Jump to content

फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> ये ! जोजफीन ! जिवाचा भडका ! - भडका झाला आहेग ! प्रिये ! नको थांबूस ! एक पाऊल पुढें ये - कडकडून मिठी मार ! - कीं या तापलेल्या देहाचें थंड - गोड - अमृत होईल ! - अग ये ! लवकर ये ! - स्वर्गात तर भेटूंच - कायमचेच भेटूं ग ! पण आधीं - हाय ! जोजफीन ! फ्रान्स ! फ्रान्स !! दाबा ! डोक्यावर हातोड्याचे घाव घाला ! पण ध्यानांत ठेवा ! सूर्याचा गळा दाबीत आहां ! रक्तानें न्हालेल्या - संतापानें लाल झालेल्या सूर्याचें मस्तक फोडून - पहा ! एका सूर्याला फोडलें - पण वेडयांनो ! आकाशांत - जगांत - पहा कसे हे लक्षावधी सूर्य जळत आहेत ते ! - डॉक्टर ! माझ्या बाळाला संभाळा ! - हाय ! सेंट हेलेनांत - या जळजळीत निखार्‍यांत मला निजवूं नका ! उचला ! ती पहा ! माझी लाडकी फ्रान्स माझ्याकरितां ओरडत आहे ! निजवारे ! तिच्या मांडीवर मला - आटपा ! बसूं नका ! महत्त्वाकांक्षेची दारु ठासा ! - मनुष्याच्या हदयांत जोरानें दारु ठाशीत चला, कीं आज नाही उद्यां - लक्षावधी - कोट्यावधी वर्षानी ! - पण केव्हां तरी शेवटीं आपला - मनुष्याचा जय हा होणारच ! त्रिभुवनाला - प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां आपण जिंकणार ! त्याला आपलें कौतुक करायला लावणार ! एवढ्याचकरितं तर - अहा ! किती सोसाट्याचें व मजेदार वादळ हें ! यः कश्चित् धुळीचे कण ! पण पहा कसें यांच्यांत महत्त्वाकांक्षेचें वारें संचारलें आहे ! - आल्पस ? सगळें जग थरारुन कोसळून पडलें पाहिजे ! चला ! पुढें व्हा ! अरे जिवाची कल्पना एका क्षणांत जर जगाला काडकन् फोडून टाकते ! तर प्रत्यक्ष जिवानें खरोखर त्रिभुवन फोडून त्याचा चुराडा केलाच पाहिजे ! नाहीं तर जन्माला यायचं कशाला ? - हं ! अशा तोफांच्या गोळ्यांचा पर्वत जरी या नेपोलिअनवर - पकडा ! चालूं द्या ! या चवताळलेल्या जगावर निकरानें हल्ला करा ! स्टिंगेल ! डिसेबस ! मेसिना ! शाबास ! अस्सें ! जोरानें ठोसे मारा ! पेटूं द्या ! सगळें आंग पेटलें तरी - ओरडा ! जयजयकार ! फ्रान्सचा जयजयकार ! फ्रान्स ! फ्रान्स ! - सैन्य ! - माझें सैन्य ! - जोजफीन ! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.