पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/836

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ १८ ॥ जंव कर्तव्याचा अहंभावो । तंव सर्वथा न लभे देवो । अहंपाशी वद्धतेसी ठावो। मुक्तता पहा हो तत्यागें ॥ १९ ॥ नामरूपें एकपण । हेचि माझें अनुष्ठान । तेणे तुष्टला जनार्दन । माझे मीपण तो जाहला ॥ १०२० ॥ जेवीं बाहुल्याचे खेळणें । तेथ रुसणे आणि सतोपणे । हे खेळवित्याचे करणें । बाहुली नेणे तो अर्थ ॥ २१॥ तेवी माझेनि नांवे कविता । करून जनार्दन जाहला वक्ता । यालागी हे अथकथा । साधुसता पंढियंती ॥ २२ ॥ देहअहंता ग्रंथ करिता । एकही वोवी न ये हाता । येथ जनार्दन जाला कर्ता । ग्रंथ ग्रंथार्थी वेणे आला ॥ २३ ॥ देखोनि मराठी गोठी। न ह्मणावी वृथा चावटी । पहावी निजबोधकसवटी । निजात्मदृष्टी सज्जनीं ॥ २४ ॥ सस्कृत वंद्य प्राकृत निद्य । हे बोल काय होती शुद्ध । हाही अभिमानवाद । अहंता अशुद्ध परमाथीं ॥ २५ ।। मोले भूमि खणिता वैगरी । अवचटे अनयरत्न लामे करी । तें रत सांपडल्या केरी । काय चतुरी सांडावे ॥ २६ ॥ तेवीं सस्कृत आटोटी । सहसा परमार्थी नव्हे भेदी । तेचि जोडल्या मराठीसाठी । तेथ घालिती मिठी सज्ञान ॥ २७ ॥ चकोरा चंद्रामृतप्राशन । वायसा पड़े तेथ लंघन । तेवी हा महाराष्ट्र ग्रंथ जाण । फळा फळपण ज्ञान अज्ञानां ॥२८॥ देवासी नाहीं वाचाभिमान । सस्कृत प्राकृत्त त्या समान । ज्या वाणी जाहले ब्रह्मकथन । त्या भापा श्रीकृष्ण सतोपे ॥ २९ ॥ साजुक आणि सुकली । सुवर्णसुमनी नाही चाली। तेवीं सस्कृत प्राकृत बोली । ब्रह्मकथने आली समत्वा ।। १०३० ॥ सस्कृत भापा निंदा केली । तरी ते काय पावन जाहली प्राकृत भापा हरिकथा केली। ते वृथा गेली झणवेना ॥३१॥ जो जो भापाअभिमान | तो तो वत्त्यासी वाधक पूर्ण । ज्या भापा केले ब्रह्मकथन । ते होय पावन हरिचरणीं ॥ ३२॥ माझी मराठी भापा चोखडी । परब्री फळली गाढी । सत सज्जन जाणती गोडी । त्यालागी जोडी जोडिला ग्रंथ ॥ ३३ ॥ हे जनार्दनकवितावाडी । ब्रह्मरसे रसाळ गाढी । जे जनार्दने लाविली गोडी । ते चवी न सोडी प्रथार्थ ॥ ३४ ॥ उद्धवव्याजे स्वयें श्रीकृष्ण । वदला पूर्ण ब्रह्मज्ञान । येणे छेदूनि भवबंधन । दीनजन तरावया ॥ ३५ ॥ तो हा एकादशाऐसा ग्रथ । येथ ठाकठोक परमार्थ । येणे महाकवि समस्त । निजहितार्थ पावले ॥ ३६ ॥ पक्व फळी शुक झेपावे । तेथ मुंगीही रिगमू पावे । तेवीं महाकवींची वैभवे । मीही पावे प्राकृते ॥ ३७॥ महारायांच्या ताटापाशीं । रिगमू नाहीं समासी । तेथे सुखेसी पैसे माशी । तेवी हा आह्मासी प्राकृत ग्रंथ ॥ ३८ ॥ भोजनी धरोनि चापाचा हात । गोड ते आधी, वाळक खात । तेवी महाकवींच्या अनुभवात । प्राकृतें परमार्थ मीही लाभे ॥ ३९ ॥ मी लाभलो सद्गुरुवचन । तैसे हे चालिले निरूपण । बाप कृपाळू जनार्दन । ग्रंथ सपूर्ण तेणे केला ॥ १०४० ॥ ह्मणाल पूर्ण जाहला परमार्थ । पुढे आहे महाअनर्थ । तैसा नन्हे गुरुज्ञानार्थ । स्वयें कृष्णनाथ दावील ॥ ४१ ॥ माता पिता स्त्री पुत्र जन । जाति गोत सुहृद सजन । सकळ कुळासी येता मरण । ममता श्रीकृष्ण कदा न धरी ॥४२॥ कृष्णआज्ञा काळ बंदी माथां । एवढी हाती असता सत्ता । तरी कुळंरक्षणार्थ ममता । श्रीकृष्णनाथा असेना ॥ ४३ ॥ १ अहकार तोडत्यानं २ मद्रूप झाला ३ आवडती ४ प्रथपणाला ५ गोष्ट ६ निषिद्ध ७ रनाच्या खाणीत सहज अमूरम ९ वटवट १० कावळ्याना उपासमार ११ ताजी १२ प्रकार, रीति. १३ रोकडा १४ भाक्रमण करतो । १५ प्रवेश १६ मोठया राजाच्या १७ वशाचे रक्षण कराचे झणून.