Jump to content

बालमित्र भाग २/प्रतापशिंग

विकिस्रोत कडून
बाळमित्र.
प्रतापशिंग

 प्रतापशिंग ह्मणून कोणेएके पलटणीचा मुख्य सरदार होता; तो आपले उत्तम चालीने मोठे योग्यतेस चढला होता; त्याने पाहिले तो आपले हाताखालचे सरदार सर्ववेळ जुगाराकडे मन योजीत असतात, असे त्यास समजले; ह्मणून त्यास फार खेद उत्पन्न झाला.मग त्यांस शुद्धीवर आणण्याविषयी तत्पर होऊन त्याने एके दिवशी सर्व सरदारांस आपले येथे जेवावयास बोलाविलें,आणि बोलतांबोलतां जुगाराचे गोष्टीवर बोलणे आणून त्याने आपणास घडलेल्या गोष्टींची हकीकत सांगितली.

 मी सोळावर्षांचा असतां, ज्या पलटणीत हाली मुख्य आहे त्याच पलटणीत मी लहान अंमलदार होऊन राहिलो. बाळपणांत मी विद्याभ्यास फार झटून करीत असें, ह्मणून माझे आईबापांचे अटकळीत असे आले की, हा शिपाइगिरीची कळा अशीच शिकून एखादे दिवशी योग्यता व कीर्ति मिळवील; परंतु थोडक्याच दिवसांत जुगारी सरदारांच्या मागमेकरून त्यांचा कित्ता मला लागला. त्यांचा समागम हे एक का.
बाळमित्र.

रण, दुसरें, त्यांनी ह्याविषयी अति आग्रह केला, ह्यमुळे माझें मन वेढून गेले.
 मग मी त्यांशी नित्य नित्य जुगार खेळू लागल्यामुळे मला असा छंद लागला की, त्याखेळावांचून दुसरे काही सुचेना; अगदी मोहून गेलों; मला एखादे वेळेस तो खेळ सोडून काम करण्याचे पडल्यास त्या कामाचा अतिशयित तिटकारा वाटे.
 विश्रांति जर ह्मणाल तर एक घटकाभर झोप मात्र घेई, पण ती तरी जुगार सोडून घेणे मटलें मणजे फार प्राणसंकट पडे. बरें, तितक्यांत तरी गाढमूढ नीज किंवा जुगाराशिवाय दुसरें स्वम १ हेही नाही. स्वमांत रुपयांचे ढीग पाहावे, व फांशांचा उच्चार करून मोठ्याने बरळावे, असें निरंतर निद्रा होई तोपर्यंत होत असे.
 पहा, भोजन हे सर्वांस स्वभावेंकरून प्रियना । पण मला तितकाच वेळ व्यर्थ गेला ह्मणून तें उत्तम अन्न विषवत वाटावें. माझे जुगार खेळावयाचे सोबती ह्यांचा व माझा फार वियोग नव्हावा ह्मणून मजकडून जितकी त्वरा होई तितकी मी करीत असे.

 वसंतकालादिक जे काय ईश्वराने मनुष्यांस मुखव्हावे ह्मणून केले आहे, व सणांचे दिवस, त्या सर्वाचा मी अनादर केला, ह्यामुळे ते सर्व सुख मला अंतरलें. जुगार खेळणारे सोबती यांवांचून कोणाशी भाषण देखील नाही, मग स्नेह तर फारच लांब, आईबापांचे स्मरण जर कधी मला झाले तर त्यां'
प्रतापशिंग.

चे शिकवणीमुळे त्या स्मरणाने मनांत फार दुःख होई. । ईश्वराचे स्मरण तर कधी झालेच नाही.
 पहिल्याने जुगारांत मला रती अनुकूळ होती, ह्यामुळे तर माझी बुद्धि फारच अष्ट झाली. जुगार खेळण्यामध्ये फारच जे द्रव्य मिळविले होते ते द्रव्य भुईवर आंथरून त्याचा बिछाना करीत असे, ह्यासाठी की, माझ्या ओळखीच्यांनी ह्मणावे, हा आजकाल द्रव्यांत लोळतो आहे.
 अशा नीच कमीत मी आपल्या वयाची तीन वर्षे फुकट घालविली, त्या तीन वर्षांचे स्मरण मनांत लज्जा आणल्या वांचून होत नाहीं; कारण, त्या वर्षांनी माझे प्रतिष्ठेस फारच बहा लावला; तो तुह्मांस काय सांगू त्या तीन वर्षांचा कलंक जावा ह्मणून किती जरी यत्न केला तरी काही जावयाचा नाही. ह्या खेरीज देहाने न होण्यासारखी आणखी एक गोष्ट मजकडून झाली,ती सुधारावी ह्मणून आज वीस वर्षे यत्न करितों आहे, तरी सुधरत नाही; ती सांगावयास मला मेल्याचा पाड चढतो, आणि त्या गोष्टीचे स्मरण झाले झणजे मी किती जिवाला खातों; पण तितकेही सोसून ती गोष्ट तुमचे हितासाठी तुझांला सांगतो.
 एके समयीं मला भरतीचे शिपाई मिळवावे ह्मणून आज्ञा झाली; तेव्हां ह्या द्वाड व्यसनांत मी राहिलों

आणि ते काम हवलदारास सांगितले. मग चार दिवसांनंतर हवलदार वीस माणसें बक्षिसासाठी घेऊन आला,
बाळमित्र.

त्या दिवसाचे आदले रात्रीस म्यां आपलें जे काय होते ने सर्व जुगारांत गमावलें; बरें, तेवढ्यावरच गेलें असें नाही, जे सरकाराने कामाकरितां मजकडे रुपये दिले होते तेही गमावले. पाहा तुह्मी, मग त्या मूर्खपणाला व दुःखाला कांही जोडा आहे. त्यावेळी मला भान न राहातां काय करूं कसे करूं अशी अवस्था प्रान झाली. असा जेव्हां मजवर वक्त गुदरला, तेव्हां जेथे माझी पलटण होती तेथें एक स्नेही सरदार होता न्याजकडे म्यां जुगार खेळण्याची हकीकत लिहून रुपये उसणे मागावयाकरितां एक हलकारा ताबडतोब पाठविला. त्याचे उत्तर त्या सरदाराने कसे लिहिलें तें ऐका. त्याने पत्रांत असा मजकूर लिहिला होता की, मी नित्य जुगार खेळणाऱ्यास रुपये देऊन बुडवून टाकू १ आतां रुपये न दिले तर स्नेह तुटेल, तर ज्या स्नेहाने पाणी उतरतें तो स्नेह रुपये पाण्यांत यकून राखावा, तर असा स्नेह राखण्यापेक्षां रुपये राखावे हैं फार चांगले आहे; ह्मणून मी आपले रुपयेच राखितों; मला स्नेहाची गरज नाही. असें धिक्काराचे उत्तर वाचल्यावर मग कशाला विचारतां, ते वेळी मजवर आभाळ कोसळले; त्याचे स्मरण जर आतां झालें तर असे वाटते की, ते कर्म म्यां कालच केले. त्यासमयी असे मनांत आले की, माझे आईबापांस मजविषयी किती राग व किती दुःख झाले असेल: या प्रमाणे म्यां आपले कुळांत व सोयरे धायरे इष्टमित्र ह्या सर्वांप्रतापशिंग. त अपकीर्ति मिळविली, व त्यांसही हलकेपणा आ- णिला. आणखी माझे मनांत आले की, राजाचे पलट. णीतून आतां माझी पुरती शोभा होऊन चाकरी निघे. ल. अशी अनेक प्रकारची संकटें एकदाच मनांत उभी राहिली, तेव्हा माझे डोळ्यांवरचा धूर गेला, आणि प. श्यात्ताप पावलों की, जर मी चांगले आचरण केलें असतें तर मला पुढे अधिक वाढावयाची आशा असती, पण तें आतां कोठचे? असा जेव्हां शुद्धीवर आलों तेव्हां हा अपराध दूर करण्याकरितां दुसरा अपराध करावा अ. सा मनसुबा केला, आणि तो सिद्धीस न्यावा. इतक्यांत ज्याने असे पत्र लिहिलें तोच सरदार माझे येथे आला. त्यास पाहातांच मला असा क्रोध चढला की, मी शस्त्र घेऊन एकाएकी त्याचे अंगावर धांवलों, ते वेळेस पु. ढे काय होईल व हा कां आला हे माझे लक्षांत आ- लेच नाही. शेवटी त्यानेच हातचे शस्त्र घेऊन स्नेह वादामुळे मला आलिंगिलें, आणि ह्मणूं लागला की, तुमचे पत्राचे उत्तर म्यां धिक्कार पूर्वक लिहिले ह्मणून तुह्मांस राग आला असेल, परंतु त्या लिहिण्यांत माझा अभिप्राय असा होता की, ह्यावरून तुझांस माहित व्हा- वेंकी वाईट खोडीमुळे तुह्मी कसकसे संकटांत पडलां,आ- णि मलाही समजावें की,माझें पत्र लिहिण्याचे सार्थक्य कसे होते. आतां तुह्मांस ज्यापक्षी पश्यात्ताप झाला आहे त्यापक्षी तुमचें माझें कांही वाटले नाही, घ्या हे रुपये; असें ह्मणून त्याने पिशवी काढली, आणि बोबाळमित्र. लिला की, बक्षिसांचे शिपायांस खर्च होऊन बाकी जे राहतील ते घटकाभन्यां जुगाराची इच्छा झाली झणजे कामास पडतील. त्याचे उत्तर मी त्यास लाजून केले की, अतःपर जुगार खेळणार नाही. मग त्याने मला पोटाशी धरिलें. त्या दिवसापासून मी आपले वचनांत किमपि अंतर न पडूं देतां योग्य आचरण करीत आलों; आणि त्यासमयीं म्यां असा निश्चय केला की, आपले ख्याली खुशालीकडे कांहीं खर्च करूं नये; मग मोठी का. ळजी लावून कर्ज फेडण्याकरितां मी रुपये मागें या- कीत गेलो. आणखी जो काय मला अवकाश होता तो म्यां चांगल्या गोष्टीच्या अभ्यासावर योजिला; आ. णि चाकरी फार जपून करूं लागलों, ह्मणून माझ्याव- रचे जे सरदार होते ते संतुष्ट झाले. सारांश, मी इतके योग्यतेस चढलों याचे कारण हेच की, वाईट चाल सोडून चांगली चाल धरली. ही हकीकत त्या सरदारांनी ऐकतांच ते मनांत खोंचले, आणि ती गोष्ट त्यांचे मनांत ठसली. त्यायो- गें त्यांत जे जुगार वगैरे काय दुर्व्यसन होतें तें अग- दी मोडून तेही चांगल्या रीतीने वागू लागले. त्यांस वाईट आचरणानें पैसा मिळवावयाचा जो छंद होता तो नाहीसा झाला. असा त्या चतुर पुरुषाचे शिकवणीचा परिणाम फार चांगला झाला.