Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ते मायेच्या निजपोटी । भयशोकदुःखांचिया कोटी । ब्रह्माशिवादीचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥ ६१॥ ते महामायेची निवृत्ती । करावया दाडगी भगवद्भक्ती । स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थी । बोलिला अर्जुनापती गीतेमाजी ॥ १२॥ ॥ भगवद्गीताश्लोकार्ध ॥ मामेय ये प्रपद्य ते मायामेता तरी त ते ॥ माया मणिजे भगवच्छती । भगवद्भजने तिची निवृत्ती । आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥ ६३ ॥ हरीची माया हरिभजने । हरिभक्ती सुखेंचि तरणे । हैं निजगुह्य अर्जुनाचेनि कारणे । स्वयें श्रीकृष्णे सागितले ॥६४ ॥ मायेची हेचि निजपुष्टी । स्वरूपी विमुख करी दृष्टी । द्वैतभावे अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥६५॥ भयाचे जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हे सत सज्ञान बोलती ॥ ६६ ॥ऐसे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान । ते भक्तीचे पोपण जाण । न करिता भगवद्भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥६७॥ जरी जाहले वेदशास्त्रसपन्न । तिही न करिता भगवद्भजन । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥ ६८ ॥ शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती । मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करिता हरिभक्ति कदा नुपजे ॥ ६९ ॥ हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी । हरिनामाचेनि गर्जनी । जीव घेउनी माया पळे ॥ ४७० ॥ माया पळता पळो न लाहे । हरिनामधार्के विरोनि' जाये । यालागी हरिमाया पाहें । वाधू न लाहे हरिभक्ता ॥७१ ॥ नामाची परम दुर्धर गती । माया साही न शके निजशक्ती । हरिभक्त माया सुख तरती । यालागी श्रीपती बोलिला स्वयें ॥७२॥ सायुज्यादि चारी मुक्ती । अकी वाढवी भगवद्भक्ती । ते न करिता अनन्यगती । शास्त्रज्ञा मुक्ती न घडे कदा ॥७३ ।। हरिभजनी जे विमुस । त्यासी सदा द्वैत सन्मुख । महाभयेसी दु सदायक । प्रपचु देख दृढ वाढे ॥ ७४॥ जेवीं एकाएकी हग्भ्रम पडे । तो पूर्व ह्मणे पश्चिमेकडे । तैसी वस्तु विमुसे वादे । अतिगोद मिथ्या द्वैत ।। ७५ ॥ द्वैताचिये भेदविहिरे । सुटती सकल्पविकल्पाचे झरे । तेथ जन्ममरणाचेनि पूरें । बुडे एकसरें ब्रह्माडगोळ ॥७६॥ जन्ममरणाचिया योढी । नाना दुःखाचिया कोडी । अभक्त सोशिती साकडी । हरिभक्ताते वोढी स्वप्नीही न लगे ।। ७७ ।। भक्तीचे अगाध महिमान । तेथे रिघेना भववधन । तें करावया भगवद्धजन । सगरुचरण सेवावे ॥७८॥ निजशिप्याची मरणचिता । स्वये निवारी जो वस्तुता। तोचि सद्गुरू तत्वता । येर ते गुरुता मत्रतंत्रोपदेशे ॥ ७९ ॥ मंत्रतत्र उपदेशिते । घरोघरी गुरु आहेत आइते । जो शिप्यासी मेळवी सद्धस्तूतें । सद्गुरु त्यातें श्रीकृष्ण मानी ॥४८॥ गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वरु वस्तुतां । गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्वता परब्रह्म ।। ८१॥ गुरूचे उपमेसमान । पाहता जगी न दिसे आन । अगाध गुरूच महिमान । तो भाग्येषीण भेटेना ॥ ८२ ॥ निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी । नित्यानित्यविवेकआवडी । तै पाविजे रोकडी सद्गुरुकृपा ॥ ८३ ।। सद्गुर कृपा हाती चढे । तेथें भक्तीचे भाडार उघडे । तेव्हा कळिकाळ पळे पुढे । कायसे यापुढे भरभय १ गोष्ट, पाद परसन ३ मोठी, दाडगी ४ निमितान ५ दृश्य, न, दरा, अशी त्रिपुटीप प्रपनरचना ६ पा ७ निर्यट होते ८ सलोपता, समीपता, सम्पता या सायुज्यता ९माठीवर घेऊन १.६रिश्रम ११