________________
८२४ एकनाथी भागवत. ससार मायिक रचना । सत्यत्वे कळलें ज्याच्या मना। तै मनचि लाजे मनपणा । विज्ञान जाणा त्या नांच ।। ३९० ॥ जागृति सुषुप्ति आणि स्वम । ससाराचें मिथ्या भान । ज्यासी ठसावल्या संपूर्ण । विज्ञान जाण त्या नांव ॥ ९१ । मुख्य विज्ञानाचे लक्षण । साधक होय ब्रह्म पूर्ण । जगी न देखे मीतूंपण । उपर्शम जाण या नांव ।। ९२ ॥ ऐसा उपशम ज्यासी पूर्ण । त्यासी मजसी नाहीं भिन्नपण । दारुकें ऐकतां निरूपण । हृदयीं ते खुण चमत्कारली ॥९३ ॥ अलंकार सोनेपणे पाहूं गेला । तंव तोचि सोने होऊनि ठेला । तेवीं मी कृष्णरसे वोतला | वियोग नाथिलो देहलोभे ॥ ९४ ॥ मी कृष्णस्वरूप आपण । मज कृष्णेसी नाही भिन्नपण । ऐसी चमत्कारली खूण । मी ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥१५॥ इत्युक्तरस परिक्रम्य नमस्फरय पुन पुन । तपादौ शीपर्युषाधाय दुर्ममा प्रययौ पुरीम् ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशम्कन्धे यहफकसक्षयो नाम प्रिंशोऽपाय ॥३०॥ ऐसें ऐकोनि कृष्णवचना | शिरी चंदूनि श्रीकृष्णाज्ञा । खेद सांडोनियां मना ! कृष्णचरणां लागला ॥ ९६ ॥ करूनि त्रिवार प्रदक्षिणा । पुनःपुनः लागोनि चरणां । माथा ठेवूनि पदी जाणा । घेऊनि कृष्णाज्ञा निघाला ॥९७ ॥ ब्रह्म सर्वत्र परिपूर्ण । त्याचा बोधक श्रीकृष्ण । तो निजधामा गेला आपण । तेणें दुर्मन दारुक ॥ ९८ ॥ पुढती श्रीकृष्णदर्शन । सर्वथा न लामे आपण । यालागी अतिदुर्मन । करी गमन द्वारकेसी ॥ ९९ ॥ दारुक धाडिला द्वारकसी । तंव मैत्रेय आला कृष्णापाशीं । तेचि काळी हपी. केशी । ब्रह्मज्ञान त्यासी उपदेशी ॥४०॥ तो ब्रह्मज्ञानउपदेशविधी । शुक बोलिला तृतीय स्कंधी । ते निरूपण ये संधी । न प्रतिपादी पुनरुक्त ॥१॥ पहावया कृष्णनियोण । उद्धव गुप्त होता आपण । तेणे ऐकोनि ज्ञाननिरूपण । सतोपें नमन करी कृष्णा ॥२॥ तेचि काळी मैनेयासी । स्वमुखें बोलिला हपीकेशी । विदुर येईल तुजपाशीं । त्यासी तू उपदेशी गुह्यज्ञान ॥ ३ ॥ उपदेशूनि मैत्रेयासी । देवे धाडिला तो स्वाश्रमासी । उद्धवे नमूनि हुपीकेशी । तोही चदरीसी निघाला ॥४॥ दारुक धाडिला द्वारकेसी । मैत्रेय धाडिला स्वाश्रमासी । उद्धव धाडिला बदरीसी । व्याधाँधमासी धाडी स्वर्गा ॥५॥ निजरथसहित घोडे । निजायुधेसी धाडिले पुढे । आता आपणही वाकोडें । निजधामाकडे निघेल ॥ ६॥ निजधामा निघता श्रीपती । समस्त देव पाहाँ येती । ते सुरसँकथासगती । पुदिले अध्यायार्थी अतिगोड ॥७॥ अजन्मा तो जन्म मिरवी । विदेहा अगी देहपदवी । स्वयें अक्षवी तो मरण दावी । अतिलाघवी श्रीकृष्ण ॥ ८॥ ज्याचे निजधामगमन । शिवधिरिच्यादिका अतयं खूण । त्याचे सांगेन उपलक्षण । श्रोता अवधान मज धावें ॥९॥ एकादशाचा कळसं जाण । श्रीकृष्णाचं निजनियोण । जेथ नाहीं देहाभिमान । तें ब्रह्म पूर्ण परिपक्व ॥ ४१० ॥ भय नाही जन्म धरिता । भय नाही दही वर्तता । भय नाही देह त्यागिता । हे ब्रह्मपरिपूर्णता हरि दावी ॥ ११॥ एका जनार्दना शरण । पुढे अचुंवित निरूपण । सती मज द्यावे अवधान । सागेन व्याख्यान सद्गुरुकृपा ।। ४१२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकदशस्कंधे परमहससहितायां एकाकारटीकाया स्वकुलनिर्दळण नाम त्रिशत्तमोऽध्यायः॥३०॥अध्याय ॥३०॥ ओंव्या ४१२ रपूर्ण दैतमान उसल्यानतरची स्थिति २ बसलेला, मिष्या ३ उदास ४ या प्रसगी ५ एकदा प्रतिपादिले ६ मदारकाश्रमाला जरान्यामाला. ८ रसपूर्ण कयैचा विस्तार ९ लक्ष १० शेवट ११ सपूर्ण