पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/826

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. निश्चिती । ऐसे उद्धवा कल्पिसी चित्तीं । मज काय तीर्थी विवंचू ॥ १३ ॥ मोक्षाहीवरील भक्ती । तुवा अर्पिली माझे हातीं । तेणें भी जाहलों अतिकृतार्थी । झणसी मज तीर्थी चांड नाही ॥ ९४ ॥ तुज माझी आज्ञा प्रमाण । अवश्य तेथे करावे गमन । उद्धवें धरोनिया मौन । मस्तकी वचन दिले ॥ १५॥ सदावे करूनि नमन । घेतां बदरिकाश्रमदर्शन । तो नर होय नारायण । एवढे महिमान त्या स्थळाचे ॥९६॥ उद्धवा तुझ्या ठायीं पूर्ण ज्ञान । ज्ञान असोनि माझें भजन । तुझेनि चरणस्पर्श जाण । होईल पावन बदरिकाश्रम ॥ ९७ ॥ ऐसे ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धवासी आले रुदन । धांवोनि वंदिले श्रीचरण । सर्वथा गमन करीन आतां ।। ९८ ॥ ब्रह्मशापाचे निर्दळण । उद्धवाचे चुकवावया जाण । श्रीकृष्णे प्रबोधोनि पूर्ण । करवी गमन बदरिकाश्रमा ॥ ९९ ॥ उद्धव नियाचे ज्ञानरत्त । त्यासी यांचवनि श्रीकपण। विस्तारावया निजज्ञान । करवी गमन बदरिकाश्रमा ।। ८००॥ चुकवावया ब्रह्मशाप दारुण । उद्धवासी विशोळी गमन 1 अन्यथा जाहलिया ब्रह्मज्ञान । कृष्ण तीर्थाटन नेमीना ॥१॥ उद्धवासी भवबंधन । वाळपपीचि नाही जाण । हे जाणोनिया श्रीकृष्ण । ब्रह्मशापामेण तीयो धाडी ॥२॥तीर्थयात्रेचा अभिप्रावो । हाचि निश्चितें निजभावो । जाणोनिया देवाधिदेवो । मोकली उद्धवो बदरिकाश्रमा ॥ ३ ॥ उद्धवा तुज गेलिया तेथ । थोर लोकसग्रह होईल एथ । तुझेनि धर्मे निश्चित । दीन समस्त उद्धरती ॥ ४ ॥ ह्मणसी पावल्या ते तीर्थ । म्या कैसे वसावे तेथ । तेही अर्थी लोकहितार्थ । तुज इत्यर्थ सागेन ॥५॥ उद्धवा तुझें जे आचरण । तोचि जनासी उपदेश जाण । यालागी वैराग्य भक्ति ज्ञान । स्वधर्माचरण सांडूं नको ॥६॥ त्रिभुवनामाजी सर्वथा । उद्धवा मज नाहीं कर्तव्यता । तोही मी लोकसग्रहार्यो । होय वर्तता निजधर्मी ॥ ७ ॥ तूं ऐसे ह्मणसी आता । त्रैलोक्य असे तुझ्या माथा । यालागी लोकसग्रहार्या । तूं होसी वर्तता स्वधर्मकर्मी ॥८॥ मी निजधामा जातों आपण । यालागी माझी स्थिती पूर्ण । ते पूर्णता तुज म्या अपिली जाण । लोकसग्रहार्थ पूर्ण तूं विरक्त होई ॥ ९॥ अभेदभक्ति वैराग्य ज्ञान । स्वयें आचरोनि आपण । देखी लावावे इतर जन । लोकसग्रह जाण या नावे ॥ ८१० ॥ उद्धवा माझिये ज्ञानप्राप्ती । तूं वंद्य जाहलासी त्रिजगतीं । तुझी जे आचरती स्थिसी । तेचि लोकी समस्ती करिजेल ॥११॥ आता तुझेनि "मिस जाण । साडे ती श्लोकीचें निरूपण । लोकसग्रहार्थ सागेन । तैसेचि बर्तन करावे तुवा ॥ १२॥ तुज पावलिया बदरिकाश्रमातें । तेथ विद्यमान बहुत तीर्थे । परी अलकनंदा मुख्य तेथें। जे नाशी दोपात दर्शनमानें ॥ १३ ॥ १ विचार, गरज २ जरूर ३ र ४ घात ५ बदरिकाश्रमास ६ ब्रह्मशापाच्या भवान ७ दवटी, घाटी ८ लोकानी तस वागाव दाणून ज्ञानोबाराय गीताचार सागतात -'देख प्रातार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरला रोकालागाँ ॥ १५५ ॥ मागी अघासरिसा । पुढे देसणाही चाले जैसा । अनाना प्रस्टावा धर्म संसा । आचरोनी }} १५६ ॥ एथ वडिल जे जे करिती । तया नाम धर्म ठेविती । तेचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ ।। १५८ ॥ जे उतपुरता पाया । हे सफळ लोकसम्था । रक्षणीय सवथा । ह्मणऊनिया ॥ १७० ॥'ज्ञानेश्वरी अ०३ ९ एकात्मतेची पदभाक, बैराग्य, घझान, हे आचरून दाखवि झणजे हा कित्ता सामा य जन गिरवू लागतात लोकसंग्रह तो हाच. १. निमित्ता ११ भागीरशी