पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/818

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. करूनियां खडतर । मजलागी स्वतंत्र अर्पिले ॥ ४॥ येणे शस्त्रवळे मी जाण । छेदूंग जगाचे बंधन । एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वे ॥५॥ ससार दुःखरूप जो का एथे । तो सुखरूप जाहला माते । ऐशिये कृपेचेनि हातें । मज निश्चितें उद्धरिले ॥ ६॥ मी कृतकृत्य जाहलो एथें । परी काहीएक मागेन तूते । ते कृपा करावी श्रीकृष्णनाथें । ह्मणोनि चरणातें लागला ॥ ७ ॥ __ नमोऽस्तु महायोगिन् अपसमनुशाधि माम् । यथा त्वचरणाम्भोजे रति स्थादनपायिनी ॥ ५० ॥ न घडे ते घडवी आपण । नाथिले दावी विदान । र्जित्या मेल्या लावूनि लग्न । नांदवी संपूर्ण निजमाया ॥ ८॥ जे योगियांसी अतिदुस्तर । जिणे नाडिले चेष्टा शंकर । ते माया तुझी किकर । तूं परात्पर महायोगी ॥९॥ त्या तुझ्या कृपेस्तव जाण । मी कृतकृत्य जाहलों आपण । न देखें भवभयादि दुःसभान । स्वानंदनिमग्न सर्वदा ॥ ७१० ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं त्रिपुटी नाही गुण । हारपले मीतूंपण । स्वानंदपूर्ण निर्जयो) ॥११॥ निजबोधे स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण । परादिवाचां पडिले शून्य । यालागी मौन वेदवादां ॥ १२ ॥ कार्य कारण कर्तव्यता । मज उरली नाहीं सर्वथा । तरी काहीएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आता मागेन ॥ १३ ॥ जेवीं का बाळकाचा थाया। कळवळोनि पुरवी माया । तेवी माझे वचना या । श्रीकृष्णराया अवधारीं ॥ १४ ॥ हें अतींचे माझे मागतेपण । देवे अवधारावे सावधान । वंदनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विंदान मागत ।। १५ ॥ मज थोर श्रम होता चित्ती । गोड असेल जीवन्मुक्ती । तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ति मज न लगे ॥ १६ ॥ सद्गुरुकृपावचनोती। शिष्यतत्काळ लाहे मुक्ती । त्या तुज सद्गुरूची राहे भक्ती । जळो ती मुक्ति मज न लगे ॥१७॥ यालागी तुज शरण । मागुतेन मी आलों जाण । सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देई ॥ १८॥ मागा वहुती केली भक्ती । ह्मणसी त्यासी म्या दिधली मुक्ती । परी मुक्तीवरती भक्ती । नाही मजमती मागितली ॥ १९॥ मागा जिही जिंहीं केली भक्ती । त्यासी त्वा ठकविले देऊनि मुक्ती ते ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥७२०॥ समतश्लोक ॥ आरमारामाच सुनयो निर्मन्या अप्युरक्रमे । कुर्वन्त्यहेतुकी भक्तिमित्यभूनगुणो हरि ॥ ज्याची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगती । तेही अहेतुक भक्ति करिती । ऐशी स्वरूपस्थिति पै तुझी ॥ २१॥ तेथ त्यजोनियां तुझी गुरुभक्ती । मुक्ति मागणे हेचि भ्राती । असो तुझी न लगे मुक्ती । तुझी गुरुभक्ती मज देई ॥ २२ ॥ ज्यासी आकळली निजमुक्तता । ह्मणसी त्यासी भक्ति नेर्दवे आता । हे मजसी बोलो नको कथा । तुझी समर्थता मी जाणे ॥ २३ ॥ तूं न घडे ते घडविसी । न चळे ते चाळविसी । नव्हे ते तू होय करिसी । नाहीं सामर्थ्यासी मर्यादा ॥ २४ ॥ अगम्य सामर्थ्यांची गणना | बुडत्या तारूनि पापाणा । त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुबंधना श्रीरामा ॥२५॥ पसरतर, फार तीक्ष्ण २ भलतें ३ अजय करणी, चमत्कार ४ चैतन्य व जड देह याचे रम, चिजडप्रथी ५ब्रह्मदेव ६ दासी ७ सर्वश्रेष्ठ ८ सहरूपक्षानाने ९ मिश्या १० परादि चारी बायाची गती खुरली ११ हह, लडिवाळपणाचें मागणं १२ पुनरपि १३ सागितली १४ फरावेगिरी, १५ सखरूपी रमणारे १६ निमाम भक्ति १७ माझी १८ खापान शाली १९देववत नाही