मधुयामिनी
Jump to navigation
Jump to search
मधुयामिनि नील-लता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला--
दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरीं
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरे नव भूतिला--
सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनांत
विश्वगोल रंगला.
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
