________________
अध्याय अठ्ठाविसावा. ७३१ यापरी भवबंधन । मज पाहतां मिथ्या जाण । भवबंधालागी स्थान । नेमस्त जाण असेना ॥४३॥ आत्म्याच्या ठायीं ना देही । उभयसबंधीही नाहीं । भवबंध मिथ्या पाहीं। यासी ठावो कोठेही असेना ॥ ४४ ॥ कोपों नको श्रीकृष्णनाथा । माझेनि निजनिधोरें पाहतां । भवबंध मिथ्या तत्त्वतां । निश्चयें चित्ता मानले ॥ ४५ ॥ ऐकोनि उद्धवाचे वचन । हरिखें वोसईला श्रीकृष्ण । माझा उद्धव झाला सज्ञान । निजात्मखूण पावला ॥४६॥ सत्य मिथ्या भवबंधन । ऐकोनि उद्धवाचे वचन । परमानंदें डोले श्रीकृष्ण । जीव निवलोण करूं पाहे ॥ ४७ ॥ आत्म्यास भवबंध नाहीं । शेखी न दिसे देहाच्या ठायीं । हा विवेक नेणिजे जिहीं । त्यांसी भवबंध पाही हरि सांगे ॥४८॥ श्रीभगवानुवाच-यावद्देहेन्द्रियमाणेरामन ससिकर्षणम् । ससार फरवास्तापदपार्थोऽप्यवियेकिन ॥ १२ ॥ जो वर्णाश्रमांही परता। जो बंधमोक्षा अलिप्तता। जो देहद्वंद्वा नातळता । तो उद्धवहितार्थी हरि बोले ॥ ४९ ॥ मी स्थूळ कृश गौर श्याम । हे देहाचे देहधर्म । मी काणा मुका बहिरा परम । हे जाण धर्म इंद्रियाचे ॥ १५० ॥ क्षुधातपादि अनुक्रम । हा भाणाचा प्राणधर्म । कामकांधलाभादि सत्रमा हा मनोधर्म मनाचा ।। ५१॥ सत्वगुणाची जागृती । रजोगुणे स्वमस्फूती । तमोगुणें जाड्य सुषुप्ती । जाण निश्चिती देहयोगें ॥५२॥ देहासी येता मरण । मी मेलों हाणे तो आपण । देहासी जन्म होता जाण । जन्मलेपण स्वयें मानी ॥ ५३ ॥ इद्रियें विषयो सेविती । ते म्या सेविले मानी निश्चिती । स्वर्गनरकभोगप्राप्ती । सत्य मानिती देहात्मता ॥ ५४ ॥ अन्न आकाक्षी प्राण । त्यात भक्षी हुताशन । तत्साक्षी चिदात्मा आपण । तो ह्मणे च्या अन्न भक्षिले ।। ५५ ॥ हे अवघे माझे धर्म । ऐसा आत्म्यासी जंव दृढ भ्रम । तंव मिथ्याचि अतिदर्गम । संसारविषम में भोगी ।। ५६ ॥ त्या भोगाचे फळ गहन । अविश्नम जन्ममरण । स्वर्गनरक पापपुण्य । भ्रमें आपण सत्य मानी ।। ५७ ।। ससार मूळी निर्मूळ । तोही भ्रमफळे सेदाफळ । जो का अविवेक्या अतिप्रवळ । सर्व काळ फळलासे ॥ ५८ ॥ जेथ सत्य अर्थ नाहीं। तो अनर्थ माणिजे पाहीं । त्याचा फळभोग तोही । वाळवागुलन्यायीं भोगावा ॥ ५९ ॥ ॥ आशंका ॥ ॥ गगनकमळाची माळा । ज वंध्यापुत्र घाली गळा । ते ससारभोगाचा सोहळा । आत्म्याच्या जवळां देखिजे ।। १६० ॥ ऐसें न घडते केवीं घडे । तेचि अर्थीचें वाकोडे । श्रीकृष्ण उद्धवापुढे । निजनिवाडे सागत ॥ ६१ ।। 'म साविद्यमानेऽपि समृतिर्न निवर्तते । ध्यायतो विपयानस्स स्व नर्थागमो यभा ॥ १३ ॥ सत्यार्थ नसताही ससार । निवर्तेना अतिदुर्धर । याचि अर्थीचा विचार । निजनिर्धार अवधारौं ॥ ६२॥ बंध्यापुत्राचिया ऐसें । ससारा सत्यपण नसे । सत ह्मणों तरी हा नासे । काळवशे सहजेचि ॥ ६३ ॥ ससार जै सर्त होता । तै ब्रह्मज्ञानेही न नासता । हा सतांसतं नये ह्मणता । अनिर्वाच्य कथा 4 याची ॥ १४ ॥ अविचारिता याचे कोड । अविवेके हा अतिगोड । विषयध्याने वाढे रूढ । संकल्प सदृढ मूळ याचें ॥ ६५ ॥ १ आमदाने मरून गेला स्थूल व सूक्ष्म हा दोन देहास ३ प्राणवायु ४ अनि ५ नेहमी फळ प्रमवणारा, ६ आकाशातील कमळाची. ७ खत निर्णय करून “सत्य खराही प्रणवत नाही व खोटाही झणवत नाही, एवर अमिवाच्य माहे 'सत्य क्षणों तरी नासे । मिथ्या पणों तरी भासे' असा हा भमरूप आहे.