________________
७३० एकनाथी भागवत. __उद्धव उवाच-नेवारमनो न देहस समृतिर्दृष्टदृश्ययो । अनात्मसदृशोरीश कस्य स्यादुपलभ्यते ॥ १०॥ आत्मा नित्यमुक चिद्धन । त्यासी न घडे भवबंधन । देह जड़ मूढ अज्ञान । त्यासी ससार जाण घडेना ॥ २२ ॥ एथ भवबंधन हपीकेशी । सांग पां वाधक कोणासी । जरी तूं ससार नाही ह्मणसी । तो प्रत्यक्ष जगासी जडलासे ॥ २३ ॥ आत्म्यासी विचारिता जाण । भवबंधा न दिसे स्थान । येचि अर्थीचें न घडतेपण । उद्धव आपण सांगत ॥२४॥ ____ आत्माऽव्ययोऽगुण शुद्ध स्वयज्योतिरनावृत । अग्निवहारपदचिदेह कस्खेह समृतिः ॥ ११॥ आत्मा चिद्रूप अविनाशी । गुण निर्गुण नातळे त्यासी । कर्माकर्मपापपुण्यांसी । ठाव ज्यापाशी असेना ॥ २५ ॥ परादिवाचा नव्हे उच्चार । यालागी झणिजे परस्पर । प्रकृति गुणी अनिवार । प्रकृतिपर परमात्मा ॥ २६ ॥ जयाच्या स्वप्रकाशदीप्ती । रविचं. द्रादि प्रकाशती । प्रकाशे प्रकाशे त्रिजगती । तेजोमूर्ति परमात्मा ॥ २७ ॥ ऐशिया आत्म्याच्या ठायीं । भवबंध न लगे काहीं। सूर्य बुडे मृगजळाच्या डोही । तै आत्म्यासी पाही भवबंध ॥ २८ ॥ खद्योततेजे सूर्य जळे । बागुलाभेणे काळू पळे । मुंगीचेनि पांखवळें । जै उडे सगळे आकाश ।। २९ ॥ वारा आडखुळिला आडी पडे । जै चिल्लरामाजी मेरे बुडे । तरी भवबंध आत्म्याकडे । सर्वथा न घडे गोविंदा ॥ १३० ॥ देहाकडे भवबंधन । मूर्खही न मानिती जाण । देह जड मूढ अज्ञान । त्यासी भवबंधन कदा न घडे ॥ ३१॥ जे दगडाचे पोट दुखे । कोरडे काष्ठ चरफडी भुकें । तें देहाकडे यथासुखें । भवबंध हरिखें लागत ॥ ३२ ॥ O डोगरासी तरळे भरे । मृत्तिका नाहाणालागी सुरे। कोळशाने काळे होय आंधारें । तै भवबंधभारे देह दाटे ॥ ३३ ॥ ह्मणसी देहात्मसंगती। घडे भववंधाची प्राप्ती । विचारिता तेही अर्थी । न घडे श्रीपति तें ऐक ॥ ३४॥ आत्मा स्वप्रकाश महावन्ही । देह तो जड मूढ काष्ठस्थानी । तो मिळता आत्ममिळणी । सांडी जाळूनि तत्काळ ॥ ३५ ॥ 0 अग्निमाजी सौदें । कापूर आठ प्रहर नादे । तै देहात्मनिजसवंधे । देह भवबंधे नादता ॥ ३६ ॥ ह्मणती काष्ठामाजी अग्नि असे । परी तो काष्ठी असूनि न दिसे । मथूनि काढिल्या निजप्रकाशे । जाळी अनायासें काठातें ॥ ३७॥ तेवीं आत्मा देहामाजी असे । परी तो देहचि होऊनि नसे। देहप्रकाशक चिदंशें । भवबंधपिसे त्या न घडे ॥ ३८ ॥ ॥ आशंका ॥ ॥ ह्मणशी आत्म्याचे निजसगतीं । जै जळोनि जाय भूतव्यक्ती । तें भूताची वर्तती स्थिती । कैशा रीती ते ऐक ॥ ३९ ॥ छायामंडपी दीप प्रकाशी। नानवी कागदाच्या बाहुल्यांसी । तेच लावितां दीपासी । जाळी अना. यासी त्या व्यक्ती ॥ १४० ॥ तेवीं आत्म्याचे स्वसत्ताशक्ती । भूतें दैवयोगें वर्तती । स्वयंभू झाल्या आत्मस्थिती । भूतव्यक्ती उरेना ॥४१॥ करिता आत्म्याचे अनुसंधान । ससाराचें नुरे भान । तेथ भूताकृति भिन्नभिन्न । कैंच्या जाण अतिबद्ध ॥ ४२ ॥ वन्यपूर्ण २ अचेतन ३ परादिवाणींच्या योगाने, परापवादाचा ४ परेच्या पलीकटचा नामदेव हाणतात, "परनि परतें घर । तेध राह निरंतर" प्रकृति ही शुणातली य परमात्मा प्रकृतीपलीकडला . ज्याच्या प्रकाशन प्रलोक्य माम। ६ ससारवधन ७ काजव्याच्या चमकण्याने ८ प्रकाशतो ९ काळ, मृत्यु १० भाडात 11 ११५ १२ मत्परत १३ सरळणजे चळ चळण. हालाँकिवा अजीणांची हावण १४ मावी सानाकारता झुरत किया पऊन मोठा साली नाही दाणून झुरते १५ एकरूपानें, ऐक्यान १६ काष्ठचि होऊनि नसे. १७ ससारबध. स पिशाय या पेट