Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/753

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. ७२५ तर्केनौ ॥ १३ ॥ जे अतयं वेदशास्त्रांसी । ज्यालागीं वेद विवादिती अहर्निगी । ते तूं क्षणायें वोधिसी । सच्छिष्यासी निजबोधे ॥ १४ ॥ तुझ्या निजबोधाची हातवटी । पढता वेदवेदातकोटी । तरी अलक्ष्य लक्षेना दृष्टी । सर्वार्थी गोष्टी अगम्य ॥ १५॥ बहुत कळले कळले ह्मणती । नाना परीच्या युक्ति चाळिती । परी ते न कळोनि वोसणती । जेवीं शुक बोलती सुभाषिते ॥ १६ ॥ यालागी तुझी बोधकशती । अगम्य सांशी साधौँ । तुझी लाधल्या कृपायुक्ती । अगम्य पावती सुगमत्वे ॥१७॥ जे अगम्य श्रीभागत । त्याहीमाजी एकादशार्थ । प्राकृत करविला यथार्थ । वापं समर्थ कृपाळू ॥ १८ ॥ दधि मथूनि समस्त । जेवी माता काढी नवनीत । ते बाळकाहाती देत । तैसे केले येय जनार्दन ॥ १९॥ वेदशास्त्रांचे निजमथित । व्यासे काढिले श्रीमहाभागवत । त्या भागवताचा मथितार्थ । जाण निश्चित एकादा ॥ २०॥ त्या एकादशाचे गोडपण। सर्वथा नेणे मी आपण । ते जनार्दनें करूनि मथन । सौराश पूर्ण मज दीधला ॥ २१ ॥ तो स्वभाव घालिता तॉडी । लागली एकादयाची गोडी । त्या गोडपणाच्या आवडीं। टीका चढोढी चालिली ॥ २२ ॥ यालागी एकादशाची टीका । एकला कर्ता नव्हे एका । एकी एक मिळोनि देखा । ग्रंथ नेटका निर्वाळिला ॥ २३ ।। मागेपुढे एक एका । हैं एकादशाचे स्वरूप देखा । तेणे एकपणे चालिली टीका । साह्य निजसखा जनार्दन ॥ २४ ॥ जनार्दनें पैं आपुलें । एकी एकपण दृढ केले । तेचि एकादशाचे अर्था आले। एकी मीनले एकलें ॥ २५ ॥ जेवीं जेवणी गोड घास । तेवीं भागरती एकादश । त्याहीमाजी अष्टाविश । अतिसुरस साजिरी ॥ २६ ॥ सर्वागी शिरं प्रधान । तैसा अहाविसावा जाण । तेथील जे का निरूपण । तो स्वानंद जाण सोलीव' ।। २७ ।। तो हा अठ्ठाविसावा अध्यायो । ब्रह्मसुखाचा निजनि हो । उद्धवें न पुसता पहा हो । स्वयें देवाघिदेवो सागत ॥ २८ ॥ उद्धवें न करिता प्रश्न । का सागताहे श्रीकृष्ण । ये अर्थीचें निरूपण । सावधान परियेसा ॥ २९ ॥ उद्धव कृष्णोक्ती निजज्ञान । पायोनि झाला ज्ञानसपन्न । तेणे येऊ पाहे ज्ञानाभिमान । जाणपण अनिवार ॥ ३० ॥ जग मूर्स मी एक ज्ञाता । ऐशी चढेल जे अहंता । तै गुणदोपाची कथा । दापील सर्वथा सर्वत्र ॥३१॥ जेध गुणदोषाचे दर्शन । तेथ निःशेष मावळे ज्ञान येथवरी ज्ञानाभिमान । बाधक जाण साधका ॥ ३२ ॥ अभिमान बाधी सदाशिवा । तोही आणिला जीपभाया । तेथ मनुष्याचा कोण केवा । अहंतत्त्रं जीना मुक्तता कैची ॥३३॥ यापरी गुणदोपाचे दर्शन । मैं ईश्वर देखे आपण । तोही नाडूं पावे जाण । इतराचा कोण पडिपाडू ॥३४॥यापरी गुणदोपदर्शन । साधका बाधक होय पूर्ण । यालागी त्याचे निवारण । न करिता प्रश्न हरि सागे ॥ ३५ ॥ वाळक नेणे निजहिता । तेथ साक्षे प्रवर्ते माता । तेवीं उद्धवाचे १ तर्फ चालत नाही २ वाद करितात ३ पद्धती, तन्हा ४ बाखरूप ५कोटिकम, बुद्धीचे तर्क ६ घरळतात ७ पोपट ८ पडविलेली सुबोध वचन ९ बोध ठसविण्याची शक्ती १. कृपाआतौं ११ मोठा, प्रबळ सद्गुरू समर्थ वरुपालु' दोन्ही आहे १२ लोणी १३ जनादनखामीनी १४ कथन १५ तात्पर्य १६ उत्तारोत्तर अधिक मासादिक अशी १७ उघड केला, निर्मळ केला १८ गोड, सुदर १९ मन्तक २० ब्रह्मानद २१ शुद्ध, अमिन २२ वाढती जे. २३ पाड, प्रतिष्ठा २४ हानिकारक