पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करून आपल्या वस्त्राखाली लपवून ठेविलीं. आणि ये रुशालेमांस येऊन राजाच्या दारापुढे उभा राहिला, आणि द्वारपाळांस बोलावून त्यांस म्हणाला की, मी मतातया- चा पुत्र योहानान राजापुढें जावयास आलो आहे. ते- व्हां ते द्वारपाळ आणि पाहरेकरी येऊन त्यास म्हणाले कीं, येहुद्यांचा मुख्य याजक दाराजवळ उभा आहे. ते व्हां नीकानोर म्हणाला की त्यास येऊंद्या. मग ते यो हानानास नीकानोरापुढें घेऊन आले. तेव्हां नीका- नोर योहानानास म्हणाला की, ज्यांनी राजावर बंडावा केला, आणि जे त्याच्या राज्याचें कल्याण इच्छित ना- हीत, त्यांतील तूं एक आहेस. योहानान त्यास उत्तर करून म्हणाला हे स्वामी, मी तोच; परंतु आतां मी तुज पुढें आलों आहें; जसी तुझी इच्छा असेल तसें मी क रीन. तेव्हां नीकानोर त्यास म्हणाला की, जर तूं मा झ्या इच्छेप्रमाणें करणार, तर एक डुकर घेऊन त्या उं- चस्थानावर काप; म्हणजे राजकीय वस्त्रे तुला लेववून व राजाच्या घोड्यावर तुझी स्वारी काढून राजा- च्या प्रियकरांतला तूं एक होशील. हें जेव्हां यो हानानानें ऐकिलें, तेव्हां तो त्यास उत्तर देऊन म्हणाला, हे स्वामी, मी इस्राएल लोकांस भितों; त्यांनी कदाचित हें ऐकिलें तर ते मला धोंडमार करून मारून टाकितील. ही गोष्ट त्यांस कदाचित कळेल, म्हणून तुझ्या समोरची सर्व मनुष्य घालीव. यावरून निकानोराने त्याच्या समोर ची सर्व मनुष्य घालविलीं. तेव्हां मतातयाचा पुत्र योहाना- न यानें आँपले डोळे आकाशाकडे उंचावून आपल्या देवास प्रार्थना केली. आणि म्हणाला - हे माझ्या देवा, आणि माझे पूर्वज आब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा,