Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/837

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसावा. ८०५ ज्यासी देही निरभिमानता । ज्यासी बाधीना काळाची ममता । ते देहीची निरहंकारता । श्रीकृष्ण आता स्वागें दावी ॥ ४४ ॥ ते ज्ञानपरिपाकनिर्वाण । अतिगोडीचे निरूपण । पुढिले दो अध्यार्थी जाण । श्रीशुक आपण सागेल ॥ ४५ ॥ ते ज्ञानगुह्य निजकथा । जनार्दनकृपा तत्त्वता । एका जनार्दन वक्ता । अवधान श्रोता मज द्यावे ॥ ४६॥ जेय सत अवधान देती । ते कथा वोढचे परमार्थो । एका जनार्दनीं विनंती । अवधान ग्रंथार्थी मज द्यावे ॥४७॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसवादे एकाकारदीकायां परमार्थप्राप्तिसुगमोपायकवनोद्धवबदरिकाश्रमप्रवेशो नाम एकोनत्रिशोऽध्यायः ॥ २९॥ ॥ अध्याय ।। २९ ॥ श्लोक ॥ ४९ ।। ओव्या ॥ १०४७॥ ॥ अध्याय तिसावा श्रीगणेशाय नमः ॥ ॥जय जय सद्गुरु अनादी । जय जय सद्गुरु सर्वादी । जय जय सद्गुरु सर्वसिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुया ॥१॥ जय जय वेदाचका । जय जय वेदार्यप्रकाशका । जय जय वेदप्रतिपादका । जय जय वेर्दात्मका वेदज्ञा ॥२॥ जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका । जय जय विश्वनिवासका । अकतात्मका अव्यया ।। ३ ।। तुझी अव्यय अक्षर स्थिती । नाही नाम रूप वर्ण व्यक्ती । तो तूं नादसी जातिगोती । लोकस्थितिव्यवहारें ॥ ४ ॥ तुज जगी नाही दुसरें । तो तू गृहस्थ घरदारें । तू नंपुसक साचोकारें । की स्त्रीपुत्रं नादसी ।। ५ ।। अज आणि बंदिसी पिता । अजन्मा तो नमिसी माता । जगी तुझी सर्वसमता । शेखीं अरिमित्रता चाळिसी ॥६॥ तू जगन्नाथ जगचाळक । केवीं एकाचा होसी सेवक । तूं परिपूर्ण पूर्णात्मक । की मागसी भीक रकत्वे ॥ ७ ॥ तूं नैष्ठिक ब्रह्मचारी । की व्यभिचारें तारिसी नारी। तू सर्वज्ञ गुरूच्या द्वारी । तृणकाष्ठे शिरी स्वयें वाहसी ॥ ८ ॥जो तू कळिकाळातें ग्रासिसी । तो तूं बागुलाभेणे लपसी । तूं मायानियंता हपीकेशी । शेखी माया वाधिर्जशी उखळी ॥९॥ तो तू आत्माराम नित्यतृप्त । शेखीं गोवळीचा खाशी भात । तुझा ब्रह्मादिका न कळे अत । तो तूं उभा रडत यशोदेपाशीं ॥ १० ॥ त्रैलोक्य दाविसी उदरीं । तो तूं गोपिकाचे कडियेवरी । तू जगाचा चाळक श्रीहरी । त्या तुज लेकुरी शिकविजे चार्॥११॥ जो तू सर्ववंद्य सर्वेश्वर । तो तू होसी पाढरा डकर । एव करिता तुझा निर्धार । वेदासी विचार कळेना ॥ १२ ॥ वेदी घेतले महामान । ज्ञाते झाले नेणे कोण । योगी चळघले रानै । तुझें महिमान कळेना ॥ १३ ॥ मुरयत्वे जन्म नाही जाण । तो कृष्ण दावी कैसे मरण । ते ऐकावया निरूपण । परीक्षिति पूर्ण श्रद्धाल ॥१४॥ प्रथमाध्यायी वैराग्यार्थ । मुसळ बोलिले शापयुक्त । तेंचि प्रथावसानी एथ । असे पुसत परीक्षिती ॥ १५॥ १ खत २ पूर्णज्ञानार्ग परफळ ३ सर्वाध ४ चेद वोलणाच्या ५ वेदाचा अप प्रकट करणान्या ६ वेदसरूपा ७ जगदतयामी ८ अविनाशी ९ नानाकुळगोनातून १० स्त्रीपुष्पविरहित स्थितीतील ११ रारोपर १२ जमरहित १३ पाप वसुदेव १४ गोपी १५ सादीपनी गुरूच्या घरी गवताचे भारे व लाकडे खायावर वाहन तू काया भागविलीस १६ यशोदने उसळीला पामर्व १७ गुराख्याचा १८ मुलानी १९, चालायाला २० श्वेतवराहावतारी २१ रानांत जाऊन पसले.