महाबळेश्वर/पांचगणीं.

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchपांचगणी.
---------------

 हें ठिकाण महाबळेश्वर आणि वांई यांच्या बहुतेक मध्यावर आहे. तथापि हवापाण्यासंबंधानें हे प्रति महाबळेश्वरच आहे. पुण्याहून महाबळेश्वरीं येतांना वाटेनें या गांवांतूनच यावें लागतें. महाबळेश्वरपेक्षां याची उंची २०० फूट कमी आहे. महाबळेश्वर डोंगराची जी शाखा वांई बावधनपर्यत जाऊन पसरली आहे त्या शाखेवर तांबडे मातीच्या जमिनीचा जेथें शेवट होतो त्या ठिकाणावर अर्ध मैलाच्या अंतरांत दोन खेडेगांवें आहेत त्यांपैकीं पूर्वेकडील गांवाचे नांव धांडेघर व पश्चिमेकडील बाजूस सपाटीवर आहे तें पांचगणी. हे गांव महाबळेश्वरापेक्षा सखलांत असल्यामुळे महाबळेश्वरचा कहरी पाऊस व धुके यांचा या गांवावर भडिमार होत नाही. हा कहरी पाऊस उत्तर व दक्षिण आंगच्या डोंगरांकडे पांगून गेल्यामुळे पांचगणीचा चांगला बचाव होतो. यामुळे पांचगणीला खुशाल बारा महिने राहिलें तरी नकोसें वाटत नाहीं. पूर्व बाजुनेंहीं डोंगराचें उच्च नाकाड आलें असल्यामुळे थंडीच्या दिवसांतील पूर्वाभिमुख वाराही महाबळेश्वराप्रमाणें येथें आंगाला झोंबल्यासारखा लागत नाहीं.

 पांचगणी येथील वसाहत होण्यास जान चेस साहेबांनी पहिल्यानें हिय्या करून परिश्रम केले त्यांचे चांगलें सार्थक झालें. या स्थानाची उंची ४३७८ फूट आहे. येथील जमीन व हवा मनुष्यांस व समशीतोष्ण कटिबंधांत होणाऱ्या फळझाडांस फार चांगली आहे असें यांनीं सन १८५४ सालापासून स्वानुभवाने खात्री करून घेऊन लोकांच्या प्रतीतीस आणिल्यावर सन १८६२ साल पावेतों साहेबलोकांची ६ घरें येथें झालीं आणि लागलींच याचवर्षी सरकारांतूनही मदत म्हणून सालींना २००० रूपयांची नेमणूक येथील स्वच्छतेच्या व्यवस्थेकरितां चालू झाली. जान चेससाहेबालाच पहिले आनररी सुपरिंटेंडेंट व माजिस्त्रेट करून त्यांच्या गळ्यांत सर्व व्यवस्था पाहण्याचें सर बार्टल फ्रियरसाहेब यांनीं घातलें. येथें राहणाऱ्या लोकांस महाबळेश्वरपेक्षां येवढीच कमतरता आहे कीं त्यांस बाहेर फिरून पाहण्यास रम्य ठिकाणें नाहींत. येथून पूर्वपश्चिम पसरलेल्या कृष्णाखोऱ्याची भव्य शोभा दिसते. किनाऱ्यावरून ठिकठिकाणींं गांवें आहेत त्यांतील घरांच्या व झोपडयांच्या लहान लहान समुच्चयांचे तुकडे तुकडे, भोंवतालच्या झाडीतून व पिकांतून ओसाड भगदाडे किंवा खांडवे पडल्यासारखीं दिसतात. नदीच्या पाण्याचीं वळणे हिरव्या गार पिकांतून कृष्णसर्प शांतपणानें पसरल्याप्रमाणें वाटतात. दक्षिण अंगास तर छोटेखानी पण याहीपेक्षां प्रेक्षणीय मजा दिसते.

 पांचगणीच्या जमिनीच्या अंतर्यामी उष्णता उत्पन्न करणारीं द्रव्यें आहेत. यामुळे डोंगरकांठच्या खडकाचे तळाशीं खोदलें असतां त्याठिकाणींं धुमसत असलेला अंतरंग वन्हि एकदम थंड होऊन बुडबुडे आल्यासारखे वाटतात. जवळ धांडेघर गांव आहे तेथें पाणी चांगलें असून तेथून काळे दगड, पांढरें रस्ते वगैरे सर्व देसुरी हवापाण्याचीं चिन्हें लागतात. हा गांव लहान वस्तीचा आहे. येथें शंकराचें देऊळ आहे. त्यांत पाण्याची उत्तम सोय आहे. येथें रस्त्यावर घोडयाचा टप्पा मेल कंट्राक्टर यांचा आहे. पांचगणीच्या मातींतही लोहांश मिश्रित आहे. परंतु जमिनीच्या आंगीं महाबळेश्वराप्रमाणें मोखरपणा नाहीं. पाण्याचा तळ लौकर लागतो व जमिनीत विहीर करण्यास खडकाचा धरही लागतों असें जरी आहे तरी हुकमी पाणी लागेलच असा भरंवसा नसतो. यामुळे गोडीला व गारपणाला जरी महाबळेश्वरच्या मासल्याचें पाणी येथें आहे, तरी तें मनमुराद मिळत नाही. येथें फक्त ३ सार्वजनिक झरे आहेत. बाकीचे लोकांच्या खाजगत जमिनींत सापडल्यामुळे त्यांबद्दल विशेष माहिती देण्याचें कारण नाहीं. या तिहींपैकीं बारा महिने भरपूर पाणी असणारा झरा उत्तरेस जरा खालीं उतरून गेलें ह्मणजे लागतो. त्याला कडें बांधून काढलें असून त्यांस मराठ्यांची विहीर असे ह्मणेतात. यास सरकारांने अलीकडे ३५३ रु. खर्च करून चांगले दुरूस्त केले आहे.  पांचगणी हे हवा खाण्याचे ठिकाण या दृष्टीने पाहिले असतां चांगले आहे. हवामान वर्षभर सुखासमाधानाने राहण्यासारखे आहे. येथील हवा थंड असून पाचक आहे, परंतु थोडी रुक्ष आहे. येथेही फिरावयास जाण्यायेण्याच्या वाटा असून पाइंटासारख्या जागा केलेल्या आहेत. त्या सिडणी पाइंट व टेबलल्यांड ह्या होत. ही दोन ठिकाणे फिरण्यास जाण्यासारखी आहेत. अलीकडे गांवाच्या मागील अंगास डोंगरांचे शिखर आहे त्या लगतउंचावर मोठी दगडी ताल घालून खेळण्याची पैस जागा केली आहे. त्या ठिकाणी सायंकाळचे सुमारास लोक खेळण्याकरितां जमतात. ही स्टेशन फंडाने तयार केली आहे.

व्यवस्था.

 येथील लोकसंख्या सुमारे ७००।८०० आहे. त्यांत नेटिव ६०० असून साहेब लोक १००।१५० आहेत. येथील सर्व अधिकार सुपरिटेंडेंट साहेबाला आहेत. त्यांची योग्य बजावणी होऊन लोकांस नीट स्वच्छता ठेवण्याची दहशत असावी ह्मणून त्यांस दुसरा वर्ग माजिस्त्रेटचा अधिकार फौजदारी कामासंबंधानेही दिला आहे. येथें पोलीस आफिसर असून शिपाई वगैरे मिळून १५ लोक सुमारें असतात. हें स्थळ महाबळेश्वर सुपरिंटेंडेटचे देखरेखीखालीं असतें. लोकांच्या खाजगी बंगल्याशिवाय सार्वजनिक उपयोगी अशा इमारती आहेत त्या, सुपरिंटेंडटचें आफिस, रहदारी बंगला, हॉटेल, लायब्ररी, पोष्ट आणि तारआफिस, हिंदूची सरकारी मराठी शाळा, यहुदि व साहेब लोकांच्या मुलांची सरकारी मदत मिळालेली इंग्रजी शाळा, दवाखाना, माकेंट आणि ३० नोकरांस राहण्यासाठी कोठडया वगैरे इमारती आहत. पैकी ३ मात्र सरकारी पैशानें बांधिलेल्या आहेत. येथील रहदारी बंगला हवा तेवढा मोठा असून त्याला स्वयंपाकघर, नोकर लोकांच्या व पाकनिष्पत्ति करणाऱ्यांच्या कोठडया आणि तबेला वगैरे इमारती जोडल्या आहेत. या बंगल्यांत महाबळेश्वरचे सफरीस निघालेले साहेब लोक मुक्काम करितात; किंवा कोणी पारशी किंवा गोरे लोक हॉटेलला उदार आश्रय देतात. येथील हायस्कूलचा शिक्षणक्रम पाद्री मंडळीच्या कमिटीने चालविला आहे. सन १८७६ मध्ये सुमूहर्तावर याची स्थापना झाल्यावर, १८८० मध्ये मुंबईच्या मुख्य पाद्री साहेबांनी यास थोडे उत्तेजन देऊन सुधारणा केली. तूर्त खाणावळ खाऊन पगारी गोरे व पारशी जातीचे विद्यार्थी या शाळेत पढत असतात. या इंग्रजी शाळेच्या इमारतीला सन १८८४ साली ४०x१८ ची एक कोठडी नवीन बांधून जोडावी लागली त्यास २६०० रू. खर्च आला. रविवारी शाळेस सुटी असल्यामुळे देवाची प्रार्थना करण्यास कित्येक खिस्ती लोक येथेच जमतात. डोंगरमाथ्यावरील उच्च ठिकाणच्या गार हवेत साहेब लोकाच्या मुलांना शिकण्यास ठेवण्याची कायमची एवढीच शाळा आहे. ज्यांना आपली मुले विलायतेस केवळ शिक्षणाकरितां पाठविण्याचे सामर्थ्य नसेल किंवा ती आपल्या डोळ्यापुढे असून वरचेवर भेटावीत असे वाटत असेल त्यांना हे हायस्कूल ह्मणजे एक अलभ्य वस्तूच सांपडली असें ह्मणण्यास हरकत नाही. कारण, मनुष्याच्या शरीरसुखास मुख्य जी हवा ती येथें मनास सदासर्वदा उल्हसित ठेवणारी असल्यामुळे, शिक्षणक्रमाचा धोशा कसा दुधांत साखर घातल्याप्रमाणे मनःपूर्वक चालला असतो. येथील वसाहतीचें सालीना उत्पन्न सरकारी मदत २००० रु० ची धरून बहुतेक खर्चाच्या बेताचेंच आहे.

 येथील व्यवस्था चांगली चालली आहे. हल्लीं येथें यूरोपियन व पार्शी लोकांचे एकंदर बंगले सुमारे ५०|६० आहेत.

नरसरी.

थंडहवेंत होणारीं परदेशचीं झाडें, वनस्पति, बटाटे, सपताळू, निवडुंग आणि ल्बॅकबेरी व इतर मूळ झाडे वगैरे येथे तयार करण्याची खटपट चाललेली असते, ती वांया जात नाहीं. कारण पांचगणीच्या काफीची लंडनच्या दलालांनीं तर चांगलीच तारीफ केली. तसेंच मधुर सुवास असलेली हेलिआट्रोप व मर्टलची फुलें येथें जंगलांत पुष्कळ होतात. ब्रायरचीं फुलें सगळ्या हिंदुस्थानांत दुर्मिळ तीं येथें तयार होतात. वांईहून घाट चढून येणाऱ्या रखरखीनें त्रस्त झालेल्या पथिकास येथील दुतर्फा कुंपणांच्या पुष्पगुच्छांचा शृंगार पाहून त्याच्या मनास खचीतच समाधान वाटतें. हे फुलांचे झुपके कुंपणावरून इतके दाट असतात कीं ते गुलाबाच्या फुलाच्या मुद्दाम माळा करून पसरल्या प्रमाणें दिसतात. एकेका झुपक्यांत पन्नास पन्नास फुलें दृष्टी पडणें ह्यणजे कांहीं सामान्य गोष्ट नाहीं आणि असे झुपके पाहून मनास सानंद आश्चर्य वाटणें अगदीं साहजिक आहे. सर्व ऋतुकाळीं रम्य दिसून ही सुंदर पांचगणी आगष्ट व सपटंबर महिन्यांत तर सौंदर्याची कमालच करून सोडिते. यावेळीं लहानझुडपे, बटरकप, रानवाटाणा यांनीं रान अगदीं शृंगारून गेलेलें असतें. सपाट जाग्यावर हरळी, मखमाल व इतर प्रकारचें गवत उगवून हिरवागार गालीच्या पसरल्यासारखा दिसतो.

 बाहेरून महाबळेश्वरीं आलेले लोक मे अखेर पावसाळा लागतां लागतां आपुलें सामान पाठवून डांकेच्या जंत्रींत नांवें नोंदून वाहन मिळण्याचा नंबर येईपर्यत गडबडीत गडबड करून येथें उभाउभी येऊन जातील तर त्यांना याही ठिकाणचा मासला कळून येईल. या वेळीं येथें वळवाचे पाऊस, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून वाऱ्याचीं वावटळे येऊन तिसरे प्रहरीं पडण्यास लागतात. खरा पावसाळा देशावर सुरू झाल्यापासून आठ दिवसांनीं ह्मणजे अर्धामूर्धा जून महिना ढकलतो इतक्यांत चोहींकडून झोडपीत दक्षिण बाजूनें आरंभ करितो आणि सारखा रात्रंदिवस पाणी ओतावयास लागतो. हा चमत्कारही मुक्काम जास्त वाढविल्यास पाहण्यास मिळतो.

------------

 गाड्याचे टपे-महाबळेश्वर, घांडेघर, वांई, जोश्याची विहीर, शिरगांव, वाठार ही घोडे बदलण्याची कंट्राक्टर याचीं ठिकाणें आहेत.

समाप्त.
सूचिपत्र ( जंत्री.)
---------------
उतार ६२ कलह
उपाध्या ३३ कन्यागती १३
एको पाइंट १९३ क्लेश ६६
एलफिन्स्टन १७१ कष्ट ११३
एलफिन्स्टन तलाव ७१ कृत्रिम ६०
ओघ १२ कऱ्हाड १४
ओंठ ६१ करवीर २३
आर्थरसीट १७७ काळभैरवाचे स्थान २८
ओढे ७० कार्तिकस्वामी २९५
औषधि ८९ कारवी १४०
कळक ८३ कावेरी १४
कबरस्थान १५३ कायदा ३०२
कृष्णाबाई ६९ कारनाक पाईंट १९१
कमलगड ५१ कांठया ८३
कमलजा ३१ क्यानाट शिखर १९४
केट पाईंट १९७ क्रीडा १५९
कर्णविवरांत ३६ किल्ले १६०

कुलदैवत ३२ गोदावरी १४
कुसर ८१ गोरखनाथाचे दे-
कुणबी १२१  ऊळ २९०
कुत्रा ४२ घळ २९८
खर्च १५७ घटोत्कचाचा
खंडाळ्याच्या घाटांत ३६  बाजार २४६
खडपा १९७ घर १६२
खड्डा १७८ घरें २१
ख्रिस्त मंदिर ३३९ घरपट्टी ३००
खुर्च्यांच्या रागा- घाटमाथ्याची ६८
 प्रमाणे ३४ घाम ५६
खोरी ५६ घाणीचे पाणी ६३
गव्हरमेंट हौस १९५ घुशी १३९
गॉथिक १४९ घोंस ७८
गारा ५६ घोणसपूर २८६
गुजारा ७६ चंद्रराव मोरे २८७
गुलेराघळ २९६ चविणी ८२
गुरेघर ८७ चवरांची झाडे ८२
गुन्हे ३०४ चावडी ३१२
गुजराथ ५४ चिनी धबधबा २०९
गेळा ८३ चिमूट ८३

चोराची घळ २९० टाकी ५६
छत्रीवर ५८ टांगे १५६
छावणी ५८ टेकड्याचा १६२
जनावरें १३७ ठाण्याचे ११८
जंगली कापीव ठिकऱ्या १७९
 लाकूड २३४ ठिकाण १६०
जहागिरदार १५४ ड्यूक पाईंट १९५
जंगल १३२ डाक्तरास ६४
जड ६८ डाक्तर वुलियम ४३
जनरल लाडविक ४१ डिमॉक सुपरिंडेंडंट
जमखिंडीकरसाहेब २२   साहेब १९४
जरंडा ५१ ड्यूक आफ कॅनाट
जानेवारी ५४   साहेब १९४
जांवळी ५८ डेरी २३१
जिमखाना १५३ डेलिया ५९
झाडी ७७ डोमेश्वर १६७
झुंझुरका १५५ डोंगराळ ७०
झुळका ५५ डोहळे ५५
झोंप ६८ ढवळा घाट १८२
टंचाई ४९ ढोंलीत १२५
टॅक्स ३०१ तल्लीन ५९
तपश्चर्या धोबी धबधबे २०६
तपोवने धांडेघर ३४३
तल्लख ६४ धान्य ५७
तंदुळनदी १९४ धावड लोक ४९
तंबू ३०८ धुके ३८
तवे, कढया ४९ धुकट ५४
तार आफिस ३२८ नरसरी ३५०
ताडी २३२ नद्यांची ६०
तांबनदी ७३ नहरांत ७५
ताई तेलणीने २८६ न्युजंटझरा ७३
तायघाट १९८ नाटके १५१
तुफान नायनाट १२१
तुरंगांत ११८ नाग १४२
तिजोरीत ३०१ नाक १६७
दरडी ७६ नाच ५६
दऱ्या १८६ नार्थकोटपाइंट २०२
दुतोडी घळ २९२ नारायण विश्वनाथ
दुर्दशा १८७  मंडलीक ३२२
देखावे ३४ नीति १५८
धन १५७ निरखपट्टी २३५
धर्म हिंदु २२५ नेचे ८४
नोवेंबर ५४ पांडवगड २९३
पश्चिमेकडून ५५ पारा ५५
पक्षी १४१ पाहाडांत ६०
पखाल ७२ पाणथळ ६२
परवानगी अर्ज ७२ पांचहजार ६३
परमेश्वराने १२४ पाचक ६८
प्रतापगड किल्लयाचे व- पाठाळ ११२
  र्णन २६५ पांखरे १४२
प्रतापगडची लढाई २७५ पारगांव १८९
प्रतापगड २६४ पांडवदरा २९४
प्रतापगडचा किल्ला ४५ पाइंट १६२
प्रतिनिधिसाहेब २६ पांचगणी ३४३
पृथक्करण १२१ पिंपळ ७७
पन्हाळा ५४ पिसा ७८
पेटिटरोडने १९७ पित्तांशाचा ६४
पेशवे १८४ पित्त ६४
पेरणी ११२ पिठा १३१
पत्र्याच्या इमारती २४९ प्रीतिसंगम १५
परदेशवास ४१ पोल ७९
पंचगंगा पोलोची १५४
पांढरे ठिपके ३६ पोस्ट आफीस ३२५

पोयए १२५ बखर २७२
पिंगळे ३० बंदुका २०
पितृमुक्ती तीर्थ २३ बर्फ ५५
फर्न ( नेच्या ) ३७ ब्रह्मकुंड १२
फारेष्टांत ८८ बाजार २८८
फाऊंटन झरा ७३ बारचेस्टरस्प्रिंग ७४
फ्रियर १४९ बापुगोखले २७
फिट्झरल्ड घाट १८८ बाह्य स्वरूपावरून २८४
फी १७४ बाबिंगटन १६४
फुरसें १४४ बाॅॅनी व्ह्यू २३५
फुकट १३५ बिशप तलाव २०६
फूल ५८ बिलियर्ड १५२
फेरिसाहेबाचा ब्ल्यूव्हलीकडे २०२
 रस्ता १९८ बेकवुइथ १९९
फौजदार ३१५ बेलाव्हिस्टा १९५
ब्रह्मारण्य १६ बोर्ड १७५
बंदिवान ११८ भस्म २०
बटाटे १२० भव्य १६
बॅडमिंटन कोर्ट १५३ भयंकर रस्ता २९२
बंगला १६२ भक्ष्यस्थानी १८
बंगल्याचे लिस्ट २५० भक्त २२६
भावनगर १३९ माथेरान ५१
भूगर्भपदार्थ ४७ मार्चपासून ५५
मरीपेठ ४५ मालकमटेकडी २०५
मराठे १८७ मार्च व एप्रिल ६७
महालकरी ३१२ मालकमचे घर २०६
मडीमहाल ४५ माथ्युसाहेब १५०
मंडलिक झरा ७३ म्युनिसिपाल ६३
मल्लिकार्जुनाचे देवळाची मुंबई १८८
 व्यवस्था २८६ मुसलमान २१३
मृगनक्षत्रापासून ५६ मुखवटा १६९
महाबळेश्वर १,२,८ मुरारजी क्यासल-
मालकमपेठ  स्प्रिंग ७४
मच्छलिपट्टण १४ मेण १३१
मध १२३ मे व जून ६७
मरेचे घर ३४१ मैदान १६३
मकरंदगड ५१ यवन १८७
महाड १८९ यवतेश्वर ५१
मनोराज्यांत ४९ यतिरा १८२
महादेव वासुदेव बर्वे २४ यात्रेकऱ्यांकडून २२
मालकमपेठ ऊर्फ नहर ४१ यांत्रिक ४९
मारुती २३ युरोपियन ६८
योद्धे १८७ लिंगरूप
रपेटीस १५५ लिली ५९
रायगड ५१ लिमजी १५०
राजबेरी ८८ लिंब ७७
राजपुताना ५४ लिंगमळा ८७
राजसत्ता १८७ लीज ३३०
राजे १८७ लुकण ४९
रामदासस्वामी २३ लोखंडी दगड ४८
रामेठा ७९ लोखंड ४७
रासबर्ग ९२ वऱ्हाड ५४
रेस्कूल ३०९ वहिवाट ११६
रेगार्डन ३२३ वचनांत
रोटंडा घाट ४६ वणवा २०
लष्कर ३३१ वर्गणी २०२
लंबायमान किरण १९ वनभोजनाकरितां १९२
लायब्ररी १५२ व्यवस्था ३२७
लान्टेनिस १५३ व्यापिली ७०
लाडवुइक १६५ वाटाणा ८८
लारेल ५९ वाद्य १३९
लांकडे ५७ वारा ५१
लाटिन ९२ वाई १३
विद्या १५८ शाखा १६२
विश्वाचे स्वामी शाळा ३०९
विठोबा ३३८ शिवाजीचा इति-
विजा ५६  हास २७६
विकार ६२ शिकार १८
विस्तीर्ण ५२ शिनशिनघळीपर्यंत २०४
विसांबर १४२ शिककाई १३२
विरली ३९ शिलालेख १९९
विलायतेप्रमाणे ४५ शिवाजी १८९
वुइंचेस्टर ११८ शिडी १३०
वुईलसन साहेब ८७ शिग्राम १५६
वुडहौस १५३ शिकारीचे नियम ३०२
वेण्णा धबधबा २०८ शेतांतील पिके १०९
वेण्णा तलाव ७० शेवाळ ८५
वेळाचा व्यय १५५ शेगडया ४०
वेताचे करंडे १२० सरोवर ७०
वेदगंगा १५ स्वयंभूपिंडी ११
वेण्णा नदी १० स्वप्नाप्रमाणे ४९
वैद्य ८९ स्वयंवर १५८
शंकराच्या १९० संस्थान ३०
शहराची रोषनाई २४६ संस्थान भोर २५
स्वरूप २४७ सांडपाणी १३
सर जान मालकम समाधान ५५
 साहेब ४३ सावित्री १७९
सक्तीची ६३ स्मशाने ३३३
स्मृति १४८ सासून पाइंट १९३
संताक्रूज ३४० सिद्धांत ६४
सरकारी शाळा २४ सिंडोलापार्क ८७
सर्प १४२ सिडने पाइंटावर ४१
सॅनिटोरियम १४९ सिंहगड ५१
सॅॅडल बॅॅक २८५ स्निग्धता ६०
समुद्र ५५ सूचना ३०२
सह्यपर्वताचे ६० सुळका ५२
स्मारकाप्रमाणे ११ सुपरिटेंडेंट ३१२
स्मारक २०० सूर्यास्त १९४
स्थान १७० सूर्योदय १९४
स्ट्रॉबेरी ८८ सूचना १७५
सावज १४० सुप्रसन्न ६१
साहेब १४९ सुप्रकृती ९०
सावे १०९ स्नेह १५४
सातारा ५० सोराबजी १२३
सातारचे रेसिडेंट ४२ हजारो रुपये १६१

हक्क ३३ हारीस १५४
हवा ५१ हॉटेले २३६
हजार लोक ९९ हिंसक
हरिहरेश्वरी हिंवताप ६२
हारदड १२५ हिंदुस्थानांतील १६९
हास्पिटल ३१०


---------------
पुस्तके विकत मिळण्याचे ठिकाण.
दत्तात्रेय कमळाकर दीक्षित, राहणार महाबळेश्वर,
जि. सातारा.


---------------
शुद्धिपत्र.
-----
पृष्ठ ओळ. अशुद्ध. शुद्ध.
१५ प्रदश. प्रदेश.
त्यांस त्यास
१० १४ कुकुद्मति ककुद्मति
१२ १२ पहाणाराच पहाणाराचे
13 यात्रेकऱ्यांच्य. यात्रेकऱ्यांच्या
१४ १७ दऱ्या दरे
२२ वर्षामागे वर्षांमागे
३६ १२ हा
४३ साबाचे साहेबांचे
४७ यर्थला येथील
४८ मातींचे मातीचे
६३ १८ समुद्रसपाठीपासून समुद्रसपाटीपासून
६४ १३ पित्तकरपंचाणे पित्तकरपणाचे
७३ गव्याच्या गव्याचा

-----
पृष्ठ ओळ. अशुद्ध. शुद्ध.
७८ राइ राई
८० १६ सालीचीं सालीचे
८३ कोबीसारखा कोंबासारखा
८७ आक ओक
९१ स्कधाची स्कंधाची
११४ १४ ह्यांचा ह्यांच्या
११९ ११ रिपोर्टावरून रिपोर्टांंवरून
१४२ गोचर, गोमा गोचरगोमा
१४७ १९ बक्षिसाच्य बक्षिसाच्या
१४८ १८ मूध्नी मूर्ध्नि
१५३ बुडहौस वुडहौस
१६४ (गव्हर्मटहौस ) गव्हमेंटहौस
१६५ परतु परंतु
१८९ बाँड बँँड
२०६ मालकमचे मालकमचें
२०८ १९ टकत टिकत.
२१९ १७ खालचा खालची
पृष्ठ ओळ. अशुद्ध. शुद्ध.
२३७ धुमश्चर्की धमश्चक्री
२३९ मोठे मोठें
२४० कवा किंवा
३०१ १९ यास त्यास
३२१ १२ जगति जागृति
३२९ खले खुलें
३३२ लष्करकरितां लष्करांकरितां
३४० मूर्तीची मूर्तींंची
३४४ झोंबल्यासारखा झोंबण्यासारखा
३४९ १३ लोकाच्या मुलांन लोकांच्या मुलांना
३५० १२ बॅकबेरी ब्लॅकबेरी
" " मूळ झाडे फळझाडे


--------------

डायाबिटीस क्युअर.
अथवा
मधुमेहारि.

 महाबळेश्वरच्या आरोग्यकारक हवेंत उत्पन्न होणा-या पुष्कळ गुणकारी वनस्पत्यौषधिभांडाराची माहिती मिळविण्याचा आमचा उपक्रम बरेंच दिवस चालल्यावर या रोगावर कांहीं रामबाण वनस्पति आढळून आल्या. पुढे त्यांचा प्रयोग या रोगानें त्रस्त झालेल्या बऱ्यांच अजाऱ्यांंवर करून पाहून गुण आल्याची पक्की खात्री झाल्यावर त्यांचें हें ओषध बनविलें आहे.

 हें ओषध घेऊं लागल्यापासून पंधरा १५ दिवसांतच गुण येण्यास सुरवात होते, ती अशी:- रोग्याची तृष्णा कमी कमी होत जाऊन त्याच्या लघवीचें मानही दिवसेंदिवस बदलत जातें, इतकेच नाहीं तर तींतील साखरेचे प्रमाणांतही हळू हळू अंतर पडू लागतें; त्याचप्रमाणें जठराग्नी चांगला प्रदीप्त होऊन भूक चरचरीत लागूं लागते, व खाल्लेल्या अन्नाचा शरिरांत चांगला परिपाक होणें व मलोत्सर्ग साफ होऊं लागणें या क्रिया एखाद्या सुप्रकृति मनुष्याप्रमाणें चालू लागतात. तेव्हां रोग्यास अर्थातच हुशारी वाटणें साहजिक आहे. परंतु हा रोग अगदीं समूळ नाहीसा होण्यास हें औषध दोन तीन महिने तरी सारखें घेतलें पाहिजे.

 १८० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. १ σ १२
 ३६० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. ३.

 शिवाय पॅकिंग व पोस्टेजबद्दल हांशील σ५ आणे जास्त पडेल. तीनपेक्षां जास्त डबे मागविल्यास टपालहांशील वगैरेचा कांहींएक चार्ज पडणार नाहीं. अनुपानखर्डा औषधासोबत पाठविला जाईल.

 पत्ता-दत्तात्रय कमळाकर दीक्षित, राहणार महाबळेश्वर.-------------
LIST OF PERSONS
WHOSE CERTIFICATES CAN BE SEEN
IN THE FOLLOWING PAGES.
-------------

1.R. B.Y. M. Kelkar, late Oriental Translator to Government of Bombay.
2.R. B. R. R. Bhardi.
3. Mr. M. B. Chaubal, High Coart Pleader, Bombay.
4. Mr. S. W. Kane, Doctor, Bombay.
5. Justice M. G. Ranade, High Court Judge, Bombay.
6. Mr. Janardan Gopal, Solicitor, Bombay.
7. Mr. R. S. Poredi, L. M. & S., Private Secretary to H. H. the Rajasaheb of Akkalkot.
8. R. B. M. W. Barve, Late State Karbhari, Kolhapar.
9. Shri. H. S. Desai, Bhawnagar.
10. Mr. M. K. Makanji, Bombay.
11. R. B. V. M. Bhide, Poona.
12. R. B. R. V. Poonekar, Late Khasagi Karbhari, Baroda.
13. Col. G. H. Jacob, Staff Corps.
14. R. B.Jayasatyabodharao Trimalrao, Subt.Judge, F.C. Satara.
15. Mr. K. B. Bullel, M. D.
16. Mr. S. Tagore, I. C. S.
17. Mr. G. H. Bhide, Pleader, Nagpur.
18. R. B. R. N. Mudholkar, B. A. LL. B.
19. Mr. M. G. Pasta, Bombay.
20. Mr. Kalabhai Laloobhai, Vakil, Bombay.
21. R. B. C. D. Kavishwar, Sub-Judge, F.C.
22. Mr. Hiralal Chunilal, Government Pleader, Broach. 23, Prof. G. G. Agarkar.
24, Hon. Bal Gangadhar Tilak, B. A., LL. B.
25. Hon. Gopal Krishna Gokhale, B. A.
26.R. B. A. B. Desai, Assistant Commissioner S. D.
27. Prof. Abaji Vishnu Kathawate
28. Hon. Mr. C. H. Sitalvad.
29. Shri. Lakhangauda S. Sardesai, Vantmur
30. Mr. B. B. Mukhirj, Agent of H. H. The Maharaja Manikya Bahadur of Independent . Tipprah Bengal.

-----------
MALCOLM PETH.

SIR,
 It is now acknowledged by all that there is no better Sanitarium than Mahableshwar in this part of the country. That being so, it is resorted to not only by the higher officers of Government, but also by Chiefs and Jahagirdars and by other classes of well-to-do people for business or health. For Europeans coming to this station, there is every kind of convenience. It is the native visitor that finds it very difficult to live here comfortably, at a moderate cost. With a view to remove this inconvenience as far as it lay in my power, I established an agency in the year 1887. with what success, will be seen from the accompanying certificates kindly given to me by well-known gentlemen with whom I had any kind of dealing during their sojourn in this place. I am not however satisfied with what little I have been able to do. I have not been able to remove even a little of the difficulties which are encountered by native visitors here. It is, my ambition to remove them all and to make them as comfortable as European visitors. But this is beyond the power of my limited means. I hope therefore, you will be kind enough to utilize my services in some way or other you may deem fit. I am a permanent resident of this place and hope you will be good enough to entrust me with the management of your own or your Chief's Bunglow or to ask me to do any kind of business that honest and hard-working agent, can do in a place like this. I shall be quite contented with such remuneration or commission charge as you will be pleased to give, since my primary purpose is to extend the business of my agency with a view to serve native visitors as much as I can. Negotiations, for the purchase of sites (of Bungalows, furnishing and adjusting them after the local fashion, purchasing and sending local curiosities, hiring houses and supplying all available things at a moderate price, may be made at all times. Because it is the business of this kind in which I am likely to be most useful, and it is in this direction I hope to be employed by you at no distant day.

I Hoping to be excused for the troubles,
I beg to remain, Sir,
Yours very truly,
DATTATRAYA KAMALAKAR DIXIT,
AGENT,
MAHABLESHWAR.


----------------

TESTIMONIALS.
-------------

 I am glad to state that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit, Agent, Mahabaleshwar, has always rendered me valuable assistance in procuring furniture &c. He is a trustworthy man and am sure that any stranger visiting this Sanitarium will find him extremely useful.

Y. M. KELKAR,

Oriental Translator to Government Bombay.

Mahableshwar, 24-5-90.

-------------

 I am glad to record that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit is a very useful gentleman in this station. His manners are good and he is trustworthy.

R. R. BHARDI,

Assistant Commissioner.

 Malcolm Peth, 25th May, 1890.

-------------

 Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has started business here as house agent and supplier of furniture &c. to strangers coming here. It is an attempt to provide a very desirable institution on these hills for the comfort and convenience of Hindu gentlemen; and it is to be wished that these should largely avail themselves of Mr. Dikshit's agency. Thus patronised, Mr, Dikshit hopes to be able to afford every comfort for boarding and lodging; he is strictly honest, persevering and energetic and ought to succeed in his attempt.

MAHADEO B, CHAUBAL,

Pleader, High Court, Bombay.

Malcolm Peth, 25th May, 1890.

-------------

 I have great pleasure in stating that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has been of great use to me during my short stay here. He has been very assidnons in looking to my comfort and has, in fact, made me feel at home in this strange place.

S. W. Kane,

Doctor, Bombay.

26-5-90.

-------------

 I have very great pleasure in recording that Mr. Dattatraya Kamalakar Dixit who has lately started business as an house agent here, is a very useful and honest man. Gentlemen coming to these Hills should take advantage of his agency.

M. G. RANADE,

Special Judge, Poona.

Mahableshwar, 28-5-90.

-------------

 Mr. Dutoba Kamalakar Dixit was introduced to me by my brother Dr. Pandurang, Surgeon in the Baroda State at present, who has known him for a long time. During my visit to this place in the May Season he, Duttopant, proved himself of very great use to me. I found him extremely obliging and ever willing to render what assistance he can to those (Native Gentlemen ) who visit this place and who may stand in need of it. He deserves every encouragement from visitors.

JANARDAN GOPAL,

Solicitor Bombay.

-------------

 Mr. Dattatraya Kamalakar Dixit has been useful to us on several occasions during our stay here. He has started business as an house agent and we feel sure that before long his services will be largely availed of, by visitors to this Sanitarium.

R. S. POREDI, L. M. & S.,

Private Secretary to H. H. The Rajesaheb of Akkalkot.

Mahableshwar House, 6th June, 1890.
-------------

 I have known Mr. Dattatraya Kamalakar Dikshit of Mahableshwar for the last five years. He is a very obliging and accommodating house agent here; always willing and ready to assist his Constituents, prompt and attentive to the wants of his clients at all times, a good correspondent too.

MAHADEO WASUDEO BARVE.

7th June, 1889,

-------------

 It seems that Dattatraya Kamalakar Dixit has commenced very recently the business of house agent and supplier of things such as furniture, beds, &c. We had a little of order with him this season, but we would be willing to entrust him with any such business hereafter as we know him since these seven years.

HARIPRASAD SANTURAM DESAI,

Bhavnagar

9th Jane, 1899.

-------------

 Dattatraya Kamalakar Dixit seems to me to be a faithful and honest agent. He has, it seems, very recently started the agency of supplying houses and bungalows, which he does in my opinion, at a much cheaper price, than other two Europeans. I wish that every native and especially a Hindu must give the agency of his bungalow to this man. He also supplies furniture of every sort and also carriages for Season to much advantage.

MULRAJ KHATAO MAKANJI,

Bombay.

25th May, 1882.

-------------

 I am very glad to state that Dattatraya Kamalakar the house agent at Mahableshwar is a very obliging and useful gentleman. He has been of great use to me last and this year in procuring house accomodation and other conveniences. And the feature in his character is that he does all things in an honest and straightforward way.

VISHNU MORESHWAR. BHIDE,

Pensioner First Class Sub-Judge,

Poona

26th May, 1889.

-------------

 I am very glad to certify that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit who has lately commenced the business of house agent at Mahableshwar is very obliging and not only supplies houses and Bungalows but furnishes every thing that visitors to this station are in need of. He is honest, and straightforward in his dealings. He is very useful agent as well as an amiable friend.

RAOJEE VITHAL POONEKER,

Pensioner, Late Khasgi Karbhari,

Baroda

29th May, 1882.

-------------

 I have made acquaintance here of Mr. Datttraya Dikshit, who has set up in business as an Agent for native gentlemen visiting the hill and from his extensive local knowledge, there is no doubt that he is in a position to afford material aid to such. Mr. Dikshit is also an enthusiast in regard to the medical plants of the country and is doing his utmost to discover their properties. In a vast country like this, there must be number of plants possessed of healing virtues, and every effort to add to the Indian pharmacopoeia is deserving of encouragement. I hope therefore that men, who are competent in such matters, will give a helping hand to Mr. Dikshit in his praiseworthy efforts to benefit suffering humanity.

G. A. JACOB,

T-1 Col., Staff Corps.

Mahableshwar, 16th March, 1891.

-------------


 I came to this place to spend a few days of the Holy-Easter Holidays, with family and children, and put up in the house of Dattatraya Kamalakar Dikshit. He kept excellent arrangement for the care of my family during my stay here. He is a very good gentleman of obliging character, a man of learning and intelligence. He has been studying the medical plants here. It would be of great use if he publishes the names of the plants and their uses. He has built two or three houses on the hill, which have been well provided for and furnished. There are wells and privies to both the houses. Any visitor coming to this place will I am sure, be pleased with the kind and cordial treatment from Mr. Dattatraya Dikshit.
27th March, 1891.

JAYSATYBODHRAO TRIMALRAO,

Subte-Judge, F. C., Satara.

-------------

 I have great pleasure in stating that Mr. Dattopant Dixit has been of great use to me during my short stay at this place. He carefully looked after my comforts. He really deserves some encouragement from Native visitors of this place.
3rd June. 1891.

K. B, BULEL, M. D.

-------------

 We have had occasion to avail on ourselves of the services of Mr. Dikshit and were very much pleased with them. He is likely to be of great use to gentlemen visiting Mahableshwar.

S. TAGORE,

Sessions, Judge,

Mahableshwar, 29-5-90.

Sholapur and Bijapur

-------------


Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has rendered me great assistance in making my stay comfortable in every way. During my stay here for upwards of two months his usefulness became known to me in various ways in assisting poor natives who came here for the benefit of their health. Without his help and his attention, their stay would have been very uncomfortable. Such a native agent is an absolute necessity here. Native gentlemen in well-to-do circumstances, who come here for the benefit of their health in the hot senson, should patronize him in engaging house accommodations through him, which will entitle him to obtain commission from houseowners, instead of using European Agency for this purpose. This kind of patronage will enable him ( Mr. Dixit) to assist the poor natives in various ways. I will use him as my Agent to secure house accommodation for me hereafter and I recommend that every one who is of my opinion should do so and thus give the poor natives the benefit of his assistance on their arrival here at cheap remuneration.

GOPALRAO HARI BHIIDE,

Pleader, Nagpur.

31st May, 1893.

-------------

 I have known Mr. Dattatraya Kamalakar Dixit since the year 1888. That year and last year and this year, when I was here I availed myself of his services very freely. I have always found him willing and prompt to do what is in his power for those who require his assistance. He has set up an agency office since 1887 and has by so doing supplied a long felt want in the case of Hindu gentlemen who were new to this station or had no house of their own. I firmly believe that Mr. Dixit is deserving of every encouragement and support.

RANGANATH N. MDDHOLKAR,

B. A., L.L. B.

Pleader, High Court, Amraoti.

1st June, 1893.

-------------

 Dattatraya Kamalakar Dixit, has given me good satisfaction in his lately commencing his agency business to secure houses and bungalows. He is very honest and obliging. He also supplies furniture and other household materials. I wish him success in his future prospects. I recommend, all gentlemen who deal with him will get every satisfaction.

MADOWDAS GOKULDAS PASTA,

Bombay.

3rd June, 1889.

-------------

 Mr. Dattatraya Kamalakar Dixit having applied to me for my remarks as to the way in which he has been carrying out the orders from time to time made on him for the different supplies at Mahableshwar, I endorse with pleasure what, Mr. Bhide has said. I have always found him very prompt and attentive to every order entrusted to him. Any visitor of the hills will, I dare say, find in him a very useful guide and agent and at the same time a very amiable and docile friend. I wish him every success and encouragement in the work he has undertaken.
27th May, 1887.

KALABHAI LALOOBHAI,

Vakil, High Court,

Bombay.

-------------

 Mr. Dattatraya Kamalakar Dixit acted as our agent in procuring house accommodation, servant and conveyance during our short stay in Mahableshwar. He is very prompt and attentive in executing the orders entrusted to him. He appears to be a very deserving man and I wish him success in the agency business commenced by him. Natives coming to this place would be inconvienced if there were no help of a man like Mr. Dattatraya.

CHUNILAL DALAPATRAM KAVISHWAR,

Sub-Judge, Kaira. Ahmedabad Dist.

LALOOBHAI DALPATRAM KAVISHWAR,

L. C. E.,

Secretary, Baroda State, Spinning & Weaving

Mills, Baroda.

Mahabaleshwar, 29th May, 1889.

-------------

 I visited Mahableshwar and put up with Mr. Dattatraya Kamalakar Dixit. I stopped with him only for twenty four hours and found him very kind and hospitable. There is no other such agent for natives and it is to the interest of all natives to give him encouragement in the course he has taken up and I am sure every native who will come in contact with him, will be very much pleased by the assistance, given by Mr. Dixit.

HIRALAL CHUNILAL,

Government Pleader, Broach.

Mahableshwar,
28th April 1892.

-------------

सुधारकांत (अंक ७ तारीख ८ माहे दिसेंबर १८९०.) महाबळेश्वराचें वर्णन लिहितांना प्रो० गो० ग ० आगरकर यांनीं असें लिहिलें आहे:- "रा. दत्तोपंत हे हुशार, प्रामाणिक, उद्योगी आणि मनमिळाऊ गृहस्थ आहेत. यांनीं महाबळेश्वरीं अलीकडे एजन्सीचा धंदा सुरू केला असल्यामुळे मध्यम स्थितीच्या लोकांची मोठी सोय झाली आहे. दत्तोपंतापाशीं घरापासून टांचणीपर्यंत पाहिजे ती वस्तु भाड्यानें देण्यासारखी असल्यास भाडयानें किंवा विकत देण्यासारखी असेल तर किंमत देऊ करून मागा, ती थोडया वेळांत फार माफक कमिशन घेऊन ते तुम्हांस आणून देतात, आणि तुमचा परामर्श धेण्याविषयी नेहमीं तत्पर असतात. आज दोन तीन वर्षे महाबळेश्वरीं मधल्या स्थितींतले खाजगी गृहस्थ किंवा मोठमोठे नेटिव अंमलदार गेले, त्यांनीं दत्तोपंतास दिलेल्या सर्टिफिटांचें एक लहानसें पुस्तक झालें आहे, व या पुस्तकांतील बहुतेक सर्टिफिकिटांत दत्तोपंतांच्या अंगी वर सागितलेले गुण असल्याबद्दल दाखला सांपडण्यासारखा आहे. ”

-------------

 I have known Mr. Dattatraya Kamalakar Dixit for several years and have great pleasure in recommending him to all such gentlemen as may desire to have a hardworking and honest agent at Mabableshwar.

BAL GANGADHAR TILAK,

B.A.LL.B.

Member of Council, Bombay.

Mahabaleshwar,
7th March, 1896.

-------------

 I had occasion this year to avail myself of the services of Mr. Dattatraya Kamalakar Dixit in securing house accommodation at Mahabaleshwar and I have much pleasure in stating that Mr. Dixit arranged every thing to my entire satisfaction.

GOPAL KRISHINA GOKHALE,

Professor and Member of Council, Bombay

Mahabaleshwar,
21 May 1900.

-------------


 I am glad to have on record that Mr. D. K. Dixit rendered me excellent services in finding me suitable accommodation, furniture, etc. He is a willing worker and deserves the patronage of all gentlemen.


ACHUT BHASKAR DESAI,

Assistant Commissioner, Belgaon.

26-5-1900.

-------------


 I have known Mr. Dattatraya Kamalakar Dixit for sometime. I have great pleasure in stating that his thorough acquaintance with the station and his good manners and his willingness to render assistance to visitors make him a very good house and furniture agent.

ABAJI VISHNU KATHAWATE,

Prof. Elphinstone College, Bombay.

Mahabaleshwar,
28th May, 1900.

-------------


 Mr. Dattatraya Dixit is a very amiable and obliging gentleman and was very serviceable to us during our stay at Mahabaleshwar this year. He in starting the agency work that he has been doing for the last few years, has supplied a real want in the case of the Hindu visitors at this Sanitarium.

CHIMANLAL H. SITALVAD,

B. A., LL. B.,

High Court Pleader,Bombay

31-5-94

-------------