Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/878

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४२ एकनाथी भागवत देवो । परी ये अवतारींचा नवलावो । ज्ञानप्राधान्य लीला पहा हो । अगम्य अभिप्रायो ब्रह्मादि देवां ।। ७४ ॥ जन्मापासून जो जो देहाडा । तो तो नीच नवा पोंडा । ब्रह्मसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळ ॥ ७५ ॥ अवतारांमाजी श्रीकृष्ण । निजनिष्टंक ब्रह्म पूर्ण । त्याचे चरित्र ज्ञानघन । पठणे पावन जन होती ॥ ७६ ॥ ऐसी पावन कृष्णकीर्ती । पढता वाचक उद्धरती । श्रद्धेने जे श्रवण करिती । तेही तरती भवसिंधू ॥७७॥ कलियुगी जन मंदमती । त्यांसी तरावया सुगमस्थिती । परम पावन कृष्णकीर्ती । कृपेनें निश्चिती विस्तारली ॥ ७८ ॥ ऐसी पावन भगवत्कीर्ती । विस्तारली श्रीभागवती । त्यांत दशमस्कंधाप्रती । श्रीकृष्णकीती अतिगोड ॥ ७९ ॥ उपजल्या दिवसापासूनी । चढोवढी प्रतिदिनीं । कीर्ति विस्तारी चक्रपाणी । दीनजनी तरावया ॥ ३८० ॥ धरूनि नटनाव्यधेप । अवतरला हपीकेश । तेथें नानाचरित्रविलास । दिवसेदिवस विस्तारी ॥८१॥ त्याहीमाजी वाळचरित्र । मधुर सुंदर अतिपवित्र । मालखंडा जे केले क्षेत्र । परम पवित्र पावनत्वे ॥ ८२ ॥ जरासंध पराभवून । काळयवनाते निर्दाळून । ते अतिविचित्र विदीन । लाघवी श्रीकृष्ण स्वयें दावी ॥ ८३ ॥ रुक्मिया रणीं विटवून । शिशुपाळादि वीर गांजून । कृष्ण करी भीमकीहरण । ते परम पावन हरिलीला ॥ ८४॥ पट्टमहिपींचें चरण । भौमासुराचे निर्दळण । पारिजाताचे हरण । पाणिग्रहण सोळासहस्रीं ॥ ८५॥ समुद्री वसवूनि द्वारावती । निद्रा न मोडितां निश्चिती । मथुरा आणिली रातोराती । अभिनव कीर्ती कृष्णाची ॥ ८६ ॥ वत्सें वत्सप होऊनि आपण । आपुले दावी पूर्णपण । ब्रह्मादिका न कळे जाण । अवतारी कृष्ण पूर्णागे ॥ ८७॥ खाजनि भाजीचे पान । तृप्त केले ऋपिजन । ऐसी चरित्रे ज्ञानप्रधान । परम पावन आचरिला ॥ ८८ ॥ ऐसी कृष्णलीला परमाद्भुत । पाठकां करी परम पुनीत । ते दशमामाजीं समस्त । कथा साद्यंत सांगितली ॥ ८९ ॥ एकादशाची नवलस्थिती । मूळापासूनि परम प्राप्ती । ज्ञान वैराग्य भक्ति मुक्ती । स्वमुखें श्रीपति सघादला ॥ ३९० ॥ प्रथमाध्यायीं वैराग्य पूर्ण । मुख्य अधिकाराचे कारण । नारदवसुदेवसवाद जाण । भूमिशोधन साधकां ॥९१॥ तेथ निमिजायंतसंवादन । निर्भयाचे कोण स्थान । उत्तम भागवत कोण । सायातरण कर्मब्रह्म ॥ ९२ ॥ इत्यादि विदेहाचे नव प्रश्न । नवांची नव उत्तरें पूर्ण । तेचि नव नागर जाण । क्षेत्रकर्षण अतिशुद्ध ॥९॥ ते पाचां अध्यायांच्या अंतीं। देवी प्रार्थिला श्रीपती । कृष्ण कुलक्षयाच्या पाती। निजधामाप्रती निघेल ॥९४ ॥ हे उद्धचे जाणोनि आपण । निर्वेद केला जो संपूर्ण । तेचि कल्पनाकाशाचे निर्दळण । पालव्या छेदन विकल्पांच्या ॥ ९५ ॥ कामलोभांचे गुप्त ख़ुट । आडवू लागले उद्भट । ते समूळ केले संपाट । अतितिखट अनुता ॥९६ ॥ क्रोधाचिया अतिजाडी । समूळ उपडिल्या महापेडी। शाति निवडक चोखडी । समूळ उपाडी मूळेंसी ॥ ९७ ॥ उद्धवचातक आतिहरण । बोलिला श्रीकृष्ण कृपाघन । क्षेत्र बोलावले संवाह्य पूर्ण । लागली संपूर्ण निजबोधवाफ ॥ ९८ ॥ तेथे पूर्ण ब्रह्म निजवीज । १ साधय २ देहाचा व्यापार ३ निस ४ गुणवर्णन ५ नि सशम ६ नियुद्ध. ७ उत्तरोत्तर, अधिकाधिक ८ घाळ लीला १ 'मालखढे असाही पाठ आहे १० फसव, कौतुक ११ डोक्याचे पाट काइन ११ सक्मिण्यादि अष्टनायिकाच १३ पाणिग्रहण १४ सहार १५ गुरासी १६ चोलला १७ भूमिशुद्धि १८ जनकराजाचे १९ शेवटी २० सेद, दुख. ल्पनारूपी आकाशा. २१ मुळे, बुहवे. २३ भस्पत दीन. २४ उद्धवरूपी चातकाचा दुसनारा करणार . se .. - - - - - - -