Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ एकनाथी भागवत भावें करितां भगवद्भक्ती । क्षुधेतृपेची नव्हे स्फूर्ती । एवढी पावले अगाध प्रीती । ते भवभयें निश्चिती डंडळतीना ।। ६६ ।। मनामाजी भवभयभरणी । ते मन रोतलें हरिचरणीं । आता भयाने तेथ कोण मानी । मन मनपणी असेना ॥६७॥ मनी स्फुरे द्वैताची स्फूती । तेथ भवभयाची दृढ स्थिती । ते मनी जाहली हरीची वस्ती । यालागी भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ।। ६८ ॥ देहबुद्धीमाजी जाणा । नानापरी उठती तृष्णा । ते बुद्धी निश्चयें हरीच्या स्मरणा । करिता परिपूर्णा विनटैली स्वयें ।। ६९ ॥ जेथे जे जे स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण । तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे सपूर्ण पूर्णामाजी ॥ ६७० ॥ यापरी गा तृप्णारहित । हरिस्मरणे भगवद्भक्त । इंद्रियलेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥ ७१ ॥ मुख्य कष्टाचे अधिष्ठान । इंद्रियकर्मी राया जाण । ते इंद्रियकर्मी ब्रह्मस्फुरण । हरिभक्तां पूर्ण हरिभजने ॥ ७२ ॥ दृष्टीने घेऊ जाता दर्शन । दृग्यमानी प्रगटे नारायण । श्रवणी शब्द घेतां जाण । शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तु ॥ ७३ ॥ वाणी घेतां नाना वासु । वासवोधे प्रगटे परेशु । रसना सेवी जो जो रसु । रसी ब्रह्मरसु निजस्वा प्रगटे ।। ७४ ।। देही लागता शीतोष्ण । अथवा का मृदु कठिण । तेणे स्पर्शज्ञाने जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें ।। ७५ ॥ आतां कमेद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती । घेणे देणे गमनस्थिती। इंद्रियां गती आत्मारामें ॥७६॥ ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टी होय निजसुख प्रगट । तेणे इंद्रिया विश्रांती चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ।। ७७ ॥ जेणे इंद्रियां कष्ट होती । तेणेचि इंद्रियां सुखप्राप्ती। हे भगवदजनीं नित्ययुक्ती । भोगिजे हरिभजन ।। ७८॥ जन्म आणि मरण । हे देहाचे माथां जाण । भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरूप जाले ॥ ७९ ॥ यालागी देहीची अहंता । कदा नुपजे भगवद्भक्तां । ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सागेन ॥ ६८० ॥ देह धरिला पचानने ।भक्त न डंडीकी जीवे प्राणे। बंध्यापुत्रु सुळी देणे । देहाचे मरण तेवी देखे ॥८१॥ छाया पालखी वैसावी । ऐसे कोणी चितीना जीवी । तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी स्वभाव लोभ भक्तां ॥८२॥ देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तो खेदू नुमटे चिता । जेवीं आकाश शस्त्रघाती।न ये काकुळती तसे ते ॥ ८३ ॥ जननीजठरी देहो जन्मला । भक्तु न ह्मणे मी जन्मा आला । रवि थिल्लरी प्रतिविवला । बिल्लर मी जाहला कदा न ह्मणे ।। ८४ ॥ सायंप्रात. सूर्य प्रकाशे। अधी गंधर्वनगर आभासे । देहप्रतिपाळी अदृष्ट तैसे । म्या केले ऐसे स्फुरेना ॥ ८५ ॥ भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचे स्मरण । यालागी देह निमाल्या आपण । न मरता पूर्ण पूर्णत्वे उरे ॥८६॥ थिल्लरा समूळ नाशु जाला । तरी रवि न ह्मणे मी निमाला । तेची देहो गेलिया भक्त उरला । सद्भूपें सचला हरिस्मरणे ॥८७॥ आधी काय सर्प मारावा । मग दोराते दोरू करावा । तो न पालटता निजगौरवा । दोरूचि अवघा दोररूपें ॥ ८८ ॥ तेवी हरिभक्तां देहाचा अभावो । मा काळ कवणा घालील घावो । आतां आली ते आमीच आहो । आमीपण वायो आमुचेनि आह्मां ।। ८९ ॥ इत्यादि ससारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म । मोहो कदा नव्हेच भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वे १ उमस्त नाहीत. २ रमः ३ जडली ४ जेवढें दिमतें सात ५ परमेश्वर ६ पाण्याच्या डबक्यात ७ सन्चरला