) असणाऱ्या गर्भाण्डपेशाशी एकजीव होऊन गर्भधारणा घडून येते. मात्र ही उत्पन्न झालेली पेशी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ति असते. हे विसरता कामा नये. गर्भ अगर बीज उत्पन्न होणे, हे स्त्रीपुरुषतत्वसंयोगाचा परिणाम होय.

 कधी कधीं क्षुद्र वनस्पतींमध्ये जननपेशी कांहीं काल विश्रांतिस्थितीत असतांना जीवनकण संकुचित होतात व चलनवलनादि क्रिया बंद होतात. जागृतावस्था प्राप्त झाल्याबरोबर पुनः पूर्ववत् सर्व क्रिया सुरू होतात. सजीवतत्व जागृत झाल्यानंतर ते मूळ पेशी सोडून दुसरी पेशी तयार करते, व त्या नवीन पेशीमध्ये जीवनकण, सचेतन शरीरे इत्यादि उत्पन्न करून आपले व्यवहार पूर्ववत् चालू करते. ह्या प्रकारांत मूळ पेशी मृत होऊन त्यापासून दुसरी तयार होते, व पेशींची संख्या न वाढता पूर्वीइतकीच कायम राहते. येथे सजीवतत्त्व कहीं काल स्वस्थ पडून पुनः तरुण होते. ह्यामुळे ह्या प्रकारास ' तरुणावस्थेत शिरणे ' अगर तरुण होणे Rejuvenescence हे नांव यथार्य आहे.

 कळी सोडणे:-Budding; स्वतंत्र केंद्रे एका पेशींत उत्पन्न करून केंद्रागणित एक एक व्यक्ति तयार होणे Free cell formation तरुण होणे (Rejuvenescence) व तसेच स्त्री-पुरुषसंयोगामुळे गर्भधारणा होणे,
८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ५९
-----
Fertilization हे सर्व प्रकार वनस्पतीच्या उत्पत्तीसंबंधाचे आहेत. ह्याप्रकाराने वनस्पतीच्या निराळ्या व्यक्ति उत्पन्न होतात. ह्या चार प्रकारांव्यतिरिक्त जो प्रथम पेशीविभाग प्रकार सांगितला, त्यायोगाने मात्र पेशींची संख्या अधिक होऊन शरीरवर्धन होते. अथवा वनस्पति लहानाची मोठी होते. बाकी इतर प्रकारांमुळे व्यक्ति संख्या अधिक होते. पेशीविभागाचे योगानें पेशींची संख्या अधिक होऊन त्या व्यक्तींची शरीरवाढ पूर्ण होते.
---------------