Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ ८४॥ गुरुते मणो मातापिता । ते एकजन्मी सर्वथा । हा सनातन तत्वतां । जाण पां वस्तुता मायबापू ॥ ८५ ॥ अधोद्वारे उपजविता । ते लौकिकी मातापिता । अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्गुरु पिता सत्यत्वे शिष्यां ॥ ८६ ।। गुरुतै हाणो कुळदेवता । तिची कुळकर्मीच पूज्यता । हा सर्व कर्मी अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थी ॥ ८७॥ गुरु ह्मणों देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण । मग त्या सद्गुरूसमान । देवही जाण तुकेना ॥८८॥ गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किचित न्यून । गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्गुरुसमान अद्वयत्वे ॥ ८९ ॥ यालागी अगाध गुरुगरिमा । उपमा नाही निरुपमा । ब्रह्मीं ब्रह्मत्व प्राणप्रमा । हे वाक्यमहिमा गुरूची ॥ ४९० ॥ ब्रह्म सर्वाचे प्रकाशक । सद्गुरु तयाचाही प्रकाशक । एवं गुरुहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वे ।।११।। यालागी गुरुते मनुष्यबुद्धी । पाहों नये गा त्रिशुद्धी । ऐशिये भावार्थबुद्धी । सहजे चित्तशुद्धी सच्छिप्या ॥९२ ॥ज्याचा गुरुचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो । गुरुआज्ञा देवो पाळी पहावो । गुरु वाक्ये स्वयमेवो जड मूढ तारी ॥ ९३ ॥ ब्रह्मभावे जे गुरुसेवक । देवो त्याचा आज्ञाधारक । त्यासी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुलंधी देवो ॥ ९४ ॥ देवो गुरुआज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी । एवं उभयता अभिन्नपणीं । भावार्थियांलागोनी तारक ।। ९५ ॥ सद्भावो नाही अभ्यंतरी । बाह्य भक्ति भावेंचि करी । भावानुसार ससारीं । नानापरी स्वये ठकती ॥ ९६ ॥ ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निजस्वार्थी । ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभ हरिभक्ती कदा नुपजे ॥ ९७ ॥ येथ भावेंवीण तत्वतां । परमाथु न ये हाता । सकळ साधनाचे माथा । जाण तत्वतां सद्भावो ॥ ९८ ॥ कोरडिये खावी धरिता सद्भावो।तेथेचि प्रगटे देवाधिदेवो । मी सद्गुरु तो पहावो । स्वयं स्वयमेवो परब्रह्म ॥ ९९ ॥ यालागीं गुरुभजनापरता । भजावया माणु नाही आयता । ज्ञानभक्ती जे तत्त्वता । ते जाण सर्वथा सद्गुरुभक्ती ॥ ५०० ।। गुरूहूनि श्रेष्ठ ब्रह्म । ह्मणता गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म । ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥१॥आह्मा सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम । हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥२॥ ऐशिये गुरुसेवेआंत । प्रह्लाद झाला द्वंद्वातीतं । नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्ये विचरत सुरासुरस्थाने ।। ३ ।। ऐसीचि गुरुसेवा करिता । चुकली अवरीपाची गर्भव्यथा । ते गर्भचि जाहला देवो साहता। भक्ता भवव्यथा वाधों नेदी ।। ४ ।। ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां । ते पढियंते जनार्दना । त्यासी भवभावना शिवो नेदी ॥५॥ गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही अमे तदात्मक । जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सागे ॥६॥ भनिधमानोऽप्यरभाति हि द्वयो ध्यातुधिया स्वाममनोरथौ यथा । तरकर्मसकरपविकरपक मनो बुधो निर ध्यादभय तत स्यात् ॥ ३८ ॥ पुरुषासी जो प्रपचु दिसे | तो नसताचि मिथ्या आभासे । जेवी का एकला नियो। स्वमामाजी जग कल्पी ॥ ७॥ असोनि निद्रावशे दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण । १ जुनाट २ योनिमार्गात ३ तुलना, परोपरी पावत नाही ४ सहर पूर्ण ५ गुरूचा मोठेपणा ६ प्रमाण-झाायुक्त । अत करण, प्रमा-यथाथज्ञान (अमृतानुभव प्र ६ ऑषी ४१ पहा)७ काष्ठीं सद्भावो ८ मग ९ शीतोष्णादि दवा इन निराळा १० देवरोकी व दैत्यलोकी ११ ससाराची पीडा. १२ आवडते, प्रिय १३ सुस १४ झोपेमध्ये ।