Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/714

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૬૮૮ एकनाथी भागवत. वाणी । उर्वशी वेश्या कामचारिणी । जे बहुजनी भोगिली ॥ ३९ ॥ ऐशियेच्या कामासफता । मी सर्वस्वे भुललों आतां । ते भुललेपणाची कथा । अनुतापता स्वयें वोलें ॥१४० ॥ धर्मपत्नीसी भोगिता काम । सहसा नासेना स्वधर्म । मज वोढवलेसे दुष्ट कर्म । वेश्येसी परम भुललों ॥ ४१ ॥ परदारा अभिलापिती । ते अवश्य नरका जाती । मा स्वदाराकामासक्ती । तेथही अधोगती सोडीना ॥ ४२ ॥ स्त्रियां भुलविले हरिहर । स्त्रियां भुलविले ऋपीश्वर । स्त्रिया भुलविले थोर थोर । मीही किंकर स्त्रियों केलों ॥ ४३ ।। राज्य आणि राजवैभव । वेश्येअधीन केले सर्व । याहूनि केले अपूर्व । तीलागी जीव अर्पिला ॥ ४४ ॥ मी राजवर्या मुकुटमणी । तो दास झालो तिचे चरणी । वाप कंदांची करणी । केलों कामिनीअधीन ॥ ४५ ॥ ऐशिया मज राजेश्वरातें । वेश्येने हाणोनि लाते । उपेक्षुनियां तृणवते । निघाली निश्चिते साडोनी ॥४६ ॥ तीस जाता देखोनि पुढे । मी नागवा धांवे लवडसवडें । लाज सांडोनिया र. । तरी ते मजकडे पाहेना ।। ४७ ॥जेवीं का लागले महद्भूत । नातरी पिशाच जैसे उन्मत्त । तेवी नागवा धांवे रडत । तरी तिचे चित्त द्रवेना ॥ ४८ ॥ तरी रडत पडत अडखळत । मी निर्लज्ज तीमागे धावत । माझे मोहाचा अतिअनर्थ । अपमान ग्रस्त मज झाला ॥ ४९ ॥ फुतस्तस्यानुभाव सात्तेज इशित्वमेव वा । योऽन्वगच्छ त्रिय यान्ती सरवत्पादताडित ॥ मी महत्त्वे राजराजेश्वरू। ऐसा गर्व होता दुर्धरू । तो मी वेश्येचा अनुचरू । झालों किकरू निजागे ॥ १५० ॥ एवढाही मी राजेश्वरू । मागे धावे होऊनि किकरू । तरी ते न करी अंगीकारू । जेवीं वोसडी खरू खरी जैशी ॥ ५१ ॥ जेवीं खरी देखोनियां सरू। धांवोनि करी अत्यादरू । येरी उपेक्षुनि करी मारू । अतिनिठुरू लाताचा ॥ ५२ ॥ तिच्या लाता लागता माथा । खरू निघेना मागुता । त्या खराऐशी मूर्खता । माझे अगी सर्वथा बाणली ॥ ५३ ॥ स्त्री उदास कामदृष्टी । मी आसक लागें पाठी । माझ्या समर्थपणाची गोठी । सागता पोटीं मी लाजे ॥५४॥ ऐसे स्त्रीकाम ज्याचें मन । त्याचे योग याग अनुष्ठान । अवघेचि वृथा जाण । तेचि निरूपण निरूपी ॥ ५५ ॥ कि विद्यया किं तपसा कि त्यागेन श्रुतेन धा । कि विविक्तेन मोनेन स्त्रीभिर्यस्य मनो हतम् ॥१२॥ स्त्रीकाममय ज्याचे मन । त्याची वृथा विद्या वृथा श्रवण । वृथा तप वृथा ध्यान । त्याग मुंडण तें वृथा ॥ ५६ ।। वृथा एकांतसेवन । वृथा जाण त्याचे मौन । राखेमाजी केले हवन । तैसे अनुष्ठान स्त्रीकामा ॥ ५७ ॥ कामासक्त ज्याचे चित्त । त्याचे सकळही नेम व्यर्थ । आपुलें पूर्ववृत्त निदित । अनुतापयुक्त नृप वोले ॥५८ ॥ वार्थस्याकोविद धिमा मूख पण्डिमानिनम् । योऽहमीश्वरता प्राप्य स्वीमिर्गौसरबजितः ॥ १३ ॥ चहूं पुरुषार्थाचे अधिष्ठान । नरदेह परम पावन । जेणे देहें करितां भजन । ब्रह्म १ एकाएकी २ विष्णु य शकर ३ चाकर, दास ४ मोठी ५ सार्वभौमाला, चक्रवती राजाला ६ गवताच्या काडीप माणे ७ घाईघाईन, उत्स्टेने ८ पाठीमागून लुडबुडत धावणारा ९ लाथा मान द्वइते १० गाढवी ११ वामनपडित हाणतात "मवोडाच्या लाथा खर पुरुष सोसूनि रमती" मोरोपतानाही विषयी जनाच्या निरज्जपणाचा असाच दयात घेतला आहे "स्त्री हाणिती जर शिरी हि सकोप टाचा । लागे तथापि रस गोटाच खोपटाचा" १२ ससार टाकणे सन्यास