महासर्प (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

कोणरे तूं ? चल दूर होः - या गुलाबाच्या फुलाला पुनः हात लाव कीं तुला अगदीं कडकडून डसलोंच म्हणून समज ! - अरे तुम्ही माणसें आपसांत काय वाटेल तें करा - एकमेकांचे गळे कापा - रक्त प्राशन करा - आणि खुशाल मजेनें ढेकर देत बसा ! त्या तुमच्या सुखाच्या आड कोणी येत नाहीं ! - जा बरें, बाबा ! असंतोषानें रात्रंदिवस डोकीं कोरीत बसणार्‍या त्या आपल्या मनुष्यसृष्टींत खुशाल जाऊन बैस ! अरे, आपलीं मनें उजाड करतां तीं करतां - आणि आमच्या या सुंदर वनालाही उजाड करुं पाहतां ? किती सुंदर गुलाबाचें फूल हें ! पहा कसें आनंदानें उड्या मारीत आहे ! - तो पहा ! तो ढग आकाशांत दूर एकटाच फिरत आहे ! - त्यालासुद्धां याच्या बाललीला पाहून किती आनंद झाला आहे ! - या वनांतील मौज पहात तो कसा स्वस्थ उभा आहे ! - नको ! हें सुंदर - चिमकुलें - फूल तोडूं नकोस ! अरे, हें आमचें भावंड आहे ! समज, हें तूं तोडून नेलेंसे, तर - मला, माझ्या या सगळ्या भावंडांना, या ढगाला, आणखी आमच्या प्रेमळ आईला किती दुःख होईल ! - तुमचें लहानसे बालक काळानें आपल्या घरीं खेळायला नेलें, तर तुम्हांला किती बरें शोक होतो ! - कमलाकरा, या सुंदर - सुवासिक - फुलाला आमच्या हातूंन हिसकावून नेऊन तूं काय करणार ? आपल्या पत्नीलाच देणार ना ! अरे, आईच्या स्तनापासून तूं तट्कन ओढून आणलेलें हें मूल तिनें पाहिलें, तर ती चट्कन रडायला लागेल ! - जा, तुझ्या प्रियेलाच येथें घेऊन ये, म्हणजे ती या पुष्पाचें चुंबन घेईल, त्याच्याकरितां गाणीं गाईल, - आणखी, तिचें मधुर गायन ऐकून मला - आमच्या आईला - या वनाला - एकंदर सर्व सृष्टीला - किती आनंद होईल ! तुझी लाडकी प्रेमाचा वीणा वाजवायला लागूं दे, कीं आनंदानें मी अगदी डोलायला लागेन ! मी अतिशय रागीट आहें खरा, - पण प्रेमानें मला कोणी जवळ घेतलें, तर कधीं कोणावर मी रागावेन का ?....


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.