पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/778

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४८ एकनाथी भागवत. पिता । यालागी आत्म्यासी जन्माची कथा । जाण सर्वथा असेना ॥ १२ ॥ त्रिगुणांचे त्रिविध मळ । हे मिथ्या मायिक समूळ । आत्म्यासी न लागती अलुमाळ । यालागी निर्मळ निजात्मा ॥ १३ ॥ अप्रमेय मणिपे ते ऐका। ऐसा तैसा इतुका तितुका । पैल तो अमका तमका । प्रमाण देखा कदा नव्हे ॥ १४ ॥ काळा गोरा सांवळा । निळा धवळा पिवळा । एथ तेथ दूरी जवळा । या प्रमाणांवेगळा परमात्मा ॥ १५ ॥ महानुभूतिपदव्याख्यान । आत्मा अखंडदंडायमान । निजी निजरूपं समसमान । स्वानंदघन सर्वदा ॥ १६ ॥ तेथ देश काळ वर्तमान । ध्येय ध्याता अथवा ध्यान । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही जाण असेना ॥१॥ नाम-रूप-जात-गोत-1 क्रियाकर्मासी अलिप्त । जन्म. मरण कैचें तेथ । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ १८ ॥ तेथ वृद्धि आणि ह्रास । आदिमध्यातविलास । परिपाकाँदि विन्यास । याचाही प्रवेश असेना ॥ १९ ॥ ह्मणशी पूर्वोक्त धर्मस्थिती । तेथ न रिघे कैशा रीती । सकळानुभूति त्या पदोक्ती । वस्तु. सर्वार्थी अलिप्त ॥ ५२० ॥ या धर्माचा धर्मी आणि धर्म । सकळ भूताचे क्रियाकर्म । प्रकाशक मी आत्माराम । यासी अलिप्त परम परमात्मा ॥२१॥ गंगाजळा आणि मेघासी । आकाश व्याप्त असोनि त्यासी । परी ते अलिप्त दोहींसी । तेवीं ज्ञानाज्ञानासी परमात्मा ॥२२॥ जेथ अज्ञानाचा अभावो । तेथ कर्माकर्मा कैचा ठावो । सकळानुभूति या नाच पहा हो। अभेदान्वयो स्वानदें ॥ २३ ॥ ऐसा परमात्मा परमानंद । स्वजातीयविजातीयस्वगतभेद । नसोनिया वस्तु शुद्ध । जाण प्रसिद्ध निजबोधे ॥ २४ ॥ विजातीय भेद मी देह ह्मणणे । स्वजातीय भेद मी जीवपणे । स्वगत भेद मी ब्रह्म स्फुरणे । हे तिनी नेणे परमात्मा ॥ २५ ॥ तेथ उणखूण लक्ष्यलक्षण । युक्तिप्रयुक्ति प्रमाण । हेही सर्वथा न रिघे जाण । ब्रह्म परिपूर्ण एकाकी ॥ २६ ॥ ऐसे एकाकी परब्रह्म । निजगुह्याचे गुह्य उत्तम । हे जाणे तो सभाग्य परम । त्यासी भवनम न बाधी ॥ २७ ॥ तो देही असताचि जाण । त्यासी न बाधी देहगुण । कदा न वाधी कर्माचरण । जन्ममरण बाधीना ॥ २८ ॥ ऐकोनि ऐशिया ज्ञानासी । तें स्वरूप स्पष्ट साग ह्मणसी । तरी तेथ रिगमू नाही वाचेसी । श्रुति शब्दें परतल्या ॥ २९ ॥ तेथ अतिविवेकसपन्न । बुद्धि प्रवेशेना आपण । सवेगपणे न पवे मन । ते वस्तु वाचेअधीन सर्वथा नव्हे ॥ ५३० ॥ खुंटली शास्त्राची व्युत्पत्ती । देशेने अद्यापि विवादती। श्रति परतल्या नेति नेति । तेथ वचनोक्ती विराम ॥३१॥ धरोनि जाणिवेची हाव । शब्दज्ञाने घेतली धांव । परी वस्तूचे एकही नांव । घ्यावया जाणीव ने सरेची ॥ ३२॥ एवं विचारितां साचार । परादि वाचा नव्हे उच्चार । यालागी वस्तु परात्पर । क्षराक्षराअतीत ॥ ३३ ॥ जे सर्वावयवी सर्वदा शून्य । शेखीं शून्यही नव्हे आपण । शून्यप्रकाश चिद्धन । वस्तु परिपूर्ण एकत्वे ॥ ३४ ॥ तेथ रिघावया १ज्याची इयत्ता करिता येत नाही असा २ सतत, एक्सारसा जागरूक ३ परिणामादि ४ परब्रह्म ५ राहाटी ६ अस्पृष्ट ७ आत्मा हा सकलानुभवखाप आहे ह्या तीन भेदाच विवरण पुढील ओवीत आहे ९श्रीज्ञानोबारायानी तामायास भगवताचें हदत “एथ देव एक बोलिरे । दुजें नाहीं " असे सागितले आहे १० प्रवेश ११' यतो याचा नियत ते १२ वेगवत असन मनही तेथे पोचत नाही. 'अप्राप्य मनसा सह १३ शान, साख्य, योग, न्याय, पशपिक, मीमासा, आणि वेदात, ही सहा दशन १४ उमेद १५ पुरी पडत नाही १६ शेवटी