पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


3 आणि असें झालें कीं, आनतिओखास राजानें त्याचा प्रधान नीकानोर मारला गेला असें जेव्हां ऐकिलें; तेव्हां त्यास फारच दु:ख झालें. मग त्यानें बगरीस, जो स्वतः दुष्ट असून आपल्या लोकांसहि (दुष्टाई कडे) वळवीत असे, त्यास बोलाविलें. आणि आनतीओखोस बगरीसास उत्तर करून म्हणाला कों, इस्राएलांच्या पुत्रांनीं मजशीं काय केलें तै, क्यांनीं माझें सैन्य मारून, माझा तळ व माझे सरदारांस प्लुटिलें हैं तूं जाणत नाहींस काय १ व तं ऐकिलें नाहींस काय ? तर आतां तुम्हीं तुमच्या द्रव्याचा भरंवसा ठेऊं शकतां काय ? आणि तुमचों घरें तुमचीच असें म्हणू शकतां काय ! या आपण त्यांवर चढून जावू आणि आकाशाचे देवानें त्यांसीं शाब्बाथ, प्रतिपदा आणि सुंता हे जे करार केलेले आहेत, ते आपण रद्द करूं. यावरून दुष्ट बगरीस व त्याचें सर्व सैन्य येरुशालेमास घेऊन तेथे त्यांनीं मोठा वध केला आणि शाब्बाथ, प्रतिपदा व सुंता हे करार न पाव्छावे असा त्यानें एक पूर्ण ठराव केला. ही राजाची गोष्ट अमलांत आल्यावर, आपल्या पुत्राची सुंता केली असा एक मनुष्य त्यांस सांपडला; तेव्हां त्यांनीं त्यास व त्याच्या बायकोस आणून त्या मुलाच्या समोर त्यांस फांशी दिल्हें. त्यावेळीं एका बाईस तिचा नवरा भेल्यावर पुत्र झाला. त्याची तिने आठव्या दिवशीं सुंता करून आपल्या पुत्रास हातावर घेऊन येरुशालेमेच्या तटावर चढली. आणि बगरीसास हाक मारून म्हणाली, हे दुष्ट बगरीसा, शाब्बाथ, मतिपदा व सुंता हे आमच्या पूर्वजांचे करार आम्ही कधींच रद्द करणार नाहीं व लेकरां