________________
७७४ एकनाथी भागवत. हारपे तेथें । देखे सभोवतें परब्रह्म ॥ ३६० ॥ परब्रह्म देखती वृत्ती । तेही विरे ब्रह्माआंतौती । जेवीं धृतकणिका घृती । होय सुनिश्चितीं घृतरूप ॥ ६१॥ तेव्हां ब्रह्मचि परिपूर्ण । हेही स्फूर्ति नुरे जाण । गिळूनियां मीतूंपण । ब्रह्मीं ब्रह्मपण अहेतुक ॥६२ ॥ तेथें हेतू मातु दृष्टातू । खुंटला वेदेसी शास्त्रा५ । हारपला देवभक्तू । अखंड वस्तू अद्वयत्त्वे ॥६३ ॥ गेलिया दोराचे सापपण । दोर दोररूपें परिपूर्ण । हो का भासताही सापपण । दोरी दोरपण अनसुट ।। ६४ ॥ तेवी प्रपंच सकारण । गेलिया ब्रह्मचि परिपूर्ण । का दिसतांही प्रपंचाचे भान । ब्रह्मीं ब्रह्मपण अनुच्छिष्ट ॥ ६५ ॥ याचिलागी सर्व भूती । करितां माझी भगवद्भक्ती । एवढी साधकांसी प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ।। ६६॥ तत्काळ पावावया ब्रह्म पूर्ण । सांडूनिया दोषगुण । सर्व भूती भगवद्भजन । हेंचि साधन मुख्यत्वे ।। ६७ ॥ याही साधनावरते । आणिक साधन नाही सरते । हेचि परम साधन येयें। मजही निश्चिते मानले ॥ ६८॥ अय हि सर्पकरपाना सधीचीनो मतो मम । मद्भाव सर्वभूतेषु मनोवाकायर्कर्मभि ॥ १९ ॥ सर्व भूती भगवदृष्टी । हेंचि भांडवल माझे गांठी । येणे भांडवले कल्पकोटी । करोनि सृष्टी मी अकर्ता ॥ ६९ ॥ मज पाहता निजात्मपुष्टी । सर्व भूती भगवदृष्टी । हेचि भक्ति माझी गोमटी । ब्रह्माडकोटी तारक ॥ ३७० ॥ हेचि भक्ति म्यां कल्पादी । सर्व भूती भगवदुद्धी । नाभिकमळी त्रिशुद्धी । ब्रह्मा या विधी उपदेशिला ॥ ७१॥ व्रत तप करिता दान । योग याग करिता ध्यान । वेदशास्त्रार्थे साधिता ज्ञान । माझ्या भक्तिसमान ते नव्हती ॥ ७२ ॥ नाना साधनाचिया कोटी । साधी साधिता आटाटी । माझ्या प्रेमाची नातुडे गोठी । मतभेटीवाचूनी ।। ७३ ।। माझिया भक्काचिये सगती । साधका लाभे माझी भक्ती । अभेदभजने माझी प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ।। ७४ ॥ सर्व भूती भगवद्भजन । करी ते ऐक पा लक्षण । विषमे भूते देखता जाण । मनीं भाव परिपूर्ण ब्रह्मत्वे ॥ ७५ ॥ दुष्ट दुरात्मा अनोळख । नष्ट चाडाळ अनामिक । तेथही ब्रह्मभाव चोख । हैं मानसिक निजभजन ।। ७६ ॥ भूती भगवत परिपूर्ण । ऐसे जाणोनि आपण । भूतासी लागे अतिदारुण । ते कठिण वचन वोलेना ।। ७७ ॥ तेथें जातांही निजप्राण । भूताचे न बोलवे दोपगुण । या नाव गा वाचिक भजन । उद्धवा जाण निश्चित ॥ ७८ ॥ जेणे भूतासी होय उपकार । ते ते करी देहव्यापार । भेदिता निजजिव्हार । अपकारिया कर उचलीना ॥ ७९ ॥ स्वयें साहूनि अपकार । जो अपकारिया करी उपकार । ऐसा ज्याचा शरीरव्यापार । ते भजन साचार कायिक ।। ३८०॥ यापरी काया वाचा मन । सर्व भूर्ती भगवद्भजन । हेंचि मुख्यत्वे श्रेष्ठ साधन । भक्त सज्ञान जाणती ।। ८१॥ ब्रह्मप्राप्तीचे परम कारण । हचि एक सुगम साधन । मजही निश्चय मानले जाण । देवाची आण उद्धया ॥ ८२ ॥ हा भजनधर्म अतिशुद्ध । येथे विघ्नाचा सबंध । अल्पही रिघों न शके याध । तेचि विशद हरि सागे ।। ८३ ॥ - - १नट होते . पाहणारी ३ लय पावते ४ निवाररहित, पूर्ण ५ श्रेष्ठ, शेवटचे परते ६ घृत्तिाम उरकर याप्रमाणे ९ ज्याला ओळख नाही असा झणजे वृतान १० सदाटोपाने ११ सापडत नाही १२ व्याचे नाव भेक भपे इनका पवित ११ मर्मभेदक १४ आपले मर्म १५ स्पट, गुलासेवार,