Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/719

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९३ अध्याय सब्जिसावा. वर्षे झाली साठी । तरी अग्निसमें द्रव उपजे घटी । तेवीं प्रमदासंगपरिपाठी । वार्धकीही उदी अतिकामू ॥ ४४ ॥ जरी कापूर अग्नीआंत । नादो लाहता न पोळत । तरी स्त्रीसमें परमार्थ । पावसे समस्त परजाना॥४५॥ अग्निपोळा धरिता हाती । तैसी स्त्रियाची संगती । सगे वाढवी आसकी। पाडी अनर्थी पुरुषांतें ॥४६॥ त्रियेपरी स्त्रैण । संगती मीनलिया जाण । कोटि अनर्थाचें भाजन । अध:पतन तत्सगें ॥४७॥ तैसी स्त्रैणेसी झाल्या भेटी । ब्रह्मानद स्वीसुखाच्या पोर्टी। ऐशा विरता प्रवोधी गोठी । करी उठाउठी स्त्रीकाम ॥४८॥ तेथ स्वदारा आणि परदारा । या करूं नेदी विचारा । प्रवर्तवी स्वेच्छाचारा । स्त्रैण खरा अतिघाती ॥४९॥ स्त्रैण जेथे प्रवेशला। तेथ अनाचार वेलिंगला । अधर्म सर्वागीं फुलला । वाधकत्वे फळला अनर्थ फळी ।। २५० ॥ यालागी जो परमार्थी । तेणे स्त्रैणाची सगती । सर्वथा न धरावी हाती । पाडी अनर्थी तो सग ॥५१ ॥ मुख्य स्त्रेणचि चाळिला आहे। तेथे स्त्रीसंग कोठे राहे । हे सगतीचि पाहें । सेव्य नोहे परमार्था ॥ ५२ ॥ यालागी साधी आपण । स्त्रीनिरीक्षण सभापण । सर्वथा न करावे जाण । एकातशील न कधी व्हावे ।। ५३ ।। ह्मणसी विवेकी जो आहे । त्यासी सग करी काये । स्त्रीसगास्तव अपाये । सोशिले पाहे सुज्ञानी ॥५४॥ पराशरासी अर्ध घडी । नावेसी मीनली नावाडी । ते अर्धघटिकेसाठी रोकडी । अगी पैरवडी बाजली ॥ ५५ ॥ ऋष्यशृग अतितापसी । तोही वश झाला वेश्येसी । इतराची गोठी कायसी । मुख्य महादेवासी भुलविले ॥ ५६ ॥ विपयइंद्रियाचे सगतीं । अवश्य क्षोभे चित्तवृत्ती । तेथ सज्ञानही वाधिजती। मा कोण गती अज्ञाना || ५७ ॥ हेही असो उपपत्ती । न साहे स्त्रियाची सगती । कामक्षोभ एकांती । तेंचि विशदार्थी नृप बोले ॥ ५८ ॥ ___ अदृष्टादश्रुताभायान भाव उपजायते । असमयुक्षत माणान् शाम्पति स्तिमित मन ॥ २३ ॥ जे देखिले ऐकिले नाहीं । ऐशिया विषयाचे ठायीं । पुरुपाचे मन पाही । सर्वथा कहीं क्षोभेना ॥ ५९॥ जे पूर्वभुत विषय असती । तेचि स्मरण झालिया चित्तीं । कामउद्रेके क्षोभे वृत्ती । नसता सगती स्त्रियेची ॥ २६० ॥ एवं पूर्वापर विपयासक्ती । पुरुषासी बाधक निश्चितीं । तो वैसल्याही एकांती । वासनासस्कारें वृत्ति सकामें क्षोमे ॥ ६१॥ पूर्वदिवशीची पक्वान्ने । जी ठेविली अतियते । ती न करिताही राधणे । पहाटे भक्षणे स्वयें जेवीं ॥ ६२ ॥ तेवीं वासनासस्थित काम । पुरुपास करी सकाम । काम क्षोभ पाडी श्रम । कर्माकर्म स्मरेना ॥ ६३ ॥ एवं वासना कामसगती । बाधक होय परमार्थी । यालागी साधकी समस्ती । स्त्रीकामासक्ती त्यागावी ।। ६४ ॥ मनी क्षोभल्या कामासक्ती। साधी तेथे करावी युक्ती । आवराव्या वाह्यं इद्रियवृत्ती । तें मनासी शाति हळूहळू होय ।। ६५ ।। कर्मेद्रियी राखण । दृढ वैराग्य ठेविलिया जाण । मनीं क्षोभल्या काम पूर्ण । आपल्या आपण उपशमे ।। ६६ ।। जेणे पडिजे अनर्थी । ते त्यागावी सगती । सगत्यागाची निजस्थिती। दृढ श्लोकार्थी नृप वोले ॥ ६७ ।। १ राहू शकता २ स्त्रीलपटाची ३ खस्नी ४ वाढतो ५ अनर्थरूप फलानी ६ टाकला, निषिद्ध केला ७ अनर्थ ८ नावास्याची कन्या सापडली ९ दोपप्रसार १० दोषात सापडतात १५ सट होण्याकरिता १२ पाही १३ पूरी भोगलेले १४ मदनाचा प्रादुर्भाव होऊन १५ पाक करणे, तयार करणे १६ वासनेत राहिलेला १५ याहेरील - - विपथावर