________________
अध्याय एकोणतिसावा. ७९१ केवळ जे कां वनचर । पालेसाईर वानर । चारी मुक्ती त्याच्या किंकर । त्यांसी सुरवर चंदिती स्वयें ॥ २६ ॥ केवळ जे कां व्यभिचारिणी । शेखी ज्या धुरंटा गौळणी । मोक्ष लागे त्याच्या चरणीं । ये ब्रह्मा लोटागणी चरणरजासी ॥ २७ ॥ तूं परमात्मा परमेश्वर । हे नेणती गौळणी वानर । तरी तुझे त्यासी भजनमात्र । फळले साचार परबहावें ॥२८॥ ऐसे अगाध तुझें भजन । अगम्य भजनाचे महिमान । भक्तिअधीन तुझें देवपण । मा मोक्षासी कोण अधिकाई ॥ २९ ॥ भक्तीच्या पोटी जन्मली मुक्ती वाढली मुक्ती भक्तीते घौती। ऐसी जे का मुक्ति मातृहती । तिसी मी सर्वार्थी नातळे ।। ७३० 1 फिटे मुक्तीचे दूपण | जेणे ते होय अतिपावन । ते मी सागेन विदीन । ऐक साबधान श्रीकृष्णा ॥३१॥ जोडल्याही मुक्तपण । मज द्यावें तुझें गुरुभजन । तेणे मुक्तिही होय पावन । हाणोनि लोटागण घातले ॥ ३२ ॥ मस्तकी धरिले श्रीचरण । उद्धव सर्वथा न सोडी जाण । तेणे ठकाच जाहला श्रीकृष्ण । त्यासी सपूर्ण तुष्टला ॥ ३३ ॥ जाणोनि आयुले मुक्तपण । मी न साडी तुझें निजभजन । ऐशी कृपा करी पूर्ण । ह्मणोनि श्रीचरण न सोडी ॥३४॥ मुकता मानल्या सपूर्ण । ते राहो न शके सद्गुरुभजन । हेही वावो न शके विघ्न । तैशी भक्ति निर्विघ्न मज साग ॥ ३५ ॥ कोटिजन्में शिणता जाण । हाणसी नातुडे मुक्तपण । त्या मोक्षा नाव ठेविसी विघ्न । मूर्ख सपूर्ण मज ह्मणसी ॥ ३६ ॥ जेणे सुटे तुझ सद्गुरुभजन । ते मी मानी परम विन्न । तुझे भक्तिवीण मुक्तपण । अलवणी मज जाण गोरिदा ।। ७ ।। माझी न मोडे नित्यमुकता । अहेतुक चालवी भक्तिपंथा। ऐसी कृपा करीं श्रीकृष्णनाथा । झणीं सकोचता मालिसी ॥ ३८ ॥ हाणसी म्या दिधली नित्यमुक्ती । ते माझी मजपाशी सिद्ध होती । दिधली ह्मणा हे मिथ्या वदंती । बारगी ख्याती दातृत्वाची ॥ ३९ ॥ माझी स्वत सिद्ध नित्यमुक्तता । त्यावरी भक्ति मी मागें आता। ते देशील तरी तंसाचार दाता । उदारता या नाच ॥७४०॥ते सतोपोनि भक्ति देता। उल्हास न देखों तुझ्या चित्ता । थोर माडली कृपणता । कृष्णनाथा मजलागी ॥४१॥ जे साड़वी सद्गुरुभक्ती । आमा न लगे तुझी जीवन्मुक्ती । मुक्ति मणणे हेही भ्रांती। ऐक श्रीपति सागेन ॥ ४२ ॥ मुळीच मुख्य नाही चद्धता । तेय कैची काहिली मुक्तता। मिथ्या मुक्ति नासळे सर्वथा । माझी गुरुभक्तता मज देई ॥४३॥ मागें ज्याकी वा दिधली मुक्ती । ते 'किले ठकिले याच रीती । तैसे चाळचू नको श्रीपती । मोक्षावरील भक्ती मज देई ॥४४॥ ह्मणोनि घातले लोटागण । धावोनि धरिले दोनी चरण । में वोसडला श्रीकृष्ण । उद्धवासी सपूर्ण तुटला ॥ ४५ ॥ मोक्षाहीवरील गुरुभकी । उद्धव मागीतली नाना युक्ती । जे जे चालली उपपत्ती । तेणे सुखें श्रीपति सुखावला ॥ ४६॥ सुखें सुखावली कृष्णमूर्ती । डोलो लागला स्वानंदस्थिती । तेणें सतो भक्तिमुक्ती । उद्धवाहाती अर्पिली ।। ४७ ॥ जगी उद्धवाचे शुद्ध पुण्य । जगी उद्धवाची धन्य धन्य । ज्यालागी सर्वस्वे श्रीकृष्ण । मोक्षावरील गुरुभजन स्वानदे देत ।। ४८ ॥ गुरु ब्रह्मा दोनी १ झाडपाला पाणारे, जगली २ गावडळ, गोरमाने दुर्वामिन ३ उतपाररदित सोल ४ तरमग ५ मारी, पात करी ६ युति, उपाय ७ भाचर्यचक्ति ८ सापडत नाही आळणी, बेचव, मिठादांचून अम त १० निष्काम १५ कीर्ति, वाणी १२ फसले गेले १३ ज्ञानोत्तरभफि १४ भरून वाहू लागला १५ युकीचे पोल १६ वाहवा