Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा भागवतांमाजी वरिष्ठ । त्यासी उत्तमत्वाचा पाट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥४५॥ तो योगि यांमाजी अग्रगणी । तो ज्ञानियाचा शिरोमणी । तो सिद्धांमाजी मुगुटमणी । हे चक्रपाणी बोलिला ॥ ४६॥ जैगा घृताचिया कणिका । घृतेसी नन्हेति आणिका । तेवीं भूत भौतिक व्यापैका । भिन्न देखा कदा नव्हती ॥४७॥ हे उत्तम भक्ताची निजस्थिती । राया जाणावी निश्चितीं । आतां मध्यम भक्त कैसे भजती । त्याची भजनगती ऐक राया ॥४८ ॥ - ईश्वर तदधीनेषु बारिशेपु द्विपरसु च । प्रेम मेत्री कृपोपेक्षा य करोति स मध्यम ॥ ४६॥ ईश्वर मानी उत्तमोत्तम । तदक्त मानी मध्यम । अज्ञान ते मानी अधम । द्वेपी ते परम पापी मानी ॥ ४९ ॥ ईश्वरी प्रेम पवित्र । भक्तासी मैत्री मात्र । अज्ञानी तो कृपापात्र । उपेक्षा निरतर द्वेपियाची ॥ ६५० ॥ हे मध्यम भक्ताची भक्ती । राया जाण ऐशा रीती । आतां माकृत भक्ताची स्थिती । तेही तुजप्रती सागेन ॥५१॥ अर्चायामेव हरये पूजा य श्रद्धयेहते । न तमक्तेपु चान्येषु स भक्त प्राकृत स्मृत ॥ ४७ ॥ पापाणप्रतिमा हाचि देवो । तेयेचि ज्याचा पूर्ण भावो । भक्तसज्जनासी पहावो । अणुमात्र देहो लवी नेदी ॥५२॥ ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण । त्यासी स्वप्नीही नाही सन्मान । यापरी भजन प्राकृताचे ॥ ५३ ॥ ऐशिया स्थिती जो जड भक्त । तो जाणावा मुख्य प्राकृतू । प्रतिमाभगें अतू । मानी निश्चितू देयाचा ॥५४॥ यापरी त्रिविध भक्त । सागितले भजनयुक्त । परी उत्तमाची लक्षणे अद्भुत । ती सागावया चित्त उदित माझे ॥ ५५ ॥ गृहीत्यापीदियैरों यो न द्वेष्टि न हप्यति । विष्णोर्मायामिद पश्यन् स वै भागवतोत्तम ॥ ८ ॥ इद्रिये विपयांते सेविती । परी सुखदुःख नुमंटे चित्तीं । विपय मिथ्यात्वे देसती । ते जाण निश्चिती उत्तम भक्त ॥५६॥ मृगजळी जेणे केले स्नान । तो नाहता कोरडाचि जाण । तेवी भोगी ज्यासी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ।। ५७॥ उत्तम भक्त विषय सेविती। हा चोलु रूढला प्राकृताप्रती । त्यासी निपयीं नाहीं विपयस्फूती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥५८ ॥ स्वप्नीचे केळे रायभोगे । जागा होऊनि सावों भागे । तेणे हातु माखे ना तोडी लागे । तेवीं विषयसमें हरिभक्त ॥ ५९॥ येथवरी मिथ्या विषयभान।तरी सेवायया त्यासी काय कारण । येय प्रारब्ध बळी पूर्ण । ते अवश्य जाण भोगवी ॥६६०॥परी मी एक विषयभोका । ही स्वप्नीही त्यास नुमटे कथा । यालागी उत्तम भागवतता । त्यासीच तत्वता बाणली ॥६१॥ यापरी विषयासक्ती । चतिजे उत्तम भक्ती । याहुनि अगाध स्थिती । सागेन तुजप्रती ते ऐक ।। ६२॥ देहेंद्रियमाणमनोधिया योजमाप्ययामयसपारे । मसारधर्मरविमुखमा स्मृस्या हरेभागवत्तमभान ॥४॥ देहेंद्रियमनोवुद्धि प्राण । हंचि वधाचे पंचायतन । क्षुधा तृपा भय सेवा पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥६॥या पाचा स्थानी अपार श्रम ! या नाव हाणिजे ससारधर्म । निजभत्ता प्रसन्न आत्माराम । त्यासी भरभ्रम स्वीही नाही ॥६४॥ क्षुधा लागलिया दारण। जनआकाक्षे पीडे पाण| भका क्षुधेची नव्हे आठवण । ऐसे अगाध स्मरण हरीचें ॥६५॥ १ मानाचे मुरय आसन २ सम्या ३ शरीररिपसादिक ४ गतपरनाम्पाहा भूतभौतिक मजे में में सुरक्षा त मिन नाही ५ पापरत्र ६ अज्ञान ७ मूर्ती रानास ताला असता तर, उनकपम होत नाही १. पांच स्थाी १५ अपाच्या इच्छेन -