बालमित्र भाग २/दुखणाईत सरदार

विकिस्रोत कडून

दुखणाइत सरदार. नाटक एक अंकी. पात्रे, शिवाजी, ....... . . . . . . . . सरपागे. तान्हानी, ......... • सरपाग्यांचा मित्र. जगदीशराव, ....... मोठा मानकरीसरदार. • .......मानकऱ्याचीस्त्री. भिमाबाई, गणपतराव, हिराबाई, ..............मानकऱ्याची मुलें. यमुना, स्थक, मानक-याचे घराजवळची आंबराई. प्रवेश १, गणपतराव आणि हिराबाई. (हिराबाईजवळ आंब्यांच्या पाडांनी भरलेली टोपली आहे. गणपतराव आपली टोपली भरलेली ति. जकडे नेतो.) -गण- काय सांगू, ताई! वारा तर खूप चालला आ. हे, आतां पुष्कळ पाड सांपडतील, मग मिळणार नाहीत; मी आणले हे धे, ठेव; लवकर घे ताई. ५६ बाळमित्र. हिरा०- बाबाबा ! शर्थ केली; तुझी तर चुळबुळ भारी; पाड कोठे ठेवावे हे देखील मला सुचू दे नाहींस. गण- यमनी टोपल्या आणावयाला गेली तिला फ र वेळ झाला आहे; ती आतां येईल, तंवर तू आ. पल्या साडीचे पदरांत कां ठेवीसना ९ हिरा०- वाह वारे! बरेच सांगतोस. झणजे माझी सा डा चिकानें भरावी, आणि आईने मला रागें भरा व, असे तुझ्या मनांत आहे वाटते ? तुझी टोपल माझे टोपलीहून मोठी आहे; ह्यासाठी माझे पाड आपल्या टोपलीत घाल. आणि माझी टोपली घेऊन जा; मी येथे राखण करीत बसते. गण-बरें तर, आतां मी पाड जमा करावयास जा तों, तंवर यमनीही येईल. हिरा०- हो हो, आण जा. मग अवघे पाड एका काणी करूं ह्मणजे पुष्कळ दिसतील.. गण- यमनीची टोपली व आपल्या टोपल्या भ ल्या मणजे बाकी पाड राहतील ते आपण यथे खाऊन जाऊं. हिरा-छि, नको, येथेच खाऊं नयेत; यंदा आप बाबा बरोबर पाड खाऊं, पुढें बाबा संगती आ णाला कधी मिळतील कोण जाणे. आतां बाबा ढाई स जाणार आहे, कोण जाणे काय होईल काय नाही. दुखणाईत सरदार. गण - काय, अवघेच का लोक लढाईत मरतात, म. णून तूं असें बोलतीस ? हिरा०- लढाईचे काम फार कठिण आहे. लढणारे लोक फारच निर्दय असतात, तुमी आह्मी जशी परस्पर एकमेकांवर ममता करितो तशी ते करिते तर मग काय पाहिजे होते ९ । गण- खरें हाणतेस, आपण काय थोडक्याशा कळी. वरून भांडत नाही? मी ह्मणतो की त्वां कळ का. ढली, तूं ह्मणतेस की मी काढली, पण आपणांतून कोणाकडे अपराध, हे सांगावयाला फार कठिण. तसेंच मोठमोठ्या लोकांतही होते. हिरा ०- आपण तर भांडण झाल्यावर मात क्यान ए. कच होतो, तसेंच त्यांनी करावे की नाही ? पण आणखी एक सांगते. आपल्या भांडणांत जिवाला कांहीं भय नसते. गण- आपले आईबाप कज्जाचे निवारण करितात की नाही ? परंतु पोरांत आणि मोठे माणसांत फार अंतर आहे. मोठ्यांचे हातांत ढाल तरवार अस- ल्यावर मग त्यांनी कोणाचे आज्ञेत वागूनये, आ. णि आपणावर कोणी जुलूम करूं लागला असता तो तरी उगाच कां सोसावा ? हिरा०- तूं नित्य नित्य शिपाइगिरीच्याच गोष्टी का- ढतोस. गण- वाहवा ९ शिपाइगिरी तर फारच चांगली. मी. बाळमित्र. ही शिपाईच होईन; त्वां कितीही सांगितले तरी मी लढाईवांचून राहणार नाही. आमचे तर हे क. सबच. ह्यावांचन आह्मीं पोट कशावर भरावें ९ बापा- ची कमाई मला किती दिवस पुरणार आहे ९ ताई, तूं रडतेस कां ? रडूंनको, तुझें रडणे पाहून मलाही रडू येते. हिरा०- मी येथे एकटीच आहे, मला रडून घेऊदे. बाबापुढे रडेन तर त्यास फार दुःख होईल, एथें र- डले तर काही चिंता नाही. गण- उगी उगी, रडूं नको, डोळे पुसून कामास लाग मी टोपली भरून पाड घेऊन येतो. हिरा०- तूं तिकडच्या बाळआंबराईत जा, इकडचे पाड मी गोळा करून आणिले. ( गणपतराव आंबराईकडे धांवतो. हिराबाई अंमळ उगीच राहून आपणाशी ह्मणते,) जर मी भक्तिमान असते तर ईश्वराची प्रार्थना क- रून करून बाबास राहविले असते. किंवा जर मी मोठी असते,तर राजाजवळ जाऊन बाबाला घरी राहण्याची रजा व बैठा रोजमुरा इतके करून घेऊन आले असते. बैठा मशारा खावा अशी चाकरी माझे बाबाने केली आहे, HEALL LIBRARY -~~nema सार्वजानेक वाचनालय खेड, (गे.) GENER TIVE दुखणाईत सरदार. प्रवेश २, हिराबाई, शिवाजी, आणि तान्हाजी. शिवा०- अहो तान्हाजी, जगदीशरावाचें तें घर म. णून मला लोकांनी सांगितले आहे, चला तिकडे, मी त्याचे प्रतिष्ठेस योग्य अशी रजेची आज्ञा आण- ली आहे, ही ऐकून तो आनंदमय होईल. परंतु ही अतिमुलक्षणी मलगी कोणाची आहे बरें ? थां- बा, मी तिजसंगती काही बोलतों; पण तुही मा- झे मोठेपणाचें नांव घेऊ नका, हो तान्हाजी. (हि राबाईचे खांद्यावर हात ठेवून ह्मणतो,) मुली, तू फार चपळाईनें काम करितेस. हिरा०- कांहो रावजी, तमी मला भिवविले ? शिवा- मुली, रागें भरूं नको, क्षमाकर; माझ्या म. नांत तुला डचकवावे असे नव्हते, तुझा चांगुलप. णा पाहून मला आनंद झाला. बरें, हे चांगले चां- गले पाड कोणासाठी जमा करितेस हिरा- ( पाडांची टोपली त्याजवळ आणिते ) मज गरिबावर कृपाकरुन तुह्मी शांतन कांहीं पाड घ्या. येथे तबक नाहीं, काय करावे, असते तर फार चांगले होते. आंबे त्यांत घालून म्यां दिले असते. | (शिवाजी तान्हाजी त्यांतून एक एक पाड घेतात.) शिवा- वाहवा! असा गोड आणि बिनरेष पाड आ- जपावेतों कधी खाण्यांत आला नव्हता. मुली, बाळमित्र. आह्मांस हे पाड विकत देशील ? | हिरा०- नाही, नाहीं, रावजी, तुमी कितीही रुपये दिले तरी मी विकत देणार नाही. शिवा०- खरेंच, हे तुझ्या टोपलीत आहेत ह्मणून ह्यां- चे मोलच नाही, खरे. हिरा०- असे नव्हे, महाराज ! हे मी आपले बापा- साठी जमा केले आहेत; मी आपल्यासाठी केले असते तर तुह्मांस फुकटच देते. (हिराबाई डोळे पुशीत पुशीत बोलते.) यंदा बाबाने अझून पाड खाल्ले नाहीत; आतां तर काय शेवटलेच खाणे आहे. शिवा ० -- काय ९ त्याचे जिवासांड दुखणे आहे ह्मणू. न तूं असें बोलतेस की काय, मुली ? तान्हा.- त्याचे दुखणे पाडावरचे वासनेचेच असेल असे वाटते. हिरा०- ते कांहीं दुखण्यास पडले नाहीत; मागें हिं. वाळ्यात बरीक त्यांस संधिवायु झाला होता, त्या- ची कसर अझून तशीच राहिली आहे. दुखणाईत असोत किंवा नसोत, पण उद्यां त्यांना येथून जाणे अवश्य आले आहे. शिवा- जाण्याची इतकी जरूरी त्यांस काय ह्मणून पडली? हिरा०- त्यांची पागा उद्यां इकडून जाणार आहे ति- जबरोबर त्यांस जाणे प्राप्त आहे. . दुखणाईत सरदार. शिवा०- त्यांची पागा हिरा- होय, त्यांची, झणजे शिवाजीची पागा, ती हिंदुस्थानाकडे मोहिमेवर जाणार आहे, तीत माझा बाप असतो. शिवा०- (एकीकडे होऊन तान्हाजीस ह्मणतो.) ग- ड्या, ही जगदीशरावाची मुलगी दिसते. हिरा०-(ते बोलणे ऐकन झणते.) होय, तोच माझा बाप; त्यास तुझी ओळखतां ? शिवा०- तो तर आमचे सोबतीचा सरदार; आमी त्यास ओळखतों. हिरा०- पागा येऊन पोहोंचली का ९ आतां ह्यागांवीं मुकाम न होतां आजच पढ़ें जाईल ९ शिवा०- आज कांहीं पागा येत नाहीं; उद्यां येईल. आमा मात्र पुढे आलों. (तान्हाजीस डोळा घा. लून ह्मणतो.) आमचे घोड्याचा नाल पडला आहे झणून नालबंदी होई तोपर्यंत ह्या आंब्याचे छाये- खाली बसावे ह्मणून आलो होतो, पण आतां ना. लबंदी झाली असेल, गंगाखेडाकडे जावयाची वाट हीच असेल नव्हे ९ हिरा०- नाहीं नाहीं, रावजी, ती वाट रानांत जाव. याची आहे. शिवा - हा गांव तुझ्या बापाच्या जहागिरीचा आहे ना १ ६२ बाळमित्र. हिरा०- आह्मां गरिबाला एवढा मोठा गांव जहागिरी- चा कोठचा १ एवढा असता तर मग काय पाहिजे होते; बाबाची एवढी आंबराई मात्र, आणखी मि- राशी जमीन, बागाईत जिराईत मिळून, चार चाहूर आहे; आमचा बाबा पागे बरोबर नसला ह्मणजे नेहमी एथेच राहतो. शिवा०- बरें बरें, हिवाळ्यांत तो का दुखणेकरी प. डला होता हिरा०- काय सांगावें रावसाहेब! त्याच्याने हातपाय देखील हालवत नव्हते आणि फार दिवस झाले व्याचे कपाळावर एक जखम लागली होती, ती पुन: फुटली, ती देवाने काहीशी बरी केली तों मा- तक्यान त्याला लढाईस जाणे आले. शिवा - रोग्यास कोणी लढाईस नेत नाही, असे आहे तर त्याने रजा मागावी की नाही हिरा०- बाबास नसमजू देतां माझे आईनें रजेविषयी विनंतीपत्र राजास पाठविले आहे, पण त्याचे उत्तर अझून आलें नाहीं; मग काय राजास खरे वाटले नाही, किंवा शिवाजी सरपागे ह्यांनीच मधे पत्र दा- बून ठेविलें, कसे काय असेल ते असो.. शिवा०- चांगले सरदारास कामाचेसमयी रजा दे. ण्याचा संतोष शिवाजीचे मनांत नसेल, असे काही कारण असले तर कोणास कळे. हिरा०- रावसाहेब, तुझांस आईबाप आहेत ? दुखणाईत सरदार. शिवा - आहेत, मुली. हिरा- तर तुह्मी आईबापांस सोडून आला तेव्हां ते तुह्मांकरितां भारी रडले असतील. त्यांनी तुझांस कसे येऊ दिले ९ माझा वडील भाऊ विद्या शिका- वयास जेव्हां दुसरे गावी जाऊ लागला, तेव्हां आह्मी उभयतां पुष्कळ रडलो. तिकडली आशा तरी होती, एथें तर हातावर शिर घेऊन जावें लागते. त्याला ह्याला फार अंतर. शिवा- मुली, तूं ह्मणतेस इतकें कांहीं नाहीं; मी आईबापांस सोइन फारवेळ लढाईस गेलो आहे. ह्यामुळे तें काम आमचे आरोक्यांत पडले आहे. मी पहिल्याने तर बापाबरोबर लढाईस गेलो होतो. हिरा- जे शिपाईलोक आहेत त्यांस फारशी दया माया नसती, हे मला पुरतें माहीत आहे; पण मा- झा बाप कांही तसा नाहीं हो; त्याला दया माया पुष्कळ आहे. त्याचे मनांत तर आपली प्रतिष्ठा राहून सर्वस्व नाश जरी झाला तरी त्याची काळ. जी नाहीं; ह्मणूनच रजा घेण्याविषयी त्याकडून आळस तो. शिवा०- कां, असें कां? हिरा- तो वारंवार बोलत असतो की, मदीचा लेक लढाईचे वेळेस जर रजा मागेल तर त्याला लोक भितरा असे ह्मणतील. ह्यासाठी त्याने कधीही अशा प्रसंगी रजा मागितली नाही. आणखी त्या६४ बाळमित्र. चे झणणे की, मी आपल्या धन्याकरितां लढाईत मेलों तर फार चांगले; पण ईश्वराने मला घोड्या- वर बसावया पुरती शक्ति मात्र द्यावी मणजे झाले, तर एखादे दिवशी त्याचे बोलण्याप्रमाणे जर झाले, तर मग आमी पोरांबाळांनी कोणाचे तोंडाकडे पाहावे ? शिवा०- आठव नाही, मुली, तुला १ त्याजवर आज पावेतों किती प्राणसंकटे आली, पण त्या तित- क्यांतूनहीं देवाने त्यास वांचविले; आणि आतांच का इतक्या कल्पना तुझ्या मनांत येतात ९ लढा- ईत सर्वीसच गोळ्या लागतात असे काही नाही. हिरा०- पण ज्यांना लागतात ते तेव्हांच ठार होतात. त्यांतली एखादी लागली तरी पुरे, मग कसे होईल : शिवा०- तूं ह्मणतेस तेही खरेच आहे; बरे पण ती आणखी एक मुलगी इकडे येते आहे ती कोणाची १ हिरा- ती माझी सख्खी बहीण, तिचे नांव विचाराल तर यमुना. प्रवेश ३, तान्हाजी, शिवाजी, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. हिरा०- अगे यमुने! आतां आलीसना ९ एवढा वेळप- यंत कोठेंगे होतीस १ कोणी तुला खोळंबविले होते? ६५ दुरवणाईत सरदार. यमु०- मला आईनें बाबा बरोबरचे फराळाचे कराव- यास खोळंबविले होते.' हिरा०- तुझी टोपली कोठे आहे ? यमु०-दोनी टोपल्या भरल्या इतक्यांत ९ इतके पाड कुठेगे मिळविले? हिरा०- पहा तर (तिचे टोपलीत पाड घालिते आ- णि दुसरे पाड वेंचावयास आपली टोपली रिकामी करिते.) यमु०- (हिराबाईचे कानी लागते.) ताई, हे कोणगे ? हिरा०- (हळूच सांगते.) हे शिवाजीचे पागेतले सरदा- र आहेत. यमु०- हे का बाबाला घेऊन जाण्यासाठी आले आ- हेत? हिरा०- नाही नाही, ते एरवींच पुढे आले आहेत, बाबाने मटल्याप्रमाणे पागा उद्यां इकडून जाणार आहे. यमु०- हे सर्व सरदारांसुद्धां तिकडेसच कां मेले न. व्हते ९ इकडे कशाला आले ९ हिरा०- अगे हळूच बोल, हे सरदार ऐकतील. यमु०- ऐकतना कां मेले. आतां आमचे बाबाला घे. ऊन जाऊन आमची आणि बाबाची ताडातोड क. रितील. शिवा०- (तान्हाजीस ह्मणतो.) ह्या मुली आतां आ. मांला चांगले पाहत नाहीत, आमचे वाईट इच्छि. बाळमित्र. तातसे वाटते, नाहीं बरें? तान्हा.- तुह्मी आपले नांव त्यांस सांगून रजेची आ- ज्ञा आणली आहे ती कां त्यांस कळवाना ९ शिवा- माझ्या मनांत जलदी करूंनये, कांकी ह्या मुली आपले बापावर फार ममता करतात, हे पा. हून मला आनंद वाटतो, ह्यासाठी आणखी अमळ ह्यांस बोलू द्या. हिरा०- गणोबा तिकडे पाड वेंचावयास गेला आहे, त्याने मला बलाविले होते. पण मी एथेंच बोलण्या- चे नादांत राहिलें, असो, आतां मी तिकडे जात, यमने, तूं येथें बैस, पण ह्या सरदारांस कांही वडे वांकडें बोलूं नको, हो । यमु:- अहा, तूं काय मला शिकवितेस कसे बोलावे तें तूं आपली जा. हिरा०- रावसाहेब, तुझांस एथे सोडन म्यां जाऊंनये, पण बहिणीस तह्मांजवळ ठेवन मी आपले भावा बरोबर पाड वेंचावयास जाते. ह्मणजे लोकर लाकर पाड वेचून बाबाकडे जावयास सांपडेल. आणि आज्ञा द्याल तर तुह्मी आला हे बाबास सांगेन, झणजता तुह्मांस पाहून फार खुशी होईल. यम०- परे पुरे, काही सांगावयाला नलगे, आजचा दिवस तरी आह्मांला बाबाशी पोटभर बोलून घेऊदे. हे आले झणजे मग बाबा आमांशी कोठला वो- लावयाला दुखणाईत सरदार. -हिरा०- रावसाहेब, तुझी हिच्या बोलण्यावर जाऊं- नका; हिला काही समजत नाही. तुह्मी हिच्या बोलण्याची क्षमा करा. घरी पाहुणे आले ह्मण- जे हिला असेंच वाईट वाटत असते. यमु०- काय र क्षमा करा ९ कश्वी क्षमा ? असे मी काय बोलले १ पाहुणे घरी आले ह्मणजे बाबाला आप- णाशी बोलावयास फावणार नाही. मला तर आ. ज बाबाजवळ फार गोष्टी बोलावयाच्या आहेत; हे आले झणजे मग वेळ कसा सांपडेल १ हैं का ह्यां- ना ठाऊक नाही ९ शिवा०- भिऊंनका, मुलींनो, तुझी खुशाल आपले बाबाशी बोला; मी तुमचे बोलण्याचे आड येणार नाही. (हिराबाई निघून जाते.) यमु०- पण रावसाहेब, खरेच सांगा, माझे बाबास रा- जा बलावून नेऊन लढाईस कां पाठवितो. मग बरें आह्मां लेकरांस कोण संभाळील ९ शिवा०- पर मुलखांत लढाईस जाणे, तेव्हां चांगले चांगले शिपाई नेले पाहिजेत, आणखी एक, ज्या- चे अन्न खावें त्याचे कामास प्रसंगी जावयास नको? यमु०- पण एव्हांच लढाई करण्याची काय गरज आहे आणि जरी गरज असली तरी आमचे बा. बास कशास नेतो ९ कांकी लढाई करून जे मुल. खाचे हित होणार, ते घरी राहून मुलें मुशिक्षित केल्याने होणार नाही की काय ? बाळमित्र. शिवा०- होय, मुली, होईल खरे; परंतु जर तो आ- पली दुसरी मुले तुजप्रमाणे तरबेत करील तर होईल. यमु०- लोक मला फार घट्ट मानितात, आणि ह्मण- तात की, यमनीला ढाल तरवार भाला दिला ह्म- णजे फार चांगला बारगीर दिसेल. शिवा०- हो हो, मग तर तं फार चांगली शिपाइाग. री करशील. यम- मजजवळ ढाल तरवार असती तर मी को. णास हसूं नदेतें. शिवा०- फार बरें, तर, ही घे माझी ढाल तरवार, आणि शिपाई हो, पाहूं. यमु०- (शिवाजी ढाल तरवार पुढे करतो. यमुना ती नघेतां पळून दूर जाते.) अरे, नको बाबा मला. शिवा- अहो शिपाई बाबा, तुह्मी ढाल तरवारीला भिऊन पळतां? यम- मी भ्यावयाची नाही, पण तुझी माझे जवळ येऊनका, जवळ आलां तर मी बाबाला हाक मा. रीन. माझी आरोळी ऐकतांच बाबा मजकरितां धां- वून येईल. शिवा- मी कांहीं तुजवर बलात्कार करीत नाही, उगीच थट्टेने तुजपुढे ढाल तरवार केली. दुखणाईत सरदार. प्रवेश ४. शिवाजी, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. गण- यमुने, तूं कांगे आतां ओरडलीस १ तुझा मोठा शब्द ऐकिला ह्मणन मी तजसाठी धांवूनआलो. शिवा- तूं का बहिणीचा कैवार घेऊन तिचे वांटचा भांडावयाला आलास १ । गण- होय, माझे बहिणीस कोणी जर चकार श- ब्द बोलेल, तर तो मोठा का असेना, त्याला दो. । न गोष्टी ऐकवीन. यमु०- मी आपली उगीच ओरडलें. तूं आलास हे. ही बरेच झाले. (शिवाजीकडे पाहून ह्मणते.) मा- झ्या मनांत असें आहे की, राजाची अवकृपा नहीं। नां बाबास रजा मिळावी, मणजे बरे. पण रावसा- हेब, तुमी आह्मांला याविषयी काही मसलत सांगाल ९ हिरा०- रावसाहेब, जर तुह्मी आझांला मसलत द्या. ल तर आमी फार उपकारी होऊ. आमी आप- ल्या कातड्यांचा जोडा करून तुमचे पायांत घात- ला तरी हा उपकार आमच्याने फिटणार नाही. गण- ( इतकावेळ शिवाजीची ढाल तरवार पोशाक ह्यांजकडे न्याहाळून पहात होता; मग ह्मणतो.) बाबाचे राहणे घरी कसे होईल हे जर तुह्मी सांबाळमित्र. गाल तर मी आपली लाहोरी बंदूक, व सुरा, व कांसवाची ढाल, व मुलतानी कमान, तुझांला देईन. शिवा०- ह्याची मसलत मला काही सुचत नाहीं, सु- चती तर मी तेव्हांच सांगतों. यमु०- आह्मांला कांहींच का उपाय करता येणार नाहीं ९ आह्मी असें करूं की, पागेचे मुख्य सरदार शिवाजी उद्यां एथें आले, झणजे त्यांचे पायांवर आझी सर्व लोळण घालून पडूं, आणि, तुमचे बा- पास मी लढाईस नेत नाही, असे जेव्हां ते ह्मण- तील तेव्हांच उठू, नाही तर कधी उठणार नाही. हिरा०- हो हो, गडे, असेंच करूं; आणि त्यांस झणूं की, हिवाळ्यांत बाबा फार दुखणाईत होता, अझू- न काही चांगला बरा झाला नाही, त्याला नेऊ नका, त्यावांचून आमांस कसे करमेल ? मग राव- साहेबांस आमचे डोळ्यांची आसवें पाहून दया ये- णार नाही की काय ९ आणि ते आह्मांस पायांनी ढकलून देतील ९ तुह्मांस कसे वाटते बरें ? शिवा०- हे मुलांनो, तो तुझांस कधी ढकलून देणार नाही. पण तो आतांच जर आला नसेल तर पुढे येणार नाही; आणि जर तो न आला, तर मग तुमच्या कल्पना तुमच्याठायी राहतील नव्हे : पण शिवाजीप्रमाणेच एक मोठा मानकरी त्या पा- गेंत शिवाजीचे हाताखाली शिकणाऊ आहे, त्याचा दुखणाईत सरदार. व तुमचे बापाचा घरोबा मोठा आहे. गण- हाताखाली शिकणाऊ ह्मणजे काय ? शिवा०- शिवाजी बरोबर फौजेत युद्धाची कळा शि. कावयासाठी खुशीने चालतो व लढतो. तो शिवा- जीचा जिवलग मित्र आहे. तो जे मागेल ते शिवा- जी मान्य करील, हे मी पक्के जाणतो. हिरा०- रावसाहेब : तो तुमचा मित्र आहे की काय ? शिवा०- होय, तो माझाही जिवलग मित्र आहे. हिरा०- तर मग तुह्मी, रावसाहेब, आझी तर काय, पण ईश्वराकडे पहा. आणि त्यागहस्थाचे हातून कसेही करून बाबास रजा देववा, आणि बाबा आह्मी एके जागी राहूं असें करा. कदाचित् आम- चे दैवाने तशी गोष्ट नहोई, आणि जाणेच प्राप्त झाले, तर आमचे बाबास फार सांभाळा, बरें, रा. वसाहेब. त्याला फारशी चाकरी पडू देऊ नका. नजाणों एखादे वेळेस दुखण्यास पडला, किवा ज. खम लागली तर मग,- यम- काय जखम ९ रावसाहेब, आमचे बाबाला ज- खम लागू देऊ नका, त्यावर घाय पडेपर्यंत तुझी खोळंबून उगेच राहं नका; जर कोणी त्यावर ह- त्यार उगारले तर त्याला तुह्मी भाल्याने टोचून खाली पाडा. शिवा०- (मनांत ह्मणतो, ) आतां मला आपले नां- व लपवावयास धीर निघत नाही. (मुलीकडे बाळमित्र. पाहून.) मुली हो तुह्मी किमपि भिऊ नका बरें, त्याचे केसास ढक्का तो माझे प्राणास. हिरा०- तर आमचा सर्व भरंवसा तुझांवरच आहे, पण मी पुन्हां विनंती करते की, जे शिकणाऊ गू. हस्थ आहेत त्यांजकडून रजा मागण्याविषयीं, रा- वसाहेब, विसरूं नका बरें. मला आणखी तुह्मांशी फार बोलावयाचे होते, पण आतां जाते, बाबा आमची वाट पाहात असेल. शिवा- बरें तर, जा, पण मी कांहीं तुह्मांस देता यवढे घ्या. हिराबाई, ही मुदी तूं आपले हा. तांत घाल, अंमळशी मोठी आहे, पण ती लहान करता येईल. हिरा०- नकोबा, आई रागें भरेल; बाबा तर फार मार रागावेल. आतां त्याचे जावयाचे वेळेस जर ता मजवर रागावला तर मग मला फारच दुःख होईल. मी काय करूं त्या मुदीला ९ शिवा- कांही चिंता नाहीं; घे तूं ही मुदी, अंगत्य घेतलीच पाहिजे. जर तुमचा बाबा रागावला तर शिकणाऊचे हातून रजा नमिळाली असतां तो पा. गेत येईलच, आला ह्मणजे तमचे वरचा राग त्याचे मनांतून मी काढून टाकीन. हिरा- (मुदी घेऊन ह्मणते.) रावसाहेब, मी आ- तां घेते, पण माझ्या बाबास जर तुह्मी रजा देव- विली नाही, तर मी ही मुदी बाबा बरोबरच तुमची ३ दुखणाईत सरदार. तुझांस परत पाठवून देईन, आणि जर रजा मिळा• ली तर मग जेव्हां जेव्हां ही मुदी मी पाहीन ते. कव्हां तेव्हां तुमचे उपकार आठवीन. | यमु०- चलगे चल आतां, तुझा तर ह्या मुदीवरच भा- । री जीव गुंतला आहे. शिवा०- (यमुनेस ह्मणतो.) मुली! ही घे तूं एक मुदी. ही कांही फारश्या किमतीची नाही, तांब्या- ची मुदी, वर सोन्याचा मुलामा आहे, आणि खडा- तर खोयच आहे. तला माझी आठवण राहावी म. णून मी देतो, तूं मनामध्ये काही संशय न आणितां बेलाशक घे. यमु०- (मुदीकडे पाहून ह्मणते.) मला परीक्षा आ. हे; कांहीं नाहींशी नाहीं; खडा खरा दिसतो. आ- णि मुदी तर सोन्याचीच. माझा बाबा तुह्मांप्रमाणे- च सरदार आहे, पण त्याजवळ अशा मुद्या नाहीत. ह्मणून मला वाटते की, तुझी कोणाजवळून लुटन आणल्या असतील. आमचा बाबा तर कधी को- णास लुटीत नाही, ह्याकरितां मला ही तुमची मुदी नको. शिवा०- मुली, ही लुटीची नव्हे, बरें. तुझ्या मनांत ही घ्यावयाची नाही ह्मणून असें ह्मणतेस, तर ल- ढाईमध्ये हिला मी कुठे संभाळू ९ ह्यासाठी आतां चार दिवस ही तुजजवळ असूंदे, मी तिकडून ७४ बाळमित्र. आलों हणजे मग मला दे. मग तर कांही चिंता नाहीं ? यमु०- तर मग मी घेते. गणपतराव, चला, आतां जाऊं. गण- मला काही काम आहे ह्यांपाशी; तुह्मी जा, मी आपला मागून येईन. ( इतक्यांत तान्हाजी बाहेर गेला होता तो माघा. रा येऊन शिवाजींचे हातांत कागदाचा रुमाल देतो, आणि तोंडाला पदर लावून कानाशी लागतो.) यमु०- काय तुमचे मनांत आपणाला आणखी एक मुदी मिळावी, ह्मणून घुटमळतां १ हिरा०- (हळूच ह्मणते.) हे काय भाऊराया ९ असे धनलोभ्यासारिखें काय करतोस ९ द्रव्याच्या आ. शेने तुझें मन गुंडाळते, ह्मणून आझांबरोबर याव. याला मागे पुढे करितोस वाटते ९ गण - तुमच्याच मनांत द्रव्याची आशा आहे, ह्मणू- नच असे उद्गार तोंडातून निघतात; हे तर माझ्या गांवी देखील नाही. माझें कांहीं नाजूक काम आहे, ह्मणून मी मागे राहतो. तुह्मी त्याला सत्रा कल्पना काढून बोलणार. यमु०- नाजूक काम ९ काय करूं बाबाचे जाण्यामुळे माझें चित्त स्वस्थ नाही, नाहीतर तुमचे नाजूक काम पहावयाची मला फार हौस होती. गण- जर-जर- जर तूं माझी बहीण नसतीस, तर दुरवणाईत सरदार. तुला खूप बडवितों. यमु०- बरे तर बाबा, आमी जातो हो. तुझी आ- पले नाजूक काम करा काय ते. चलगे ताई. प्रवेश ५ गणपतराव आणि शिवाजी. गण - माझे मनांत तुह्मांशी काही थोडेसें बोलावे अ. से आले आहे. शिवा०- बरे आहे; काय तुझ्या मनांत आले असेल ने बोल. गण - मघां तुह्मी ह्मणालां की हाताखाली शिकणाऊ आहे ह्मणून, त्यास हाताखाली शिकणाऊ ह्मणजे काय शिवा- कोणीएक मोठा अंमलदार असतो, त्याजवळ काम शिकावयासाठी जो दुसरा कोणी खुशीने रा. हतो त्यास शिकणाऊ असें ह्मणावे, त्याला काही लढाईचे प्रसंगी फारसा जिवाचा धोका नसतो, सर. दारास बरीक सर्वांचे पुढे घोडा घालावा लागतो, आणि शिकणाऊ जमातींत मागे असतो. गण- असें आहे तर मग मीही हाताखाली शिक- णाऊ होईन. शिवा - तूं होशील खरा. परंतु शिकणाऊ जवळ पैका पुष्कळ असला पाहिजे, तुझ्या जवळ पुष्कळ बाळमित्र. पैका असला तर सांग. गण- माझ्या जवळ पैका नाही, पण राजाजवळ तर पुष्कळ आहे. राजाला आपल्या शिपायांचा निर्वाह करावा लागतो की नाही ? शिवा०- नाही नाही, तसे नव्हे; चाकरीच्या शिपा. या सारखें शिकणाऊस केवळ लढावे लागत नाही, न्याची खुशी, ह्मणन राजा कांहीं त्यास पैका देत नाही; यासाठी शिकणाऊस आपले पदरचा पैका ख. र्चावा लागतो. गण- असे काय तर मग हे फार वाईट. पण मला पोटाला अन्न तर पाहिजे बरे.- मी बापाबद्दल चाकरी करण्या विषयी जर राजापाशी विनंती के ली तर कसे? शिवा०- मुला, हे काम फकाचे नव्हे; तुझ्या ताडाव रचा जार अझून वाळला नाही. याकामास नेहमी- चा सराव पाहिजे आणि तादृश अधिकारही पाहिजे. तुला तर अझून हे कांहींच माहीत नाहीं. गण- मी लहान आहे झणन माझी आज्ञा कोणी न मानील तर नमानो, पण माझ्याने तर इतरांची मानवेल की नाही ह्यासाठी मला तुह्मी बरकदा जच करा परते. शिवा०- मुला, फौजेच्या कुचा बरोबर तुझ्याने पायी चालवेल ९ इतकें सामर्थ्य तुला कोठचें ? गण.- अहो, चालवेल तंवर चालेन, नाही तर बुदुखणाईत सरदार. णग्यांत राहीन, किंवा दारुगोळ्याचे छकड्यावर बसेन, माझे काय ? शिवा०- बरें, पण तुला जर बापाचे वांटचे घतेलें त- र मग तुलाही जावे लागेल; मग तुझा बाप आ. णि तूं एके ठिकाणी कोठून असणार ? गण- चिंता नाहीं; माझ्या योगाने बाबाचें राहणे मातारपणी माझ्या आईबहिणींजवळ तर होईल, पुरे, येणेकरून मला फार आनंद होईल. माझा बाबा जसा मोठा पराक्रमी आहे, तसा मीही लौ. करच होईन. मला शिपाइगिरी करण्याची फार आवड आहे; ही पहा लढाईची बखर किती चां- गली आहे, व शिपाईलोकांस किती आनंद देते ती! ही मी तुझांस बक्षीस देतो. शिवा०- (तान्हाजीकडे संकेताने पाहतो, कांहीं ए. क कल्पना मनांत आणतो.) मला, तुझी बखर मी घेतली, पण तुला मीही एक चांगली बखर दे- तों, ही घेऊन तूं आपले बापाकडे जा. ( रुमाला- तून एक लाखोटा काढून गणपतरावाचे हाता देतो.) गण- ( आनंदयुक्त होऊन ह्मणतो.) बरे, ही ब- खर मी वाचूं आतां ? शिवा- आतांच वाचूं नको. आमी येथून गेल्यावर मग वाच. ( आपल्या हाताने गणपतराव ह्याचे खि- शांत लाखोटा घालतो.) ही बखर तूं गमावू नको बाळमित्र. बरें ? तुला मी शिपाई करून बरोबर लढाई नेईन. गण- (शिवाजीस रामराम करून ह्मणतो.) राव साहेब, येवढा मजवर उपकार करा की, मी तुम पाशी उभा राहन लढाई करीन असे करा. शिवा०- बरें बरें; आतां आझी जातों ( तान्हाजी घेऊन आपण झाडाआड जातो. ) पहा, कशीह सुलक्षणी मलें ह्या जगदीशरावास ईश्वराने दिन आहेत ! अशा मुलांस सोडून जाणे हे बापाला फ र अवघड आहे, पण आतां हे पत्र गणपतरावा न्यास दाखविले झणजे तो फार समाधान पावर बर, पण हा मुलगा आता काय करतो आहे पाहूंया बरें. गण- (खिशांतून कागद काढन पाहतो.) अहा। हा बखर कश्ची! ह्यावर मोहर आहे ! असो, असे ली ह्मणून काय चिता ? ह्यांत काय आहे ते पा हावें बरें. (लाखोटा उलगड़न पहातो. ) हा तर हु डीचा कागद दिसतो, रावसाहेबांनी माझी थट्टा के ली. ( आंबराईतून निघून बाहेर जातो.) -200md. NERAL URTAN xgom CGENERA सार्वजनिक कामका खेड, (गु.) दुखणाईत सरदार. ७९ प्रवेश ६. जगदीशराव, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. जग०- गणोबा, सरपागे आतां कोठे आहेत ९ गण- तुमचे सरपागे काळे किंवा गोरे मला ठाऊक नाहीत. हिरा- ज्यांनी मला मुदी दिली तेच सरपागे, असे बाबा ह्मणतात; त्यांवांचून अशी देणगी कोण देणार आहे १ गण- असे काय ? मी तर, मी काही त्यास ओळ- खलें नाहीं; आता काय करावे मी केवळ मूर्ख होय. जग०- तेच असतील, ही त्यांचीच मुदी, म्यां ओळ. खिली; पहा मी त्यांची भेट देखील घेतली नाही; काय सांगावें, मला फार वाईट वाटते. असो, मी उद्यां शिवाजीस भेटेन. यमु०- बाबा, ते गेले इतक्याने मला आतां बरे वा. टते; आतां आली पाहिजे तसे आजचा दिवस तु. झ्याशी बोलू. ते आले असते तर मग कुठचे बो. लणे आणि कुठचे चालणे - जग- मुलांनो तुह्मी असा धीर का सोडला ९ थोड. क्याच दिवसांत सल्ला होईल अशी बोलवा आहे; सल्ला होतांच मी निघून घरी येईन, मग तुह्मांस ८० बाळमित्र. सोडून कोठे जाणार नाही. हिरा०- ते सरपागे जर तह्मांस घरी राहावयाची आ- ज्ञा देतील तर त्यांनी दिलेली मुदी हीच त्यांस मी नजर करीन. यमु०- तर मग मीही मोठ्या हर्षांने त्यांची मुदी त्यांस देर्दन, गण- बाबा, ही पहा त्यांनी मला कशी बखर दि. ली आहे ती. जग- पाहूं,- अरे पाहूं ! ही तर राजाची मुद्रा आहे ह्या कागदावर.(कागद उलगडून पाहतो.) ही बखर कशाची हे तर मला घरी राहण्याविष- यीचे पत्र आहे; वाहवा ! फार बरें झालें, काय सांगू तुह्मांस, मुलांनो ? मुले०- बाबा सांगा काय झाले ते. जग.- थांबा, मला पुते वाचूं तर द्याल, ( मुले भों. वताली पाळा घालितात.) ही अशी चांगली गोष्ट खरी कोठली व्हावयाला, हे आपले सारे स्वना सारिखें दिसते. मुले- बाबा, आह्मी मनामध्ये हर्ष धरितों, आणि तुह्मी आमचा हिरमोड करितां.. जग.- ( मुलांस आलिंगन देऊन ह्मणतो.) मुलांनो, __माझें राहणे झालें, बरें! मुले- झाले राहणे १ अहाहा ! फारच बरें झालें. वाहवा ! वाहवा! काय देवानें मौज केली! ८१ दुखणाईत सरदार. जग०- मला पागे बरोबर मोहिमेवर जाण्याची तर आज्ञा नाहींच, आणि चाकरी नकरितां घरी राहा- वें असेंही नाही. पण काही दुसरेंच आहे. मुले- ते काय बाबा ९ जग०- मी दुखणाईत आहे ह्मणून राजास कोणी सुचविले, नकळे. परंतु राजाने माझी रीत रवेस पाहून किल्याची देख रेख मात्र करावी अशी कि- ल्लेदारीची सनद मला दिली आहे. गण - बाबा, तर आतां तमी किल्लेदार झालां काय ? यमु०- बाबा, आतां तमी सर्वांपेक्षा मोठे झालां ना ? जग- ज्या थोरांनी मजवर येवढा उपकार केला, की जो सांगतां परे होत नाही, त्यांचेच द्वारा मला ही पदवी मिळाली असे वाटते. मुले- आतां आह्मी चोहीकडे धावून त्यांस पाहून घेऊन येतो. प्रवेश ७ शिवाजी, जगदीशराव, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. (शिवाजी झाडांतून बाहेर निघतो. व जगदीशरावा. कडे जातो) जग- ( रामराम करून शिवाजीस भेटतो, आणि हाती धरून गालीच्यावर बसवितो.) आपण परो- पकाराकडे शरीर वेंचितां; आपला उपकार म्यां बाळमित्र. जन्मपर्यंत आपली सेवा केली तरी फिटणार नाही. हिरा०- आह्मी सर्व तुमची उपकारी झालों हे किती सांगावें ? तुमच्या पत्राने जो आह्मांस आनंद झा. ला तो तोंडाने सांगवत नाही. तुह्मीं आतां नवा बाबा आमांस दिला असें झालें. शिवा- मी काय, आपला राजाच असा रूपावंत ! तुमचे नांवाचा एक कागद कचेरीत आला, तेव्हां माझे मनांत आले की, हे विनंतीपत्र तुमचे कुटुंबा. कडून आले असेल. असा निश्चय करून, तुमची शरीर प्रकृति अशक्त, तुह्मांस चाकरीवर दूर पाठविणे हे नीट नव्हे, असें मनांत आणून राजा जवळ रजेची गोष्ट काढिली. आणखी माझे मनांत आले की, रजेपेक्षा दुसरे कांहीं काम मिळवावें; ते. व्हां विनंती करून किल्लेदारीची जागा तुझांसाठी मागून घेतली; आणि तुझांस हे वर्तमान कळवाव- याकरितां मी पुढे निघून आलो. आतां तुमची भेट झाली, फार आनंद झाला, जग- मला हे कांहींच माहीत नाही; पण आपण तिचे पत्रास रुकार दिला ही केवढी गोष्ट! हे केव- ळ सामान्य पुरुषाचे करणे नव्हे, आपण तसेच योग्य आहां, केवढा मजवर उपकार केला हा ! हिरा०- मी तुमची मुदी घेतली, पण मला लाज वा- टते, ही फार मोलाची आहे. दुखणाईत सरदार. ८३ शिवा० - चांगली खरी, त्यांत तुझे बोटांत आहे म- णून तिची किमत फारच वाढली; आणि आतां ही माझी आहे असे मला वाटत देखील नाही. यमु०- तुमी मलाही असेंच उत्तर द्याल ह्मणून मी बोलत नाही. गण- रावसाहेब, बखर ह्मणून मला हा कामाचा कागद दिला, त्यास हा आपला माघारा घ्या. शिवा०- मुला, जाणून पसूनच हा कागद मी तुला दिला. आतां तुझा बाप जर तुला मजजवळ देईल तर मी तुला शिलेदार करून घेऊन जाईन. जग०- आमचे हित आपण कराल ते थोडेच आहे, ईश्वराने आह्मांवर कृपा करून आपलें येणें इकडे पर घडविलें. गण- खरेच मला शिलेदार करितां ? वाहवा! तर बरें आहे. शिवा- होय गड्या. "गण - मी आतां तुह्मां बरोबर फौजेत येतों, लोकांस बाबाचे नांवाचा विसर पडू देणार नाही. जग०- आपण जशी इतकी कृपा केली तशी आतां येवढी एक विनंती सेवकाची ऐकिली पाहिजे. शिवा- तुमचा अभिप्राय माझे लक्षात आला. माझे ही मनांत अगोदरच आले आहे की, आजचा दि- वस तुमचे येथे राहून तुमची मेजवानी घ्यावी; परंतु तुमचे यमुनाबाईचे मनास येईल तेव्हां. बाळमित्र. यमु०- आमचा बाबा राहिला, आतां तुमची मर्जी असेल तंवर तुझी आमचे येथे राहावें. हिरा०- आतां आणीक दुसरे आंबे घ्या, यमु०- हे आंबे मघां तुमचे येण्याने फार कडू वाटत होते, पण आतां फारच गोड लागतात. बापू आणि गंगा. रामराव ह्मणून कोणी एक गृहस्थ व त्याची बा- यको पार्वतीबाई ह्या उभयतांनी एक पोरका मुलगा त्याच्या लहानपणापासून बाळगला होता, त्याचे नांव बापू त्यांनी त्याचे लालन पोषण असे केले, की को- णाचे मनांत हा बाळगलेला मुलगा असे वाटू नये, केवळ ह्यांचेच पोटचा असें. वाटावे. त्या उभयतां स्त्री- पुरुषांस एक मुलगी मात्र होती, दुसरे अपत्य कांहीं नव्हते; त्या मुलीचें नांव गंगा, ती बापूच्या बरोबरीची होती, त्या उभयतां मुलांची परस्पर प्रीति इतर मुलां- पेक्षां विशेष असे. ज्येष्टमासी एकेदिवशी सुप्रभाती बापू आणि गंगा आपली मैत्रीण भागीरथी हीस बरोबर घेऊन बागांत खेळावया करितां गेली. गंगा व भागीरथी ह्या दोघी मुली आठ वर्षांचे आंत होत्या, त्या बागामध्ये फारवेळ खेळून आनंद पावल्या. एकीमेकीचा हात धरून गाणे