पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. जीव घालूनि पूर्णत्वाआत । जें जें अभिमानकल्पित । तें तें साचचि स्वयें होत । तेही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥ १४ ॥ ब्रह्माहमस्मि नुसधैं वचन । ये अहंते नाम भगवद्जन । मा हा तंव तद्रूप होऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेसीं ।। १५ । साडूनि देहबुद्धीचा केरू । भजनें उठिला अहंकारू । तो अपरोक्ष निजसाक्षात्कारू । पावूनि पूर्ण निधारू पूर्णत्वे चर्ते ॥ १६ ॥ ह्मणोनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्यस्मरण । चित्तासी मी निजचिंतन । चित्यधर्मवीण सर्वदा ॥ १७ ॥ ज्याची सहसा प्राप्ती नव्हे । ते ते निजचित्तें चितावें । तंव अप्राप्तीसीचि प्राप्ति यावे । चित्त निजानुभवे सहज भजता ॥ १८॥ तेव्हा निश्चितें जे जे चिती चित्त । ते ते स्वयेंचि होय समस्त । या प्रतीती चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधे ॥१९॥ नाथिले चिती ते अतिचिता । आथिले चिती ते निश्चितता।आधीनार्थी साडूनि चित्ता । सहजे न भजता भजन होय ॥ ४२०॥ चित्त चित्य आणि चितन । या तिहीं जाहले समाधान । ते समाधानही कृष्णार्पण । सहजी सपूर्ण स्खये होये ॥२१॥ ऐसिया भगवद्भजनविधी । भजनगील जाली बुद्धी । ते सकळ कर्मी समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें जाली ॥ २२ ॥ कर्माचरणी समाधी । एक ह्मणती न घडे कधी । ते पावले नाही निजात्मबोधी जाण त्रिशुद्धी विदेहा ॥ २३ ॥ ताटस्थ्या नाव समाधी । ह्मणेल त्याची ठकली बुद्धी । ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणाधीनुसंधी मूर्छा आली ॥ २४ ॥ ताटस्थ्यापासूनि उठिला । ते तो समाधीस मुकला । तेव्हा एकदेशी भानो आला । मंद या बोला न मानिती सत्य ॥२५॥ समाधी आणि एकदेशी बोलता बोलणे ये लाजेसी । सत्य मानी ते शन्दपिशी । शुद्ध स्वरूपासी अनोळख ॥ २६ ॥ येथे प्राचीन अतिसमर्थ । ते मूर्छा आणोनि करी तटस्थ । चाचूनि चालते समाधिस्थ । जाण पा निश्चित वसिष्ठादिक ॥२७॥ पाहें पा देवर्षि नारदु । विनोदं न मोड़े समाधिवोधु ।याज्ञवल्क्याचा समाधिसवधु । ऋपि प्रसिद्ध परीक्षा केली ॥ २८॥ स्वरूप देसोनि मूच्छित जाहला । तो आपांणेया आपण तरला । स्वयें तरूनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकनामदेवी ॥ २९॥ यालागी समाधि आणि व्युत्यांन । या दोनी अवस्थांसहित जाण । बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखडत्वे पूर्ण समाधी ॥ ४३० ।। अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धी । परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य तें त्रिशुद्धी नेदीच स्पर्शी ॥३१॥ सकळ कर्मी समाधी । हे सद्गुरूचि वोधी बुद्धी । तरी युद्धीही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोड़े ॥ ३२॥ बुद्धी आकळले परब्रह्म । ते अहेतुक चाले कर्म । हेचि बुद्धीचे अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥३३॥ स्वरूपी दृष्टी निग्यधी। अनवच्छिन्न समानबुद्धी । कर्माकी अज्ञान न वाधी। परमसमाधी तिये नाव ॥ ३४ ॥ नि शेप गेलिया देहबुद्धी । स्वरूपपणे फुज न नाधी। कर्माकर्मी अज्ञान नवावी।दे परमसमाधी निर्दष्ट ॥३५॥ते स्वरूपी निरवधी। भजनशील जाली वुद्धी । ते सकळ कर्मी समाधी । निजाणविधी स्वय जाहली ।। ३६ ॥ जेथे शामली महातरी चिसाचे प्रमाणजे गुण अगी नसून ३ नसते ४ असले ५आहे, नाही ही दोन्ही पाळ ७ शब्दपाडिलाच घेट रिवा पिशाच ८ जान ९ समाधिविसर्जी १० तमाळ ११ निर्वाणयुद्धी १२ युीने महण फल १३ निष्काम १४ व्यापक, विन्छिन १५ या गायात 'निज समाधी' नाधानी फारच रारा रमण पेरे बारे खम्पाच्या टा अन जागति ठेवून निष्काम कर्म करीत जाणे हाच सरा समाधियोर होय १६ सहकार मी मन आहे', असा गर्न १५ दोपरहित, उलूट १८ आत्मनिवेदनरुप नववी भक्ति १९ गाईशी आला