पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/820

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. करूनियां संडतर । मजलागीं स्वतंत्र अर्पिलें ॥ ४ ॥ येणे शस्त्रवळे मी जाण । छेदूं शर्के जगाचे बंधन । एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वे ॥५॥ ससार दुःखरूप जो कां एथे । तो सुखरूप जाहला मातें । ऐशिये कृपेचेनि हातें । मज निश्चितें उद्धरिले ॥ ६॥ मी कृतकृत्य जाहलों एथें । परी काहीएक मागेन तूते । ते कृपा करावी श्रीकृष्णनाथें । ह्मणोनि चरणातें लागला ॥७॥ ___ नमोऽस्तु ते महायोगिन् भपन्नमनुशाधि माम् । यथा त्वचरणाम्भोजे रति स्यादनपायिनी ॥ ५० ॥ न घडे ते घडवी आपण । नाथिले दावी विदीन । जित्या मेल्या लावूनि लग्नं । नांदवी संपूर्ण निजमाया ॥८॥ जे योगियांसी अतिदुस्तर । जिणें नाडिले चेष्टा शंकर । ते माया तुझी किंकर । तूं परात्पर महायोगी ॥ ९॥ त्या तुझ्या कृपेस्तव जाण । मी कृतकृत्य जाहलो आपण । न देखें भवभयादि दुःखभान । स्वानंदनिमम सर्वदा ॥ ७१० ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं त्रिपुटी नाही गुण । हारपले मीतूंपण । स्वानंदपूर्ण निर्जबोधे ॥ ११॥ निजबोधे स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण । परादियाचा पडिलें शून्य । यालागी मौन वेदवादा ॥ १२ ॥ कार्य कारण कर्तव्यता । मज उरली नाही सर्वथा । तरी काहीएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आतां मागेन ॥ १३ ॥ जेवीं का वाळकाचा थाया। कळवळोनि पुरवी माया । तेवी माझे वचना या । श्रीकृष्णराया अवधारी ॥ १४ ॥ हें अतींचे माझें मागतेपण । देवे अवधारावे सावधान । वंदूनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विंदान मागत ॥ १५॥ मज थोर भ्रम होता चित्तीं । गोड असेल जीवन्मुक्ती । तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ति मज न लगे ॥ १६ ॥ सद्गुरुकृपावचनोक्ती । शिष्यतत्काळ लाहे मुक्ती । त्या तुज सद्गुरूची राहे भक्ती । जळो ती मुक्ति मज न लगे ॥१७॥ यालागी तुज शरण । मागुतेन मी आलो जाण । सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देई ॥ १८ ॥ मागा बहुती केली भक्ती । ह्मणसी त्यांसी भ्यां दिधली मुक्ती । परी मुक्तीवरती भकी । नाहीं मजप्रती मागितली ॥ १९ ॥ मागा जिहीं जिही केली भक्ती । त्यासी त्वां ठकविले देऊनि मुक्ती । ते ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥७२०॥ समतश्लोक ॥ आरमारामाश्च मुनयो निम्रन्या अप्युरमे । कुर्यन्त्यहैतुर्की भक्तिमिस्थभूतगुणो हरि ॥ ज्यांची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगती । तेही अहेतुक भक्ति करिती । ऐशी स्वरूपस्थिति पैं तुझी ॥ २१॥ तेथ त्यजोनिया तुझी गुरुभकी । मुक्ति मागणे हेचि भ्राती । असो तुझी न लगे मुक्ती । तुझी गुरुभक्ती मज देई ॥ २२ ॥ ज्यासी आकळली निजमुक्तता । ह्मणसी त्यासी भक्ति नेदवे आता । हे मजसी वाला नको कथा । तुझी समर्थता मी जाणे ॥ २३ ॥ तू न घडे ते घडविसी । न चळे ते चाळविसी । नव्हे ते तू होय करिसी । नाहीं सामर्थ्यासी मर्यादा ॥ २४ ॥ अगम्य सामर्थ्याची गणना ।वुडत्या तारूनि पापाणां । त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुवधना श्रीरामा ॥२५॥ १ सरतर, पार तीक्ष्ण २ भलते ३ अजय करणी, चमत्कार ४ चैतन्य व जड देह याच लम, चिजडग्रथा ५ब्रह्मएवं ६ दासी ७ सयट सहरूपज्ञानात ९ मिष्या १० परादि चारी वाचाची गती सुटली ११ हह, लडिवाळपणाचे माग्यो १२ पुरपि १३ सांगितली १४ परावेगिरी १५ स्खलरूपी रमणारे. १६ प्किाम भक्ति १७ माझी. १० म्यापारी १५देवरत नाही