पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/868

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३२ एकनाथी भागवत. कैवारी । एकाचा जाहला पूर्ण वैरी । परी एकात्मता चराचरी । अणुभरी ढळेना ॥४९॥ एकी उद्धरिली चरणी लागतां । तोही एकाचे चरणी ठेवी माथा । बाप ज्ञानाची उदा. रता । न्यूनपूर्णता तरी न घडे ॥ १५० ॥ इतर ज्ञाते ज्ञानस्थिती । बोल बोलोनि दाविती । तैशी नव्हे ही कृष्णमूर्ती । आचरोनि रीति दावी अंगें ।। ५१॥ अतिगुंह्य ज्ञानलक्षणे आचरोनि दाविलीं श्रीकृष्णे । परी अणुमात्रही उणे । नेदीच पूर्णपणे अंगी लागों ।। ५२ ॥ एवढी ज्या देहाची ख्याती । जेणे देहीं दीन उद्धरती । ज्या देहाते सुरनर बंदिती । ज्या देहाची कीर्ति त्रैलोक्य वर्णी ॥ ५३ ॥ त्या देहाची अहंकृती । निःशेप साडूनि श्रीपती । गेला निजधामाप्रती । ठेवूनि निजमूर्ति स्वभक्तध्यानीं ॥ ५४ ॥ कृपणे देह नेला ना त्यागिला । तो लीलाविद्महे सचला । निजभकध्यानी प्रतिष्ठिला । स्वयें निजधामा गेला निजात्मयोगें ॥ ५५ ॥ ____ य एता प्रातर थाय कृष्णस्य पदवी पराम् । प्रयत कीर्तयेत्या तामेयामोत्यनुत्तमाम् ॥ १४ ॥ श्रीकृष्णअवताराचे अंतीं । कृष्णाची जे परम गती । अतिउत्कृष्ट योगस्थिती । अतर्क्ष्य निश्चिती सुरश्रेष्ठा ॥५६॥जे गतीहूनि वरती । चढेना अधिक गती । तीते परा पैदवी ह्मणती। वेदशास्त्रोक्ती सज्ञान ॥ ५७ ॥ हे कृष्णपरमपदवी । जो कोणी भक्तियुक्त सद्भावी । नित्य नियमस्थ धरूनि जीवीं । पढे निजभाषी प्रातःकाळी ॥ ५८ ॥ भक्तियुक्तसुहृदयकमळी । या चौदा श्लोकाची जपमाळी । जिह्वाग्ने अनुदिनी चाळी । नित्य प्रातःकाळी नियमस्थ ॥ ५९॥ केलिया या नेमासी । साडणे नाहीं प्राणासी । ऐशी निष्ठा जयापाशी । उत्तमत्वासी तो पावे ।। १६० ॥ कृष्णपदवी गाता गीतीं । पाया लागती चारी मुक्ती । त्याचीही उपेक्षनि स्थिती । कृष्णपदवी निश्चिती स्वयें पावे ॥६१ ॥ हे चौदा श्लोक जाण । चौदा भवनाचे निजजीवन । कृष्णपदवी पाविजे पूर्ण । नियमस्थ पठण केलिया ॥ १२ ॥ हे चौदाही श्लोक जाण | चौदा पर्दै गयावर्जन । पदी पिंडा समाधान । नियमस्थ पठण केलिया ॥ ६३ ॥ हे चौदाही श्लोक जाण । चौदा इंद्रांच्या जीवां जीवन । इंद्राचा इंद्र होइजे आपण । नियमस्थ पठण केलिया ॥६४ ॥ हे चौदा श्लोक जाण । चौदा विद्याचे जन्मस्थान | जो प्रातःकाळी करी पठण । कृष्णपदवी पूर्ण तो पाये ॥६५॥ हे चौदाही श्लोक जाण । चौदा का. वेद सपूर्ण । वेदवादा समाधान । नियमस्थ पठण केलिया ॥ ६६ ॥ हे चौदाही श्लोक जाण । ससाराचे गुणकर्मवर्ण । मोडूनि करी ब्रह्म पूर्ण । नेमें पठण केलिया ।। ६७ ॥ प्रात:काळी नेमस्त पठण । करिता पाविजे ब्रह्म पूर्ण । मा त्रिकाळी जो करी पठण । तो स्वदेहें श्रीकृष्ण स्वयें होय ॥ ६८ ॥ एव पढोनि जो अर्थ पाहे । तो स्वयें श्रीकृष्ण होये । कृष्णाची पूर्ण पदवी पाहे । आंदणी होये तयाची ॥ ६९ ।। कृष्णपदवी निजनिर्वाण । श्रवण पठणें अर्थ जाण । साधकां करी ब्रह्म पूर्ण । हैं गुह्य निरूपण परमार्थसिद्धी ।। १७० ॥ एष न करितां अतिसाधन । अनायासे ब्रह्मज्ञान । कृष्णपदवी पाविजे पूर्ण । श्रद्धायुक्त पठण नेमें करिता ॥७१॥ तक्षकभयावे १ याचा सागता येप्नासारौं २ एवख्या बहुमोल देहाची मुदा ३ स्थापला ४ 'सा काष्टा सा परा गति भी श्रुति थाद्दे ५ मनात ६नकी पावन झालेल्या गुद्ध हृदयात ७ दररोज स्थान, वैकुठभुवन, ९ निसनेमा १. मैदपाटको परिकांचे सुद्धा ११ निरसन १२ नियमित. १३ दासी ।