पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/828

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९६ एकनाथी भागवत. तेंचि उपदेशलक्षण । वाचेसी माझे नामकीर्तन । शरीरी माझे नित्य भजन । मद्रूपी मननिमग्नता ॥ ३५ ॥ ज्ञानी ह्मणतां न धरी श्लाघ । मूर्स ह्मणतां न धरी राग । स्वये रहावे अनुद्वेग । हे दशा चांग ज्ञात्याची ॥३६॥ शिष्य देतील सन्मान । तो नेघे ह्मणतां अपक्कपण । घेतां आला ज्ञानाभिमान । हेही विघ्न ज्ञात्यासी ॥ ३७॥ शिष्य देतील सन्मान । तो अनुद्वेग घ्यावा आपण । परी न धरावा मानाभिमान । हे मुख्य लक्षण ज्ञात्याचे ॥ ३८ ॥ तुज माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती । तेचि एकांती लोकांती । नित्य निरभिमानस्थिती । स्वानंदस्फूर्ती सर्वदा ॥ ३९ ॥ एवं नित्य निरभिमान । भक्तियुक्त वैराग्य ज्ञान । स्वयें आचरोनि आपण । शिष्यसज्जन उपदेशिजे ॥ ८४० ॥ तुज जे शिष्य येती शरण । ते नीच न ह्मणावे आपण । हे गुरुत्वाचे पूर्णपण । शिष्यही पूर्ण पूज्यत्वे देखें ॥४१॥ जेवी तानयालागी माता । तेवी शिष्याचिया निजस्वार्थी । गुरूसी कळवळा तत्त्वतां । शुद्ध सद्गुरुता या नांव ।। ४२ ॥ शिष्यलक्षणप्रकार । मागां सांगितला विचार । तो जेथ देखसी अधिकार । तेथ साचार उपदेशी ॥ ४३ ।। तुज जे शिकविले प्रस्तुत । ते शिष्योपदेशसंग्रहार्थ । तूं ठायींचा गुणातीत । तुज हें समस्त स्पर्शेना ॥ ४४ ॥ अतिव्रज्य गतीस्तित्रो मामेप्यसि सत परम् ॥ १४ ॥ यापरी ज्ञान उपदेशितां । तुझी न मोडे गुणातीतता । ज्यांसी उपदेशिसी तत्त्वतां । तेही त्रिगुणावस्था जिकिती ॥ ४५ ॥ पूर्वोक्त उपदेशयुक्ती । जे शिष्य सर्वदा वर्तती । ते त्रिगुणाची त्रिविध वृत्ती । अतिक्रमिती गुरुकृपा ॥ ४६॥ त्रिगुणाचे त्रिविधपण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । ज्ञेय ज्ञाता ज्ञान साक्षेपें ॥४७॥ कार्य कर्म आणि कर्ता । भोज्य भोजन आणि भोक्ता शत्रु मित्र उदासीनता।या त्रिगुणावस्था बाधक ।। ४८ ॥ तेय येणे उपदेशे जाण । सच्छियी करून माझे भजन । त्रिगुणत्रिपुटी निर्दळून । माझें स्वरूप पूर्ण स्वयें होती ॥४९॥ माझिया स्वरूपाप्रती । नाहीं गुण ना गुणवृत्ती । भक्त मद्भावें गुणातीतीं । सहज पावती स्वानद ।।८५०॥ ऐसा आज्ञापिला उद्धयो । त्याचे अवस्थेचा अभिप्रावो । परीक्षितीप्रती पहा हो । स्वयें शुकदेवो सागत ॥५१॥ श्रीशुक उवाच ॥ स एवमुक्तो हरिमेधसोद्धव प्रदक्षिण त परिमृत्य पादयो । शिरा निधायाश्रुकलाभिराधान्यपिञ्चदद्वन्द्वपरोप्युपकर्म ॥ ४५ ॥ जो निजमो नित्य निष्काम । जेणे अनुभविले परब्रह्म । त्या श्रीशुकासी अतिसंभ्रम । उद्धवाचे प्रेम वर्णावया ॥ ५२ ॥ तो शुक ह्मणे परीक्षिती । उद्धव आज्ञापिला श्रीमती । त्याच्या प्रेमाची अद्भुत स्थिसी । ते मी तुजप्रती सागेन ॥ ५३॥ उद्धव जरी जाहला गुणातीत । तरी गुरुचरणी प्रेम अद्भुत । ज्यासी सद्गुरु श्रीकृष्णनाथ । भूर्तिमंत परब्रह्म ॥ ५४ ॥ त्यजू न शके हरिपदा। हरीचे ठायीं पूर्ण श्रद्धा यालागी जाण हरिमेधा । वोली अंबुद्धा उद्धवातें ॥५५॥ जो आवडी करी हरीचें ध्यान । त्याचे ध्यानेसी हरि हरी मन । जो विवंची हरीचें , समाधान । त्याचे वुद्धीचे हरण हरि करी ॥५६॥ जो करी हरि अभिमान, टोल २ उद्वेगरहित, खम्य ३ उत्स्ट ४ एकातामध्ये व जनसमूहामध्ये ५ सप्रेम ६ माता ७ मूळ्याच शिवणार नाही चीनी गुणाचा अतिमम क्रून राहणे १० अत्यत आवड, पीति ११ हरीचे ठिकाणी ज्याचे अत्यत रेम आणि उद्धिाहे असा उद्धव १२ ज्ञानवत. १३ हरण करी १४ कृष्णसमाधान