पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/866

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३० एकनाथी भागवतं. ॥ ४॥ यदुवंशी कृष्णनाथ । सर्व कर्मी सदा अलिप्त । सृष्टिस्थित्यंती नित्यमुक्त । त्यासी परमाद्भुत लें कायी ॥ ५ ॥ न मेळवितां साह्य सगे । कृष्ण सृष्टी जी निजांगें । ते प्रतिपालूनि यथाभागें । सहारूनि वेगें स्वयें उरे ॥ ६॥ कृष्ण नजी पाळी सहारी । हे जगी प्रत्यक्ष दिसे चोरी । कर्मे करूनि अविकारी । कदा विकारी , नव्हे कृष्ण ॥७॥ कृष्ण अतर्यामी सर्व भूतां । जगत्कर्माचा कृष्ण को । कर्म करूनि तो अकर्ता । विदेहता निजरूपें ॥८॥ऐसा अगाध श्रीकृष्णमहिमा । मर्यादा न पावे शिव शक ब्रह्मा । याचा देहचि विदेहात्मा । गेला निजधामा तेणे योगें ॥ ९॥ येचि अवतारी कृष्णनाथें । देही दाविले विदेहकर्माते । ते मागें परिसविले तूतें । ऐक मागुते सांगेन ॥११० ॥ सात दिवस गोवर्धन । निजकरी धरूनि जाण । इंद्राचा हरिला मान । विदेही पूर्ण श्रीकृष्ण ॥ ११॥ दावाग्नि प्राशूनि आपण । लाजविला हुताशैन । रासक्रीडा करूनि जाण । हरिला मान मदनाचा ॥ १२ ॥ समुद्र सारूनि माघारां । वसविलें निजनगरा । निद्रा न मोडितां मथुरा । द्वारकापुरा आणिली ॥ १३ ॥ सेवूनि भाजीचे पान । तृप्त केले ऋषिजन । कृष्ण अतर्यामी आपण । हें निजलक्षण दाविले ॥ १४ ॥ येणेंचि देहें श्रीकृष्णनाथ । जाहला वत्से त्सप समस्त । ब्रह्मा लाजवूनि तेथ । गर्वहत तो केला ॥ १५ ॥ मत्येन यो गुरसुत यमलोकनीत स्वा चानयच्छरणद परमानदग्धम् । जिग्येऽन्तकान्तकमपीशमसावनीश फि स्वायने स्वरनया मृगयु सदेहम् ॥१२॥ श्रीकृष्णे येणेचि देहेंसीं । जाऊनिया यमलोकासी । निगहूनि यमकाळांसी । निमाया गुरुसुतासी आणिले ॥ १६ ॥ उत्तरेचिये गर्भस्थितीं । जळता ब्रह्मास्त्रमहाशकी । तुज राखिले आकांतीं । स्वचक्र श्रीपति "प्रेरोनी ।। १७ ।। तुज राखावया हेचि कारण । तुझी माता रिघाली शरण । कृष्ण शरणागतां शरण्य । सकटहरण निजभक्तां ॥ १८ ॥ यादवांदेखतां द्वारकापुरी । द्विजपुत्र राखितां सेंटीचे रात्रीं । अर्जुन नेमेसी प्रतिज्ञा करी । तंव तो शरीरी होरपला ॥ १९ ॥ ब्राहाणे निर्भसिले" त्यासी । थोर लाज जाहली अर्जुन नासी । तेणे कळवळला हपीकेशी । भक्तसाद्यासी पावला ॥ १२० ।। अर्जुनासहित हृषीकेशी । रथेंसी निघे क्षीरसागरासी । द्विजसुन होते नारायणापाशी । द्वारकेसी आणिले ॥ २१ ॥ एवं भक्तसकटनिवारण । निजांगें करी श्रीकृष्ण । कृष्णप्रतापाचे महिमान । ऐक सागेन अलोलिक ॥ २२ ॥ वाणासुराचा कैवारू । करूं आला महारुद्र । सवे नंदी भुंगी वीरभद्रू । स्वामिकार्तिकेंसी हरू जिंतला कृष्णे ॥ २३ ॥ उमासिही अतिउग्र। भयंकरासी भयंकर । तो जिणोनि काळाग्निरुद्र । वाणभुजाभार छेदिला ॥ २४ ॥ कृष्णवचन अतिअगाध । जेणे केला महापराध । तो स्वदेहेंसी जराव्याध । स्वर्गासी प्रसिद्ध धाडिला ॥ २५ ॥ एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापागी । तो काय राखू न शके स्वदेहासी । देही देहत्व नाही त्यासी । गेला निजधामासी निजात्मता ॥ २६ ॥ एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापाशीं । तरी का गेला निजधामासी । या लोकी तेणे देहेंसीं । राहतां त्यासी १ निराग, सतन १ उत्तम करितो ३ मोठेपणा ४ श्रीकृष्ण ५मगि ६ गुरासी अभिमानरहित ८ बाधून, शिक्षा करून मृत १० ब्रह्मालान दग्घ झालेल्या परीक्षितीस ११ सुदर्शन चक बरोबर घेऊन १२ पावोनि. १३वारण जाप्याचे स्थान १४ पाठीपूजेदिवशी. १५ मरण पावला १६ झिडकारिलें १७ विलक्षण १८ सी-सह, सगट,