पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/754

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२६ एकनाथी भागवत. निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३६ ॥ ज्ञानाभिमानाचे वाधकपण । सर्वथा साधका न कळे जाण । यालागीं न करिताही प्रश्न । त्याचे निराकरण हरि सांगे॥ ३७॥ उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रह्मशासी । तेथे वाचवावया उद्धयासी । सपूर्ण ब्रह्मज्ञानासी हरि सागे ॥ ३८ ॥ जेथ देहातीत आत्मज्ञान । तेथ न बाधी शापबंधन । हे जाणोनिया श्रीकृष्ण । पूर्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ॥३९॥ जेवीं साकरेवरीमाशी। तेवी कृष्णमूर्तीपाशी । प्रीति जडली उद्धवासी । भाव ऐकदेशी दृढ झाला ॥ ४० ॥ कृष्णापासूनि दूरी जातां । उद्धव प्राण सांडील तत्त्वतां । ते मोडावया एकदेशी अवस्था। ब्रह्मसमता हरि सांगे ॥४१॥ एकदेशी झाला भावो । तो श्रीकृष्णा नावडे पहा हो। यालागीं देवाधिदेवो । ब्रह्मसमन्वयो हरि सागे ॥ ४२ ॥ उद्धव असता कृष्णाजवळी । ब्रह्मशा होईल होळी । यालागी त्यासी वनमाळी । सर्व ब्रह्मसुकाळी घालूं पाहे ॥४३॥ कृष्णावेगळा उद्धव जातां । वियोग वाधीना त्याचिया चित्ता । ऐशी पांवाया सर्वगतता। उद्धवा सर्वथा हरि बोधी ॥४४॥ • श्रीभगवानुवाच-परस्यभाषकर्माणि न प्रशसेन्न गर्हयेत् । विश्वमेकारमक पश्यन्प्रकृत्या पुस्पेण च ॥ १॥ जो निःशब्दाचा सोलीव शब्द । ज्याचे निःश्वासे जन्मले वेद । उद्धवहितार्थ गोविंद । ज्ञान विशुद्ध स्त्रये सांगे ॥ ४५ ॥ ससारी मुख्य तिन्ही गुण । निगुणास्तव निविध जन । त्याचे स्वाभाविक कर्म जाण । शांत दारुण आणि मित्र ॥ ४६ ॥ त्या कर्माचें निंदास्तवन । सर्वथा न करावे आपण । एकाचें वानिता भलेपण । इतरां कुडेपण तेणेचि घोले ॥ ४७ ॥ पांचामाजी भलेपण । एकाचे वानिता आपण । इतर जे चौघेजण । सहजे जाण निदिले ॥४८॥ वामसव्य उभय भाग। दो नावी एकचि अग । तेवी प्रकृतिपुरुषात्मक जग । चिद्रूपें चाग एकत्वे ॥ ४९ ॥ जग ब्रह्मरूप परिपूर्ण यालागी निंदा आणि स्तवन । भूतमात्राचे आपण । कदाही काळी जाण न करावे ॥ ५० ॥ सर्व भूताच्या ठायीं। आत्माराम असे पाहीं। यालागी निदास्तुति कांही । प्राणीतें पाहीं न करावी ॥५१॥ उद्धवा निदास्तुतीची कथा । साडी साडी गा सर्वथा । तरीच पावशी परमार्था । निजस्वार्था निजबोधू ॥ ५२ ॥ सर्व भूती भगवद्भाव । हा ब्रह्मस्थितीचा निर्वाह । यासी कदा नव्हे अपावै । ऐक तो भाव उद्धवा ॥५३॥ जेथूनि येवू रिघे अपाव । तेथें दृढ वाढल्या भगवद्भाव । तेव्हा अपायचि होय उपाव । विघ्नासी ठाव असेना ॥ ५४॥ हे स्थिति साडूनिया दूरी । मी ज्ञाता हा गर्व धरी । निदास्तुतीच्या भरोरी । तो अनमोझारी निमम ॥ ५५ ॥ परस्वभावकर्माणि य प्रशसति निन्दति । स आशु अश्यते स्वार्थादसत्यभिनिवेशत ॥२॥ मी एक सर्वज्ञाता पूर्ण । ऐसा धरोनि ज्ञानाभिमान । जगाचे देखे दोपगुण । निंदी ब्राह्मण मुख्यत्वे ॥ ५६ ॥ पराचे स्वाभाविक कर्म । स्वयें निंदणे हा अधर्म । हनुमंत ज्ञाता परम । त्यास वानरी कर्म सोडीना ॥ ५७ ॥ नारद ज्ञातेपणे मोठा । सत्य मानला निरूपण २ मरती ३ त्या ब्रह्मशापापासून ४ एक्प्रकारे ५ एकदेशीपणा घालविण्यासाठी ६ श्रीकृष्ण "आपुली ८ सर्वदेशीपणा ९ तत्त्वता हरि बोले १० शब्दातीताच्या ११ केवळ गाभा १२ उच्छासाबरोबर १३ थाइटपण १४ पाचामध्ये १५ दावाजवा १६ जीव गेला तरी १७ नाश १८ मरामध्ये १९ दुसामध्य २० जातिखभावान प्राप्त झालेले २१ वानराचें