पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/838

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत ___ राजोवाच-ततो महाभागवत उदये निर्गते वनम् । द्वारयत्या किमकरोद्भगवान् भूतभावन ॥१॥ जो पांडवकुळी कुळरत्न । की कौरवकुळी कुळभूपण । जो धर्माचें निजरक्षण । कलीचे निग्रहण जेणे केले ॥ १६ ॥ ऐसा राजा परीक्षिती । धैर्यवीर्यउदारकीर्ती । तेणे स्वमुखें श्रीशुकाप्रती । केली विनती अतिश्रद्धा ॥ १७ ॥ उद्धव पायोनि पूर्ण ज्ञान । तो वटरिकाश्रमा गेलिया जाण । मागें द्वारकेसी श्रीकृष्ण । काय आपण करिता झाला ॥ २८॥ उत्पत्तिस्थितिनिधन । जो इच्छामात्रे करी जाण । तो स्वदेहाचे विमैर्जन । कसेनि श्रीकृष्ण करिता झाला ॥ १९ ॥ ब्रह्मशापोपससृष्टे स्वकुले यादवर्षभ । प्रेयसी सर्वनेत्राणा तनु स कथमत्यजत् ॥ २ ॥ ब्रह्मशा श्रीकृष्णनाथ । निशेष निजकुळासी घात । कैसेनि करविला एथ । हे मुनिश्चित सागावे ॥ २० ॥ जननयना आह्लादकर । कृष्णतनू अतिसुंदर । जीसी देखताचि त्रिनेन । ह निर्भर स्वानंदें ॥ २१ ॥ ऐशी आह्लादकारक तनू । कैसेनि साडी श्रीकृष्णू । ब्रह्मशापासी भिऊनू । तो का निजतनू साडिता आला ॥ २२ ॥ कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । त्यासी वाधीना शापनंधन । तोही सत्य करी ब्रह्मवचन । यादववंशी तैनू सांडूनी ॥२३॥ दृष्टी देखतां श्रीकृष्ण । सुखें सुखावे जीवप्राण । त्याच्या सौंदर्याचे निरूपण । राजा आपण सागत ॥२४॥ प्रत्याकटु नयनमबला यत्र लग्न न शेष कर्णाविष्ट न सरनि ततो यत्सतामात्मलनम् । यच्छीर्वाचा जनयति रति कि नु मान कवीना दृष्ट्वा जिष्णोयुधि रथगत यच तरसायमीयु ॥३॥ ज्याची अकरा इद्रिया सदा गोडी ।भोगिजे तंव तंव प्रीति गाढी । कदा वीट नुपजे आवडी । अवीट गोडी कृष्णाची ॥ २५ ॥ बाळा प्रौढा मुग्धा प्रगल्भा व्यक्ती । ऐशी चतुर्विधा स्त्रियाची जाती । तिही देखिल्या श्रीकृष्णमूर्ती । दृष्टी मागुती परतेना ॥ २६ ॥ ज्या धार्मिका धैर्यवृत्ती । ज्या पतिव्रता महासती । तिही देखिल्या कृष्णमूर्ती । दृष्टी मागुती परतेना ॥ २७ ।। ज्या का अवळा अभुक्तकाम । ज्या अतिवृद्धा अतिनिप्काम । तिही देखिल्या मेघश्याम । नयन सकाम हरिरूपी ॥२८॥ जेवी लवणजळा भेटी । तेवीं श्रीकृष्णी स्त्रियाची दिठी" | मिसळलिया उठाउठी । परतोनि मिठी सुटेना ।। २९ ॥ एवं देखिलिया श्रीकृष्णमूर्ती । स्त्रियाचिया निजात्मशक्ती । दृष्टी परतेना मागुती । ऐशी नयना प्रीती हरिरूपी ॥ ३०॥ स्त्रिया बापुड्या त्या किती। जे सत विरक्त परमार्थी । त्याचे श्रवर्णी पडतां कीर्ती । चित्तीं कृष्णमूर्ति ठसावे ॥३१॥ चित्तीं ठसायोनि कृष्णमूर्ती । चित्तचि आणी कृष्णस्थिती । ऐशी कृपणाची कृष्णकीर्ती । चित्तवृत्ती आकर्षी ॥ ३२ ॥ सतांची आकर्षी चित्तवृत्ती । हे नवल नव्हे कृष्णकीती । कीती ऐकता असती । तेही होती तद्प ॥३३॥ लागता चंदनाचा पवन । खेर धामोडे होती चदन । तेवी कृष्णकीर्तिश्रवण । दे समाधान समसाम्य ॥ ३४ ॥ भावे ऐकता श्रीकृष्णकीर्ती । असतही सतत्वा येती । मग सतासत दोनी स्थिती । हारपती समसाम्य ॥३५॥ महाकवि वर्णिता कृष्णकीर्ती । पावले परम सभाग्य शासन • निदान ३ त्याग ४ लोकाच्या डोळ्यास ५ आनद देणारी ६ शकर ७ शरीर ८ चार प्रका रखा १ मागे, परत १० विपयाची कल्पना नसलेल्या नवयौवना ११ दृष्टि १२ दुर्जनानी १३ बारा १४ धावडे