पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/726

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. एकनाथी भागवत. प्रकटे अभेदवोध । तेणे घोसडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ५॥ माझे स्वस्वरूपा नाहीं अत । यालागी नांवें मी अनंत । वाप भक्तभाव समर्थ । तेणें मी अनंत आकळिलों ॥६॥ ऐसे ज्याचे प्रेम गोड । त्याचे सेवेचे मज कोड । त्याचे सोशी मी सांकड। निचाडी चाड मज त्याची ॥७॥ देव सप्रेमें भुलला । ह्मणे मी त्याचाचि अकिला । जीवेर्भाव तया विकिला । मी त्याचा जाहला तिहीं लोकीं ॥ ८॥ एथवरी भक्तां माझी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती । मा सद्भावे जे साधु सेविती । त्यांची निजगती न बोलवे ॥९॥ ऐसा सतमहिमा वानिता । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा । तोचि सतमहिमा मागुता । होय वानिता चौ श्लोकीं ॥ ४१० ॥ यथोपश्रयमाणस्य भगवन्त विभावसुम् । शीत भय तमोऽप्येति साधून ससेवतम्तथा ॥ ३१ ॥ जेवी वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करू जाणती । त्याचे शीत-तम-भयनिवृत्ती। जो करी निश्चिती उद्धवा ॥ ११॥ शीत निवारी सन्निधी । तम निवारी तेजोवृद्धी । भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसू ॥१२॥ तैसीच जाण सत्सगती । सगै त्रिविध ताप निवारती । तेचि अर्थीची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥ १३ ॥ शीत हणिजे वृद्धवाधू । तो समूळ निवारिती साधू । तम ह्मणिजे अज्ञानाधू । त्यासी करिती प्रबोधू निजज्ञाने ॥ १४ ॥ भयांमाजी श्रेष्ठ मरण । तें निवारिती साधु विचक्षण । दूर करिती जन्ममरण । कृपालु पूर्ण दीनाचे ॥ १५ ॥ अग्निसमान ह्मणणे साधू । हाही चोल अतिअवद । अग्नीहूनि अधिक साधू । तोचि प्रवोधू हरि सागे ॥ १६॥ अग्नीपाशी प्रवळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम । अग्नि पोळी अधमोत्तम । साधु सर्वसम सुखदाते ॥१७॥ साधूंची धन्य धन्य सगती । सगें जडजाड्य तोडिती । कर्भाचे कर्मठत्व मोडिती । वुडत्या तारिती निजसगें ॥ १८ ॥ निमग्योन्मजता घोरे भवाध्या परमायनम् । सन्तो ब्रह्मविद शान्ता नौदेवाप्सु मजताम् ॥ २२ ॥ प्रतिक्षणी अधिक वृद्धी । अमर्याद वाढी भवाब्धी । तेय उपकल्या चुवकल्या त्रिशुद्धी। अधर्मबुद्धि जनासी ॥ १९ ॥ अधर्स निर्मजन नरकात । स्वधर्मे उन्मजन स्वांत । ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकात ससारी ॥ ४२० ॥ यापरी ससारी जन । पावता उन्मजन निमजन । त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नोव ॥ २१ ॥ पडल्या जळार्णवामाझारी । जेवी अच्छिद्र नाव तारी। तेवीं पडता भवसागरी । सुखरू तारी सजननाव ॥ २२ ॥ कामक्रोधरहित शाती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती । ब्रह्मज्ञाने संपुरती । सुखरूप निश्चिती या हेतू ॥ २३ ॥ कामक्रोधादि साँवजासी । वळे ध्यापया आंविसासी । कदा न येववे नावेपाशी । सगें सकळासी तारक ॥ २४ ॥ नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पाती। बुडवू नेणे धारावर्ती । तारक निश्चितीं निज १ उचपळे, उतास येतो २ मोठा, परामी ३ वाधिला गेलो ४ भावड ५ निष्कामाला ६ सर्वस्वे ५ तृप्ती ८थी, अधार घ भीती याचा नाश ९ अग्नि १० शीतोष्ण, मुरादु स, इत्यादि द्वद्वापासून होणारी पीडा. ११मूळ अज्ञान. १२ प्रकारा ९३ धूर १४ जास्तो १५ साधु चर्भजाम्य, संसारभय व मुलाज्ञान नाहीशी करितोच, पण निघूम च मुख दायकही आहे, यामुळे ममीचा दृष्टात साधुपुट पिछा पडतो १६ बुडणे १७ वर येणे १८ फेरे १९ नौका २० साचूचें निदापत्र प निष्कलबस पच्छिद्रशब्द करून माविले २१ पूर्ण, भरपूर २२ प्राणी, मासे, वगरे यास २३ आमिपास, मासाचे शाले. २४ मोठया प्रवाहात व भोंग्यात ।