________________
७२४ एकनाथी भागवत. दोहींकडे । करी वाकोडें समसाम्य ॥ १२ ॥ जे कथेचे गोडपण । जीव गेल्या न सोडी जाण । ऐसे रसाळ निरूपण | उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ १३ ॥ श्रवणे उपजे ब्रह्मभावो । तो हा अठाविसावा अध्यावो । उद्धवासी देवाधिदेवो । निजकृपें पहा हो सांगेल ॥ १४ ॥ अक्षरें भरोनि अक्षररसी । देव सागेल उद्धवासी । तें निरूपण अहाविसा. व्यासी । ब्रह्मसुखेंसी लगडेल ॥ १५॥ ब्रह्मसुखाची साठवण । तो हा अठ्ठाविसावा जाण। ते उघडूनियां उणखूण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ १६ ॥ कृष्णउद्धवनिजज्ञान । एका विनवी जनार्दन । तुमचे कृपेंकरूनि पूर्ण । श्रोतां अवधान मज द्यावें ।। १७ ॥ श्रोतां दीधल्या अवधान । ग्रंथी उल्हासे निरूपण । एका जनार्दना शरण । शिरीं श्रीचरण वंदिले ॥ ४१८॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णो. द्धवसवादे एकाकारटीकाया सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥ ॥श्रीकृष्णाणमस्तु ॥ ॥ ॥ मूळ श्लोक ॥ ५५ ॥ ॥ ओव्या ।। ४१८ ॥ ॥ एकूण सख्या ॥ ४७३ ॥ ॥ अध्याय अठ्ठाविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमो सद्गुरु परंमा । जय जय सद्गुरु पुरुषोत्तमा । जय जय सद्गुरु परब्रह्मा । ब्रह्मा ब्रह्मनामा तुझेनी ॥ १॥ जय सद्गुरु चिदैक्यस्फूर्ती । जय सद्गुरु चिदात्मज्योती । जय सद्गुरु चिन्मूर्ती । भूर्तामूर्ती चिद्रूप ॥२॥ जय जय सद्गुरु सत्क्षेत्रा। जय जय सद्गुरु सत्पात्रा । जय जय सद्गुरु सन्माना । सदैकाक्षरा सद्भूपा ॥ ३॥ जय जय सद्गुरु स्वानदमान । जय जय सद्गुरु स्वानदपूर्ण । जय जय सद्गुरु स्वानंदघन । आनंदा गोडपण तुझेनी ॥४॥ जय जय देवाअग्रगणी । जय जय देवशिरोमणी । सकळ देव लागती चरणी । देवचूडामणी गुरुराया ॥ ५ ॥ जय जय जीवादिजीवा । जय जय जीवशिवादिशिवा । जय जय देवादिदेवा । जय जय अभिनवा गुरुराया ॥६॥ जय जय सद्गुरु सुखसपना । जय जय सद्गुरु सुखनिधाना । जय जय सद्गुरु सुसैकघना । सुखा सुखपणा तुझेनि ॥ ७ ॥ तुझेनि सुखें निजसुख घडे । तुझेनि बोधे निजबोध आतुडे । तुझेनि ब्रह्मा ब्रह्मत्व जोडे । तुझे पडिपोडे तूंचि एकू॥८॥ ऐसा श्रीगुरु तूं अनंत । तुझ्या स्वरूपासी नाही अत । तो तू होऊनि कृपायुक्त । निजरूपें वोधित निजभक्तां ॥ ९ ॥ आपुले निजरूप बोधून । नुरविशी देवभक्तपण । त्याहीवरी निजभजन । अद्वयें पूर्ण करविशी ॥१०॥ गगा "मिळोनि सागरी । मीनली तळपे तयावरी । तेवी भक्त मिळोनि तुजमाझारी । तुझ भजन करी तुझेनि ॥ ११॥ अथ करिता तुझी भक्ती । तूं संतोपसी ययानिगुती । सतोपोनि शिष्याहातीं । निजात्मसपत्ती अर्पिशी ॥ १२ ॥ अर्पूनि निजात्मभर भारू। शिप्य गुरुत्वें करिशी थोरूं । हा अतिलाघवी चमत्कारू । अतक्यं विचारू १ आवडीने २ भामुसाने परिपूर्ण होईल ३ साठा, निधान ४ अर्थ आपण ५ जयजय सहरु ६ श्रेष्ठा ४चिदक्यमूर्ती ८ साकार व निराकार पदार्थात ९ वेदभाषिणी अग्रणी,१० देवश्रेष्ठा ११ सुखपूणा १२ वरोवरी, साम्यती १३ मिळालिया १४ मिळाल्यावर १५ शोमे. चमके १६ एकपणानं १७ आत्मदान करितोस १० खसरूप देऊन शिष्याला गुरुत्व देतोस, निजात्मवहिवारू १९ अत्याधयकारक