पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/821

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७९१ केवळ जे कां वनचर । पालेसाईर वानर । चारी मुक्ती त्यांच्या किंकर । त्यासी सुरवर चंदिती स्वयें ॥ २६ ॥ केवळ जे का व्यभिचारिणी । शेखी ज्या धुरंटा गौळणी । मोक्ष लागे त्याच्या चरणी । ये ब्रह्मा लोटांगणी चरणरजासी ।। २७ ।। तूं परमात्मा परमेश्वर। हे नेणती गौळणी वानर । तरी तुझें त्यासी भजनमात्र । फळले साचार परब्रह्मत्वे ॥२८॥ ऐसे अगाध तुझें भजन । अगम्य भजनाचे महिमान । भक्तिअधीन तुझें देवपण । मा मोक्षासी कोण अधिकाई ॥ २९ ॥ भक्तीच्या पोटी जन्मली मुक्ती । बाढली मुक्ती भक्तीतें घाती। ऐसीजे का मुक्ति मातहती । तिसी भी सर्वार्थी नातळे ॥ ७३० ॥ फिटे मुक्तीचे दूपण । जेण ते होय अतिपावन । ते मी सागेन विदान । ऐक सामधान श्रीकृष्णा ॥ ३१ ॥ जोडल्याही मुक्तपण ! मज द्यावे तुझें गुरुभजन । तेणे मुक्तिही होय पावन । हाणोनि लोटागण घातले ॥३२॥ मस्तकी धरिले श्रीचरण । उद्धव सर्वथा न सोडी जाण । तेणे ठकांच जाहला श्रीकृष्ण । त्यासी सपूर्ण तुष्टला ।। ३३ ।। जाणोनि आपुले मुक्तपण | मी न सांडी तुझें निजभजन । ऐशी कृपा करी पूर्ण । ह्मणोनि श्रीचरण न सोडी ॥३४॥ मुक्तता मानल्या सपूर्ण । ते राहो न शके सद्गुरुभजन । हेही वाचो न शके विघ्न । तैशी भक्ति निर्विघ्न मज साग ॥३५ ।। कोटिजन्में शिणता जाण । ह्मणसी नातुडे मुक्तपण । त्या मोक्षा नाव ठेविसी विघ्न । मूखे सपूर्ण मज हाणसी ॥३६॥ जेणे सुटे तुझ सद्गुरुभजन । ते मी मानी परम विघ्न । तुझे भक्तिीण मुक्तपण । अलवणी अज जाण गोविदा ।। ३७ ।। माझी न मोडे नित्यमुक्तता । अहेतुक चालवी भक्तिपथा। ऐसी कृपा करीं श्रीकृष्णनाथा । झणी सकोचता मानिसी ॥ ३८ ॥ ह्मणसी म्यां दिधली नित्यमुक्ती । ते माझी मजपाशी सिद्ध होती। दिधली ह्मणा हे मिथ्या वदंती । वाउगी ख्याती दातृत्वाची ।। ३९ ॥ माझी खत सिद्ध नित्यमुक्तता । त्यावरी भक्ति मी मागें आता। ते देशील तरी तू साचार दाता । उदारता या नाव ।। ७४० ॥ ते सतोपोनि भक्ति देता। उल्हास न देसों तुझ्या चित्ता । थोर माडली कृपणता । कृष्णनाथा मजलागीं ॥४१ ।। जे साडवी सद्गुल्मकी । आमा न लगे तुझी जीवन्मुक्ती । मुक्ति ह्मणणे हेही भ्राती। ऐक श्रीपति सागेन ।। ४२ ।। मुळीच मुख्य नाही बद्धता । तेथ केची काढिली मुक्तता। मिथ्या मुक्ति नातळे सर्वया । माझी गुरुभक्तता मज देई ।। ४३ ।। मार्ग ज्यासी रवा दिधली मुक्ती । ते 'निले ठकिले याच रीती । तैसे चाळवू नको श्रीपती । मोक्षावरील भक्ती मज देई ॥४४॥ ह्मणोनि घातले लोटागण । धावोनि धरिले दोनी चरण । प्रेमें बोसडला श्रीकृष्ण । उहवासी सपूर्ण तुष्टला ॥ ४५ ॥ मोक्षाहीवरील गुरुभक्ती । उद्धव मागीतली नाना युक्ती । जे जे चालली उपपत्ती । तेणे सुखें श्रीपति सुखावला ॥४६॥ सुखे सुसावली कृष्णमूर्ती । डोलो लागला स्वानंद स्थिती । तेणे सतोपें भक्तिमुक्ती । उद्धवाहाती अपिली ॥ ४७ ॥ जगी उद्धवाचे शुद्ध पुण्य । जगी उद्धवाची धन्य धन्य । ज्यालागी सर्वस्वे श्रीकृष्ण । मोक्षावरील गुरुभजन स्वानंदें देत ॥ ४८ ॥ गुरु ब्रह्म दोनी २३. १झाडपाला खाणार, अगली २ गावडळ, गोरमाने दुवासित ३ अतपारराहत खोल ४ तरमग ५ मारी, पात करी ६ युक्ति, उपाय ७ अवयवरित ८ सापडत नाहीं ९आळणी, बेचन, मिठावाचून अन तसें १० निष्काम ११ कीर्ति, वाणी १२ फसले गेले १३ ज्ञानोत्तरभक्ति १४ भरून वाहू लागला १५ युकाचे बोल १६ वाहा