Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/822

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९० एकनाथी भागवत. करूनियां खंडतर । मजलागी स्वतंत्र अर्पिले ॥ ४॥ येणे शस्त्रवळे मी जाण । छेदूं शके जगाचे बंधन । एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वे ॥ ५ ॥ संसार दुःखरूप जो कां एथे। तो सुखरूप जाहला भातें । ऐशिये कृपेचेनि हाते । मज निश्चितें उद्धरिले ॥ ६ ॥ मी कृतकृत्य जाहलो एथें । परी काहीएक मागेन तूतें । ते कृपा करावी श्रीकृष्णनाथे । ह्मणोनि चरणातें लागला ॥ ७ ॥ नमोऽस्तु ते महायोगिन् प्रपनमनुशाधि माम् । यथा स्वचरणाम्मोजे रति स्वादनपायिनी ॥ ४० ॥ न घडे ते घडवी आपण । नाथिले दावी विदान । जित्या मेल्या लावूनि लग्न । नांदवी संपूर्ण निजमाया ॥ ८॥ जे योगियांसी अतिदुस्तर । जिणे नाडिले स्रष्टा शंकर । ते माया तुझी किंकर । तूं परात्पर महायोगी ।। ९ ।। त्या तुझ्या कृपेस्तच जाण । मी कृतकृत्य जाहलो आपण । न देखें भवभयादि दुःखभान । स्वानंदनिमग्न सर्वदा ॥७१० ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं निपुटी नाही गुण । हारपले मीतूंपण । स्वानंदपूर्ण निर्जवोवें ॥११॥ निजबोधे स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण । परादिवांचा पडिले शून्य । यालागी मौन वेदवादा ॥ १२ ॥ कार्य कारण कर्तव्यता । मज उरली नाही सर्वथा । तरी काहीएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आता मागेन ॥ १३ ॥ जेवी का वाळकाचा थाया। कळवळोनि पुरवी माया । तेवीं माझे वचना या । श्रीकृष्णराया अवधारीं ॥ १४ ॥ हें अतींचे माझें मागतेपण । देवे अवधारावे सावधान । वंदनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विदान मागत ॥ १५॥ मज थोर भ्रम होता चित्ती । गोड असेल जीवन्मुक्ती । तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ति मज न लगे ॥ १६ ॥ सद्गुरुकृपावचनोक्ती । शिप्यतत्काळ लाहे मुक्ती । त्या तुज सद्गुरूची राहे भक्ती । जळो ती मुक्ति मज न लगे ॥१७॥ यालागीं तुज शरण । मागुतेन मी आलों जाण । सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देई ॥ १८ ॥मागां बहुती केली भक्ती । झणसी त्यासी म्यां दिधली मुक्ती । परी मुक्तीवरती भक्ती । नाहीं मजप्रती मागितली ॥ १९ ॥ मागां जिही जिही केली भक्ती । त्यासी त्वां ठकविल देअनि मुक्ती ते ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥७२०॥ समत लोक ॥ आत्मारामाश्च मुनयो निग्रन्या अप्युरक्रमे । कुर्यन्त्यहेतुकी भक्तिमित्यभूतगुणो हरि ॥ ज्याची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगती । तेही अहेतुके भक्ति करिती । ऐगी स्वरूपस्थिति पै तुझी ॥ २१॥ तेथ त्यजोनिया तुझी गुरुभक्ती । मुक्ति मागणे हेचि भ्राती । असो तुझी न लगे मुक्ती । तुझी गुरुभक्ती मज देई ॥ २२ ॥ ज्यासी आकळली निजमुक्तता । ह्मणसी त्यासी भक्ति नेवे आतां । हे मजसी बोलो नको कथा । तुझी समर्थता मी जाणे ॥ २३ ॥तूं न घडे ते घडविसी । न चळे ते चाळविसी ।नव्हे ते तूं होय करिसी । नाहीं सामर्थ्यासी मर्यादा ॥ २४ ॥ अगम्य सामथ्याची गणना । बुडत्या तारूनि पापाणा । त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुबंधना श्रीरामा ॥२५॥ .१चरतर, फार तीक्ष्ण २ भलते ३ अजय करणी, चमनार ४ चैतन्य व जड देह याच लम, चिनदनधी ५ ब्रह्म६२६ दासी ७ उर्वश्रेष्ठ ८ स्वरुपज्ञाना7 ९ मिथ्या १० परादि चारी वाचाची गती तुटली ११६४, लडिवाळपणाचे माग पुरपि १३ सागितली १४पसवेगिरी १५ स्वस्वरूपी रमणारे. १६ निष्काम भक्ति १७ माझी. १८ सापीन शारी १९ देवपत नादी