पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/718

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९२ एकनाथी भागवत. जण । तेथ मी भोक्ता हा अभिमान । तो केवळ जाण मूर्खत्वें ॥ २३ ॥ एथ एक मी विशिष्ट भोक्ता । माझा देह ऐसी ममता । हेचि जाण तत्त्वतां । अधःपांता नेतसे ॥२४॥ तस्मिन्कलेवरेऽमेध्ये तुच्छनिष्ठे विपजते । अहो सुभद्र सुनस मुस्मित च मुख त्रिय ॥ २० ॥ • देहो तितुका अशौचकर । त्यांत स्त्रीदेह अतिअपवित्र । केवळ विटाळाचें पात्र । निरंतर द्रवरूपे ॥ २५ ॥ स्वयें भोका अतिकुश्चित । ऐसे अविवेकी कामासक्त । कामिनीकामी लोलंगत । ते मूर्ख वानीत स्त्रियांते ।। २६ ।। अहो हे सुंदर सुरेख । चंद्रवदन अतिसुमुख । सरळ शोभे नासिक । सुभग देख सुकुमार ॥ २७ ॥ ऐशिये सुंदर स्त्रियेते। पावलो आही सभाग्य येथें । ऐसे कामासक्तचित्तें । भुलली भ्रांत प्रमदासी ॥ २८ ॥ स्त्रीदेहाचे विवंचनें । विवंचितां ओकारा ये मने । जळो स्त्रियेचें निंद्य जिणें । मूर्ती रमणे ते ठायीं ॥ २९ ॥ स्वासरधिरनायुमेदोमनाऽस्थिसहतो । बिमूत्रपूये रमता कृमीणा कियदन्तरम् ॥२१॥ स्त्रीदेहाचा उभारा । केवळ अस्थीचा पांजरी । त्याचे आवरण ते स्नायु शिरा । बांधोनि खरा दृढ केला ॥ २३० ॥ तेथ रुधिरमांसाचे कालवण । करूनि पांजरा लिंपिला पूर्ण । अस्थीवरील जें वेष्टण । मजा ह्मणती त्या नाव ॥ ३१ ॥ अस्थिमाजील सुव। त्या नांव बोलिजे मेंदू । वरी चर्म मढिले सुवद्धू । त्वचा शुद्धू ती नाव ॥ ३२ ॥ त्या देहामाजीं सांठवण । विष्ठा मूत्र परिपूर्ण । ते स्त्रीदेहीं ज्याचें रमण । ते कृमि जाण नररूपें ॥ ३३ ॥ विष्ठेमाजी कृमि चरती । तैसी स्त्रीदेही ज्या आसक्ती । तेही कृमिप्राय निश्चिती । सदेह ये अर्थी असेना ॥ ३४ ॥ वनितादेह यापरी एथ। विचारिता अतिकुश्चित । तो वस्त्रालंकारी शोभित । करूनि आसक्त नर होसी ॥ ३५ ॥ घंटापारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांतें धरी । पुरुष स्त्रियेतें शंगारी । त्या पाशाभीतरी स्वयें अडके ॥३६॥ यालागी स्त्रियांची संगती । कदा न करावी विरक्तीं। गृहस्थी सांडावी आसक्ती। येचि अर्थी नृप बोले ॥ ३७॥ ___अथापि नोपसमेत स्त्रीपु स्वेणेषु चार्थवित् । विपयेन्द्रियसयोगान्मन क्षुभ्यति नान्यथा ॥ २२ ॥ स्त्रीदेह शोभनीय असता । तरी वस्त्रेवीण शोभता । तो अतिनिंद्य कुश्चितता । उघड सर्वथा शोभेना ॥ ३८ ॥ यालागी वस्त्राभरणीं। देह गुंडिती कामिनी । जवी मैद ब्राहाणपणी । विश्वासूनी घातक ॥ ३९ ॥ तैसी स्त्रियाची सगती । सेवा लावी नाना युक्ती। शेखी सगै पाडी अधःपाती । तेय विरक्ती नवजावे ॥२४०॥ जरी स्त्रियेची विरक्तस्थिती । तरी साधकीं न करावी सगती। अग्निसगै घृते द्रवती । तेवी विकारे वृत्ति स्त्रीसगें ॥४१॥ अमृत झणोनि खाता विख । अवश्य मरण आणी देख । स्त्री मानूनि सात्विक । सेवितां दुःख भोगवी ॥ ४२ ॥ अग्निमाजी घृताची वस्ती । जरी बहुकाळ निर्वाहती । तरी स्त्रीसगें परमार्थी । निजामस्थिती पावते ॥ ४३ ॥ धृत वेचल्या नरकास २ तेऽस्मिन् ३ अपविन ४ मत्सत पापी ५ वर्णितात ६ विचारदृष्टया पाहता ७ पटाया, विटकारा ८ घण हाडांचा सापळा किंवा सागाडा १० किडे ११ स्त्रीदेह १२ स्वचा, मास, रक, स्नायु, मेद, मन्ना, हा.. याचा संपात, विष्ठा, मूल व पू यांचे कोठार असा हा समगळ देह आहे १३ सुदर १४ गुडाळितात १५ ठक, भामटे १६ आरमसरूप