________________
८२८ एकनाथी भागवत, संचला । निजरूपी ठेला निजत्वे ॥ ६३ ॥ कृष्णे देहो नेला ना त्यागिला । तो लीलाविग्रहे सर्चला । भक्तध्यानी प्रतिष्ठिला । स्वये गेला निजधामा ॥ ६४ ॥ जैसजैसा भक्ताचा भावो। तैसतैसा होय देवो । तो भक्तध्यानी स्थापूनि देहो । निजधामा पहा हो ने वचोनि गेला ।। ६५ ॥ हो का कृष्णमूर्ति जरी सगुण । तरी देहदाह न लगे जाण । कृष्णाश्रये जग संपूर्ण । तेव्हा होईल दहन जगाचे ॥६६॥ जेणे मायेसी निजपोटीं । दाविल्या ब्रह्मांडांच्या कोटी । त्या कृष्णदेहदाहापाठी । जगाची गोठी नुरवावी ।। ६७ ॥ ऐशियाही युक्ति विचारितां । अतिस्थूळ ते योग्यता । कृष्णदेहाची विदेहता । तेथ दाहकता ते कैची ॥ ६८ ॥ कृष्णाचे असणे जाणे । हे श्रीकृष्णचि स्वयें जाणे । तेथ वेदाचेही बोलणे । जाणपणे सरेना ॥ ६९ ॥ हे कृष्णाची अगम्य गती । शिवविरियादि नेणती । त्याची कल्पना ऐशी चित्ती । आमासवे श्रीपति येईल ॥ ७० ॥ ऐसेनि अभिप्रायें पूर्ण । आनंदले सुरगण । अवघे होऊनि सावधान । उल्हासपूर्ण माडिला ॥ ७१ ॥ __ दिवि दुन्दुभयो नेटु पेतु सुमनसश्च सात् । सत्य धर्मो एतिभूमे कीर्ति श्रीश्वानु त ययु ॥ ७ ॥ उल्हासले सुरगणं । दिवि दुंदुभि बाहाटिल्या जाण । दिव्य सुमने गगनीहन । वर्षले पूर्ण कृष्णावरी ॥ ७२ ॥ वैकुंठादि दिव्य संपत्ती । भूलोका आणिल्या श्रीपती । तो येतां निजधामाप्रती । आमुच्या आह्मां हाती देईल वेगीं ॥ ७३ ॥ ऐसे देव उल्हासोनी । पुन:पुनः वर्पती सुमनीं । शिवादि पाहती सावधानी । अतयंगमनी हरि गेला ॥७४ ॥ आही सकळ मायेचे "नियंते । आझी सर्वद्रष्टे सर्वज्ञाते । ऐसा अभिमान होता देवाते । त्यासी श्रीकृष्णनाथें लाजविले ॥७५|| अलक्ष्य कृष्णाची निजगती । शंभुस्वयंभू नेणती । तेणे विस्मित होती। आश्चर्य मानिती सरवर ॥७६ ॥ देव परमाश्चर्य मानिती। सत्य धर्म धृति कीर्ती । श्रियेसमवेत निघती । साडूनि क्षिती कृष्णलक्षी ॥ ७७ ॥ सत्य धर्म श्री धृति कीती । यांची कृष्णचरणी नित्य वस्ती । यालागी कृष्णासवे त्या निघती । सांडोनि क्षिती तत्काळ ॥७८ ॥ तूं ऐसे मानिशी परीक्षिती । जे सत्य धर्म श्री धृति कीर्ती । निःशेष साडूनि गेली क्षिती । ऐक ते अर्थी विचार ।। ७९ ॥ मज पाहतां श्रीकृप्णमूर्ती । स्थिरावली ज्याच्या चित्ती । तेथ सत्य धर्म श्रीधृति कीर्ती । साम्राज्य पसती कुरुराया ॥ ८०॥ केवळ भक्तानुग्रही । कृष्ण स्वयें लीलाविग्रही । त्या कृष्णाची गती पाही । न पडे ठायीं ब्रह्मादिका ॥ ८१ ॥ देवादयो बामुख्या न विशन्त स्वधामनि । अविज्ञातगति कृष्ण दहशुश्वातिनिस्मिता ॥ ८ ॥ इंद्र बृहस्पति मुख्यत्वें ब्रह्मा । पाडूनि देवा परम चमां । कृष्ण प्रवेशला निजधामा । अतयं महिमा हरीचा ॥ ८२ ॥ अतयं श्रीकृष्णाची गती । देवांसी लक्षेना निजशक्ती । अतिविस्मय पावोनि चित्ती । स्वधामाप्रती निघाले ॥८३ ॥ देव जाता स्वधामाप्रती । क्षणक्षणा आश्चर्य करिती । अलक्ष्य लक्षेना कृष्णगती । अतयं स्थिति शिवादिका ॥ ८४ ॥ तेचि कृष्णाची अतयं गती । देवांसी लक्षेना दैवी शक्ती । तेचि विशद दृष्टाती। परीक्षितीप्रती शुक सागे ।। ८५॥ १ ओतप्रोत भरला २ जाऊन ३ यशोदेला. ४ कृष्णदेह दहन झाला हाणजे जगाची गोष्ट सपलीय प्रणायाची ५त वान पुरं पडत नाहीं ६ शकर, ब्रह्मदेव चगरे ५ स्वर्गावर ८ वाजविल्या . ठेवणारे ११ फरणारी १२ शिव व प्रामा १३ हे परीक्षिति राजा गि