Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/824

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९२ एकनाथी भागवत. अभिन्न । हेही सद्गुरु प्रबोधी पूर्ण । यालागी मोक्षावरील गुरुभजन । नव्हे दूपण सच्छिप्या ॥ ४९ ॥ मागिलां निजभक्तांप्रती । स्वानंदें तुष्टला श्रीपती । तिही मागीतली निजमुक्ती । त्यांसी हे स्थिती अतयं ॥ ७५० ॥ उद्धवें थोर केली ख्याती । मुक्तीचे मायां पाइली भक्ती । अगम्य मागितली स्थिती । है श्रीपति अर्पित ॥ ५१ ॥ उद्धवा मुक्तीवरील जे भक्ती । ते मज अवतारांची अवतारशकी । येणे उत्पत्ति स्थिति प्रलय अती । करूनि श्रीपति मी अलिप्त ॥ ५२ ॥ येणेचि बळें म्यां तत्त्वतां । कर्मे करूनि मी अकर्ता । भोग भोगोनि अभोक्ता । जाण सर्वथा येणे योगे ॥ ५३ ॥ हा योग न कळे ज्यासी । दुःखरूप ससार त्यासी । हा अखंड योग मजपाशी । मी ससारेंसी सुखरूप ॥ ५४॥ - हा योग सदाशिव जाणे । कां म्या जाणिजे नारायणे । इतराचें जें जाणणे । ते अंगम्यपणे रिघेना ॥ ५५ ॥ ऐसी श्रीकृष्ण सांगे गुह्य गोष्टी । ते स्थिति वाणेली उद्धवाचे पोटीं। दोघा निजवोधें एकगांठी । भजनकसवटी कळो सरली ॥५६॥ मुंक्तीसी भक्तीची हात. वटी । ते उद्धवासी कळली गोष्टी । तो उल्हास न माये पोटी । स्वानदपुष्टी कोदेला ॥५७॥ जेवी वाळकाच्या थायाकारणे । माता लेववी निजभूषणे । तेवी उद्धवालागी श्रीकृष्णे । अँचतारस्थिति देणे निश्चित ॥ ५८ ॥ मनाचे नाइकती कान । बुद्धीचे न देसती नयन । शेसी गगनातेंही चोरुन । उद्धवासी श्रीकृष्ण निजस्थिति अीं ॥ ५९॥ जे ब्रह्मवेत्त्यांसी नाकळे । जे वेर्दानुवादा न कळे । ते स्थिति उद्धवासी गोपाळे । कृपावळे अपिली ॥७६०॥ पूर्वी श्रीकृष्णे पुसता पहा हो । उद्धरलो ह्मणे उद्धवो । आता मागे भजनभावो । हा गूढाभिप्रावो हरि जाणे ॥ ६१॥ मुक्तीवरील मागतां भक्ती । श्रीकृष्णाची अवतारगती। मायानियंतृत्वाची पूर्ण स्थिती । उद्धवाचे हाती स्वयें आली ॥ ६२ ॥ जाणोनि मायेचे मिथ्यात्व पूर्ण । तिचे प्रेरण आणि आवरण । हे मायानियंतृत्वलक्षण । उद्धवासी श्रीकृष्ण स्वयें अपी॥ ६३ ॥ जैसे बुद्धिबळाचे पोटी । पूर्व कर्म नसता गाठीं । राजा प्रधान पशु प्यादा उठी । निर्धारिता दृष्टी काष्ठ एक ॥ ६४ ॥ एकचि काष्ठ "दोही भारी । तेथ कोण कोणाचा वैरी । वैर नसताही झुजारी । मारामारी अचेतना ॥६५॥ ह्मणती हस्ती घोडा प्रधान मेला । तेथ काय त्याचा प्राण गेला । प्यादा होता तो प्रधान जाहला । तो काय पावला गजातलक्ष्मी ॥६६॥ जीव नसता निर्धारीं । मारिले ह्मणती निजगजरी । एका जीत एका हारी । तें ज्ञान सारी नेणती ॥ ६७ ॥ सारी निमाल्यापाठी । कोण धर्मात्मा चहे वैकुंठी । कोण पडे नरकसकटीं । बद्धमुक्तगोठी समूळ मिथ्या ॥ ६८ ॥ एवं बुद्धिवळाचिया परी । ज्यासी निजदृष्टि ससारी । तोचि अवताराचा अवतारी । जाण तो निर्धारी भगवंत ॥ ६९ ॥ समूळ मिथ्या जाणे वेदोक्ती । समूळ मिथ्या जाणे बंधमुक्ती। हे जाणोनि आचरे जो वेदविहिती । तेचि निजभक्ती मुक्तीवरी ॥ ७० ॥ करूनि ससारनिवृत्ती । बहुत पावले नित्यमुक्ती । त्याही हे दुर्गम भक्ती । अतयं स्थिती तर्केना ॥ ७१ ॥ १ नेणवेपणान २ ठसरी ३ मजाची सीमा,कस ४ मुचीशी भक्तीचे ऐक्य ५ व्यापला ६ आळीसाठी ७ निज स्थिति ८ वेदवेदाताला ९उदा मुक्तीवरील भक्ति मागितली तीच श्रीकृष्णाची अवतारशक्ति असून मायानियतृत्वाची Tu हाय ! प्रानातला गूढार्थ फार रम्य व उदात आहे १० प्रत्ति ११ आवरून धरण १२ दोन घाजना १३ मोहरी १४ मेरमावर.