________________
७९८ एकनाथी भागवत. सचलें श्रीकृष्ण ॥ ८८० ॥ त्याज्य सगुण पूज्य निर्गुण । हेही दशा आरती जाण । ज्यासी ब्रह्मरूप तृणपापाण । त्यासी त्याज्य सगुण कदा नव्हे ।।८१॥ एवं सगुण आणि निर्गुण । उद्धवासी समसमान । गुरुत्वे कृष्णी प्रेम गहन । तो त्यागिता पूर्ण विव्हळता ॥ ८२ ।। आज्ञा नुल्लंघवे सर्वथा । ह्मणोनि निघावे वदरीतीर्था । तंव श्रीकृष्णासी सांडूनि जातां । परमावस्था उद्धवीं ॥ ८३ ॥ उद्धव प्रयाणअवसरी । लोळणी घाली पायावरी । चरण आलिगी हृदयीं धरी । जावया दूरी धीर नव्हे ॥ ८४ ॥ मज एथोनि गेलिया आतां । मागुती न देखें श्रीकृष्णनाथा । तेणें अनिवार अवस्था । पाऊल सर्वथा न घालवे ॥८५॥ मी निवालों कृष्णचरणामृती । मज चाडं नाही महातीर्थी । त्याहीमाजी अदृष्टगती । अंती श्रीपति त्यागवी ॥ ८६ ॥ सप्रेम चळचळां' कांपत । कंठ जाहला सद्गदित । वा क्षणक्षणा स्फुदत । स्वेदरोमाचित उद्धव ॥ ८७ ॥ गमनालागी अतिउँद्यत । पाया ला. गोनि पन्हा जात । सवेचि येऊनि पायां लागत । विगुंतले चित्त हरिप्रेमीं ॥८८॥ पुढती नमन पुढती गमन । पुढती घाली लोटांगण । पुढती बंदी श्रीकृष्णचरण । सर्वथा जाण निघवेना ॥ ८९॥ देखोनि उद्धवाचा भावो । परमानंदें तुष्टला देवो । यासी माझ्या ठायीं अतिस्नेहो । गुरत्वे पहा हो अनन्य ॥ ८९० ॥ कृपा उपजली यंदुनायका । आपुले घरणींच्या पादुका । उद्धवासी दिधल्या देखा । तेणे निजमस्तका ठेविल्या ॥ ९१ ॥ पादुका ठेवितांचि शिरीं । मी जातो कृष्णापासूनि दूरी । हे नाठवे उद्धवाभीतरी । ऐशियापरी प्रबोधिला ॥ ९२ ॥ पादुका ठेविताचि माथा । स्वयें उपशमे अवस्था । नमस्कारोनि श्रीकृष्णनाथा । होय निघता तदाज्ञा ॥ ९३ ॥ त्रिवार करोनि प्रदक्षिणा । अवलोकून कृष्णवदना । नमस्कारोनि श्रीचरणा । उद्धव कृष्णाज्ञा निघाला ॥ ९४ ॥ तृतीयस्कंधींचें निरूपण । उद्धवासी विदुरदर्शन । दोघां पडिले आलिंगन । कुशल सपूर्ण पुशिले ॥९॥ तेथ सागता कृष्णनिधन । उद्धव नव्हेचि दीनवदन । ते विदुरासी कळले चिह्न । हा ब्रह्मज्ञान पावला ॥ ९६ ॥ मरता गुरु रडैता चेला । दोहीचा वोध वाया गेला । साच मानी जो या बोला । तोही ठकला निश्चित ॥ ९७ ॥ यासी तुटली श्रीकृष्णकृपामूर्ती । निमाली मोहममतावृत्ती । पावला परमानंदप्राप्ती । स्वानंदस्थिती डुलत ॥ ९८ ॥ शब्द नातळोनि बोल बोले । पृथ्वी नातळोनि सहजे चाले । असोनि नामरूपमे । नामरूपा नातळे हा एक ।। ९९ ॥ हा रसेवीण सुरस चाखे । डोळ्यांवीण आपण पैं देखे । इद्रियावीण सोलींव सुखें । निजात्मतोखें हा भोगी ॥९००॥ निर्विकल्पनिजवोधेसी । त्यावरी भक्तिज्ञानवैराग्येसी । स्थिती देखोनि उद्धचापाशी । विदुर मानसीं निवाला ॥१॥ मग तो विनधी उद्धवासी । तुज तुटला हपीकेशी । तू पावलासि ब्रह्मज्ञानासी । त मज उपदेशी सभाग्या ॥२॥ उद्धव ह्मणे। धन्य धन्य । तुज अती सरला श्रीकृष्ण । तुज सांगावया ब्रह्मज्ञान । मैत्रेयासी जाण आज्ञापिलें ॥३॥ कृष्ण मज जरी आज्ञा देता। तरी मी तत्काळ बोध करिता । तुज सद्गुरु परमार्था । जाण सर्वथा मैत्रेय ॥ ४ ॥ ऐकता उद्धवाचे वचन । विदुर गहिवरला पूर्ण । काय बोलिला आपण । सावधान अवधारा॥५॥ १ आलिकडची, पच्ची २ कष्टदशा ३ जाण्याच्या वेळी ४ तृप्त झालों ५ गरज ६ देवगतीनं ७ तयार ८ पलीफडे, दूर ९ श्रीकृष्णाला १० पदेशिला ११ शात झाली १२ कृष्ण निजधामी गेल्याचे वृत्त १३ गुरु मरणधी व राप्य रउवा दोपही अशच. १४ रसनेवाचून १५ आत्मसुखानें १६ स्कष३ अ. ४ श्लोक २६.१५ करतो असतों