बालमित्र भाग २/बापू आणि गंगा
बापू आणि गंगा.. गात गात झाडांखालून फिरताहेत, तंव त्या दोघीज- णींची दृष्टि आंब्याचे झाडावर पाड होते त्यांकडे गेली; त्या झाडावरचे पाड अगोदरच कोणी बहुत करून ने- ले होते, कोठे दहापांच वर राहिले होते, ते असे पिव. ळे धमधमीत होते की. पाहतांच तोंडास पाणी सुगवें, आणि कोणी ह्मणेल की, पाहणारास तोडून न्यावया- साठी बोलाविताहेत, अशा त्या पाडांकडे त्यांचे मन वे. धले. बापू पुढे धावत जाऊन त्या झाडावर चढला, आणि त्याचे हातास जितके पाड आले तितके तोडून खाली दोघी मुली साडीचा पदर पसरून उभ्या होत्या त्यांजकडे यकिले. तेव्हां अशी कांहीं मौज झाली की, त्यांतून अल- गलेले चांगले चांगले पाड तेवढे भागीरथीचे ऑीत पडले, तेणेकरून ती फार हर्षित झाली आणि तिची कांहीं दृष्टि फिरली; परंत बापूनें जर दाटून तसे केले असते तर तिची दृष्टि फिरली हे नीटच होते, कांकी गांवांतील सर्व मुलांपेक्षां बापू फार सुंदर व गुणी होता, पण तसे काही झाले नाही. मग ते चांगले पाड भा- गीरथी गंगास दाखवून ह्मणते, जाऊदे तुझे पाड घाणे- रडे, हे पहा माझे कसे चांगले आहेत ते! तेवेळेस गंगास फार वाईट वाटले, आणि खिन्न होऊन तिने तोंड खाली घातले; मग खेळणे संपे तोपर्यंत गंगाने मुखांतून एक चकार शब्द देखील काढला नाही. बाळमित्र. मग घराजवळ गेल्यावर भागीरथी गंगास विचारून आपल्या घरी गेली. घरांत जाण्याचे अगोदर बापूने गंगास विचारिलें की. ताई. तं अशी रुष्ट कांगे दिसतेस ? तुझा मजवर राग नसावा, भागीरथीस आंब्यांचा वाटा मिळाला ह्मणून तुझ्या मनांत वाईट वाटूनये, कांकी, तूं पुरते जाणतेस की, मी तुजवर अधिक प्रीति करितों, आणि त्या प्रीतीचे प्रमाण दाखवावयासाठी मी झाडावरू: न चांगले चांगले पाड तझ्याकडे टाकले; पण कसे झाले नकळे, सर्व चांगले पाड भागीरथीचे पदरांत पडले; त्याला माझा काही उपाय आहे ? बरें, ते पाड तिच्या पदरातून निलाजऱ्यासारिखे मला घेता येतात हे तूंच सांग बरे कसें ते. परंतु त्वां कांहीं येवढ्याश्या गोष्टी- वरून नेणत्या पोराप्रमाणे रागें भरूनये, आणि मजवि. षयी तुला कधी राग यावयाचा नाही हे मला पके ठाऊक आहे. तुजविषयी मी किती जीव देतो ह्याची खातरी एखादे वेळेस अवकाश सांपडेल तेव्हां करीन. मी झाडावर असतांना तुला राग आणावा असे माझे मनांत नव्हते. गंगा ह्मणाली काय मला राग आला । हे तुला कोणी सांगितलें : भागीरथीचे पाड किती का बापडे चांगले असेतना, मला काय करावयाचे आहेत. आधाश्यासारखें माझें चित्त कांहीं खाण्यावर नाही, हे तूं जाणतोसच; त्यामुळे मला राग आला असें नाही पण तिने आपले पाड दाखवून मला हिणावले, ते मला सोसले नाही. ह्यासा माझी समजी व्हावी असें जर बापू आणि गंगा. तुझ्या मनांत आहे तर तूं माझे पायां पडून क्षमा मा. गून घे, नाही तर मी तुशी कद्धींच बोलणार नाही. बापू ताठ्याने बोलतो, पायां पडावें ! ही गोष्ट मी कदाकाळी करणार नाही. मजकडून जर काही अपराध झाला असता तर मग असो. परंतु अपराधा- वांचून पायां पडले असतां अपराध कबूल केला असें होईल. पण तुला मी एक गोष्ट खचीत सांगतो, मी काही लबाड कृत्रिमी नव्हें. तला रागे भरवावे हे माझ्या मनांत देखील नाही. ह्या उपर हे तुला खरें जर न भासलें तर मग तं हा अन्याय करितेस. मग नी हणाली, बरेंच किरे बोलतोस; तूं माझें ऐकत ना- हीस, आणि अनादर करितोस: ह्याचे कारण मला स्प- ट कळून येते की, तुझी भागीरथीवरच फार प्रीति आ. हे, आणि ह्मणून तीही असे बोलली. ह्याप्रमाणे बो. लून बापूकडे नपाहतां धिक्काराने मान हालवून रागें रागे घरांत गेली. 1 इतक्यांत भोजनाचे सिद्ध झाले तेव्हां उभयतां भावंडे एका पंगतीस बसून भोजन करूं लागली; पण जेवतेवेळेस एकमेकांकडे फारच क्रोध दृष्टीने पाहत अ. सत. पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता ह्मणून गंगा पाणी देखील जेवण होईपर्यंत प्याली नाही. ही ति. ची चर्या बापूने ओळखून त्यानेही तिजकडेस पाहिले. नाही. नत्रापि मधून मधून चोर दृष्टीने गंगा बापूकडे व बापू गंगाकडे पहात असत. एक वेळ उभयतांची ८८ बाळमित्र. एक दृष्ट झाली, तेव्हां गंगा तन्क्षणीच एकीकडे पाहूं लागली, हे बापूनें पाहतांच आपल्या मनांतून गंगा फारच उतरली असा भाव दाखविला. मग जेवण झा• ल्यावर आईनें गंगास कांही विचारले, तेव्हां गंगाने चापूचे रागामुळे आईशी कांहीं धड उत्तर केले नाही, झणून आईस राग येऊन तिने गंगास बाहेर घालविले. तेव्हां ती रडकुंडे तोंड करून रागाचे भिरीरीने खोली. तून निघून बागाचा दरवाजा उघडा होता तिकडे गेली. मग उदास होऊन बागाचे बंगल्यांत एक लहान खो. ली होती तेथे जाऊन आणखी पुष्कळ रडली. मग तिचे मनांत आले की, मी व्यर्थ बापूशी कज्जा केला. अशी ती फार पस्ताई. पडली. कांकी ती कधाहा रडू लागली असतां बापू तिचे समाधान अगोदर करीत असे. जेवावयाचे खोलीत बापू होता. तो गंगा आईस रा- ग आणून बाहेर गेली हे पाहन मनांत फार खंत क. रूं लागला. आईनें व बापाने त्यास उत्तम आंबे दिले होते ते बहिणीस द्यावयाचा मनसोबा करून ते आंबे खिशांत लपवावयाचा यत्न करूं लागला; त्याचे मनांत की, एकदा कसेही करून कोणत्या तरी निमित्ताने बागांत जाऊन तिला आंबे द्यावे. पण तो मनसोबा आईबापांस कळूनये ह्मणून काही युति योजू लागला. न्याने ते आंबे घेऊन उगीच धुतले, खाली ठेवले, पु. न्हां हातांत घेतले, असें दहापांच वेळ केले. तेथें जबापू आणि गंगा. → वळच मंगी व चिमणी ह्मणून मांजरीची दोन पिली ए. कमेकांशी खेळत होती. बापूचे मनांत की, आईबापा- नी ह्या पिलांकडे पाहिले झणजे आपण आंबे खिशात लपवावे. मग ह्मणतो अगे आई, अहो रावजी, ती पहा मांजरीची पोरें कशी मौजेनें खेळताहेत ! तुझांस हसता हसतां पुरे होईल, तुह्मी अंमळ मागें तर फिरून पहा. मग बापाने अंमळ मांजरांकडे तोंड करून, अंः त्याला काय पहावयाचे आहे असे मणन लागलेच पुन्हा इ. कडे तोंड फिरविलें. इतक्यांत बाप खिशांत आंब ठवः णार होता तो मातक्यान हातांत घेऊन खाली वर पा हूं लागला. पार्वतीबाईनें तें बापूचे कसब पाहून म. नांत समजली आणि आपल्या भास दुसरेकडे पाह- ण्याची खूण केली, तेव्हां तो मागें तोंड फिरवून मांज. रांकडे पाहिलेंसें करून काही हांसला. बापूचे मनात की, ही माझी युक्ति कोणास समजली नाही. आता आपण बाहेर जाण्याचा यत्न करावा, असें मनांत आ. णन लटकेंच आंबे चोखून टाकल्या सारखें केले, आ. णि एक आंबा आंगरख्याचे घोळांत व दुसरा अगव. स्त्रांत लपविला, इतक्यांत ती दोघे स्त्रीपुरुषं कांहीं ए. कमेकांशी बोलू लागली, तंव बापूचे मनांत आले की, बाहेर जाण्याला आतां ही सवड बरी आहे, मग मांजरांचे मागें धांवून काही दांडगाई व गलबा क. रूं लागला, तेव्हां आईनें झटलें, कारे, आमचे बोल. ण्यांत गलबा मांडला आहेस, जा येथून बाहेर. तेव्हां ९० बाळमित्र. असे व्हावें हें बापूचे मनांत अगोदरच होते, मग काहीं हिरमुसल्या सारखे करून मांजरांचे मागे धरावयासाीं झणून धांवला. धांवतां धांवतां चपळाईने एक आंबा खिशांत व दुसरा पागोट्यांत लपविला, ती मांजरीची पोरेही बागाकडेसच पळाली. हाही धूम ठोकून त्यांचे मागे जाऊ लागला. आई ह्मणाली, बापू, तूं कुठेरे जातोस ? तेव्हां तो उभा राहून उत्तर देतो, मी बागांत फिरावयास जा- तो; मग ती ह्मणाली, कांहीं काम नाही तिकडे जाण्या- चें; अशी अक्षरें तिच्या तोंडांतन निघतांच बापूनें कि. लवाणी तोंड करून झटले, आई, मी तुझ्या पायां पड. तों, मला अंमळ बागांत जाऊंदे; मी काही दांडगाई करणार नाहीं; मग आई बोलली, बरें तर जा. मग बापूचा आनंद किती ह्मणून सांगावा! लाग- लीच धांव मारली, तंव पाय आडखळन पडला, पण दैवयोगाने आंब्यांस किंवा हातपायांस कांहीं धक्का लागला नाही, ह्मणून मग तन्क्षणीच उठून वागांत गेला, आणि सर्व ठिकाणे सोधली, मग बंगल्यांत गेला तों तेथे गंगा त्याचे दृष्टीस पडली. मग पहातो तो अति खि. न होऊन डोळ्यांतून अश्रुपात ढगाळती आहे. तिने बापूस दुखविले व आईही रागें भरली ह्मणून तिची व. त्ति केवळ उदास झाली होती. . बापू तिला नमून बोलला, माझे आई, आतां तु. झी माझी गडी असावी! तूं मजवर रागें भरूं नको; बापू आणि गंगा. ९१ माझे मनांत तुला राग आणावा असें जर असते, तर मी क्षमा मागितली असती; परंतु जर तूं क्षमा मजपाशा मागशील तर मी तुजपाशीं मागेन. आतां तुझा माझा पहिल्यासारखी मैत्री होऊंदे; हे घे इरसाल आबमा तुजसाठी आणले आहेत; तं एथें होतीस ह्मणून मला हे गोड लागले नाहीत. असें ऐकतांच गंगा त्याच खा यावर डोके ठेवून रडत रडत ह्मणाली, तूं मजवर ले- हानपणापासून माया करितोस, हे मला पुरते आठवते. मातक्यान स्फुदून स्पंदन ह्मणते. माझे सख्या, बापू राया, मी काही आंब्यांकरितां रागें भरले नाही; तूं असें मनांत आणू नको, पण त्या द्वाड भागीरथीने म- नशी चढून गोष्ट सांगितली, ह्मणून मला राग आला. पण तो राग आतां माझा गेला; हा माझा अन्याय तू मनावर घेऊनको. असें बोलतांबोलतांबापूचे खांद्यावरचे असूं आपल्या साडीचे पदराने पुसून ह्मणाली, तुला की बधी चिडवावे असे मला आवडते खरे, पण आता हे तुझे आंबे तूंच खा, मी खाणार नाही. म बापू ह्मणाला, बरें बाई, तुझ्या मनास येईल ति. तके तूं मला चिडीव, पण मी दुसऱ्या कोणाला चिडवू देणार नाही. पण तूं आंबे कां घेत नाहींस तुजवां- चून माझ्याने हे आंबे कसे खाववतीला हे मी पहिल्या- ने तुला सांगितले, आणि आतां ही सांगतो, मी कधी लबाड बोलावयाचा नाही; माझी प्रकति तुला माहीत आहेच. गंगाने उत्तर केले की, हे आंबे मला नकोत; -९२ बाळमित्र. ह्यांनींच इतका राग आणला; असें ह्मणून तिने ते आं- बे तिरस्काराने रस्त्यावर फेंकून दिले, आणि ह्मणाली, बापूराया आपण गडी झालों, पण मी आतां आईकडे कशी जाऊं १ आईकडे जाणे घडते तर मौज असती. मग बापू ह्मणाला, थांव, हा मी आईकडे जाऊन तिची रजा घेऊन येतो. असें बोलून धांवत जातां जातां म. णतो, तूं तिजवर रागें भरलीस ह्याचे कारण मीच, का. की मी प्रथम तुला रागें भरविले होते, हे मी आईला सांगतो. इतका शब्द बोलतां बोलतां लांब गेला. मग तो आईजवळ जाताच आईने त्या मुलांचा मनोरथ तन्क्षणी सिद्धीस जाऊ दिला. अशा न्या दोन मित्रांचे मित्रत्व पाहून कोणी सुशील सद्गुणावर दृष्टि दे- ऊन दुसन्याचा दुर्गुण मनांत आणणार नाही. करनकरी स्वभावाचें वर्णन. जनाबाई आणि तिची कन्या मनी मनी- नाहीं आई, परकरापेक्षां कांचोळीच अगोदर शिवावी असे मला वाटते. जना- अगे, अगोदर एवढा परकराचा चीण शीव; मग पाहिजे तर कांचोळी शिवावयास लाग. तुझ्या चुलत बहिणीला परकरच आवडतो, ह्यासाठी आधी . तेवढा तो तयार कर, मग दुसरे काम हाती घे.