Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/829

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७९७ चितन । त्याचे चित्ताचें करी हरि हरण | जो करी हरीचे स्मरण । त्याचा ससार पूर्ण हरि हरी ॥५७॥ ऐशिया हरीच्या ठायीं सर्वदा । पावलियाही मक्तिपदा । उद्धवाची सप्रेम श्रद्धा । बालागी हरिमेधा त्यासी ह्मणती ॥ ५८ ॥ जे पावले गुणातीती । त्यासी आवडे ज्याची भक्ती । तेणें श्रीकृष्णे उद्धवाप्रती । प्रयाण निश्चिती नेमिले ।। ५९ ॥ दूरी प्रयाण बदरिकाश्रम । मागुता न भेटे पुरुषोत्तम । तो प्रयाणकाळउपक्रम । जाहला सप्रेम उद्धवासी ॥ ८६० ॥ सर्वदा सुखदुःखातीत । उद्धव जाहलासे निश्चित । तोही प्रयाणकाळी प्रेमयुक्त । प्रदक्षिणा करीत श्रीकृष्णा ॥ ६१ ॥ चरणी मस्तक ठेविता जाण । आनंदाश्च लोटले नयन । तेणे श्रीकृष्णाचे चरणक्षाळण । जाहले सपूर्ण पदद्वया ॥१२॥ मुदुस्यमहवियोगकातरो न शमुवस्त परिहातुमातुर । कृचा ययो मूर्धनि भर्तृपादुके चित्रनमस्कृत्य ययौ पुन पुन ॥ ४६॥ आणिकाचा स्नेह अतिवाधक । त्याते सांडवी वेदैविवेक । तैसा कृष्णस्नेह नन्हे देख । तो सुखदायक स्नेहालुवा ॥ ६३ ॥ उद्धवासी स्वाभाविक ! गुरु परब्रह्म दोनी एक । इतरासी भावनात्मक । उद्धवासी देस स्वत:सिद्ध ॥ ६४ ॥ ऐसा श्रीकृष्णस्नेहो आवश्यक । उद्धवासी सुसदायक । त्या कृष्णासी साडिता देख । आत्यंतिक विव्हळ ॥६५॥ निःशेप निमाली विपयावस्था । जरी वृद्ध जाहली पतिव्रता । तरी त्यागावा निजभर्ता । है तिशी सर्वथा नायडे ॥६६॥ तेनी अनुभवूनि परमार्था । उद्धव पावला जीवन्मुक्तता। तरी सद्गुरु श्रीकृष्ण त्यागिता । अतिविव्हळता गुरुप्रेमें ।। ६७ ॥ स्नेह द्वेपें संकामसी। जे जे वेधले श्रीकृष्णासी । ते ते पागले परमानदासी । त्या श्रीकृष्णासी त्यजी कोण ॥ ६८॥ अविधी रातले श्रीकृष्णासी । ते बंध जाहले ब्रह्मादिकासी । मा उद्धव विकला गुरुप्रेमासी । केवी श्रीकृष्णासी त्यजील ॥६९॥ज्यासी परब्रह्मत्वे गुरुभक्ती। त्यासी तृणप्राय जीवन्मुक्ती जाहलीही मुक्ति उपेक्षिती । विकिले गुरुभक्ती अनन्यत्वे।।८७०॥डलधूं नये सद्गुरुवचन । करावे वदरिकाश्रमी गमन । श्रीकृष्णप्रेमा पढिये पूर्ण । तो सर्वथा जाण निघों नेदी ॥७॥ ऐसे उभयता अतिसकट । उद्धवा वोढवले दुर्घट। श्रीकृष्णप्रेमें उतरे पोट न देखे वाट बदरीची ॥७२॥ त्यागोनि जावे जरी कृष्णनाथा। तरी हा निजधामा जाईल आता।मगमी न देखें मागुता । यालागी अवस्था अनावर ॥७॥ जलंदनवधनतनु । श्याम राजीवलोचनू। आनंदविग्रही श्रीकृष्णू । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥ ७४ ॥ मुकुटकुंडले मेखळा । तिलक रेखिला पिवळा । पदक एकावळी गळा । कठी तेजागळा कौस्तुभ ॥ ७५ ॥ वाकीअर्दुवाचा गजर । चरणी गर्जत तोडर । विद्युत्माय पीतावर । तेणे शार्ङ्गधर शोभत ॥ ७॥ कासे विराजे सोनसळा । आपाद रुळे वनमाळा । घरघवीत घनसावळा । देखता डोळा जीयू निवे ॥ ७७ ॥ ऐसे श्रीकृष्णदर्शन । पुढती न देखें मी आपण । यालागी उद्धव जाण । प्रेमें सपूर्ण विव्हळ ॥ ७८ ॥ उद्धव पावला परब्रह्म पूर्ण । त्यासी सगुणाची अवस्था कोण । कृष्णमभामकाशे चिद्धन । आत्मवस्तु सपूर्ण श्रीकृष्ण ॥ ७९ ॥ धृत थिजलें का विधुरले। परी घृतपणा नाही मुकले । तेवीं सगुणनिर्गुणत्वे मुसावले । परब्रह्म १हरण करतो २ हरिबुद्धि शुकाचार्य ३ वेदातज्ञान ४ काल्पनिक ५ अतिशय ६ सरली विषयच्उने ८ रत झाले ९ प्राप्त झाली असताही १० फार आवडता ११ भरले १२ स्थिति १३ जलाने पूर्ण भरलेल्या नवन मेधाप्रमाणे श्याम देहाचा १४ कमलनयन १५ भारदमूति १६ पायातील तोडे १७ शोभतो १८ पीतापर १९ पायापर्यत. २० विरघळले २१ एकपटले ।