बालमित्र भाग २/लहान हरणी

विकिस्रोत कडून

एक लहान हरणी, जिचें नांव यमुना. नाटक दोन अंकी. पात्रे. गोपाळा रामराव, ........... कोणी एक देसाई. विनायक,.............. रामरावाचा मुलगा. गंगा, ... • . . . . . . रामरावाची मुलगी. लक्ष्मण, ....... विनायकाचे स्नेही. स्थळ रामरावाची खोली.. प्रवेश, गंगा. गंगा- (विलाप करीत ह्मणते ) अहा. माझे राजसे यमने, तूं अंमळ माझे जवळ नसलीस तर तुजवा- चून कसें चैन पडेल १ तुझे गुण मी काय वर्णां ! माझे खेळण्याचे वेळेस ह्या पलंगावरचे गादीवर त्वा गरीबा सारखें उगीच बसावे, आणि उठलीस ह्मण- जे मला किती आनंद व्हावा! मान वरती करून शेपूट हालवीत हालवीत छपर पलंगा खालून, चोबाळमित्र. पाळ्या खालून, त्वां कसें लोटत लोटत चालावें, आणि ठिकावें! म्यां तुला मांडीवर घेतले ह्मणजे माझ हात तोंड त्वां हंगावें ! मज संगती खेळावें! आता तू माझे हातीं परतून जर नाही लागलीस तर मी किती झुरूं लागेन ! म्यां कधी गमावली नसती, पण तो विसरभोळा विन्या- - - प्रवेश २, गंगा आणि विनायक. विना- (हे ऐकतांच आंत येऊन ) वाहावागे, माझें - नांव घेतीस १ गंगा- तुझ्या वांचून कोणाचे घेऊं ? तूं असा हट्टी पा- हिलास ! माझे राजसेस बाहेर नेले नसते तर ती कधी गमावली नसती. - विना०- होय ताई, जशी तुला खंती वाटती तशी म- लाही वाटती, पण आतां गमावली त्याला काय करावें १ गंगा- भाऊराया, नेऊं नको ह्मणून म्यां तुला सां- "गितलें नाहीं बरें ? पण तूं कुठला ऐकायाचा. तो तुझे बरोबर नसली तर तुला एक पाऊलभर दे- खील चालवत नाही. विना.- बाहेर तिचे चालण्याचे चपळाईमुळे मी को- णीकडे जातों व कसा चालतों ह्याचे भान देखील लहान हरणी. मला राहत नव्हते. मी पाठीस लागलों अस मार तिने इकडे तिकडे पळावें, आणखी त्वरेने लोटत ला. टत येऊन माझे भोंवताली मोठ्या हर्षाने उड्या माराव्या, तेव्हां आझांला किती आनंद व्हावा! गंगा- असे होते तर अधिक जतन करावी की नाहा। विना०- करावी; पण ती मजजवळून लांब पळून जाई, आणि पुनः बोलावल्यावांचून येई, ह्यामुळे मला वाटले- गंगा- वाटले ! तुझे वाटण्यास काय करावें । तूं बाप- डा कधी कोणाविषयी अविश्वासी असा नाहीस; पण ह्या मुळे माझी सखी यमनी गमावलीना विना०- ताई, आतां मी तुला वचन देतों की, आज- पासून कदा काळी- गंगा- पुरे पुरे आतां ! मजजवळ काही असले तर गमावशील मात्र तेवढा. काल रात्री मला तिचे खे. दामुळे झोंप देखील डोळाभर आली नाही, अंमळ डोळा लागला तो यमनीचे तोंड उतरून गेले आहे आणि ओरडत मजजवळ आली; हे मी पाहतांच जागी झाले, तो मी एकटीच आहे. अहाहा, ती ही मजप्रमाणेच झुरत असेल ! विना०- ताई, तुला इतके दुःखांत पाहून माझा जीव तिळ तिळ तुटतो. काय करूं आतां ! मी आपली सर्व खेळणी सुखाने सोडीन, पण ती कशी तरी ए. कदा माझे दृष्टीस पडो, 90 बाळमित्र. गंगा- तूं मला तिजविषयींचे दुःख आधिक वाढवितोस; तुझी तिची चुकामूक झाली ती जागा देखील तुला ठाऊक नाही, असती तर तिकडेसच लोकांत शोध लावावयास अवघड पडतेना. विना- मी पैज मारतों; ती खचीत घराजवळ आली, पण ती हुंगीत हुंगीत घरोघरचे अंगणांत जाई, ह्या- मुळे कोणी तरी दरवाजा लावून तिला कोंडलें अ- सावे. गंगा-हे खरेच असेल; असे नसते तर ती आपले ठि- काणी फिरून आली असती; तिला घराची वाट प. केपणी माहीत आहे. . विना०- गोपाळा मजबरोबर होता, यमनी आमचे मा- गें चालत होती. तिला पाहून एक क्षण देखील झाला नाहीं तों इतक्यांत दिसेनाशी झाली. यमनी गमावल्याचे मूळ गोपाळाच. काय सांगू? तो वाटेने चालतांना काय काय तन्हा तन्हा करीत असे; त्या- ने मला यमनीची शुद्ध देखील राहिली नाही. गंगा- तर तुजबरोबर त्याने शोध करायाला यावे की नाहीं । विना.- तो मजबरोबर काल संध्याकाळी आणि आज सकाळी शोध करायाला आला होता. आ- ही सर्व चौकीवाल्यांच्या जागा व बाजार व ग. ल्या वगैरे सर्व जागी शोध केला, पण कोठेही लि. काणा लागला नाही. खरेच सांगतों, माझे आच99 लहान हरणी. रणाने तुझे तोंडाकडे पाहावयास मला लाज' तुलाही मजविषयी भारी राग आला असेल ह चीत जाणतों. गंगा- ( त्याचा हात धरून ) मला राग नाही, के माझें वाईट करावें हे तुझ्या मनांत देखील न पण तूं फारच पस्ताई पडलास. असो: आधी ना वर कोण येतो आहे तो जाऊन पहा बरे. नाही, कांकी प्रवेश ३, गंगा, विनायक, आणि गोपाळा. (गोपाळा खोलीचे दार उघडतो, आणि विनाय. कास मी, मी आलों, असें ह्मणतो. उभयतां एक- कांस उत्तम रीतीने भेटल्यावर गोपाळा विनायकास झणतो.) गोपा.- यमनीविषयी काही सुगावा लागला आहे, ह्यामुळे मी आशा ठेवितों की थोडक्याच वेळांत ती मला- गंगा- यमनी सांपडेल काय ? गोपा०- मी सांगतो ते ऐका अगोदर. गल्लीचे कोप- न्यांतील दुकानावर जांबवाली मातारी बसत अस. ती तिची तुमची ओळख आहे ९ गंगा- काय माझी सखी यमनी तिजपाशी आहे ? बाळमित्र. गोपा.- तिजपाशी कशाची; ती फार भली आहे, म- जवर अतिशय लोभ करिती; कां विनायकराव, हे तुह्मांला ठाऊक नाही ९ यमनी ही मजप्रमाणे लाडी गोडी लावावयाकरितां तिचे दुकानाचे ओट्यावर पाय देऊन उभी राहून फळ फळावळ वगैरे हुंगू लागली. विना०- अरेरे, यमनीचा लाड अगदीच कामास आ- ला नाही. मातारीच्या एका धपाट्याने सगळा व्यर्थ गेला. गंगा- थांबरे, ह्यावांचून काय पडलें आहे ९ मग, गो. पाळा ? गोपा०- मी आतां नुकता तिचे दुकानी केळी घ्याव- यास गेलो होतो, तिला मी आपले हरणीचे वर्त- मान कळविले. तेव्हां ती ह्मणाली, काय ती ओं. गळवाणी हरणी गेली १ गंगा- तुह्मी असे माझे हरणीस उगीच वाईट साईट बोलत जाऊ नका. गोपा.- मी कांही पदरचे बोललों असें नाहीं; तिच्या तोंडांतून जी अक्षरें निघाली ती सांगतो. मला म- णते, ओंगळवाणी हरणी तो तुझा देखणा सोबती त्याचीचना ९ मी झटले होय, मग ती ह्मणाली की. सफेतीचे वाड्यांतील जो पोर आहे त्याने ती फु. सलावून नेली. लहान हरणी. १३ विना- काय, तिचे बोलण्याचा भाव लक्षुमणाविष. जयीं दिसतो तर. गोपा- तुझांला स्मरण आहे ९ जेव्हां आपण माता- रीचे दुकानावरून जात होतो तेव्हां तो तेथेंच हो- ता; पण त्याचे मनांत ह्या केळ्यांतून आपणाला ह्यांस काही द्यावे लागेल, ह्मणून त्याने आपणांस पाहिले न पाहिलेंसेंच केले. विना०- हें नर पक्केपणे माझे मनांत आहे; तो तेथे होता खरा. गोपा०- आपण दुकानापासून काहीसे पुढे गेलो ते. व्हां यमनी आपले मागें चालत होती. तिला त्या- ने दुधाची आशा दाखवून तिला दूध पिण्यांत गुंत- विलेंच, आणि लागलेच उचलून घरांत नेले, हे त्या- चें कपटी कर्म मला त्या झातारीने कळविलें. गंगा- अहारे लक्षुमणा, तूं इतका प्रतापी हे ठाऊक न. व्हते; असो, पण यमनीचा ठिकाणा लागला. तर विनायकराव, आतां लौकर त्याचे घरी जाऊन पहा. गोपा.- विनायकरायाला हरणी त्याचे घरी कदाकाळी सांपडावयाची नाही. तो मोठा हाताळ आहे; घरांत ज्या कांहीं वस्तु हातास लागतील त्या आणि आ- पल्याही चोरून नेऊन विकतो; ह्यावरून वाटते की, खचीत यमनीस विकावयास चोरून घेऊन १४. बाळमित्र. गेला आहे. आणखी, दोन दिवस झाले आहीं दो- घे गोट्या खेळत होतो त्यांत त्याने भारी लबाडी केली. गंगा- त्या लबाडाने घरच्या माणसांस, कोणी आले असतां मी बाहेर गेलों ह्मणून सांगा, ह्या प्रमाणे सां- गन ठेवून अगोदरच बंदोबस्त करून ठेवला असल. गोपा.- नाही, नाहीं; मी त्याचे घरी गेलो होतो; त्याच्या खोलीत जाऊन पोऱ्यास सांगितले की, मी लक्षुमणास गोट्या खेळावयाकरितां धुंडतों आहे, न्यास सांग; तो येईपर्यंत मी विनायकरावाचे घरी वाट पाहात बसतो. गंगा- त्याने यमनी चोरली असली तर तो कद्धी इ. ____ कडे तोंड दाखविणार नाही. गोपा०- काय सांगतां! त्याची अब्रू तर गाड्यावर जाती आहे हे तुझांस कांहींच का माहीत नाही, आतां तर तो आपणावर वहमा येऊनये ह्मणून अगोदर येईल. बरें, कांही चिंता नाहीं; तुमचे समक्ष मी त्यास चोर ठरवीन. गंगा- हे काम तर डोळा नफुटे काडी न मोडे ह्या री- तीने केले पाहिजे; खडा टाकुन ठाव पहावा ह्मणने काय ते समजेल. गोपा०- माझें ऐका; इतक्यावांचून कांहीं खोळंबा नाही. एक्याच गोष्टींत त्याची चोरी बाहेर का- ढावी. लहान हरणी. १५ विना०- असे करूंनये; अशाने लागलाच कजा मात्र होईल, आणि रावजी आपणांवर मनस्वी रागें भर- तील; ह्या साठी मला वाटते की, कजा व छद्मी भाषण करावे ह्यापेक्षां गोडशब्द बोलल्याने आपले काम सिद्धीस जाईल तर बरें. गंगा- ती हरणी माझी आहे असे न्यास माहीत नसेल. गोपा.- असे कसे होईल ! शंभरदां तुमचे भावाब- रोबर तिला चालतांना त्याने पाहिले आहे, आणि फारदां तिशीं तो खेळला आहे, आतां तर त्याने खचीत विकावयासाठींच चोरली. गंगा- अरे, हा लक्षुमण आला पहा ! प्रवेश गंगा, विनायक, गोपाळ, आणि लक्ष्मण. ल.- गोपाळराव, माझे चाकराने तुमचा निरोप मला सांगितला, की तुझी मला खेळावयास बोलाविले. चला तर मी सिद्ध आहे. कां विनायकराव. खुशा- ल आहां की ? गंगाबाईची भेट झाली हेही बरेच झाले. गंगा- बाबा, खेळण्यावर तुमचे लक्ष, पण इकडे आ- मचे तोंडचे पाणी पळाले आहे. ल-कां १ का १६ बाळमित्र.. गंगा- अहो, आमची गोजिरवाणी हरणी हरपला हो! ल- हं! हं! अरेरे फार वाईट झालें ! चांगली हो- ती; तिचे रूप काय; तिचे आंग किती मऊ असे; पोटाखाली कसा पांढरा रंग होता; पाय आणि शे- पूट काय चमत्कारिक दिसतअसत! दोन कवड्यां- ची जरी होती तरी ती तुमची दोन मोहरांची, गंगा- तुझी इतकी माहितगारी सांगतां त्यापक्षी ती कशी हरपली हें निश्चये तुमचे पाहाण्यांत आले आहे, व शोध लागावयाचा तोही तुह्मांकडूनच लागेल. ल.- काय, मी तुमचा चाकर आहे, की मजकडे ति. ची रखवाली सांगितली आहे १ विना- तूं ताईचे बोलण्याचा अभिप्राय मनांत न आणतां उगीच रागास येऊ नको. गंगा- ह्यांत तुला राग तो कशाकरितां आला १ एक तर तूं आमचा शेजारी, आणि हरणी कोठे लांब हरपली असें कांहीं नाहीं; त्यांत तूं शोध करण्या• विषयी आमच्यापेक्षां शहाणा आहेस, ह्मणून ह्मणते. गोपा०-ठीकच आहे, ह्याला सोडून दुसऱ्या भल्या म. नुष्यास विचारण्याची गरज नाही. ल.- ह्यांतला अर्थ कायरे ९ गोपा.- ह्यांतला अर्थ ज्याचे आंगी दोष असेल त्या- ला माहीत, तथापि मी सर्व कृत्य जाणून आहे. ल- ह्यासमयीं गंगा येथे नसती तर, लहान हरणी. गोपा.- ती आहे ह्मणूनच आपली ह्या ठिकाणी शोभा आहे, नाही तर समजतें मग; लागलींच बारास बोरें आणली असती. विना- ( गोपाळास एकीकडे नेऊन ) हळू, हळू बोल, उतावळा होऊं नको. अशाने हरणी कदा. काळी आपले हाती लागणार नाही. गंगा- लक्षुमणा, माझी मर्जी राखावी असे जर तुझे मनांत आहे, तर ती आहे किंवा नाही, हे मला निवळपणे सांग; कायतें कळूदे एकदा झणजे झाले. गोपा.- होय, संदिग्ध कामाचे नाही. गंगा- आमची हरणी तुजजवळ आहे खरी, पण ती कोणत्या ठिकाणी बांधली आहे हे सांग. ल.- ( गांगरून ह्मणतो) काय मजजवळच तुझी ह. रणी आहे ? गोपा०- कायरे ! उत्तर देणे एकीकडेस ठेवून तेरी में- री करतोस; पण मला खचीत ठाऊक आहे की, त्वां दुधाची आशा लावून ती नेली. ल०- हे तुला कोणी सांगितले रे ९ गोपा- तुला हे कर्म करतांना जिने पाहिले तिने. गंगा-हें खरें की खोटें, एवढेच कृपा करून मला सांग. ल.- मी जर तझी हरणी चोरून नेऊन घरांत बा. धून ठेवली असेल तर ना सांगू ? गंगा- हे आह्मी खचीत ह्मणतों असें नाही, इतकेंच बाळमित्र. की आता ती कोठे आहे ते सांग, विना- तुह्मी केवळ चोरून नेली असें नसेल, कदा. चित् थटेने जशी कोणी कोणाची वस्त ठेवितात त. शी आमच्या जवळून कांहीं हर्की घेऊन मग द्यावी असें ह्मणून ठेविली असेल. ल- माझ्या वाड्यांत काय शिकारखान्याची जागा आहे . गोपा.- काय ह्या निलाजरेपणास झणावें १ पाहा क. से उत्तर करितो ते! ल०- मी तुजशी काही बोलत नाहीं तुला काय इत- के बोलण्याचा अधिकार रे ९ गोपा०- बोलण्यांत मी तुला कुंठित केलें ह्मणून. गगा-हळू बाबांनो! तुझी नीट समजला नाही. ल. क्षुमण केवळ आमची हरणी ठेवील असे होणार नाही. विना०- जर कदाचित् तुझी वस्त हरवली असती, आणि तिचा शोध मला लागला असता, तर मी मोठे आनंदानें तला कळविले असते. लोकरीतीप्रमाणे विचारले असतां त्वां रागास यावे हे योग्य नाही. 10- धादांत माझें नांव तुह्मी घेतां, मग मला राग कसा येणार नाही ? थांबा, मी तुमचे बापापाशी जाऊन सांगतों. गोपा.- इतके कशाला ? चला त्या झातारीकडे, आ- तांच पदरी घालतों. लहान हरणी. १९ ल०- माझें बोलणे तुला खोटे वाटते, आणि साठी बु. द्धि नाटी अशी जी मातारी तिजवर विश्वास ठेवि- तोस, हे फार चांगलें. गोपा०- तिची दृष्टि आणि तिचे कान अझून फार तिखट आहेत; त्यांत आणखी वयाने मातारी व तुजपेक्षां कोट हिशांनी खरे बोलणारी आहे, ह्मणून मी तिजवर विश्वास ठेवितों, उगीच नाही. ल०- बरें बरें. मी ह्याविषयी कान पाडणार नाही. हा पाहा तुमचे बापाकडे चाललों. प्रवेश ५, गंगा, विनायक, आणि गोपाळ. गोपा.- तो अटल चोर आहे, ह्याविषयी सांगाल त. शी प्रतिज्ञा करीन. हरणी तुजजवळ आहे असे म. णतांच, पाहिलेंना, कशी बोबडी वळली ती गंगा- ही गोष्ट माझ्याने खरी झणवत नाहीं, बाबा. गोपा०- तुमची प्रकृत सरळ हो; परंतु मी खचीत जा. हणतों की ह्याच राजश्रीचे कर्म. गंगा- मला तर, बाबा, एवढे मात्र दिसते की, आपण जेव्हां विचारूं लागलों तेव्हां त्याकडून आगळीक झाली खरी. गोपा०- तुझी जर एथे नसता तर त्यास खूब बडवि. २०. बाळमित्र. लें असतें. विना- राहूंद्या उगीच; तुमचेपेक्षा दुप्पट त्याच्या म- नगटाची कांब मोठी आहे. गोपा.- अरे, कांबीपाशी काय आहे ? जरी त्याची कांब मोठी तरी तो फोपसा आहे. आणखी पाहि. लेना, जसजसे आपण मऊ बोलं तसतसा तो क. सा अधिक चढून बोले, आणि मी आपल्या बाणी- वर आलों मणजे कसा नरम होई तो ९ पण तुह्मां- ला सांगतों, त्याने जेथें यमनी ठेवली असेल तिकडे जाऊन घेऊन येईन. गंगा- तुमचे बोलणे सर्व खोटे पडेलसें दिसते. त्याने चोरी केली असे मला वाटत नाही, कारण की, तो आमचा शेजारी आहे ह्यास्तव हरणी चोरून नेऊन त्याच्याने लपवून कशी ठेववेल ९ हे का त्याचे म. नांत आलें नसेल. विना- देव करो, की खोट्याचे मनांत आपली चोरी बाहेर पडेल ह्या भीतीने तरी घात करण्याची बुद्धि न येवो. गोपा०- इतकें धैर्य त्याचे नाही, पण विकील बरीक गंगा- अहाग आई, कसे हो तुमी त्याचे घरावर उठ- लां. गोपा०- तो असाच आहे, अशी तुमची खातरी करून देईन, पाहिजे तर. लहान हरणी. प्रवेश ६, गंगा आणि विनायक. विना०- गोपाळा तर फारच क्रोधिष्ट आणि उतावळा. थोड्यासाठी उगीच मोठा कज्जा काढतो. त्याचे म- नांत मारामारी करावी असे होते, पण येथे कला- गत नहोतां एकदाचे दोघे बाहेर गेले, एवढ्याने फार चांगलें झालें. गंगा- कज्जा झाला असता तर मग रावजी आपणां- ला फारच रागे भरले असते. गोपाळाचें अंतःक- रण आपणांविषयी भारी कळवळते, अशी माझी खातर निशा झाली; परंतु हरणी सांपडावी ह्या पेक्षा आपला सूड उगवावा हे त्याचे मनांत फार आहे, नाहीं बरें। विना०- त्याची खोडच आहे, उगीच मधे मधे तोंड घालून ढवळा ढवळ करावी, अशानेच कामाची घाण झाली. लक्षुमणाने चोरली आहे तर गोडी गुलाबीने येईल तशी कज्जा केल्याने येणार नाही. पण ते रावजी आले, पहा. प्रवेश ५ रामराव, विनायक, आणि गंगा. राम- कायरे मुलांनो, तुझी लक्षुमणाचे काय केले ? बाळमित्र. तो श्वास टाकीत माझे खोलीत आला; त्याचे स. वागावर काटा उभारला होता. आपणच हरणी गमावून मजवर लटकाच आळ, त्वां चोरली ह्मणून घेतात, असें गा-हाणे मजजवळ तुमचे सांगत होता; त्यांत गोपाळाचे तर फारच. काय, ती गमावली । विना०-- होय, रावजी, गमावली; पण ती पुन्हा सां. पडेल ह्या भावाने आमी तुह्मांजवळ बोललो नाही, ती तर कालच मजपासून हरवली. गंगा- मी किती तिजसाठी तळमळले, हे तुह्मांस काय सांगू, रावजी ! जवळ नाहींशी पाहून रात्रभर रडलें. राम- हे काय ? तुझी तर हरणीच गेली, पण ह्या सृष्टीत ह्यापेक्षा मोठेमोठे अनर्थ नित्य होत आहत. ह्यासाठी दुःख साहण्याचा बाळाभ्यास असला तर फार चांगले, (विनायकाकडे पाहून ) कारे तिला चुकविलें विना०- खरें रावजी ! ह्याविषयी मजकडून चूक झाली खरी. अगोदर मी तिला बाहेरच नेऊनये; बरें नेली तर तिजकडे लक्ष ठेवावे, तें कांहींच के नाही. असा मी पस्ताई पडलों, आणि ताईची ह रणी, ह्यामुळे तर मी मेल्यापेक्षां मेला झालो आहे. गंगा- अगोदर एकवेळ ह्याचा अन्याय मजकडून समजतां झाला होता, तो ह्याने मला एक अक्षर नबोलतां सोसला; तेव्हा माझ्याने ह्याला रागें करें लहान हरणी. भरवेल राम०- मुली, तुझे गोड भाषण ऐकून माझें चित्त फार संतुष्ट होते. ये, मला मुकादे. तुजमध्ये इतका समज आहे. आणि असे प्रौढ भाषण धैर्याचे करि- तेस, तेणेकरून मला फार आनंद होतो; आणि तुझें अजात शत्रूच्या सारखे बोलणे ऐकून मला अति आश्चर्य वाटते, आणि हर्ष पोटांत मावत नाही. गंगा- मजकडे काय आहे, आपल्याच हाताने केलेलें कर्म आपल्या कामास येते; पण मजसारखीच हा यमनीवर प्रीति करीत असे. माझें तोडे उतरलेलें पाहून हा फारच कोमावला. राम- जसा तुमचा भाव परस्परांवर नि:कृत्रिम आहे, तसाच ह्या पृथ्वीतील प्राणिमात्रावर आपल्या मुख दुःखांच्या अनुभवावरून समान असावें, झणजे ह्यांत ईश्वर राजी राहातो; परंतु फार लोकांची रीति मी अशी पाहतों की, असा एखादा अन्याय कोणी सेवकांदिकांनी केला असता त्याचे सहन नकरि- तां तत्क्षणी त्या बिचाऱ्यांचे पोटावर पाय द्यावा. गंगा-ईश्वर मला अशी दुष्टबुद्धि नदेवो! काय मनु- प्यापेक्षां पशूवर प्रीति ठेवावी १ किती झाले तरी मनुष्य तो मनुष्य, पशु तो पशु. राम.- प्रस्तुत इतकी समसमान प्रीति कोणाची दि. सत नाही. काय, स्वकीय सरणांत उडी घालतील बाळमित्र. आणि परकीय तसेच राहतील ९ अहो, जर एखादे पशूला काही आजार झाला असला, तर त्यावि. षयी किती यत्न करितात, आणि कोणा गरिबाला दुखणे बाहणे आले, तर त्याकडे पाहात देखील नाहीत. असे पुष्कळ पाहतों, तत्रापि मनुष्य पशुंत तारतम्य ठेवणारे असेही ईश्वराचे लाल आहेत. गंगा-- कायहोरावजी, इतके कठीण मनाचे असतातना। राम-मुली, तूं कांही चिंता करूं नको, ती जरी नाहीं सांपडली तरी मी तिजपेक्षां फार सुंदर अशी दुसरी हरणी आणून देईन. गंगा- आतां दुसरी नकोबा; एकीने मला एकदा ठेव लावली इतके पुरे. दुसरी बाळगावी आणि तिने जावें, मग जे दुःख भोगावें त्यापेक्षां नबाळगाव हेच बरें. राम- तुझी कल्पना सर्व पृथ्वी निराळीच आहे. अ शी जर वागशील तर ह्या जगांत जे मुख आ त्याचा लेशही कधी मिळणार नाही. एखादे दिव शी भित्र गांवास जाईल, किंवा मरेल, ह्मणून क मित्र करूंच नये? पहा, जेव्हांपासून तुझा आदि हरणीचा समागम झाला तेव्हांपासून आजपावेत मुखाचे दिवस किती गेले; आणि गमावल्यावर दु: तर दोन किंवा तीन दिवस राहील; ह्यावरून मुखा दिवस फार व दुःखाचे थोडके, असे समजावे. हरणी चांगलीच होती; तिजवर तुझी प्रीति जडल २५ लहान हरणी. ह्यांत आश्चर्य नाही, आणि आतां तिजविषयी जर न हळहळलीस तर आश्चर्य, गंगा- तर मग मी पाषाणहृदय असे होईल. राम- मला एवढेच बरे वाटले, की ह्यासमयीं तुला दुःख सोसण्याची इतकी संवय झाली; पुढे ह्या पे- क्षा अधिक प्रसंग प्राप्त झाला असतां पहिल्या संव. ईमुळे दुःख सोसणे अंमळ सोपे होईल. पर्वताप्रमा- णें मनुष्याने अचळ असावें. ह्यासाठी तुला आ• तांपासून अभ्यास झाला हे उत्तमच आहे. ज. शी तुझी हरणी हरपली तशी ह्या सृष्टीतील आमची ही एखादी वस्त हरपेल, ह्मणून काय खेदच करी. त राहार्वे पण तुही लक्षुमणाशी कटकट केली अ. से वाटते. गंगा- नाहींहो, नाहीं, रावजी, आझी तर त्याशी न. | प्रतेने गोडच बोललों, पण गोपाळाने बरीक ठाव घेतला. राम- त्याचे उत्तर त्याने काय दिले १ गंगा- उत्तर देण्यांत त्याचे पाणी मरत होते, आणि विचारतांच खरकन तोंड उतरले. पण रावजी, मी तुझांला पुसते, माझी यमनी घेऊन त्याच्याने नाही ह्मणवेल बरें १ असा धीट आहे काय तो ९ कसे दिसते राम- माझ्याने स्पष्ट सांगवत नाही, पण दिसण्यांत २६ बाळमित्र. येतें खरें. जर चोरली नसती तर त्याचे तोंड एका- एकी उतरतेंना, आणि काळीज धडधड उडतेना. आतां तुझ्या यमनीचा शोध लागण्याविषयीं शहरों त दवडी पिटवितो. गंगा- पण रावजी, लक्षुमणानेच चोरली आहे तर आ- पला शोध व्यर्थ होईल. राम०- असें कद्धी होणार नाही. हरणी कांहीं केव- ळ सोने रुपे नव्हे, तर ती पेटीत राहील; तिला चारा पाहिजे, पाणी पाहिजे, तिचे पाय मोकळे होण्याकरितां अंमळ तिला सोडिले पाहिजे, ह्यामुळे ती कोणास पचणार नाही. ती त्याचे घरांत अस ली तर तिचा माग कोणत्याही भल्या माणसाचे हार लागेल. त्याचे बापाचा कुत्सित स्वभाव मला प का ठाऊक आहे, यासाठी मी त्याजकडे जाव याचा नाही. माझ्या मुलाशी तुमच्या मुलांनी खे ळू नये, ह्मणून एक दोन वेळ त्याने मजशी भांडर केले होते. बरें, अगोदर दंवडी पिटविल्याने काय होतें तें तर पाहूं या. गंगा- हरणी आणून दिली असतां कोणास बक्षीर देण्याची ताकत असती, तर मला ही हरणी सां पडण्याची आशा राहती. राम- बक्षीस देण्याविषयी मीच ताकीद फिरविते विनायका, चल माझे खोलीत, मी तिचे खुणखावं विषयी चिठी देतों ती कातवाल चावडीवर जाऊ लहान हरणी. . २७ कोतवालास पोहोंचती करून ये. गंगा- यमनीची आमची जर पुन्हां एकवेळ भेट हो. ईल तर मग आमचे आनंदास पार नाही. अंक २, प्रवेश १, विनायक आणि गंगा. विना.- (अतिहर्षानें धांवत धांवत खोलीत येऊन ह्मणतो.) गंगा ! गंगा! गंगा- काय आहेरे, काय आहे? रे तूं फारसा हर्षला- . स; वाटते यमनी सांपडली. विना.- नाहीं नाहीं, तिजपेक्षां फार सुंदर हजार हि. शांनी चांगली वस्त सांपडली आहे. ( डबीत ठेव. लेली एक आंगठी दाखवितो.) ही पहा, मला आ- पले दरवाज्या जवळच सांपडली.. गंगा- वाहवा ! काय चांगली आंगठी आहे! पण हि. चा मधला खडा कोठे आहे, बरें? विना- तो पहिलाच निखळला आहे, हा पहा, ह्या कागदाचे पुडीत गुंडाळलेला आहे. ( तो उजेडति रखडा नेऊन पाहतो.) अरे हा हिरा आहे, वाहवा काय मजेचा लखलखतो आहे ! रावजींचा तर हि- रा एवढा मोठा नाही. २८ बाळमित्र. गंगा- पण ज्या पुरुषाचा हा हिरा आज गमावला अ- सेल त्याला किती खेद होत असेल! त्याची मला दया येती. विना०- हरणी गमावण्यापेक्षा असा हिरा गमावणे फार वाईट, गंगा- पण यमनी फार चांगली, मजवर किती तिची आवड असे, मी लहानपणापासून बाळगली, आ- णि दिवसें दिवस ती फार मौजेचे खेळ शिकली. य- मनीपेक्षां का आंगठी चांगली १ मोठ्या राजाची आं. गठी असली तरी मला यमनीपेक्षा चांगली वाटणार नाही. विना-ह्या आंगण पुढे तुझी हरणी काय आणली आ- हे. तशा हरण्या तर हजारों मिळतील ह्या आंगठीवर. गगा- अहा हा ! काय माझ्या हरणीची सर करील आंगठी ! त्वां जरी ही मला दिली तरी मी आपली यमनी देणार नाही. ज्याची ही आंगठी गमावली त्याजवळ अशीच दुसरी असेल. मजजवळ काय एकच यमनी, ह्मणून त्याच्यापेक्षां माझें दैव वाईट. विना०- ताई, पण ही कोणा मातबराची असावी, ना. ही बरें ! गरिबाजवळ असली कुठची ९ गंगा- होय, पण खडा निखळला ह्मणून तो बसवाव. याकरितां सोनाराकडे घेऊन जातांना कोणी चाक- राने ही वाटेंत गमावली असावी, किंवा सोनारापा- सून पडली असावी, परंतु ज्याचे हाताने हरवली लहान हरणी. २९ त्यास दुःखाचा डोंगरच झाला असेल. विना०- तर मग माझी आवड उडाली. आतां राव. जीस झटकन कळवावें. वाहवा ! रावजीच इकडे आले, बरें झालें. प्रवेश २ रामराव, गंगा, आणि विनायक. राम- हरणीविषयी एका प्रहरानंतर देवडी फिरेल. विना.- रावजी, मी आझून कोतवालाकडे गेलों ना. ही. ( बापाचे हातांत ती डबी देऊन ह्मणतो.) ह्या- मुळे मला जावयाला उशीर लागला. राम- हा हिरा खरा आहे, फार चांगला दिसतो. विना- ( उड्या मारून ह्मणतो.) पाहिलेंना ह्या हिन्यामळे अंमळ हरणीचा विसर पडला ह्मणून काय आश्चर्य ? राम०- मुला, ही का तुझी आहे ह्मणून इतका हनि उडतोस ? विना- नाही, नाही, पण हिचा शोध जर कोणी नकरील तर मग काय चिता आहे राम- तुला डबी उचलतांना कोणी पाहिले १ विना- रावजी ! कोणी मला पाहिले नाही. गंगा- मला जर अशी वस्त सांपडती, तर ही ज्याची असेल त्याला मजपासून केव्हां मिळेल, व तेणेक. बाळमित्र. रून मी केव्हां आनंदित होईन, अशी चिंता म्या ठेवली असती. विना- ह्यांत तूं काय अधिक सांगतोस ? हिचे ध- न्याने मजजवळ यावें झणजे मीही तेव्हांच देऊन . टाकीन. सांपडलेली वस्त लपविणे आणि चोरी करणे एकच आहे. ज्याचा माल त्यास द्यावा. राम- मग हा तुझा आनंद आणि ह्या उड्या राह- तीलसे वाटते. विना०- ही सांपडली तेव्हां माझें दैव फार चांगले असें मनांत आले होते, पण ताईने सांगितले की ज्याची गमावली त्याला फार दुःख झाले असेल, त्यावरून मी आनंदित नाही, मला वाईट वाटत: ह्यासाठी ज्याची त्यास दिली झणजे मला फार आ- नंद होईल, नाही तर दर खेपेस तिजकडे पाहून माझी नव्हे ह्मणून मला लाज वाटेल. गा- दुसऱ्याचे दुःख दूर करणे ह्यांत फार सुख आ- हे, ह्यासाठी लक्षुमण माझें उतरलेलें तोंड पाहून हरणीला ठेवील असे घडणार नाही. गम०- (आनंदाने उभयतां मुलांचे चंबन घेऊन म- णतो.) ही गुणाची मुले ईश्वराने मजवर कृपाल होऊन दिली, आहा, ह्यांचे योगाने मी किती आ. नंदी आहे ! धन्य मी, की मला असली मुले. मु लांनो, अशी भूतदया सर्वकाळ मनांत असूंद्या बरें ह्मणजे आपणांस व दुसन्यांस फार मुख होईल. लहान हरणी. गंगा- रावजी, तुमचर्चाच चाल आमांस लागेल, दुसरी लागावयाची नाही. जसे तुझी आहां तशीच आह्मी होऊं. विना०- मी आतां ही सवास दाखवितों, नाही तर, रावी, शहरांत एकदाच दंवडी पिटवावी की, हर- _णी हरपली, व आंगठी सांपडली. राम.- थांब, उगीच ऐस, यक्तीनेच ज्याची त्यास पो. होंचती होई असें केले पाहिजे, नाही तर एखादा ठक येईल आणि माझीच ह्मणून उपटून घेऊन जाईल. विना- मीही जशास तसा होऊन आंगठीच्या सर्व खुणा खाणा विचारून घेऊन मग देणे तर देईन; नाहीतर कद्धी कोणास देणार नाही. राम- ही तुझी युक्ति काही उपयोगाची नाही, का- रण की, जर कोणी हिला मालकाचे हातांत पाहिले असले, तर तो सर्व खुणा खाणा देखील सांगेल, आणि घेऊन जाईल. मग मालक आला तर त्या- स काय देशील? गंगा- तूं आपलें शहाणपण मिरवू नको, कसे कराव- याचें तें तुजपेक्षां रावीला अधिक ठाऊक आहे. राम- दमादमाने केले पाहिजे, कांकी एवढ्या किमती- ची आंगठी गमावली आहे त्यापक्षी तिचा धनी उ. गीच बसणार नाही, फारच शोध करील. विना- शोध करण्याची कल्पना त्याला नाही जर ३२ बाळमित्र. सुचली तर १ गंगा- आपण कसा हरणीचा शोध करितों ? तसा ह्या आंगठीचा धनीही करील. तो शोध केल्यावांचून कसा राहील १ राम- ह्याविषयी मीच काय तो विचार करीन, तुह उगीच असा कोणाजवळ वर्तमान सांगू मात्र नका प्रवेश ३, गंगा आणि विनायक. विना०- एखादे वर्तमान लोकांस कळविण्याविषयी फा चांगले आहे, ते जर गुप्त ठेवण्याचा प्रसंग आला त मोठे अवघड पडते, ह्यासाठी हे वर्तमान लोकांस र कळविल्याने मला फार आनंद होईल. गंगा- कशाचा आनंद १ हिची तर काही इच्छा तुल नाहींच, आणि जरी असली तरी तुला जिरणा नाही. रस्त्यावर वस्त मिळाली ह्यांत मोठी प्रतिह ती काय ? विना.- तूं ह्मणतेस ते खरेंच, पण माझी ही एत हिशेबी मसलत चांगली आहे. गंगा- लोकांमध्ये ह्मण आहे की, बायकांचे पोटो गोष्ट मावत नाही, पण आतां पाहूं बरें, ही गो दोघांतून कोणा जवळून फुटते ती! विना-मी रिकामा बसलों मणजे माझें मन अ लहान हरणी. गुप्त गोष्टींत फार घोळत असते, यामुळे एखादे वेळे- स फटकन् तोंडांतून उद्गार निघेल, ह्यासाठी आतां मी यमनीचे शोधाकडे चित्त लावून कोतवालचाव- डीवर जातो. गंगा- बरे तर आतां जा कसा लौकर. अरे, पण गो- पाळा, मातक्यान का आलास बरें ? प्रवेश ४, गंगा, विनायक, आणि गोपाळा. गोपा.- विनायका, तूं बाहेर कोणीकडे जातोस ? विना०- कांहीं घरचे काम आहे तिकडे जातो. गोपा.- थांब, माझी एक गोष्ट ऐकून जा, ह्मणजे तु- | ला असा हर्ष होईल की, हांसतां हांसतां तुझें पोट फुगेल. विना०- बाबा, मला हांसायाला अवकाश नाही. गोपा.- पण तूं एवढी गोष्ट ऐकतर खरी : अरे, आ. | पला दावा साधला. विना- कशा विषयींचा दावा ? गोपा.- लख्याने आपले बापाची आंगठी गमावली. अहाहा! भली मौज झाली. (गंगा आणि विनायक एकमेकांकडे विस्मयाने पा. हतात.) गंगा- काय त्याचे बापाची आंगठी ? वाळमित्र. गोपा.- होय, मी खरेच सांगतो. खडा पडला होता तो सोनाराकडे नेऊन बसवावयाकरितां हाणून आज सकाळीच लक्षुमणाचे बापाने आंगठी त्याचे हवाली केली. (विनायक गंगाचा पदर ओढितो ती त्याला बोटाने दाबते, ) तो आपले एथें आल त्यावेळेस त्याचे खिशांत डबी होती, मंग जेव्हां रा गाने तणतणत बाहेर गेला तेव्हां ती खिशांतून नि घून कोठे पडली कोणजाणे. गंगा- आंगठी गमावल्यावर लक्षुमण तुमचे दृष्टीस पड लाच असेल, त्याचे तोंड कसे दिसत होते ? गोपा.- अगदी भयभीत होऊन उतरून गेले होते जसे कोणी लाख पायपोस मारले. गंगा- त्याचे बापाला हे कळले आहे की नाही ? गोपा.- जेव्हां त्याचे बापाने त्यास विचारले की, सो नारास आंगठी नेऊन दिली तेव्हां त्याने उत्त केले की, होय बाबा, हा आतांच देऊन आला आगठी हरवली हा एक त्याचा अन्याय आणि ल बाडी बोलला हा दुसरा, ह्यामुळे तर फारच हिर मुसला. गंगा-अरेरे, गरीब, पहा काय दैवगति ती! गोपा.- तुझी इतकी त्यावर दया करितांना १ गंगा- असा समय कोणावर येऊ नये, बाबा, ह्मणू मला दया येती. गोपा०- असल्यावर, हो, कश्ची दया! उलटी मी न्य लहान हरणी. याची मौज तुह्मांपाशी सांगतो ती ऐका. गंगा- ह्यांत काय तुला चांगले वाटतें १ गोपा.- वाः, काय मौज सांगावी ! तो आंगठी आंग. ठी करीत वैतागल्या सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे धांवतो आहे, आणि ज्यास त्यास विचारीत फिरतो आहे. भले झाले झणून मी मौज पाहाव- यास त्याचे मागे गेलो होतों! तो मला विचारूं लागला की, माझी आंगठी तुला सांपडली. तेव्हां मीही पहिला डाव मनांत धरून उत्तर दिले की पहा आपली कोठे असेल तेथें, मला काय विचार- तोस ९ त्वां आपल्या जामदारखान्याचे काम मजक. डे सांगितले आहे काय ? मग तो वरमून बोलला की, तुला जर तिची किंमत ठाऊक असती तर अ. से कधी बोलतासना; मग मी झटले, खरेच, ज्यास सांपडली असेल त्याची धनच झाली असेल; तो केवढा दैववान् ! त्याचा आनंद गगनांत मावत न. सेल. मग तो बोलला, बरें, बाबा, काय ह्मणशील तें ह्मण, पण मला तर असा समय प्राप्त झाला, आतां माझा बाप मला काय ह्मणेल ९ तेव्हां मी उत्तर केले की, बाप काही झणणार नाही, पण कोलदांडा आणि मिरच्यांचा धूर मात्र सिद्ध करील. गंगा- अरे अरे, दु:खावर असा डाग द्यावयाचा न. व्हता. गोपा०- कां नव्हता . त्याला बरी न्यावेळेस तुमची बाळमित्र. दया आली नाही? विना- अरे, आपणांशी कोणी कपटबुद्धीने वर्तला - ह्मणून आपणही न्याशी तसें वर्तावे, हे चांगले नाही. गोपा.- मी जशास तसा, काय सांगू ९ माझे हाती जर आंगठी लागली असती तर आपला दावा त्या- चेच बापाचे हातून उगवून घेतला असता, की भेद कळू दिला नसता. गंगा- काय तूं तिला चोरून ठेवतास १ गोपा.- नाहीं नाहीं, बापाने त्यास खूप चांगली शि. क्षा केल्यावर मग त्याचे हवाली करतो. विना०- गोपाळा, बराच आहेस किरे ! तूं असा आं. तल्या गांठीचा आहेस हे मला आझून ठाऊक न. व्हते. गंगा- मलाही ठाऊक नव्हते, आणि जरी तूं असें बो. लतोस तरी मला खरे वाटत नाही. जर खरे आ- हे तर तुझ्याच तोंडाने न्याय झाला, आमचे यम- नीचे वेळेस त्वां उगीच तोंड उतरल्याचे सोंग घेत. लेंसे दिसते. गोपा.- अंतःकरणांत खोंचल्यावांचून सोंगाने कुठे असे होते काय १ अहो जे मजशी भले त्यांजवर मी फार प्रीति करतों, आणि मजशी जे वांकडे त्यां- शी तर मी फारच वांकडा. हा इकडे लक्षुमण आ. ला पहा. लहान हरणी. प्रवेश ५ गोपाळा, लक्ष्मण आणि विनायक. गोपा.- (लक्ष्मणाकडे हात करून ह्मणतो.) यावें लक्ष्मणराव, यावें. लक्ष्म- मी तुमचे पायां पडतों, आतां मला उगीच छळू नका; मी दुष्ट खरा, आणि प्रारब्धाने ही मज- वर घोरपड आणली; ह्यामुळे मी अगदी मरून चूर झालो आहे. विना०- अंगठी हरवल्याची दंवडी पिटविली का ? लक्ष्म- दंवडी कशाची, आतां हे काळे तोंड घेऊन बापाकडे काय जाऊं. हा जीव किडा मुंगी नव्हे, तर रगडून टाकू आता काय करूं? गोपा.- पैज मारतों की, अंगठी हरणीचे पायीं अ- डकली, आतां त्या दोघींचा थांग एकदाच लागेल. लक्ष्म- बरे बाबा, तुमची था सोसावी हा तर माझा खुराकच, पण दैवाने मागे घेतलें, काय करूं? विना- तूं घाबरा होऊ नको, तुझी अंगठी येथेच आहे. लक्ष्म- खरच काय. माझी अंगठी तमचे पाशी आ. हे अहाहा फार बरे झाले.. गोपा.- ( गंगास एकीकडे नेऊन ह्मणतो.) पहा क. सा विनायक त्याची थट्टा करून त्यास चाळवितो बाळमित्र. आहे तो, ठीक आहे. लक्ष्म- खरेंच काय हो, असे आहे. वाहवा!- ना- ही पण आतां माझी दुष्ट वर्तणूक कशी आहे ती अगोदर कळवितों. (लक्ष्मण हर्षाने बाहेर जातो. प्रवेश ६. नगंगा, विनायक, आणि गोपाळा. गंगा- तो बाहेर निघून गेला ह्याचे कारण काय ? विना- गरीब बिचारा, भांबावला असेल. गोपा०- थट्टेचा निकर होईल. आतां तो आपले बा पास घेऊन येईल पहा, मग तुमी त्याला अंगई कोठून द्याल ९ विना- तर मी काय त्याची अंगठी चोरून ठेवीन असे तुला वाटले १ गोपा.- तर खरेच की काय तुजजवळ अंगठी आहे विना०- हे रे काय ९ जर नसती तर मी आहे ह्मणू. न उगीच खोटें कशासाठी बोलतों ९ ती तर मल आपले दरवाज्यापुढे सांपडली, तेव्हां मी उचलू घरांत आणली. गोपा.- काय बेट्याचे प्रारब्ध पहा ! असो, पण तु मी तरी त्याकडून पुष्कळ खडे खाववून मग आ जाणून सांगावयाचे होते. गंगा- गोपाळा, पाहिलेंना, माझ्या भावाचे त्दृदय व लहान हरणी. सें लोण्यासारखें पाघळते ते ९ आणि तुझें तर क. ठिण, ह्मणून आमची मैत्री तुजशी कमी होऊ लागली. प्रवेश ७. रामराव, गंगा, विनायक आणि गोपाळा. राम- (आपले खोलीतून बाहेर येऊन ह्मणतो,) ल. क्ष्मणाला काय झाले रे १ म्यां खिडकीतून पाहिले तो तो रडत रडत इकडे तुह्मांकडेसच आला. गंगा- बापडे पोर मेल्यासारखे हो झालें. विना०- रावजी, मला जी अंगठी सांपडली की ना. - ही, ती त्याचे बापाची; ती त्यानेच गमावली, ह्मणू- न रडत होता. राम- आमची हरणी छपवून ठेवून आझांकडे अंगठी मागावयास आलास, तूं दगलबाज आहेस, असें तु. मी त्यास बोलण्यांत दर्शविले की नाही ? गोपा०- नाही रावजी, विनायकानें यमनीचें नांव दे. खील काढले नाही. राम- हरणीस परत आणून घेतल्यावांचून अंगठीचा थांग लागू देऊ नका. विना.- असे माझे मनांत नाही, कांकी जेव्हां तो अगदी गायावाया करूं लागला तेव्हां मला भारी दया आली, आणि मी सांगितले. बाळमित्र. गंगा- यमनीविषयी माझे पोटांत ममता व तिच्या वियोगाचे दुःख फारच, पण लक्ष्मणाची ती अव. स्था जेव्हां पाहिली तेव्हां माझें दु:ख त्याचे दुःखा. चे पाडास देखील पुरणार नाही, असे वाटले. राम - बरें बरें, तुह्मी दोघांनी फार चांगली बुद्धि के ली. त्याला तुझी सांगितलें येणेकरून तुमचा सर ळभाव दिसून आला. आणि मीही सुसंततिमा: असा झालों, जो शत्र आपले हातांत आला त्यार पीडा देणे हे नीच लोकांचे काम, हे खरे आहे. बरे लक्षुमण निघून गेला, त्याने अगोदर कां अंगठ मागितली नाही. विना०- त्याला मी अंगठी आहे असे सांगतांच अस त्यास आनंद झाला, की मी काय करतों व को जातों ह्याचे भान देखील त्यास राहिले नाही. गंगा- तो वेड्यासारखा दाराकडे धांवत धांवत जा ऊन नविचारतां बाहेर निघून गेला. विना- रावजी, तुह्मी ताईवर आणि मजवर संतु आहां ह्मणून मला फार बरे वाटते. शम- अशा सत्स्वभावाने वर्तल्यावर मला संतो 1 का होणार नाही विना - पण तुही आह्मांस ताकीद केली होती की. गम- होय, अंगठीविषयीं गफलतीने कोणापार बोलूंनका ह्मणून ताकीद केली होती खरी, पण म लक आल्यावर त्यास नसांगतां ठेवावी असे स ४१. लहान हरणी. गितले नव्हते. तुझी केले ते नीटच केलें. प्रवेश ८. रामराव, गंगा, विनायक, गोपाळा, आणि लक्ष्मण. ( लक्ष्मण हरणीस घेऊन आंत येतो, तिला पाहतांच गंगा धावून जाते आणि हरणीस उचलून तिचे मु. के घेते.) गंगा- अहागे माझे लाडके यमने, तूं माझी फार आवडती, मला टाकून कुठेगे गेली होतीस ९ अगे लबाडे. लक्ष्म०- पहा मी किती दुष्टाचरणी आहें तो! तुझी तर केवळ धर्मराज, तुमच्या मनांत कपटाचा लेश- ही नाहीं; मी कपटी मैंद, माझ्या ह्या वर्तणुकेची क्ष- मा तुझांकडून कशी होईल ? ( रामरावजीकडे पाहून ह्मणतो,) मी तुझांला कसा अधम दुष्ट दिसत असेन ! राम- जो कोणी आपले दोष आपल्या मुखाने तुज- प्रमाणे कबूल करून क्षमा मागून घेण्याविषयी यत्न करितो तो मनुष्य वाईट नव्हे. काही चिंता नाहीं; ही घे तुझे बापाची अंगठी. लक्ष्म- ही गोष्ट किती चांगली ह्मणून वाणूं ९ मी तर अभिलाषबुद्धीने ह्यांच्या हरणीवर हात घातला, परंतु तद्विषयी ह्यांच्या मनांत कांही एक नाहीं, ये. णे करून मलाही पश्चात्ताप झाला; ह्यांच्या आणि १२ बाळमित्र. माझ्यामध्ये फारच अंतर; हे अतिउत्तम, मी अति- नीच. गंगा- लक्षुमणा, त्वां आमची यमनी उगीच थटेने ठे. वली असेल; आज संध्याकाळी तूं हिला परत आणून देणार होतास असे वाटते. लक्ष्म०- मी इतका सुस्वभावाचा नव्हे, ही चोरून नेऊन तळघरांत लपवून ठेविली होती. राम- अझून तरी तला अनुभव आला ह्मणजे पुरे की, दुष्ट चालीने वर्तलें असतां ईश्वर आणि आ. पले सोयरे धायरे भाऊबंद वगैरे सर्व छी थू क. रितात, व दूषण ठेवितात; बाबा, साहस कर्म कद्धी गुप्त राहत नाहीं, वेळ भरली झणजे आपाप बाहेर येते. पापा पुण्याचा झाडा हातच्या हाती द्यावा घ्या. वा लागतो. पहा माझी मुले कशी चांगल्या चालीने वर्ततात ती! ह्यामुळे माझा जीव डोंगराएवढा हो तो. अनुपकायावर उपकार करणे ही साधूची रीति, ह्यापेक्षा दुसरे काहीच मोठे पुण्य नाही. लक्ष्म- ह्या गोष्टीचा तर म्यां पक्का अनुभव घेतला कां गंगाबाई, अहो विनायकराव, आतां माझ्य अपराधाची क्षमा करा. विना- (लक्ष्मणाचा हात धरून ह्मणतो.) आतां आ मचे मनांत काडीमात्र राग नाही, हे मनापासून सांगतो. गंगा- माझी यमनी मला सांपडली, आतां जे झा लहान हरणी. से आमचे स्मरणांत देखील नाहीं लक्ष्म०- गोपाळा व मी अझून देखील अशी योग्य चाल न धरूं तर मग कावळ्यापुढे मोत्यां पॉवळ्यां- चा चारा घातला असे होईल. गोपा०- जशी तुला लाज वाटती तशी मलाही वाटती, . पण माझे मनांत हा उपदेश पक्केपणी ठसला आहे. लक्ष्म०- मी आतांच बापाजवळ जाऊन अंगठीचे वर्तमान त्यास सांगू लागलों तों त्यास मनस्वी राग आला. पण इतक्यांत तुह्मी जी कृपा केली ती कळवितांच त्याचे अंतःकरण फार पाघळले, आणि त्याने तुझांस सांगू सांगितले आहे की, तुमचे उप- काराने मी फार संतुष्ट व आभारी होऊन राहिलों आहे. त्यास आपल्या इच्छानुरूप एकदा भेट घ्यावयास येईन, व कांही भेटीचे पदार्थ तुह्मांक- रितां घेऊन येईन, ह्याविषयी मला फार उत्कंठा लागली आहे, ह्मणून त्यांस विचारून ये. राम- माझे मुलांचे मनांत तुझी उत्तमरीतीने वागावें, तेणे करून जसें सुख होईल तसे तुमचे नजर न- जराण्याने होणार नाही, त्याचे काही कारण ना- ही. ज्याची वस्त त्यास दिली ह्यांत आश्चर्य काय ? व तो उपकार कशाचा ९ । विना- तुमचा आमी जन्माचा स्नेह मिळविला हा. ___च आमचा नजराणा बरें, लक्ष्मणराव. लक्ष्म- तुझी मला स्नेही ह्मणाल तर ह्मणा, परंतु