पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


o आतां मी विनंती करितों कीं, या निसुंन्याचे हातीं मला दवृं नको. कारण जर न्यानें मला मारिलें तर तो आपल्या देवाच्या देउळांत जाऊन त्याची स्तुति करील आणि म्हणेल कीं, माझ्या देवानें त्यास माझ्या हातीं दिल्हें. त्यावेळीं त्यानें त्यावर तीन पाउलें चालून जाऊन । ती तरवार त्याच्या उरांत भोंसकली. आणि त्याचा मुडदा पवित्र अंगणांत आकाशाच्या देवापुढें पाडिला. मग योहानान पुनः उत्तर करून म्हणाला कीं, हे माझ्या देवा, मी त्यास पवित्र ठिकाणीं मारिला म्हणून, तें मजकडे पाप असें मोजू नको. आणि आतां जे लीक त्या- । बरोबर येहुदास आणि येरुशालभास पीडा करण्याकरितां आले आहेत, त्यांसहि तसेच माझे हातीं दे. मग मतातयाचा पुत्र योहानान यानें निघून त्यालोकां बरोबर लढाई केली, आणि त्यांचा मोठा वध केला. त्यादिवशीं इकडले व तिकडले जे मारले गेले त्यांची संख्या सात लक्ष बाहतर हजार. तिकडून परतल्यावर त्यानें आपल्या कीर्ती करितां एक खांब बांधून त्यास बळवानांस मारणारा माकाबी * असें नाव दिल्हें.

---

  • माकाबी हा शब्द इब्री मध्यें מכבי असा आहे. हा शब्द रै מי כמוך באלים יי देवांमध्यें तुजसारिखा कोण १ या वाक्याचा संक्षिप्त आहे. या शब्दांचीं पहिलीं अक्षरें एकत्र जोडून מכבי हा शब्द केला आहे. हीं अक्षरें त्यांच्या भावटयावरही होतीं. तेव्हांपासून मनातयाचे कुटुंबास मकाबी असें नाव पडलें.