पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/757

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अट्टाविसावा. ७२ जाण असेना ॥ १०॥ प्रपंच मजवरी आभासे । परी भी प्रपंचामाजी नसे । जेवीं मृगजळाचेनि रसे। सूर्य काळवशे मिजेना ॥१॥ त्रिविध प्रपंचाचे जाळ । मजवरी दिसे हे निर्मूळ । जेवीं गगन भासे सुनीळ । परी तेथ अळुमाळ नीळिमा नाहीं ॥२॥ जग प्रत्यक्ष डोळा दिसे । तें तूं निर्मूळ माणसी कैसें । हे आशंका मानिसी मानसें । ऐक अनायासें तो बोध ॥ ३॥ इद गुणमयं विदि विविध मायया कृतम् ॥ ७ ॥ एतद्विद्वान्मदुक्ति ज्ञान विज्ञाननेपुणम् । न निन्दनि न च स्तौति होके चरति सूर्यवत् ॥ ८ ॥ अध्यात्म अधिदेव अधिभूत । हे त्रिविध जग मायाकृत । नसते मजमाजी आभासत । जाण निश्चित त्रिगुणात्मक ॥ ४॥ उद्धया मिथ्या ह्मणोनि तू एथ । झणे होशी उपेक्षायुक्त । येणे मद्वाक्य साधुसंत । ज्ञानविज्ञानार्थ पावले ।। ५ ।। प्रपंचाचें मिथ्याभान । तेंचि ज्ञानाचे मुख्य ज्ञान । येणे ज्ञाने जो सज्ञान । तोचि समान सर्वां भूती ॥ ६ ॥ यालागी भूताचे गुणागण । कदा न वदे निंदास्तवन । सूर्याचे परी जाण । विचरे आपण समसाम्य ॥ ७ ॥ वदरिकाश्रम उत्तरदेशी । सेतुबंध दक्षिणेसी । सूर्य संमुख सर्वांसी । विमुखता त्यासी असेना ॥ ८॥ सूर्य समुख पूर्वेच्यांसी । तोचि विमुख पश्चिमेच्यासी । मी सर्वत्र सर्वांसी । विमुखता मजसी असेना ।। ९ ॥ सामर्थे तमै दवडूनि जाण । भूतासी सूर्य भेटे आपण । तेवीं जगाचे दवडूनि दोषगुण । साधुसज्जन विचरती ॥११०॥ जे हैं वोलिले ज्ञानलक्षण । तेंचि सिद्धाताचे पूर्णपण । मुमुक्षी हे अनुसधान। सावधान साधावे ॥११॥ हेचि पाविजे निजज्ञान । तेचि अर्थीचे साधन । उद्धवालार्गी श्रीकृष्ण स्वमुखें आपण सागत ॥ १२ ॥ प्रत्यक्षेणानुमानेन निगमेनारमसविदा । आयन्तपदसज्ज्ञावा नि सनो विचरेदिह ॥ ९ ॥ जे जन्मोनि नाशवंत । ते सर्वही जाण असत । आसक्ति सांडोनिया तेथ । उदास विरक्त वर्तावे ॥ १३॥ सैटवल्याचे बारसें । कोणी न करिती उल्हासें । नश्वर देह वाढता तैसें । मूर्ख मानसें सुखावती ॥ १४ ॥ उत्पत्तिविनाशलक्षण । त्याचें देव सागतो प्रमाण । नित्य भूताचे जन्ममरण । देखिजे आपण प्रत्यक्ष ।। १५ ।। अनुमान परी तो साचार । जें जें देखिजे साकार । मेरुपृश्व्यादि आकार । तेही नश्वर प्रळयांतीं ॥१६॥ येचि अर्थों वेदोक्ती । नाशवंत अष्टधा प्रकृती। जीवभाव नासे प्रांतीं । गर्जती श्रुती येणे अर्थ ॥ १७॥ एथ आपुलाही अनुभव असे । जड विकारी ते ते नासे । हे कळत असे गा आपसें । जग अनायासें नम्वर ॥ १८ ॥ वडील निमाले देखती । पुत्रपौत्र स्वयें सस्कारिती । तरी स्वमृत्यूची चिता न करिती । पडली भ्रांती देहलोभ ।। १९ ।। पुत्र पितरा पिडदान देती । उत्तम गति त्याची चितिती । आपुली गति न विचारिती । नवर आसक्ती देहलोमें ॥ १२० ॥ आत्मा केवळ प्रकाशंघन । प्रपंच जड मूढ अज्ञान । हे ऐकोनि उद्धव आपण | देवासी प्रश्न यूसतू ॥ २१॥ - - - - - - - - १ थोडाही निळेपणा नाही २ होऊ नकोस ३ प्रपचमिप्यात्याचे भान ४ समत्वाने ५ अधार ६ साधका, ५ मुक्ति इच्छिणान्यान ८ अनुसघान ९ मिध्या, सोटे १० सटवीच्या झपाट्यानें मेलेत्याचें ११ प्रतिमामाचे. १२ जीवत्व १३ अगदी शेवटी १४ आपोआप १५ मेलेले १६ नाशवत १७ वेजोमय