________________
अध्याय अठ्ठाविसावा. ७४९ वचनोक्ती । शन्दें साधिल्या नाना युक्ती । त्या चिदाकाशी मायळती । जेवीं का उगवतां गभस्ती खद्योत ॥ ३५ ॥ खद्योत सूर्यासी खेव देता । तै वस्तु येती वचनाचे हाता । वस्तूपाशी शब्दाच्या कथा । जाण तत्त्वता हारपती ॥ ३६ ॥ सूर्योदय जालिया पाहीं। खद्योत शोधिता न पडे ठायी । तेवी वस्तुप्राप्ति पाविजे जिही । ते मागमोस नाहीं शब्दाचा ॥ ३७॥ हो का आधारिये राती । ज्यांची दीपें चाले नियास्थिती । तेथ झालिया सूर्योदयप्राप्ती । तेचि उपेक्षिती दीपाते ॥ ३८ ॥ तेवी शान्दिका ज्ञानयुक्ती । अनुतापें ब्रह्म विवंचिती । ज्यासी झाली ब्रह्ममासी । तेचि उपेक्षिता शब्दातें ।। ३९ ॥ जव जव शब्दाचा अभिमान । तंव तंव दूरी ब्रह्मज्ञान । येचि अर्थीचे उपलक्षण । ऐक निजखूण उद्धवा ।। ५४० ॥ कन्या द्यावया वरासी । माता पिता बंधु ज्योतिषी । भेळचूनिया सुहृदासी । कन्या वरासी अर्पिती ॥४१॥ तेथ भर्तारसभोगसेजेपाशीं । जनळी मातापितासुहटेंसी । असणं हाचि अवरोध तिसी । पतिसुखासी प्रतिबंध ॥ ४२ ॥ तेवीं योग्यता चातुर्य जाण । शब्दज्ञाने ज्ञातेपण । जवळी असता ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण हो न शके ॥ ४३ ॥ जेवी डोळा अल्प केण न समाये । तेनी ब्रह्मीं कल्पनान साहे। यालागी निर्विकल्प पाहे । ब्रह्मज्ञान होये सुटंक ॥४४॥ समस्त ज्ञानाचा उपरम । सकळ वचनाचा विराम । तेचि पाविजे ब्रह्म सुगम । ऐसे पुरुषोत्तम बोलिला ।। ४५ ॥ जे नाफळे वुद्धीच्या ठायी । जे मनासी नातुडे कही । जे वचनासी विषयो नव्हे पाहीं । प्रमाणाचे पाही पावले न वचे ॥ ४६॥ यापरी वस्तु न पडे ठायीं । तरी ते वस्तूचि हाणशी नाहीं। ऐसे उद्धवा कल्पिसी काहीं । ऐक तेविपयीं सागेन ।। ४७ ।।। मूळ श्लोकीचे पद ॥ येनेपिता वागसवश्चरति ॥ येथे देहेंद्रियप्राण । हे जड मूढ अचेतन । त्यासी चेतवी आत्मा चिद्धन । तेही उपलक्षण अवधारी ॥४८॥ आत्मप्रभा दृष्टि प्रकाशे । परी आत्मा दृष्टीसी न स्पर्श । आत्मा दृष्टी सवाद्य असे । परी दृष्टीसी न दिसे अदृश्यत्वे ॥४९॥ आत्मसत्ता ऐकती श्रवण । श्रवणासी आत्मा नातळे जाण । श्रनणा सबाह्य असोनि पूर्ण । श्रवणविपय जाण नव्हेचि आत्मा ॥ ५५० ॥ वाचा आत्मसत्ता उठी। आत्मा नातळे वाचिका गोठी । वस्तु शब्दाचे पाठीपोटी । तो शब्द शेवटी नेणे वस्तू ।। ५१॥ मन आत्मसत्ता चपळ । मना सबाह्य आत्मा केवळ । तो मनासी नारळे अनुमाळ । मनासी अकळ निजात्मा ।। ५२॥ चित्त चेतवी चिद्धन । चित्सत्ता चित्तासी चिंतन । चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण । तरी चित्तासी चैतन्य कळेना ॥५३॥ आत्मसयोगें अहं उल्हासे । अहंता आत्मा कदा न स्पर्श ! अहतासवाद्य आत्मा असे । परी तो आत्मा न दिसे अहंकारें ॥ ५४ ।। आत्मप्रभाप्रकाशविधी । प्रकाशिली विवेकजुद्धी । बुद्धीस आत्मा न कळे त्रिशुद्धी। आत्मा बुद्धी सबाह्य ।। ५५ ॥ आत्मप्रभा प्राण चळे । परी प्राणासी आरमा नातळे । प्राण सबाह्य आत्ममेळें । तरी प्राणासी न कळे परमात्मा ॥५६॥ उद्धचा तू यापरी पाहे । जड जयाचेनि वर्तताहे । तो आत्मा स्वत-सिद्ध आहे । नाहीं नोहे" कल्पाती ॥ ५७॥ यापरी आत्मा स्वत सिद्ध । भेद नादनि अमेद। प्रकासोनि १ परमधाम य २ आलिंगन ३ असेना ४ पाजया ५ पत्ता, कामा ६ पोधितात v ra . ! र ९ सडा, कचरा सोसत नाही १० शुद्ध लक्षगावद ११ शेवट १२ भारत ही ११ आमसरामा ोत नाही