________________
६९८ एकनाथी भागवत. झडे सतचरणीं । सकळ पापा धुणी सत्समें ॥ ५९॥ कां ज्याचे मुखौं हरिनामकीती । त्याचे पाय जै मजमाजी येती । ते सकळ पापें माझी जाती। ऐसे भागीरथी स्वयें बोले ॥३६०॥ ऐसी सत्तांची संगती । सदा वाछी भागीरथी । अवचटें गेलिया सतांप्रती । पा पळती प्राण्यांची ॥ ६१ ॥ ते सतमुखींची माझी कथा । जै अत्यादरें ऐके श्रोता । ते त्याचे निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥ ६२ ॥ माझे कथेची अतिआवडी । नित्य नूतन नवी गोडी । सादरे ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोंडी उरवीना ।। ६३ ॥माझी कथा माझें नाम । सकळ पातका करी भस्म । हेचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥ ६४ ॥ नाना योग याग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन । तें करिता हरिकथाश्रवण । होय अतःकरण पुनीत ॥ ६५ ॥ अवद्ध पढतां वेद । दोप वाधिती सुवद्ध । नाम पढता अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥ ६६ ॥ नाना योग याग वेदाध्ययन । तेय अधिकारी द्विज सपूर्ण । कथाश्रवणे चारी वर्ण । होती पावन उद्धवा ।। ६७ ॥ ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां नाइकिजे सकळ जनीं । तें भाग्य भगवत्कृपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥ ६८॥ भगवत्कृपा पावले सांग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग । तेचि निजभाग्ये महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥ ६९ ॥ जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीती । ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवापती वोलिला ॥ ३७०॥ ऐसी भगवत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हाती । तेचि अर्थी श्रीपती । विशद श्लोकार्थी सांगत ॥ ७१॥ ता ये शृण्वन्ति गायन्ति हनुमोदन्ति चाहता । मत्परा अहधानाश्च भक्ति विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥ आपुलिया गृहकार्यार्था । विषयव्यापारी जात जातां । कानी पडली हरिकथा । स्वभावतां प्रसगें ॥ ७२ ।। कृष्णकीर्तिकथनाक्षरे । रिघताचि कर्णद्वारें। भीतरील पाप एकसरे। निघे नाहिरें गजवजोनी ॥ ७३ ॥ जेवी पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी । तेवी हरिकथेच्या मेळी । करी रवदळी महापापा ||७४॥ ऐसा निघाल्या पापाचा करूं। कथेसी उपजे अत्यादरू । कथावधानी धरितां धीरू । हर्षे निर्भरू मन होय ॥ ७५ ॥ जंब जंच कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनी प्रीति पाढे वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथा कैवा. स्वयें गाय ॥ ७६ ॥ फेडूनि लोकलाजेचें विर. । गातां हरिकीर्तिगुणपवाडे । न पाहे तो कर्माकडे । तें सींकडे सुहृदांसी ॥७७॥ निजभावे भगवस्कथा गाता। स्वयंभ उपजे सादरता । तेणे अत्यादरे हरिकथा । होय सागता अतिश्रद्धा ।। ७८ ।। जब जंच कथा सागे निवाडे । तंव तंव श्रद्धा अधिक बाढे । प्रेमाचा पूर चढे । त्यामाजी बुडे निजश्रद्धा ॥ ७९ ॥ कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीती । वायूं न शके विषयासक्ती । तेणे मत्पर स्थिति साधका ॥ ३८० ॥ न करिता भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान । येणेंचि आह्मी जाऊ तरोन । ह्मणती ते जन महामूढ ॥ ८१॥ एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती। हा विश्वास धरिता चित्ती । भगवत्पर झाली वृत्ती । सर्वभूती मदाय ॥२॥ नश, धुवून जाणे, क्षालन सहज ३ अशुद्ध रीतीनं ४ मोटे ५ आतील ६ तारवळीन ७ सिंहाची ८ रास, नाश ९ नाश, उराटा "सज करी रवदळी । सरोवरामाजी कमळी । "--रक्मिणीखयवर न० १३-६ १०पर, गदर ११चाराने १२ वधन १३ मगवताच्या यशाचा अवतारकथाचा महिमा १४ सकट TT